कोरोना व्हायरस आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार मार्गदर्शक सूचना Coronavirus Treatment in Marathi

Published by Team Marathi Doctor on

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

कोवीड १ ९ कोरोना या आजाराच्या उपचारा साठी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी मार्गदर्शक सूचना. Ayush Guidelines for Covid 19 in Marathi, कोरोना साथीच्या रोगाकरीता आयुर्वेद , युनानी व होमिओपॅथी उपचार विषयक मार्गदर्शक सूचना टास्कफोर्स ऑन आयुष फॅार कोवीड १९ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्र शासन द्वारा निर्गमित. Corona Treatment in Marathi.

अनुक्रमणिका

कोरोना चे सामान्य प्रतिबंधात्मक उपाय:-

Covid 19 Safety Instructions in Marathi, Precautions of Covid 19 in Marathi –

१ ) वैयक्तिक स्वच्छतेचे व्यवस्थित पालन करावे .

२ ) वारंवार साबणाने हात वीस सेकंद पर्यंत धुवावे .

३ ) श्वसनाविषयक नियम पाळावेत – खोकताना व शिंकताना तोंड झाकावे .

४ ) ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा .

५ ) जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा .

६ ) पशुपालन गृह तसेच जिंवत पशु विक्री केंद्र किंवा कत्तल खाने या ठिकाणी प्रवास टाळावा .

७ ) थंड , फ्रिजमध्ये ठेवलेले व पचायला जड पदार्थ टाळणे हितकारक आहे . थंड वा-याचा थेट संपर्क टाळणे हे नेहमी फायदेशीर आहे .

८ ) प्रशिक्षित योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम यांचा सराव करावा .

९ ) पर्याप्त विश्रांती व वेळेत झोपणे हितकारक आहे .

Guidelines for COVID 19 in Marathi, Coronavirus Tips in Marathi –

भोजन / आहार:-

हे ताजे उष्ण व पचायला हलके असावे . त्यात आख्खी धान्ये आणि ऋतूनुसार भाज्या इत्यादींचा समावेश असावा , तुळशीची पाने , ठेचलेले आलेहळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे .

मुगाचे कढण / सुप –

मुग डाळ पाण्यात उकळवून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सुप / पाणी प्यावे , ते पोषक व पथ्यकर आहे .

सुवर्ण दुग्ध / हळदिचे दुध

१५० मिलीलिटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चुर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.

सर्दी व खोकला या सारखी श्वसन संस्थेची लक्षणे असल्यास मास्क चा वापर करावा. याशिवाय खालील नमूद विशिष्ट आयुष उपाययोजनांचे पालन करावे .

सर्दी व खोकल्यासाठी घरगुती उपाय ‌-

१ ) तुळशीची पाने , ठेचलेले आले हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे .

२ ) सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळीमिरी चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे .

३ ) तसेच उपरोक्त लक्षणांमध्ये तुळस ( ऑसीमम सँक्टम ) , गुडुची / गुळवेल ( टीनोस्पोरा कॅार्डीफोलीया ) , आले ( झिंझीबेर ऑफीसिनेल ) आणि हळद ( करकूमा लाँगा ) या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत . 

कोरोना व्हायरस कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध CoronaVirus in Marathi

कोरोना प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचार:-

Ayush Guidelines for Covid 19 in Marathi, Guidelines for Corona in Marathi –

रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी व कोरोना प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचार –

अ ) आयुर्वेदिक औषधी:-

१ ) संशमनी वटी –

संशमनी वटी ५०० मिली ग्रॅम – १ गोळी दिवसातून दोनदा – १५ दिवस

खरेदी करा संशमनी वटी, च्यवनप्राश

२ ) आयुष क्वाथ – Ayurvedic Kadha for Corona in Marathi –

Kadha for Corona in Marathi –

  • तुळस ४ भाग ,
  • सूंठ दोन भाग ,
  • दालचिनी दोन भाग व
  • काळीमिरी १ भाग

या द्रव्यांच्या भरड चुर्णाने काढा तयार करणे .

आयुष क्वाथ / काढा तयार करण्याची पद्धत Kadha for Corona in Marathi :-

वरील औषधींचे ३ ग्रॅम भरड चुर्ण १०० मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५ ते ७ मिनीटे झाकून ठेवणे व गाळून ते पाणी / काढा पिणे . हा काढा सकाळ व संध्याकाळ ताजा बनवून १५ दिवसांसाठी सेवन करावा .

३ ) च्यवनप्राश –

च्यवनप्राश १० ग्रॅम ( १ मोठा चमचा ) सकाळी सेवन करावे . मधूमेही रुग्णांनी साखर विरहित / शुगरफ्री च्यवनप्राश सेवन करावे .

