भारतात दरवर्षी सुमारे ३० लाख ते ३५ लाख लोकांना विविध लैंगिक संक्रमित रोग होतात.

लैंगिक संक्रमित रोगांना – मराठी मध्ये लैंगिक विकार किंवा गुप्तरोग या नावांनी ही ओळखतात.

या लेखात आपण स्त्रियांना, नवजात बाळांना व पुरुषांना होणाऱ्या विविध लैंगिक संक्रमित रोगांची / लैंगिक विकारांची माहिती घेणार आहोत.

अनुक्रमणिका

लैंगिक संक्रमित रोग किंवा लैंगिक विकार म्हणजे काय ? What is STD in Marathi?

लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या, प्रजनन मार्गाच्या आजारांना लैंगिक संक्रमित रोग असे म्हणतात. या आजारामध्ये गर्भाशय, गर्भनलिका, योनीचे बाहयांग, योनी, गर्भाशयाचे मुख, अंडाशय हे स्त्रियांमधील अवयव बाधित होतात . तसेच लिंग, अंडाशय, जननइंद्रियांतील ग्रंथी, शुक्रवाहक नलिका हे पुरुषांमधील अवयव बाधित होतात.

लैंगिक संक्रमित रोगांंचे प्रकार कोणते? Types of STD in Marathi

लैंगिक संक्रमित रोगांंचे मुख्य तीन प्रकार आहेत.

१ )  बाह्यांगावर दिसणारे आजार

बाह्य प्रजनन अवयवांवर आढळून येणारी रोगांचा या प्रकारात समावेश होतो.

२ ) आंतरीक आजार

शरीराच्या आतील प्रजनन अवयवांना होणाऱ्या आजारांचा या प्रकारात समावेश होतो.

३ ) लैंगिक संबंधातून पसरणारे आजार

संभोगाद्वारे व इतर लैंंगिक क्रियेद्वारे पसरणारे आजारांचा या प्रकारात समावेश होतो.

लैंगिक संक्रमित रोगाची कारणे काय आहेत? Cause of STD in Marathi?

१ ) असुरक्षित लैंगिक संबंधात ठेवणे. 

२ ) एका पेक्षा जास्त जोडिदारांशी लैंगिक संबंधात ठेवणे. 

३ ) लैंगिक आजार झालेल्या मातेच्या पोटि जन्म घेणे. बाळाला मातेकडून लागण होते.

४ ) जननांगाची योग्य स्वच्छता न राखणे.

५ ) अनैसर्गिक लैंगिक संबंधात ठेवणे.  उदा. मुखमैथुन, गुदमैथुन.

६ ) लैंगिक संक्रमित रोग किंवा लैंगिक विकार हे अतिसुक्ष्म जंतु, परजिवी, बुरशी, विषाणु किंवा जीवाणु यांच्या संक्रमणामुळे होतात. यांच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे लैंगिक आजार होतात.

७ ) लैंगिक आजार झालेल्या व्यक्तीबरोबर शरीर संबंध ठेवणे.

लैंगिक संबंधातून पसरणारे आजार म्हणजे काय ?

व्यक्ती – व्यक्ती मधिल लैंगिक संबंधाद्वारे पसरणारे व जंतुसंसर्गामुळे ( जीवाणू, विषाणू, बूरशी, परजीवी ) होणारे जे संसर्गिक आजार होतात त्यांना लैंगिक आजार म्हणतात.

लैंगिक संक्रमित रोग / लैंगिक आजाराची लक्षणे STD Symptoms in Marathi :-

पुरुषांमध्ये आढळणारी लक्षणे Men’s STD Symptoms in Marathi :-

 • लिंगावर पुरळ व फोड येणे.
 • लिंगातून पिवळसर स्राव किंवा पू येणे. पांढरा द्रव येणे.
 • लिंगावर सुज किंवा लिंगाच्या आजुबाजुला, जांघेत गाठ येणे.
 • लिंग प्रदेशी वेदना होणे, लैगिक संबंधाच्या वेळेस दुखणे.
 • लिंगाला खाज येणे, तेथे जळजळ होणे.
 • सशूल मूत्रप्रवृत्ती – लघवी करताना जळजळ होणे.
 • तोंडामध्ये फोड , जखमा , जळजळ किंवा त्वचा लालसर होणे.
 • अंगावर फोड, चट्टे उठणे.
 • वंधत्व
 • लैंंगिक सबंध नको वाटणे.
 • काहि लैंगिक आजारात थकवा, ताप, अंगदुखी, अशक्तपणा जाणवतो.

