मधुमेहजन्य पादवर्ण, डायबेटीक फुट, Diabetic Foot in Marathi

Published by Team Marathi Doctor on

मधुमेहजन्य पादवर्ण, डायबेटीक फुट ची सर्व माहिती, Diabetic Foot in Marathi, मधुमेहजन्य पाद व्रण होण्याची कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार
शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

मधुमेहजन्य पादवर्ण ( डायबेटीक फुट ) Diabetic Foot in Marathi

मधुमेहाची सर्वात प्रमुख कॉम्पलीकेशन म्हणजे मधुमेहजन्य पादवर्ण ( डायबेटीक फुट ) Diabetic Foot in Marathi होय. अतिशय त्रासिक व उपचारास लवकर दाद न देणारी समस्या. चला तर मग आज आपण मधुमेहजन्य पादवर्ण ( डायबेटीक फुट ) Diabetic Foot in Marathi ची कारणे लक्षणे प्रतिबंध व उपचाराची शास्त्रोक्त माहिती पाहूयात.

मधुमेहजन्य पाद व्रण होण्याची कारणे Causes of Diabetic Foot in Marathi

 • रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे . ( जेवणापुर्वी १२० मिग्रॅ व जेवणानंतर १५० मिग्रॅ पेक्षा जास्त असणे )
 • प्रमेही व्यक्तींना पायाला वारंवार लागणे अथवा जखमा होणे ,
 • पायाला रक्त पुरवठा व्यवस्थित न होणे
 • पायाची स्वच्छता व्यवस्थित न ठेवण ,
 • अनवाणी पायी चालणे . किंवा कठीण पादत्राणे वापरणे ,
 • धूम्रपान , तंबाखूजन्य पदार्थ , सेवनामुळे पायातील असलेल्या लहान रक्तवाहीन्या खराब होतात . व त्यामुळे जखमा लवकर न भरणे .
 • रक्तातील साखर अतिप्रमाणात वाढल्यामुळे पायाला स्पर्शाची जाणीव होत नाही व त्यामुळे झालेल्या जखमा सुध्दा कळत नाहीत . व जखमा वाढत जातात . ( Neuropathy )
 • झालेल्या जखमेची व्यवस्थित निगा न राखणे .
 • मधुमेही लोकांची प्रतिकारक्षमता कमी असल्यामुळे जीवाणूंचा संसर्ग वाढतो . हेतू सेवन रक्तातील साखर वाढणे स्पर्शाची जाणीव न झाल्यामुळे पायाला जखमा होणे .
 • पायाला योग्य रक्त पुरवठा न होणे जखमेवर जिवाणूंचा संसर्ग होणे . जखमा वाढणे मधुमहजन्य पाद व्रण उत्पत्ती होणे .

मधुमेहजन्य पाद व्रण लक्षणे Symptoms of Diabetic Foot in Marathi:-

 1. पायाला स्पर्शाची जाणीव न होणे
 2. पादप्रदेशी रुक्षता असणे .
 3. पायातील मांसपेशीतील बल चांगले नसणे .
 4. त्वचेचा लवचिकपणा जाणे
 5. रक्तातील साखरेचे प्रमाण अति प्रमाणात वाढणे ( जेवणापूर्वी १२० मिग्रे व जेवणानंतर १५० मिग्रं पेक्षा जास्त साखर असणे )
 6. पायाचा प्रदेशी दाह होणे , मुंग्या येणे .
 7. वेदनेची जाणीव न होणे
 8. पायांतील संधीची सुबध्दता नष्ट होणे

मधुमेहजन्य पाद व्रण होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी Prevention of Diabetic Foot in Marathi:-

Diabetic Foot care in Marathi:-

 1. गोड पदार्थांचे सेवन न करणे .
 2. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे .
 3. वेळोवेळी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे .
 4. पायाची स्वच्छता व तळपायाची स्वच्छता राखणे .
 5. रोज रात्री तेलाने तळपायांना मालीश करणे
 6. मऊ व व्यवस्थित पादत्राणे वापरणे , घट्ट बसणारी पादत्राणे वापरू नयेत ,
 7. पायाच्या नखांची काळजी घेणे .
 8. पायात चप्पल न घालता बुटाचा वापर करणे आवश्यक आहे .
cancer in marathi

मधूमेहजन्य पाद व्रण झाल्यास घ्यावयाची काळजी Care of Diabetic Foot in Marathi:-

अ ) चिकित्सा Treatment of Diabetic Foot in Marathi:-

 • शरीरातील साखरेचे प्रमाण औषधोपचारांनी नियंत्रित करणे
 • पंचवल्कल कषायाने व्रणाच्या ठिकाणी धावन करणे ,
 • जखमेच्या ठिकाणी जलौका लावणे .
 • अॅन्टीबायोटिक योग्यरितीने देणे . ( आवश्यकतेनुसार )
 • नियमित व्रणावरती व्रणोपचार करणे , पट्टी करणे .
 • त्रिफळा कषायाने धावन करणे . ( स्वच्छ करणे )
 • जात्यादि तैलाने व्रणकर्म करणे . ( ड्रेसिंग करणे ) जंतूघ्न द्रव्यांनी व्रण धूपन करावे . ( निंब , राळ इ . )

Digiprove sealCopyright Material Don't Copy © 2021
error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.