मूळव्याध, हा एक जीवनशैलीशी  निगडीत असणारा आजार आहे. तुम्हाला मूळव्याद असेल तर त्यासाठी काय उपाय, उपचार करावे किंवा तुम्हाला मूळव्याद नसेल तर ते होऊ नये म्हणुन तुम्ही काय पथ्य पाळावे याची सर्व माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

अनुक्रमणिका

मूळव्याधा ची इतर नावे:-

Mulvyadh In English- Piles / Hemorrhoid

मूळव्याध को हिंदी में बवासीर कहते है |

मूळव्याधाला मराठी/संस्कृत मध्ये ‘अर्श’ असेही नाव आहे.

मूळव्याध म्हणजे काय ? / What is Piles in Marathi ?

मूळव्याध हा गुदव्दाराच्या आतील तसेच बाहेरील भागाचा आजार असून यामध्ये गुद-व्दाराच्या रक्तवाहिन्या फुगतात, सुजतात, त्या ठिकाणी वेदना होतात, तसेच यातून रक्त-स्राव देखील होतो. 

मूळव्याधाची कारणे काय आहेत? What are the Causes of Piles in Marathi ?

 •  बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे
 • शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे
 • गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे  बद्धकोष्ठता होते
 • प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.
 • चुकिची आहार पध्दति- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन
 • बराच काळ एका जागी बसून राहणे.
 • लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे
 • अनुवंशिकता 
 • अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते. 
 • रक्तवाहिण्यांचे आजार

मूळव्याधाची लक्षणे काय-काय असतात ? What are the Signs & Symptoms Of Piles in Marathi ?

 • शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना
 • शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे
 • गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे – आव पडणे.
 • गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.
 • पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहितरी आहे असे सतत जाणवत राहते.
 • अ‍ॅनिमिया- मूळव्याधामध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्ठेला अ‍ॅनिमिया असे म्हणतात.
 • भूक मंदावणे – शौच विधिच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामूळे रुग्ण जेवण कमी करु लाग़तो. परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवना मुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मुळव्याधाचा त्रास ही वाढतो.
 • रुग्णाचे वजण कमी होते.
 • सततच्या मुळव्याधाच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.

मूळव्याधाचे प्रकार काय आहेत? What are the Types of Piles in Marathi ?

उत्पत्ती स्थानानुसार प्रकार- Types by Origin:-

उत्पत्ती स्थानानुसार म्हणजेच मूळव्याध नक्की कुठल्या ठिकाणी होते त्यानुसार त्याचे २ प्रकार पडतात.

 1. अंत:र्ग़त मूळव्याध-
 2.  बाह्य: मूळव्याध

१)अंतर्ग़त मूळव्याध- Internal Piles :-

गुदद्वाराच्या आत होणा-या मूळव्याधाला अंतर्ग़त मूळव्याध असे म्हणतात.

या प्रकारच्या मूळव्याधामध्ये वेदाना कमी प्रमाणात व रक्तस्त्राव जास्त प्रमाणात असतो.

२) बाह्य: मूळव्याध- External Piles :-

गुदद्वाराच्या बाहेरिल भागात होणा-या मूळव्याधाला बाह्य: मूळव्याध असे म्हणतात.

या प्रकारच्या मूळव्याधामध्ये वेदाना व रक्तस्त्राव अत्यल्प असतो.

परंतु खाज जास्त प्रमाणात असते.

मुळव्याध फोटो Piles Photo, Image, मूळव्याध Piles, www.marathidoctor.com, drvivekanand ghodake, mulvyadh upay, Piles in Marathi, डॉ.विवेकानंद वि. घोडके mulvyadh image, mulvyadh photoमूळव्याधाचे प्रकार Types of Piles in Marathi,
मुळव्याध फोटो, Piles Photo, Image, मूळव्याध, Piles, mulvyadh upay, Piles in Marathi, mulvyadh photo

मूळव्याधाचे प्रकार अवस्थेनुसार, Piles type by Grade or severity :-

मूळव्याधाचा आजार किती बळावलेला आहे त्यानुसार त्याचे ४ अवस्था मध्ये वर्गिकरण केले जाते.

प्रथम अवस्ठा – Grade 1

जेव्हा गुदभागी अल्पप्रमाणात वेदना, खाज व आग होते. तेव्हा त्यास प्रथम अवस्था असे म्हणतात.