लैंगिक आजाराची स्त्रियांमध्ये आढळणारी लक्षणे Women’s STD Symptoms in Marathi :-

 •  योनीतून दुर्गंधीयुक्त स्राव येणे. अंगावरून पांढरे-पिवळे जाणे.
 • ओटीपोटात दुखणे.
 • योनीमध्ये खाज येणे किंवा संबंधाच्या वेळेस दुखणे.
 • योनीमार्गात लालसर फोड किंवा पुरळ येणे.
 • योनीवर किंवा आजुबाजूला जांघेत गाठ येणे. 
 • लघवी करताना जळजळ होणे. लघवीला वारंवार जाण्याची इच्छा होणे.
 • तोंडामध्ये व अंगावर फोड, जखमा, जळजळ किंवा त्वचा लालसर होणे. 

विविध लैंगिक आजारांची लक्षणे व उपचार STD Symptoms & Treatment in Marathi :-

१ ) एच. आय. व्ही. HIV- AIDS Symptoms & Treatment in Marathi:-

एच. आय. व्ही. हा एक विषाणूजन्य आजार आहे. भारतात दरवर्षी ८०,००० ते १ लाख लोकांंना एच. आय. व्ही. रोगाची लागणं होते. सध्या भारतात सध्या २४,२०,००० एच. आय. व्ही. चे रुग्ण आहेत.

एच. आय. व्ही. रोगाची लक्षणे HIV- AIDS Symptoms in Marathi-

लागणं झाल्यापासून सुरवातिच्या ८ ते १२ आठवड्यापर्यंत एच. आय. व्ही. ची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

१२ आठवड्यानंतर एक तृतियांश रुग्णांंमध्ये खालील लक्षणे दिसतात.

 • ताप, थकवा
 • त्वचेचा नागीन हा आजारही साधारणत: आढळतो.
 • अंगदुखी, सांधेदुखी
 • अंगावर पुरळ उठणे, अंंग खाजवणे.
 • जांघेत, काखेत अवदान येणे.
 • तोंड येणे – वारंवार तोड येते, अनेकदा तोंंडामध्ये पांढरी बुरशी निर्माण होते.

वरील लक्षणे २ आठवड्यापर्यंत राहतात व त्यानंतर रुग्ण लक्षणहिन अवस्थेत जातो. या अवस्थेत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

हि लक्षणहिन अवस्था प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेळी असते, सहसा हि अवस्था ५ ते ११ वर्षांची आढळते.

एका अभ्यासात असे आढळून आले की,

 • १० % एच. आय. व्ही रुग्णांचा पहिल्या ५ वर्षात मृत्यु होतो.
 • ४० % एच. आय. व्ही रुग्णांचा ५ ते ११ वर्षात मृत्यु होतो.
 • उरलेल्या ५० % रुग्णापैकी ३० % रुग्णांच्या एच. आय. व्ही चे एड्स मध्ये रुंंपातर होतात, २० % रुग्ण हे अजूनहि लक्षणहिन अवस्थेत जगतात.

एच. आय. व्ही. रोगाचे उपचार HIV- AIDS Symptoms & Treatment in Marathi-

एच. आय. व्ही. रोगासाठी कोणते ही औषध उपलब्ध नाही.

ए.आर.टी. A.R.T. Antiretroviral Therapy For HIV in Marathi –

एच. आय. व्ही. रोगाच्या विषांंणूची वाढ थोपविणारी औषधे ए.आर.टी. या चिकित्सा पध्दतीमध्ये रुग्णाला दिली जातात. या उपचाराने एच. आय. व्ही. रोग बरा होत नाही. फक्त रुग्णांचे आयुर्मान वाढते व रुग्णाच्या शरीरातील विषांणूची संख्या नियंंत्रित राहते. हि औषधे रेग्यूलर घेतल्यास रुग्णाचे आयुर्मान वाढते.

या सोबत सकस आहार, नियमित व्यायाम, कोणताही बारिक-सारिक आजार झाला तरी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला व उपचार इ. गोष्टिमुळे रुग्ण उरलेले आयुष्य सामान्यपणे जगू शकतो.

या रुग्णांंनी सामाजिक बाधिलकी व मानवता यांचा विचार करून, त्यांच्या द्वारे दुस-या निरोगी व्यक्तीला या रोगाची लागणंं होणार नाही याची काळजी घ्यावी.