खरेदी करा च्यवनप्राश

४ ) सोपे आयुर्वेदीक चिकीत्सा उपक्रम coronavirus care in marathi –

अ ) नस्य / नाका वाटे औषध टाकणे –

सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुडयांमध्ये तिळतेल / खोबरेल तेल किंवा तूप हे बोटाने लावावे / प्रतिमर्श नस्य करावे .

ब ) तेलाने गंडुश / गुळण्या व गरम पाण्याने गुळण्या करणे –

तोंडामध्ये १ मोठा चमचा तिळतेल / खोबरेल तेल घ्यावे . हे तेल न गिळता २ ते ३ मिनीटे गुळण्या कराव्यात व त्यानंतर हे तेल थुकावे व गरम पाण्याने चुळ भरावी . असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे .

गरम पाण्याने देखील एकदा किंवा दोनदा गुळण्या कराव्यात .

ब ) युनानी औषधी:-

१ ) काढा / जोशंदा –

काढा / जोशंदा घटक द्रव्ये व तयार करण्याची पद्धत-

बिहीदाना , उन्नाब , सपीस्तान , करंजवा -बिहीदाना ०५ ग्रॅम , बर्गे गावजबान ०७ ग्रॅम , उन्नाब ०७ दाणे , सपीस्तान ०७ दाणे , दालचिनी ०३ ग्रॅम , बनपशा ०५ ग्रॅम यांचा काढा / जोशंदा .

या घटकद्रव्यांना २५० मिलीलिटर पाण्यामध्ये १५ मिनीटे उकळवावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता सेवन करावे .

२ ) खमीरा मरवारीद –

दुधासोबत ०५ ग्रॅम दिवसातून दोनदा सेवन करावे . ( मधुमेही रुग्णांनी सेवन करु नये . )

क ) होमिओपॅथीक औषधी

अर्सेनिकम अल्बम ३० –

४ ग्लोब्युल्स / गोळया उपाशीपोटी दिवसातून दोनदा , असे तीन दिवस सलग सेवन करावे . एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधाचा कोर्स करावा .

वरील सर्व उपक्रम हे आपआपल्या सोयीनुसार शक्य तेवढे पालन करावे .

कोवीड १ ९ रोंगासाठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचार:-

कोवीड १ ९, कोरोना समान लक्षणे असणा-या रोंगासाठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचार – Covid 19 Treatment in Marathi, Corona Che Upay in Marathi

अ ) आयुर्वेदिक औषधी:-

१ ) टॅबलेट आयुष ६४ –

टॅबलेट आयुष ६४ च्या ५०० मिली ग्रॅम – २ गोळया दिवसातून २ वेळा १५ दिवस सेवन करणे .

२ ) अगस्त्य हरीतकी –

५ ग्रॅम दिवसातून २ वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस सेवन करणे .

३ ) अणूतेल / तीळतेल –

दोन थेंब प्रतिदिन सकाळी प्रत्येक नाकपुडीत टाकणे .

खरेदी करा तीळ तेल, अगस्त्य हरीतकी

४ ) वाफारा घेणे –

ताजी पुदीन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा / दोनदा घेणे .

५ ) खोकला व घसा खवखवणे –

खोकला व घसा खवखवणे याकरीता नैसर्गिक साखर अथवा मध यामध्ये लवंगचुर्ण मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा घेणे .

ब ) युनानी औषधी:-

१ ) अर्के अजीब –

अर्धा ग्लास पाण्यामध्ये ५ थेंब औषध मिसळून गुळण्या कराव्या. हा उपक्रम १५ दिवस करावा .

हे मिश्रण घरीदेखील तयार करता येते.

तयार करण्याचा विधी –

प्रत्येकी ५ ग्रॅम सत्ते ( सत्व ) अजवाइन , सत्ते ( सत्व ) पुदीना व सत्ते ( सत्व ) कपूर / कफूर एकत्रित करुन तयार करता येते .

२ ) तिर्यक अर्बा –

हब्बुल घर / ( लॉरस नोबीलीस फळ ) , ज्युन्तीआना ( ज्येन्शीआना ल्युटीयाना मूळ ) , मूर ( कॉम्मीफोरा माईर डीक ) , झरवंद तवील ( अॅरीस्टोलोकीया लाँगा मूळ ) .

तयार करण्याचा विधी –

या सर्व घटकद्रव्यांचे चूर्ण तयार करुन तूपामध्ये परतावे व मध गरम करुन त्यामध्ये ही औषधे मिसळावीत . याचा वापर चूर्ण स्वरुपातही केला जावू शकतो .०१ चमचा चूर्ण सकाळी घ्यावे . हे औषध १५ दिवस घ्यावे .