या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार केल्यास औषधोपचाराने मूळव्याध पूर्ण बरे होऊ शकते.

व्दितीय अवस्था- Grade 2

जेव्हा प्रथम अवस्थेतील गुदभागी वेदना, खाज व आग हि लक्षणे वाढतात. तसेच

बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे

गुदाच्या ठिकाणी कोम्ब आल्यासारखा जानवणे, त्या ठिकाणी वेदना खाज होते.

रक्तस्राचे प्रमाण प्रथम अवस्थेपेक्षा वाढते तेव्हा त्यास व्दितीय अवस्था असे म्हणतात.

यामध्ये मूळव्याधाचे कोम्ब शौच विधीच्या वेळेस गुदव्दाराच्या बाहेर येतात व शौच विधीच्या नंतर ते बाहेर आलेले कोम्ब आपोआप आत जातात.

या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्थपालन केल्यास औषधोपचाराने मुळव्याध पूर्ण बरे होते.

मूळव्याध Piles, www.marathidoctor.com, drvivekanand ghodake, mulvyadh upay, मूळव्याधाचे प्रकार अवस्थेनुसार, Piles type by Grade or severity डॉ.विवेकानंद घोडके, www.drvvg.com
मूळव्याधाचे प्रकार अवस्थेनुसार, Piles type by Grade or severity

तृतीय अवस्था- Grade 3

बद्धकोष्ठता, शौचाच्या वेळी त्रास, रक्तस्राव, दाह,खाज ही लक्षणे व्दितिय अवस्थेपेक्षा वाढतात.

या अवस्थेमधे शौच विधीच्या वेळेस गुदव्दाराच्या बाहेरआलेले मुळव्याधाचे कोम्ब आपोआप आत जात नाहित, ते तसेच गुदव्दाराच्या बाहेर राहतो, कोम्बाला बोटांनी आत ढकल्या नंतरच कोम्ब आत जातो.

या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्यपालन केले तरिही काही रुग्णांमधे औषधोपचाराने मूळव्याध बरे होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे या अवस्थेत शल्यचिकित्सा म्हणजेच ऑपरेशन करावे लागू शकते.

चतुर्थ अवस्था‌- Grade 4

चतुर्थ अवस्थेत तृतिय अवस्थेतिल लक्षणे वाढतात. ही गंभीर अवस्था आहे, या अवस्थेत उपचारास विलंब करु नये.

यामध्ये शौच विधीच्या वेळेस गुदव्दाराच्या बाहेर आलेले मूळव्याधाचा कोम्ब आपोआप आत जात नाहित, तसेच तो बोटानी ढकलून सुद्धा आत जात नाही ते तसेच गुदव्दाराच्या बाहेर राहतात.

या चतुर्थ अवस्थेत मूळव्याधाचा उपचार फक्त शल्यचिकित्सेने म्हणजेच ऑपरेशन व्दारेच होऊ शकतो.

मूळव्याध घरगुती उपाय, Piles Home Remedies in Marathi :-

मूळव्याधाच्या उपचारातील सर्वात महत्वाचा भाग हा पथ्य पालन आहे, रोज शौचस साफ झाल्यास मूळव्याधाचा त्रास आपोआप कमी येतो.

१ ) कागदी लिंबू कापून ५ ग्रॅम काथ बारीक वाटून त्या अर्ध्या-अर्ध्या कापलेल्या लिंबावर लावावा व रात्र भर तसाच ठेवावा , सकाळी दोन्ही तुकडे चोखावे. रक्तस्राव बंद करण्यासाठी हे उत्तम औषध आहे, १५ दिवस दररोज हा उपाय करावा.

२ ) झेंडूची १० पाने आणि ३ ग्रॅम काळी मिरी पाण्यात वाटून गाळून प्यायल्याने मुळव्याध मधून रक्त येणे थांबते.

३ ) आल्याची एक गाठ वाटून एक कप पाण्यात उकळावी, एक चतुर्थाश पाणी उरल्यावर चूलीवरून उतरून थंड करावे, त्यात एक चमचा साखर घालून रोज सकाळी प्यायल्याने मूळव्याध बरे होतात.