योग्य व वेळीच उपचार घेतल्यास एच. आय. व्ही रोगाची लागणं झालेली गरोदर स्त्री निरोगी बाळास जन्म देऊ शकते.

एच. आय. व्ही बद्दल कोणतीही शंका असल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२ ) पूयमेह Gonorrhoea in Marathi:-

हा मूत्रमार्गाचा Neisseria Gonorrhoeae नामक जीवाणू मूळे होणारा आजार आहे.

 •  पुरुषांमध्ये लिंगामधून दुर्गधीयुक्त स्त्राव किंवा पू येणे.
 • स्त्रियांमध्ये योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे.
 • लघवी करतांना जळजळ व दुर्गधीयुक्त स्त्राव येणे.
 • स्त्रीयांमध्ये ओटिपोटात दुखते.
 • पुरुषांमध्ये अंडाशयात वेदना होतात.
 • योग्य औषधोपचाराने ( Antibiotics ) हा आजार ८ ते १० दिवसात बरा होतो.

पूयमेह उपचार Gonorrhoea Treatment in Marathi-

Antibiotics – पूयमेह उपचारासाठी Procaine Penicillin किंवा Tetracycline या प्रतीजैविंकाचा वापर केला जातो.

३ ) योनीदाह Trichomonas Vaginitis in Marathi:-

 हा एक परजीवामुळे होणारा आजार आहे. या आजारार Strawberry Cervix हे लक्षण आढळते.

योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो, अनियमित मासिक स्राव होतो.

योनीला खाज येते व लैंगिक संबंधाच्या वेळेस वेदना होतात.

योनीदाह Trichomonas Vaginitis in Marathi, marathi doctor

४ ) फिरंंग Syphilis in Marathi:-

 फिरंंग हा Treponema Pallidum या जीवाणूच्या संसर्गांं मुळे होणारा आजार आहे.

फिरंंग लक्षणे –

पुरुषांमध्ये लिंगावर, अंडकोषवर किंवा गुद्द्वारावर जखम, पुरळ तथा पूयुक्त फोड येणे

 स्त्रियांमध्ये योनीमध्ये / योनीवर गुदद्वारावर जखम होणे

 एक किंवा त्यापेक्षा अधिक दुखणारी अथवा न दुखणारी गाठी येणे.

 तोंडाच्या श्लेष्मल त्वचेमध्ये पांढर्‍या पडद्याने झाकलेल्या बर्‍याच लाल रंगाचे अल्सर आढळतात.

लिम्फ नोड्स – शरीराच्या सर्व लिम्फ नोड्समध्ये दाह, जळजळ उद्भवते.

तळहातावर व तळपायावर चट्टे येतात, त्याबरोबर थकवा व खाज हि लक्षणे दिसतात.

laigik vikar, गुप्त रोग, गुप्त रोग marathi, गुप्त रोग मराठी, प्रजनन संस्थेचे आजार, लैंगिक आजार, गुप्त रोग, Gup trog, लैंगिक समस्या, laingik samasya, gup trog in marathi, लैंगिक विकार, syphilis in marathi, std in marathi, लैंगिक समस्या मराठी
फिरंग, Syphilis in Marathi, Marathi doctor

लक्षणे उपचार –

फिरंंग रोगाच्या उपचारासाठी Antibiotics वापरली जातात.

पेनिसीलीन, डॉक्सीसायक्लिन किंवा इरीथ्रोमायसीन सारखी Antibiotics वापरली जातात.

मूळव्याध कारणे, लक्षणे, उपचार

५ ) मृदव्रण Soft Chancre –

  लक्षणे –

स्त्रियांमध्ये ओटीपोटात दुखणे.

 स्त्रियांमध्ये योनीमध्ये योनीवर गाठी, पुरळ तथा पू युक्त फोड येणे.

 पुरुषांमध्ये लिंगावर एक किंवा त्यापेक्षा अधिक दुखणाऱ्या जखमा 

 पुरुषांमध्ये लिंगावर अथवा आजुबाजुला सतत येणारी सुज.

उपचार –

या आजाराच्या उपचारासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला Sulfonamides किंवा Cotrimoxazole हि औषधे ७ ते १० दिवस देतात.

६ ) Human Papillomavirus Infection in Marathi:-

हा विषाणू जन्य आजार आहे. 

लैगिक संपर्क आल्याने एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीला या आजाराची लागणं होते.

