आरोग्य सेविकेची सिस्टरची कर्तव्ये व जबाबदाऱ्या ANM Job Chart in Marathi

Published by Team Marathi Doctor on

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

ANM Job Chart in Marathi, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग ( शासन निर्णय क्रमांक – आरईएस १०.१००१ / प्र.क्र .१ १२२ / सेवा दिनांक -११/१२/२००१ ) बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी ( महिला ) या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, ANM Job Chart in Marathi

ANM म्हजेच सरकारी दवाखान्यातील सिस्टर, यांचे मुख्यत्वे २ प्रकार पडतात.

१) कायम स्वरूपी भरती झालेल्या सिस्टर

२) NRHM च्या कंचराटी सिस्टर

बहुविध आरोग्य सेवा योजना अंतर्गत आरोग्य सेवेतील अमुलाग्र बदल लक्षात घेता बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी ( स्त्री ) या पदाची कर्तव्ये व जबाबदा – या या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आल्या आहेत .

आरोग्य सेविकेच्या जबाबदा-या

अ ) प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रम

१ ) समाजाच्या गरजांवर आधारित उपकेंद्र कृती आराखडा तयार करणे .

२ ) गरोदर मातांची नोंदणी करणे व त्यांना प्रसुतीपूर्व दरम्यान व प्रसूतीपश्चात सेवा देणे .

३ ) रक्तक्षयाकरिता शारिरीक तपासणी , लघवीतील साखर व प्रथिनांची तपासणी , रक्तातील लोहाचे प्रमाण , रक्तदाब घेण वजन घेणे आणि पोषण व विश्रांतीबाबत सल्ला देणे .

४ ) सर्व गरोदर स्त्रीयांची लैंगिक आजारांची तपासणी होईल याची खात्री करणे .

५ ) जोखमीच्या गुंतागुंत असलेल्या गरोदर मातांना वैद्यकिय उपचाराची आवश्यकता असलेल्या आणि प्रजननविषयक समस्या असलेल्या स्त्रीयांना संदर्भसेवेकरिता पाठविणे .

६ ) कार्यक्षेत्रात होणा – या एकूण प्रसूतीपैकि ५० टक्के प्रसूती स्वतः करणे .

७ ) कार्यक्षेत्रातील सर्व प्रसूती केवळ प्रशिक्षीत व्यक्तिंकडून होतील याची खात्री करणे व प्रशिक्षीत दाईकडून होणा – या बाळंतपणावर देखरेख करणे व त्यांना मदत करणे .

८ ) अडचणीचे बाळंतपण व जोखमीचे नवजात अर्भकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात / प्रथमस्तर संदर्भसेवा केंद्रात ताबडतोब पाठविण्यासाठी मदत व पाठपुरावा करणे ,

९ ) कार्यक्षेत्रात बाळंत झालेल्या प्रत्येक स्त्रीस कमीत कमी तीनदा भेटी देणे आवश्यक त्या सेवा व सल्ला देणे .उदा . स्तनपान , अर्भकांची काळजी आणि मातेची काळजी .

१० ) बालकांची वाढ व विकासाकडे लक्ष देणे .आणि आवश्यकता असल्यास संदर्भसेवा उपलब्ध करुन देणे .

११ ) मातांना व वयात येणाऱ्या मुलींना व्यक्तिगत किंवा एकत्रितपणे खालील बाबींवर आरोग्य शिक्षण देणे . कौटुंबिक आरोग्य , माता आणि मुलांचे आरोग्य , कुटुंब नियोजन , आहार , सांसर्गिक आजारावर नियंत्रण , लसीकरण , वैयक्तिक व परीसर स्वच्छता ईत्यादी जेणेकरुन रोगापासून बचाव करण्यासाठी आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी लोक स्वतः पुढे येतील .

१२ ) लैंगिक आजार व प्रजनन मार्गाचा जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांचा शोध घेणे व त्यांना आवश्यक त्या सेवा देणे .

१३ ) उपकेंद्र स्तरावर आरोग्य सेवा सत्रात आरोग्य सहाय्यिका व वैद्यकिय अधिकारी यांना मदत करणे .

१४ ) प्रत्येक गांवांत आरोग्य सेवा सत्राचे आयोजन करून लाभार्थ्याला आवश्यक सर्व आरोग्य सेवा पुरविणे .

१५ ) सर्व गरोदर स्त्रियांना धनुर्वात प्रतिबंधक लसीच्या आवश्यक मात्रा देणे .

१६ ) कार्यक्षेत्रातील सर्व अर्भके व मुलांचे लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे योग्य वयात करणे .

१७ ) लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या सुया व सिरींजेस आणि इतर साहित्याचे व्यवस्थित पणे निर्जंतुकिकरण झाले किंवा नाहि याची खात्री करणे . व प्रत्येक लाभार्थीला वेगळी सिरीज व सुई वापरणे .