४ ) एक ग्लास मुळयाचा रस काढून त्यात शुद्ध तुपातली जिलेबी ( १०० ग्रॅम ) टाकून तासभर झाकून ठेवावे, नंतर जिलबी खात – खात मुळयाचा रस पिऊन टाकावा. ८-१० दिवस हा प्रयोग केल्याने मूळव्याध बरे होतात. 

५) महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .

६) कायाकल्प तेलात किंवा जात्यादि तेलात सूती कपडा / कापूस तेलात भिजवून रात्री गुदा मार्गाच्या आत ठेवावा. 

७)  नारळाच्या शेंड्या ( भुया ) जाळून राख बनवून चाळून घ्यावी . नारळाचे हे भस्म तीन – तीन ग्रॅम सकाळी , दुपारी उपाशी पोटी ताकाबरोबर आणि सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यावे . एकदाच घेतल्याने मूळव्याधीत अपेक्षित फायदा होतो . 

८) रुईचा चिक व हळद यांच्या मिश्रणाचा १ ठिबका रोज रात्री मूळव्यधावर लावावा.


शुष्कार्श आणि रक्त मूळव्याधीचे अचूक औषध, Medicine for Bleeding and Non-Bleeding Piles in Marathi:-

१) देशी कापूर १००-२०० मिग्रॅ ( हरब-याच्या डाळिच्या १ दाण्या एवढा ) त्याला केळाच्या एका तुकड्यात ठेवून उपाशी पोटी गिळावे. एका घेण्यातच रक्तस्त्राव बंद होतो . 

रक्तस्त्राव न थांबल्यास उपरोक्त प्रयोग तीन दिवसांपर्यंत दिवसातून तीन वेळा करू शकता. हा प्रयोग यापेक्षा जास्त वेळा करू नये . ( हा प्रयोग संपल्यानंतर केळे खाणे निषिद्ध आहे . ) 

२) गायीच्या सहज पिता येईल अशा १ कप कोमट दूधात अर्ध्या लिंबाचा रस पिळून दूध फाटण्या पूर्वीच त्वरीत प्यावे . हा प्रयोग रक्त मूळव्याधजन्य रक्तस्त्रावाला त्वरीत बंद करतो . उपरोक्त प्रयोग एक किंवा दोन वेळेपेक्षा जास्त वेळा करू नये . 

आवश्यकता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा . 

सुचना, Directions:-

वरील कुठलाही उपाय करतांना त्याबरोबर ओवा, जंगली ओवा, आणि खुरासानी ओवा तिघांना बारीक चूर्ण करून थोडयाश्या लोण्यात कालवून सकाळ – संध्याकाळ पाइल्स फोडांवर लावावे.

अर्धा चमचा हस्तिदंता चे चूर्ण अग्नित जाळून त्याचा धूर पाइल्स वर घेतल्यास पाइल्स मधे आराम येतो.

जर वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.

मूळव्याध रोगासाठी योगाभ्यास, Yoga Postures For Piles in Marathi:-

मण्डूकासन , शशकासन , गोमुखासन , वक्रासन , योगमुद्रासन , पवनमुक्तासन , पादांगुष्ठनासास्पर्शासन , उत्तानपादासन , नौकासन , कंधरासन , सर्व प्राणायाम व विशेषतः मूलबंधाचा अभ्यास करावा . 

मूळव्याध पथ्य ( काय खावे/ काय करावे), Diet For Piles in Marathi :-

 • मलावष्ठंभ असल्यास त्याचा उपचार करावा.
 • आहारात देशी गायीच्या तुपाचा वापर करावा तसेच आहारात कच्च्या तेलाचे प्रमाण थोडेसे वाढवावे.
 • भाकरी किंवा चपाती करताना पिठ चाळू नका, यामुळे पिठातील फायबर आहारात जातील व शौचास साफ होईल.
 • शौचा ला गेल्यावर कुंथु नये / जोर करु नये.
 • ज्या पदार्थानी बद्धकोष्ठता होईल असे पदार्थ खाऊ नये.
 • योग्य प्रमाणात पाणी पिणे, कमितकमी दररोज ८ ग्लास.
 • फाबरयुक्त आहार – फळे, पालेभाज्या यांचे आहारातील प्रमाण वाढवावे.
 • मांसाहार टाळावा.
 • अतिआंबट, अतिखारट, अति मसालेदार पदार्थ खाऊ नये.
 • एका जागी जास्त काळ बसू नये.
 • रात्री झोपताना पायाकडची बाजू उंच करावी.