लक्षणे –

 • साधारणत: जननांगाच्या ठिकाणी खाज व वार्ट्स हि लक्षणे दिसतात.
 • वार्ट्स च्या ठिकाणी खाज, स्राव, वेदना व कधी कधी त्यातून रक्तस्राव होतो.
laigik vikar, गुप्त रोग, गुप्त रोग marathi, गुप्त रोग मराठी, प्रजनन संस्थेचे आजार, लैंगिक आजार, गुप्त रोग, Gup trog, लैंगिक समस्या, laingik samasya, gup trog in marathi, लैंगिक विकार, syphilis in marathi, std in marathi, लैंगिक समस्या मराठी
Human Papillomavirus Infection in Marathi, marathi doctor

उपचार –

१ ) वार्ट्स वर Podophyllin 25% हे स्पिरिट मध्ये मिसळून लावावे व अर्ध्या तासाने पाण्याने धुवावे.

२ ) कठीण व जाड वार्ट्स साठी Trichloroacetic acid वापरावे.

३ ) किंवा वरील दोन्हिचे एकत्र मिश्रण ही वापरू शकता.

४ ) वरील उपायाने वार्ट्स कमी न झाल्यास ईलेक्ट्रो-सर्जरी / क्रायो-सर्जरी किंवा सर्जरी ने कापूण काढूण टाकतात.

या आजाराच्या प्रातिबंधासाठी सध्या लस उपलब्ध आहे.

७ ) कोंडीलोमा लॅटाः- 

 गुदद्वाराजवळ व जननेंद्रियाजवळ – जखम होणे, भेगा पडणे, लालसर होणे, रक्त येणे, खाज येणे, चट्टे येणे. हि फिरंंग रोगाची दुसरी अवस्था आहे.

८ ) जननांगाची नागीन Genital Herpes in Marathi:- 

लक्षणे –

सुरवातीला खाजणाऱ्या , दुखणाऱ्या व आग होणाऱ्या फुटकूळ्या उठतात. त्यानंतर त्या फुटतात व तेथे अल्सर तयार होतात. काही रुग्णांमध्ये योनी, लिंंग व लघवी करताना वेदना होतात. नंतर हे विषाणू सुप्तअवस्थेत जातात.

laigik vikar, गुप्त रोग, गुप्त रोग marathi, गुप्त रोग मराठी, प्रजनन संस्थेचे आजार, लैंगिक आजार, गुप्त रोग, Gup trog, लैंगिक समस्या, laingik samasya, gup trog in marathi, लैंगिक विकार, syphilis in marathi, std in marathi, लैंगिक समस्या मराठी
जननांगाची नागीन Genital Herpes in Marathi, marathi doctor

उपचार –

या आजारासाठी Antiviral या औषधांचा वापर केला जातो.

९ ) मोनीलिएसिस Genital Moniliasis in Marathi:-

laigik vikar, गुप्त रोग, गुप्त रोग marathi, गुप्त रोग मराठी, प्रजनन संस्थेचे आजार, लैंगिक आजार, गुप्त रोग, Gup trog, लैंगिक समस्या, laingik samasya, gup trog in marathi, लैंगिक विकार, syphilis in marathi, std in marathi, लैंगिक समस्या मराठी, marathi doctor
मोनीलिएसिस Genital Moniliasis in Marathi, marathi doctor

हा एक भूरशी जन्य विकार आहे, जो लैगिक सबंधातून पसरतो.

  लक्षणे –

स्त्रियांंमध्ये योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त पांंढरा स्राव येतो.

 स्त्रियांमध्ये योनीला खाज येणे, लैंगिक संबंधाच्या वेळेस वेदना होतात.

उपचार –

या आजारासाठी Antifungal या औषधांचा वापर केला जातो.

लैंगिक संक्रमित आजारांचा प्रतिबंध कसा कराल ? STD Prevention in Marathi:-

१ ) आपल्या गुप्तांगाची प्रत्येकाने योग्य व नियमित स्वच्छता राखावी. 

२ ) आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ रहावे.

३ ) आपणांस किंवा आपल्या जोडीदारास लैंगिक संक्रमित रोग झालेला असेल तर, त्वरीत डॉक्टरांकडून उपचार करावेत व तो पर्यंत लैंगिक संबंधाच्या वेळेस निरोध वापरा.

४ ) लैंगिक संक्रमित रोग झालेल्या जोडप्यांनी एकाच वेळी दोघांचाही उपचार घ्यावा.

५ ) हे आजार पुर्णपणे बरे करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावा.