क ) होमिओपॅथीक औषधी

अर्सेनिकम अल्बम ३० Arsenik Album 30 in Marathi –

४ ग्लोब्युल्स / गोळया उपाशीपोटी दिवसातून दोनदा , असे तीन दिवस सलग सेवन करावे . एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधाचा कोर्स करावा .

तसेच ब्रायोनिया अल्बा ( Bryonia alba ) , हस टॉक्सीको डेन्ड्रान ( Rhus toxico Dendron ) , बेलाडोना जेलसेमियम ( Belladonna Gelesemium ) , युप्याटोरियम परफॉलिएटम ( Eupatorium perfoliatum ) , हि औषधे देखील सर्दी खोकला / फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त ठरली आहेत .

( उपरोक्त सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक , युनानी व होमिओपॅथीक डॉक्टरांच्या सल्यानंतरच घ्यावीत )

कोवीड १ ९ पॉझीटीव्ह अलाक्षणिक, क्लिनीकली स्टेबल रुग्णांंसाठी पुरक उपचार :-

कोवीड १ ९ पॉझीटीव्ह अलाक्षणिक , चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर ( क्लिनीकली स्टेबल ) असणा – या व इतर वर्तमान गंभीर व्याधी ( प्रि एक्झीसटींग को- मॉरबीडीटीज ) रहित रुग्णांकरीता प्रस्थापीत चिकित्सेला पुरक आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार

Ayush Guidelines for COVID 19 in Marathi, Corona Treatment In Marathi –

अ ) आयुर्वेदिक औषधी

१ ) टॅबलेट आयुष ६४ Tablate Ayush 64 in Marathi –

५०० मिली ग्रॅम -२ गोळया दिवसातून दोन वेळा १५ दिवस सेवन करणे

किंवा

टॅबलेट सुदर्शन घनवटी Tablate Sudarshan Ghan Vati in Marathi –

२५० मिलीग्रॅम – २ गोळया दिवसातून २ वेळा १५ दिवस सेवन करणे .

२ ) अगस्त्य हरीतकी Agastya Haritaki in Marathi –

५ ग्रॅम दिवसातून २ वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस सेवन करणे .

खरेदी करा सुदर्शन घनवटि,अयुष काढा, अयुश 64 टॅबलेट –

३ ) सोपे आयुर्वेदिक चिकीत्सा उपक्रम Coronavirus Marathi Care –

अ ) नस्य / नाका वाटे औषध टाकणे –

सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुडयांमध्ये तिळतेल / खोबरेल तेल किंवा तूप हे बोटाने लावावे / प्रतिमर्श नस्य करावे .

ब ) तेलाने गंडुश / गुळण्या व गरम पाण्याने गुळण्या करणे –

तोंडामध्ये १ मोठा चमचा तिळतेल / खोबरेल तेल घ्यावे. हे तेल न गिळता २ ते ३ मिनीटे गुळण्या कराव्यात व त्यानंतर हे तेल थुकावे व गरम पाण्याने चुळ भरावी .

असे दिवसातून दोनदा / तीनदा करावे . गरम पाण्याने देखील दोनदा / तीनदा गुळण्या कराव्यात .

क ) वाफारा घेणे ‌-

गरम पाण्याची वाफ दिवसातून दोनदा / तीनदा घ्यावी . उपरोक्त सामान्य प्रतिबंधात्मक उपायांचे देखील पालन करावे .

ब ) होमिओपॅथीक औषधी

कोवीड १ ९ समान रोगांच्या लक्षणांच्या चिकित्सेकरीता उपरोक्त नमूद औषधांचा वापर हा प्रस्थापीत चिकित्सेस पुरक चिकित्सा म्हणून केला जावू शकतो .

( उपरोक्त सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक व होमिओपॅथीक डॉक्टरांच्या सल्यानंतरच घ्यावीत )

Disclaimer / डिस्क्लेमर / अस्वीकरण:-

उपरोक्त सर्व मार्गदर्शक सूचना या आयुर्वेद , युनानी व होमिओपॅथी चिकित्सा पध्दतीद्वारा रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी जनहितार्थ निर्गमित करण्यात येत असून , त्याद्वारे कोवीड १ ९ प्रतिबंधास मदत होण्याची शक्यता आहे . Covid 19 Suchana in Marathi

कोवीड १ ९ प्रतिबंधाचा किंवा चिकित्सेचा कोणताही दावा या ठिकाणी करण्यांत येत नाही .

आपणांस ताप , घसा खवखवणे , कोरडा खोकला , श्वास घेण्यास त्रास होणे किंवा इतर कोवीड १ ९ समान लक्षणे अधिक काळ जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे .

वरील सर्व माहिती टास्कफोर्स ऑन आयुष फॅार कोवीड १ ९ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्र शासन द्वारा निर्गमित केलेली आहे.

error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.