१८ ) लसीची तपासणी करणे व दिलेलया सूचनांचे पालन करणे . लसीचे वेळापत्रक , महत्वाबाबत स्त्रियांना आरोग्य शिक्षण देणे .

१९ ) शालेयपूर्व बालके , गरोदर माता , स्तनदा माता आणि अर्भकांमध्ये कुपोषणाचे रुग्ण शोधून काढून अशा मुलांना आवश्यक तो उपचार देणे . आणि नजीकच्या अंगणवाडी / बालवाडी केंद्रात पुरक आहार घेण्याबाबत किंवा आवश्यकता असल्यास वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र यांचेकडे संदर्भसेवेसाठी रवानगी करणे ,

२० ) शालेयपूर्व बालके , गरोदर माता , स्तनदा माता आणि कुटुंब नियोजनाची पध्दत स्विकारणाऱ्याना आरोग्य सेविकांशी समन्वय साधून लोहयुक्त गोळयांचे वाटप करणे .

२१ ) तीन वर्षाखालील बालकांना जीवनसत्व अ च्या मात्रा पाजणे .

२२ ) स्थनिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थापासून समतोल आहार तयार करण्याबाबत लोकांना माहिती व आरोग्य शिक्षण देणे

२३ ) योग्य जोडपी आणि लहान मुलांच्या नोंदवहयांच्या आधारे कुटुंब नियोजन स्विकार करण्याकरीता जोडव्यांना व्यक्तिगत किंवा एकत्रितपणे प्रवृत्त करणे , कुटुंब कल्याण संबंधित सर्व नोंदवहया अद्यावत ठेवणे योग्य जोडप्यांना कुटुंब नियोजनाचा संदेश देणे .आणि कुटुंब नियोजनासाठी प्रवृत्त करणे .

२४ ) पात्र जोडप्यांना पाळणा लांबवण्यासाठी साधने पुरवणे

२५ ) कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी आणि तांबी बसबून घेण्यासाठी आलेल्या लाभार्थीना सुविधा पुरवणे व मदत करणे .

२६ ) कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतलेल्या लाभार्थीचा पाठपुरावा करणे.आणि त्यांच्या समस्या सोडविणे .

२७ ) समाधानी स्त्री लाभर्थी स्थानिक नेते आरोग्य मार्गदर्शक , शिक्षक , स्वयंसेवक , आणि इतरांशी चांगले स्नेहसंबंध प्रस्थापित करुन कुटुंब कल्याण कार्यक्रमाला चालना देण्याबाबत प्रवृत्त करणे

२८ ) निरोध व तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळयांच्या वाटपासाठी डेपोहोल्डर्सची निवड करणे.त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य सहाय्यिकेला मदत करणे.आणि डेपोहोल्डर्सना बरील साधनांचा नियमित पुरवठा करणे .

२९ ) महिला मंडळाच्या सभेत सहभागी होवून जमलेल्या समुदायाला कुटुंब कल्याण , मुलांचे आरोग्य इ.बाबत माहिती व आरोग्य शिक्षण देणे .

३० ) लैंगिक समानतेबाबत समाजाला प्रवृत्त करणे व प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांत पुरुषांचा सहभाग साधण्याबाबत प्रवृत्त करणे .

३१ ) वैद्यकिय गर्भपात करुन घेणऱ्या स्त्रियांना जवळच्या सरकारमान्य केंद्रात पाठवण्यासाठी मदत करणे व आरोग्य सहाय्यिकेला कळवणे .

३२ ) वैद्यकिय गर्भपात करुन घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती स्त्रियांना करुन देणे आणि त्याबाबत आरोग्य शिक्षण व संदर्भसेवा पुरविणे .

३३ ) असुरक्षित गर्भपात केल्यामुळे होणाया गंभीर परिणामांबाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे त्यांना असुरक्षित आणि बेकायदेशिर गर्भपात करुन घेण्यांपासून परावृत्त करणे ,

ब ) दाई प्रशिक्षण

१ ) कार्यक्षेत्रातील सर्व दाईंची यादी तयार करुन त्यांना कुटुंब कल्याण व सुरक्षित प्रसुतीबाबत मार्गदर्शन करणे .

२ ) दाई प्रशिक्षणांत आरोग्य सहाय्यिकेला मदत करणे .

क ) साथरोग नियंत्रण

१ ) गृहभेटी दरम्यान साथीच्या आजारांचे रुग्ण शोधून काढणे . उदा.अतिसार , हगवण , पूरळ असलेले तापाचे रुग्ण मेंदूदाह , धनुर्वात , काविळ , घटसर्प , पोलिओ इ . आणि अचानक साथीचे आजाराची अपेक्षेपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास आरोग्य सहाय्यक व वैद्यकिय अधिकारी यांना तातडीने कळविणे .

२ ) अतिसाराच्या सर्व रुग्णांस क्षारसंजीवनीचे द्रावण वयोगटानुसार देणे .