६ ) तुम्ही पुर्णपणे बरे झालात याची खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांची पुन्हा भेट घ्या.

७ ) आजराची लक्षणे पुर्णपणे बरी झाली तरी डॉक्टरांनी दिलेली औषधे मध्येच बंद करू नयेत. दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण करा.

८ ) गर्भवती स्त्रीला असा आजार झाल्यास गर्भाची तपासणी जरूर करून घ्यावी. 

लैंगिक संक्रमित रोगांंच्या गुंंतागुंत ? STD Complications in Marathi:- 

लैंगिक संक्रमित रोगाचा उपचार न केल्यास खालील गुंंतागुंत निर्माण होतात.

पुरुषांमध्ये निर्माण होणा-या गुंंतागुंत:-

मुत्रमार्ग आकसतो, लघवी करताना अडचण निर्माण होते. वंधत्व निर्माण होते.

तसेच आरोग्यावर अतीशय गंभीर स्वरूपाचे परिणाम होतात.

स्त्रियांमध्ये निर्माण होणा-या गुंंतागुंत:-

 • ओटीपोटावर सूज येते.
 • वारंंवार गर्भपात होतात.
 • गर्भाशयाला सुज येते व गर्भाशयाचा दाह होतो.
 • गरोदर स्त्रीच्या गर्भा मध्ये विकलांगता निर्माण होते.

स्त्री व पुरुष दोघांमध्ये निर्माण होणा-या गुंंतागुंत:-

वंध्यत्व येते. तसेच लैंंगिक आजार झालेल्या रुग्णांमधे HIV ची बाधा होण्याची जोखीम २० टक्क्यांनी वाढते.


नवजात बालकांंतील लैंगिक संक्रमित रोग Neonatal STD in Marathi:-

गर्भवती स्त्रीला लैंगिक आजार झालेला असेल तर तिच्या होणाऱ्या बाळासही हा आजार होऊ शकतो. तसेच होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरही कायम स्वरूपी परिणाम होऊ शकतो.

गर्भवती स्त्रीला लैंंगिक आजारावर झाला असल्यास, त्या स्त्रीने त्वरीत उपचार न घेतल्यास जन्माला येणारे मुल जन्मत: च अपंग असू शकते. तसेच गर्भपात होण्याची किंवा मृत बालक जन्मास येण्याची शक्यता असते.

लैंंगिक आजार झालेल्या गर्भवती स्त्रीला गरोदर पणात २० आठड्याच्या आत योग्य उपचार केले तर बाळामध्ये व्यंग किंवा अंपगत्व निर्माण होत नाही.

प्रेगन्सीतील-सोनोग्राफी का ? कधी ? कशासाठी करावी ?

लैंगिक संक्रमित रोगा बद्दल गैरसमज Misconceptions about STD in Marathi:-

१ ) लैंगिक संक्रमित रोग झाल्यावर गुप्तांग तेल, पेट्रोल, सोडा, लिंबू इ. ने धुतले तर लैंगिक आजार बरे होतात हा एक खुप मोठा गैरसमज समाजात आहे तो पूर्णपणे चुकिचा आहे.

हे असे अघोरी उपाय करण्याचे आरोग्यावर गंभीर स्वरूपाचे, विपरीत परिणाम होऊ शकतात.

२ ) हकीम, भगत, बोगसडॉक्टर यांच्याकडून उपचार घेतल्यामुळे लैंगिक आजार बरे होतात, हाही एक गैरसमज समाजात आहे. योग्य डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्या.

सारांश / Summary:-

 • जर आपणांस किंवा आपल्या जोडीदारास लैंगिक संक्रमित रोग / लैंगिक आजार झालेला असेल तर आपली व आपल्या जोडिदाराची तपासणी करून उपचार करून घ्या. जेणेकरून पुर्न : संसर्ग टाळता येईल.
 • लैंगिक आजाराचा संसर्ग टाळण्याकरिता निरोधचा वापर करा.
 • संक्रमित रोग / लैंगिक आजार शंका असल्यास डॉक्टरांना भेटा व चर्चा करा, त्वरीत उपचार घ्या.
 • लैंगिक आजार झालेल्या व्यक्तींना एच . आय . व्ही . ची बाधा होण्याचा जास्त संभव असतो.
 • लैंगिक संक्रमित आजाराविषयी चर्चा करण्यास लाजू नका किंवा भिती बाळगू नका.
error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.
%d bloggers like this: