सध्या करोना लसीकरणासाठी कोणते नागरीक पात्र आहेत ?

Published by Team Marathi Doctor on

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

१ मार्च पासून राज्यात सामान्य नागरिकांसाठी कोविड लसीकरण (Free Corona Vaccine in Marathi) चालू करण्यात आली आहे. चला तर मग पाहूयात सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध कोविड लसीकरणाची सर्व माहिती.

सध्या कोविड (करोना) लसीकरणासाठी कोणते नागरीक पात्र आहेत ?

  • १) वयाची ६० वर्षे पूर्ण केलेले
  • २) ४५-५९ वर्षे वयोगटातील असे नागरिक ज्यांना इतर दिर्घ आजार ( Comorbidities ) आहेत.

४५-५९ या वयोगटातील नागरिकांची लसीकरणासाठी पात्रता Covid Vaccination Eligibility in Marathi:-

४५-५९ या वयोगटातील नागरिक खालील आजार असणारे लोक लस घेण्यासाठी पात्र आहेत. Covid Vaccination Disease list in Marathi:-

  1. Heart Failure with hospital admission in past one year
  2. Post Cardiac Transplant / Left Ventricular Assist Device ( LVAD )
  3. Significant Left ventricular systolic dysfunction ( LVEF < 40 % )
  4. Moderate or Severe Valvular Heart Disease
  5. Congenital heart disease with severe PAH or ldiopathic PAH
  6. Coronary Artery Disease with past CABG / PTCA / MI AND Hypertension / Diabetes on treatment
  7. AnginaANDHypertension / Diabetes on treatment
  8. CT / MRI documented stroke AND Hypertension / Diabetes on treatment
  9. Pulmonary artery hypertension AND Hypertension / Diabetes on treatment
  10. Diabetes ( > 10 yearsORwith complications ) AND Hypertension on treatment
  11. Kidney / Liver / Hematopoietic stem cell transplant : Recipient / On wait – list
  12. End Stage Kidney Disease on haemodialysis / CAPD
  13. Current prolonged use of oral corticosteroids / immunosuppressant medications
  14. Decompensated cirrhosis
  15. Severe respiratory disease with hospitalizations in last two years / FEV1 < 50 %
  16. Lymphoma / Leukaemia / Myeloma
  17. Diagnosis of any solid cancer on or after 1st July 2020 ORcurrently on any cancer therapy
  18. Sickle Cell Disease / Bone marrow failure / Aplastic Anemia / Thalassemia Major
  19. Primary Immunodeficiency Diseases / HIV infection
  20. Persons with disabilities due to Intellectual disabilities / Muscular Dystrophy / Acid attack with involvement of respiratory system / Persons with disabilities having high support needs / Multiple disabilities including deaf – blindness

तुम्ही ४५ ते ५ ९ या वयोगटातले असाल आणि तुम्हाला वरीलपैकी कुठले आजार असतील तर तुमच्या डॉक्टरकडून ‘ को – मॉर्बिडीटी सर्टिफिकेट ‘ घेऊन मगच लसीकरणसाठी नोंदणी करा.

कोविड लसीकरण नोंदणी कशी व कोठे करावी?

१) अपॉईंटमेंट घेऊन नोंदणी:-

Covid Vaccination Appointment Procedure in Marathi:-

अपॉईंटमेंट घेऊन लसीकरणसाठी २ पद्धतीने अपॉईंटमेंट घेतली जाऊ शकते.

१) COWIN portal किंवा रजिस्ट्रेशन लिंक : https://selfregistration.cowin.gov.in

२) आरोग्य सेतू अॅपद्वारे

अपॉईंटमेंट घेण्याची पद्धत खालीलप्रमाणे :-

  1. आरोग्य सेतू अॅपद्वारे
  2. coWIN पोर्टल किंवा https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंक वर क्लिक करून यावर आपला मोबाइल नंबर नोंदवून आलेला OTP लिहा.
  3. नोंदणीसाठी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
  4. अपॉईंटमेंट घेताना देखील आपल्याला खालीलपैकी एक ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल.
    • आधार कार्ड
    • पासपोर्ट
    • निवडणूक कार्ड
    • पॅन कार्ड
    • ड्रायविंग लायसन्स एनपीआर स्मार्ट कार्ड
    • पेन्शन कागदपत्र ( फोटोसहित )
  5. तुमच्या सोयीचे निवडलेल्या केंद्रामधील उपलब्ध तारखांपैकी स्वतःची आणि जास्तीत जास्त ३ इतर लोकांची नोंदणी करु शकता.
  6. लसीकरण केंद्र निवडा.
  7. निवडलेल्या केंद्रामध्ये निवडलेल्या तारखेला जाऊन लस घेऊन या. (तुमच्या सोयीची तारीख निवडा.)

२) वॉक – इन: नोंदणी:-

शासकीय लसीकरण केंद्रात जाऊन वाँकइन : शासकीय लसीकरण केंद्रात जाऊन तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही शासकीय लसीकरण केंद्रात जाऊ शकता.

जाताना पुढीलपैकी एक ओळखपत्र सोबत ठेवावे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • निवडणूक कार्ड
  • पॅन कार्ड
  • ड्रायविंग लायसन्स एनपीआर स्मार्ट कार्ड
  • पेन्शन कागदपत्र ( फोटोसहित )

तसेच , तुम्ही ४५-५९ या वयोगटातील असाल आणि तुम्हाला इतर आजार असतील तर तुमच्या डॉक्टरकडून ‘ को – मॉर्बिडीटी सर्टिफिकेट ‘ घेऊन मगच लसीकरणसाठी जा.

शासकीय लसीकरण केंद्रात (सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन) लस मोफत दिली जाईल. खाजगी लसीकरण केंद्रांत रु. २५० इतके शुल्क (corona Vaccine Price in Marathi) आकारले जाईल.

” लस घेऊन मी स्वतःलाच नाही, तर इतरांनाही कोविड -१ ९ पासून संरक्षण देणार ! ”

error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.