३ ) संशयित मोतिबिंदू आणि अंधत्वाच्या सर्व रुग्णांच्या नोंदी घेवून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवणे

४ ) गृहभेटीच्या वेळी आढळून आलेलया तापाच्या रुग्णंचा रक्त नमुना घेवून त्यांना गृहितोपचार देणे .आणि पुढील कार्यवाही करण्यास आरोग्य सेवकाला कळवणे .

५ ) गृहभेटीच्या वेळी कातडीवर चट्टा आढळलयास किंवा कातडीच्या रंगामध्ये बदल व त्या ठिकाणी संवेदना नसलेले रुग्ण शोधणे व ते आरोग्य सहाय्यकाला कळवणे .

६ ) क्षयरोग्यांची आणि कुष्ठरोग्यांची यादी करण्यास आरोग्य सेवकाला मदत करणे . वरील रुग्ण नियमित औषधोपचार घेतात काय यावर लक्ष ठेवणे . अनियमित व अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना नियमित व सेपूर्ण औष्धउपचारासाठी प्रवृत्त करणे . आणि आरोग्य सहाय्यक यांच्या निदर्शनास आणणे .

ड ) जीवनविषयक आकडेवारीची नोंद .

१ ) कार्यक्षेत्रात होण्याऱ्या जन्ममृत्युंची नोंद करणे . व तसा अहवाल आरोग्य सहाय्यक यांना कळविणे

२ ) कार्यक्षेत्रात होणाऱ्या रुग्णांची नोंद करणे आणि कायदयानुसार कमी वय असणाऱ्या मुलामुलींचे लग्न ठरल्यास किंवा झाल्यास आरोग्य सहाय्यक ( पु ) यांच्या निदर्शनास आणणे .

३ ) जन्म आणि मृत्युची नोंद वेळीच करण्याचे महत्व लोकांना सांगणे .

ई ) प्रथमोपचार व किरकोळ आजारांवर उपचार

१ ) प्रथमोपचाराचे साहित्य , क्षारसंजिवनी पाकिटे व किरकोळ आजारावरील औषधे योग्य त्या व्यक्तिंना / रुग्णांना उपलब्ध करुन देणे .

२ ) गंभीर आजार व गुंतागुंत झालेल्या , किरकोळ व साध्या आजारांच्या रुग्णांना वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र किंवा जवळच्या दवाखान्यांत पाठवणे ,

३ ) आरोग्य मार्गदर्शकाने पाठविलेल्या रुग्णांवर उपचार करणे व आवश्यक वाटल्यांस रुग्ण पुढील उपचारासाठी पाठवणे .

फ ) संघकार्य

१ ) प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सभेत हजर राहाणे व सहभागी होणे .

२ ) आपल्या कार्याचे आरोग्य सेविकेची आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी समन्वय साधणे .

३ ) प्रत्येक आठवडयाला एकदा तरी आरोग्य सहाय्यक ( स्त्री ) यांना भेट देणे . आणि त्यांचा सल्ला व मार्गदर्शन आवश्याकतेप्रमाणे घेणे .

४ ) कार्यक्षेत्रांत घेण्यात येणाऱ्या विविध शिबीरात आणि मोहिमेंत सहभागी होणे .

५ ) स्थानिक स्वयंसेवी संस्था शोधून त्यांना समाजाचे आरोग्य चांगले राखण्यास प्रवृत्त करणे .

म ) अहवाल व नोंदी ठेवणे .

१ ) सहा आठवडयानंतरच्या सर्व गरोदर माता , १२ महिने वयोगटांतील सर्व बालके , शालेयपूर्व बालके आणि १५ ते ४५ वयोगटांतील सर्व स्त्रिायांची नोंद करणे व नोंदवही तयार करणे .

२ ) प्रसुतिपूर्व , प्रसुतिसंबंधित आणि मुलांना देण्यात येणाऱ्या सेवांचे अहवाल तयार करणे .

३ ) योग्य जोडप्यांची यादी आणि लहान मुलांची यादी तयार करणे व अद्यावत ठेवण्यासाठी आरोग्य सेवकाला मदत करणे .

४ ) कुटुंब कल्याण साहित्य वाटप , तांबी बसवलेल्या स्त्रिया , कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या लाभार्थ्यांची यादी ठेवणे .

५ ) उपकेंद्र स्तरावर आरोग्य सेवा सत्रात वाटप केलेल्या स्त्रियांची नोंद ठेवणे .

६ ) आलेले साहित्य , व वाटप केलेले साहित्याची नोंद ठेवणे .

७ ) मासिक प्रगती अहवाल तयार करुन तो वेळीच आरोग्य सहाय्यिकेकडे पाठवणे .

ह ) इतर

१ ) अंगणवाडीला भेट देवून कुपोषित मुलांची यादी करुन मातेला आहाराबाबत आरोग्य शिक्षण देणे.

२ ) शालेय आरोग्य तपासणीत वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सहाय्यक यांना मदत करणे . नवीन कुष्ठरोगी शोध मोहिमेत सहभाग घेणे .


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.