सर्वांत महत्वाचे मूळव्याधाचा उपचार लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरां कडून करून घ्यावा.

मूळव्याधाचे आधुनिक चिकित्सा पर्याय, Piles Treatement in Marathi:-

मूळव्याधासाठी औषध-ग़ोळ्या-मलम, Medicine-Tablets-Cream for Piles in Marathi :-

मूळव्याध जर प्रथम व व्दितीय अवस्थेत असेल तर ते औषध-ग़ोळ्या-मलमा व्दारे बरे होऊ शकते.

यासाठी आपले डॉक्टर खालिल प्रकारे औषधे देतात.

१) वेदनाशामक गोळ्या / Pain Killer

२) पोट साफ होण्याची औषधे / Laxative

३) अ‍ॅन्टिबॉयोटिक्स / Antibiotics

४)मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची गोळ्या

५) मलम / Cream for Piles- 

वेदनाशामक‌+मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची औषधे+अन्टिबॉयोटिक्स+सुज कमी करणारे 

अशा सर्व घटकांना एकत्र करुन तयार केलेला मलम दिला जातो.

मलम शौच्याला जायच्या आधी व शौच्याला जाऊन आल्यानंतर मूळव्याधावर लावतात.

बिनटाक्याच्या व विना-चिरफाड मूळव्याध उपचार पद्धती :-

या मध्ये प्रामुख्याने खालील ४ उपचार पद्धतींचा समावेश होतो

मूळव्याधाचे इंजेक्शन, Injection treatement ( Sclerotherapy) for Piles in Marathi:-

मूळव्याध प्रथम अवस्थेत (लहान कोंब) असल्यास मूळव्याधीच्या कोम्बांच्या मुळाशी फिनॉल व बदामाच्या तेलाच्या किंवा Aluminum Potassium Sulphate and Tannic acid मिश्रणाचे इंजेक्शन दिले जाते, दिड-दिड महिण्यांच्या अंतराने ३ वेळा अशा प्रकारचे इंजेक्शन देतात. या उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. ह्या उपचारानंतर काही वर्षांनी मुळव्याध पुन्हा उत्पन्न होऊ शकते. हि बिनटाक्याची व विनाचिरफाड मुळव्याध उपचार पद्धती आहे

रिंग बँडिंग (रिंग टाकणे), Rubber-Band Ligation for Piles in Marathi :-

व्दितीय अवस्थेतील मूळव्याध (थोडा मोठा कोंब) असल्यास मुळव्याधाच्या मुळावर बँड (रिंग) लावून मुळव्याधाच्या कोंबाचा रक्तप्रवाह बंद केला जातो. यामुळे काही दिवसांत कोंब बारिक होतो, सुकतो, कुजतो आणि लावलेल्या रिंगसह गळून बाहेर पडतो. 

मूळव्याध Piles, www.marathidoctor.com, drvivekanand ghodake, mulvyadh upay, रिंग बँडिंग (रिंग टाकणे), Rubber-Band Ligation for Piles in Marathi, डॉ.विवेकानंद घोडके, www.drvvg.com
रिंग बँडिंग (रिंग टाकणे), Rubber-Band Ligation for Piles in Marathi

एकाच वेळी केवळ दोनच कोंबांवर बँड (रिंग) लावून उपचार करता येतात. ही प्रक्रिया सोपी असून रुग्ण उपचारानंतर त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. उपचारानंतर संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. हि बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे

क्रोयोसर्जरी Cryosurgery for Pile in Marathi :-

अती थंड अश्या लिक्विड नायट्रोजनद्वारे मूळव्याधाचा कोंब गोठवला जातो. हा कोंब नंतर गळून जातो. 

आजकाल हि शस्त्रक्रिया खुप कमी प्रामाणात प्रचलित आहे, कारण या उपचारा नंतर गोठविलेल्या कोंबातून बरेच दिवस स्राव होत राहतो तसेच खुप दिवस वेदनाही होतात. उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. हि बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे

इन्फ्रारेड फोटोकोऑगुलेशन, Infrared Coagulation for Piles in Marathi :-

या उपचार पद्धतीत इंफ्रारेड किरणांचा वापर केला जातो, हि किरणे मूळव्याधावर सोडली जातात, त्यामुळे उष्णता निर्मान होते, मुळव्याध जळून नष्ट होते. गुदद्वाराच्या आतील बाजुच्या मूळव्याध कोंबाच्या उपचारा साठीच या उपचार पद्धतिचा वापर केला जातो. उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. मुळव्याद पुन्हा निर्माण होण्याचा प्रमाण या उपचारात कमी असतो. हि बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे

ऑपरेशन व्दारे मूळव्याध कापूण काढून टाकणे, Piles Operation (Haemorrhoidectomy) in Marathi :-

तृतीय किंवा चतुर्थ अवस्थेतील मूळव्याधासाठी (कोंब मोठे असल्यास, गुदद्वाराच्या बाहेर येत असल्यास किंवा खूप जुनाट असल्यास) या पद्धतीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. 

या पद्धतीत भूल देऊन मूळव्याधीचे कोंब कापूण टाकतात. 

या पद्धतीच्या शस्त्रक्रिये नंतर रुग्णाला ३-५ दिवसापर्यंत रुग्णालयात भर्ति व्हावे लागते.

शस्त्रक्रियेनंतर दिड ते दोन आठवडे ड्रेसिंग करावी लागते.

तसेच गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते.

लेझर द्वारे ऑपरेशन, Laser Surgery for Piles in Marathi:-

लेसर किरणांचा मूळव्याधावर मारा केला जातो, लेसर किरणांच्या संम्पर्कात आल्यामुळे मूळव्याध जळून नष्ट होते. सध्या हिच उपचार पद्धती जास्ती प्रचलित आहे, यामध्ये कोणतीही चिरफाड केली जात नाही, तसेच टाकाही घेतला जात नाही.

यामध्ये कमीत-कमी रक्तस्राव होतो. तसेच उपचारा नंतर रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. १-२ दिवसांच्या आरामानंतर रुग्ण त्याची दैनंदिन कामे सुरू करू शकतो.

या पद्धतीत गुदाच्या रिंग ला अजिबात इजा होत नाही, त्यामुळे इतर मुळव्याधाच्या ऑपरेशन नंतर शौचाचा कंट्रोल जाण्याची भिती राहत नाही.

लेझर सर्जरी हि नवीन ऑपरेशन ची पद्धत, मूळव्याधाच्या रूग्णासाठी एक वरदानच आहे, या ऑपरेशन नंतर त्या मूळव्यधाच्या जागी पुन्हा मुळव्याध होत नाही.

मूळव्याध फोटो / Piles Photo, Image

मुळव्याध फोटो Piles Photo, Image,मूळव्याध Piles, www.marathidoctor.com, drvivekanand ghodake, mulvyadh upay, Piles in Marathi, डॉ.विवेकानंद घोडके,मुळव्याध कोंब
मूळव्याध व त्वचेचे कोंब फरक / Pile vs skin tag in marathi
मूळव्याध चतुर्थ अवस्था‌ - Piles Grade 4 ,मुळव्याध फोटो Piles Photo, Image,मूळव्याध Piles, www.marathidoctor.com, drvivekanand ghodake, mulvyadh upay, Piles in Marathi, डॉ.विवेकानंद घोडके
मूळव्याध चतुर्थ अवस्था‌ – Piles Grade 4

मूळव्याधा संबधित वारंवार विचारले जाणारे प्रश्र्न / Piles FAQ in Marathi:-

प्रश्न- Mulvyadh meaning in English

उत्तर-Piles or Hemorrhoids

प्रश्न- मूळव्याधाला इंग्लिश मधे काय म्हणतात?

उत्तर- Piles or Hemorrhoids

प्रश्न- Piles meaning in Marathi?

उत्तर- मूळव्याध

प्रश्न- Best cream for Mulvyadh / Piles?

उत्तर- ज्या क्रिम मध्ये लिगनोकेन हा घटक असतो ती क्रिम वेदनेवर लवकर प्रभावी ठरते.


2 Comments

Kadam v.v · 23/12/2019 at 9:26 am

खूप छान माहिती बऱ्याच जणांना या आजाराविषयी माहिती मिळत नाही घरगुती औषधे आपण सांगितली आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या माहितीचा सर्वांना उपयोग होईल

स्वयंपाक घरातील औषधे, Home Remedies from the Kitchen in Marathi. » · 28/12/2019 at 12:24 pm

[…] अति रक्तस्त्राव किंवा रक्त मूळव्याधाची समस्या असेल […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.
%d bloggers like this: