प्रा. आ. केंद्र उपकेंद्र स्तरावरील नोंदवहया Subcenter PHC Registers in Marathi

Published by Team Marathi Doctor on

प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र नोंदवहया, Subcenter PHC Registers in Marathi, R1 to R17 Registers in Marathi, PHC Records, Subcenter Records
शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील अहवाल व नोंदवहया Subcenter PHC Registers in Marathi यांची सर्व माहिती खालील लेखात दिलेली आहे.

अहवाल म्हणजे काय ?

आरोग्यविषयक केलेल्या कामाचे विशिष्ट पध्दतीने व विशिष्ट नमुन्यात वरिष्ठांना सादर करावयाच्या माहिती पत्रास अहवाल असे म्हणतात .

नोंदवही म्हणजे काय ?

कार्यक्षेत्रात केलेल्या आरोग्यविषयक कामांची माहिती विहित नमुन्यात संकलित करुन पुस्तकाच्या रुपात संचयित करणे म्हणजे नोंदवही होय .

नोंदवहीची उपयुक्तता ( महत्व )

 1. दैनंदिनी आरोग्य कामाची अहवालामध्ये केलेली नोंद संचयित करण्याकरिता .
 2. मासिक / त्रैमासिक / वार्षिक अहवाल तयार करण्याकरिता .
 3. आरोग्यविषयक कामाचा पाठपुरावा करण्याकरिता .
 4. आरोग्य कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरिता ,
 5. आरोग्य कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्याकरिता .
 6. आरोग्य कर्मचाऱ्याने केलेल्या कामाची तपासणी किंवा पडताळणी करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्रावर खालील प्रकारचा अहवाल व नोंदवहया असाव्यात .

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील अहवाल व नोंदवहया:-

क्र. नोंदवहीचे नाव स्थान लाभार्थी सेवा जबाबदार कर्मचारी
आर १आरोग्य सेवाउपकेंद्रगरोदर / स्तनदा माता अर्भकलसीकरण, आरोग्य तपासणी उपलब्ध सेवाआरोग्य सेविका
आर
उपकेंद्र साठा नोंदवहीउपकेंद्रयोग्य जोडपीकुटुंब नियोजनाची साधने, औषधीआरोग्य कर्मचारी (स्त्री/पुरुष )
आर ३कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केंद्र नोंदवहीप्रा.आ. केंद्रयोग्य जोडपीस्त्री / पुरुष कुटुंब नियोजनआरोग्य सहाय्यिका
आर ४ तांबी नोंदवहीप्रा.आ. केंद्रयोग्य जोडपीतांबी बसविणेआरोग्य सहाय्यिका
आर ५ कार्यक्षेत्रातील योग्य जोडप्याची कार्यक्षेत्राबाहेर झालेल्या शस्त्रक्रीयांची नोंदवहीप्रा.आ. केंद्रयोग्य जोडपीस्त्री / पुरुष शस्त्रक्रीयाआरोग्य सहाय्यिका
आर ६ शस्त्रक्रिया/तांबी साठी अपात्र लाभार्थी नोंदवहीप्रा.आ. केंद्रसेवेसाठी अपात्र ठरलेली योग्य जोडपी ( रिजेक्टेड )औषध उपचार व आरोग्य शिक्षणआरोग्य सहाय्यक
आर ७शस्त्रक्रिया / तांबी लाभार्थ्यांचा पाठपुरावा नोंदवहीउपकेंद्रयोग्य जोडपीशस्त्रक्रिया व तांबी लाभार्थ्यांना पुनर्भेट तपासणी आवश्यक आरोग्यसेवाआरोग्य कर्मचारी
(स्त्री/पुरुष)
आर ८मदतनीस नोंदवहीप्रा.आ.केंद्र उपकेंद्रदाई, आंगणवाडी सेविका, आरोग्य रक्षकलाभार्थीना आरोग्यसेवा देण्यास मदतआरोग्य सहाय्यिका / सेविका
आर ९साधने वाटप एकत्रित नोंदवहीप्रा.आ.केंद्रयोग्य जोडपीसंतति प्रतिबंधक साधनेआरोग्य सहाय्यिका
आर १०शिबिरातील शस्त्रक्रिया व तांबी नोंदवहीप्रा.आ.केंद्रयोग्य जोडपीशस्त्रक्रिया व तांबी बसविणेआरोग्य सहाय्यिका
आर ११प्रा.आ.केंद्र क्षेत्रातील शस्त्रक्रिया तांबी एकत्रित नोंदवहीप्रा.आ. केंद्रयोग्य जोडपीशस्त्रक्रिया व तांबी बसविणेआरोग्य सहाय्यिका
आर १२समाज शिक्षण व प्रचार कार्यक्रम नोंदवहीप्रा.आ.केंद्रगरोदर/स्तनदा माता, योग्य जोडपीआरोग्य शिक्षणआरोग्य सहाय्यक
आर १३ संततिप्रतिबंधक साधनांचा साठा नोंदवहीप्रा.आ.केंद्रयोग्य जोडपीनिरोध , गर्भनिरोधक गोळया व तांबी साठा नोंदविणेआरोग्य सहाय्यिका
आर १४ प्रजनन आरोग्य पहाणी नोंदवही (कुटुंब कल्याण सर्वे)उपकेंद्र, प्रा.आ.केंद्रयोग्य जोडपीपात्र लाभाथी नुसार दयावयाच्या आवश्यक सेवाआरोग्य सेविका
आर १५ प्रसूतिपूर्व व प्रसूति पश्चात नोंदवहीउपकेंद्र , प्रा.आ.केंद्रगरोदर / स्तनदा मातागरोदर व स्तनदा माता नोंदणी तपासणी , लसीकरण व आवश्यक सेवाआरोग्य सेविका / आरोग्य सहाय्यिका
आर १६ 0 ते २ वर्षे वयोगटातील मुलांचे आरोग्य सेवा नोंदवहीउपकेंद्र0 ते २ वर्षे वयोगटातील मुलेलसीकरण व आरोग्य तपासणीआरोग्य कर्मचारी
(स्त्री/पुरुष)
आर १७दोन वर्षावरील मुलांना द्यावयाच्या आरोग्य सेवांची नोंदवहीउपकेंद्रदोन वर्षावरील मुलेलसीकरण व आरोग्य तपासणीआरोग्य कर्मचारी (स्त्री/पुरुष )

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील अहवाल व नोंदवहया, Subcenter Registers in Marathi, PHC Registers in Marathi

उपकेंद्र व प्रा.आ.केंद्रातील इतर नोंदवहया

 1. साठा नोंदवही :-
  • ही नोंदवही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर ठेवणे आवश्यक असून यात वस्तूंचे सविस्तर विवरण व अंतिम विल्हेवाट याबद्दल माहिती नोंदविली जाते .
 2. अंधत्व नोंदवही :-
  • ( अ ) जीवनसत्व – अ वाटप नोंदवही ,
  • ( ब ) मोतीबिंदू असणाऱ्या व्यक्तींची यादी असलेली नोंदवही .
 3. क्षयरोग कामाची नोंदवही :-
  • ( अ ) संशयीत रुग्ण थुकी नमुना नोंदवही ,
  • ( ब ) नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंदवही ,
  • ( क ) रुग्ण उपचार कार्ड
  • ( ड ) औषधी साठा नोंदवही
 4. कुष्टरोग नोंदवही :-
  • ( अ ) नवीन कुष्ठरुग्णांची यादी व
  • ( ब ) नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंदवही .
  • ( क ) संशयित कुष्ठरुग्णाची नोंदवही ५
 5. हिवताप कार्यक्रमाची नोंदवही :-
  • ( अ ) हिवताप नमुना -२ ( SF2 ) : या नोंदवहीत आरोग्य कर्मचाऱ्याने घेतलेल्या रक्त नमुन्यांची नोंद घेऊन दिलेल्या औषधोपचाराची नोंद व रक्त नमुना तपासणीचा निकाल नोंदविण्यात येतो .
  • ( ब ) हिवताप नमुना -७ ( MF – 7 ) : या नोंदवहीत हिवतापाच्या रुग्णांची सविस्तर माहिती तसेच समूळ उपचाराविषयी माहिती नोंदविण्यात येते .
 6. जन्म – मृत्यू नोंदवही :-
  • कार्यक्षेत्रातील झालेले जन्म व मृत्यूबद्दल माहिती नोंदविली जाते .
 7. ग्रामपंचायत निहाय पाणी स्त्रोत नोंदवही :-
  • उपकेंद्र / प्रा.आ.केंद्र अंतर्गत येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांची नोंदवही .
 8. पाणी नमुने तपासणी आणि ओ.टी.टेस्ट :-
  • उपकेंद्र / प्रा आ केंद्र अंतर्गत येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तपासणी व ओ.टी. टेस्ट नोंदवही .
 9. सविस्तर कार्यदर्शिका ( Master File ) :-
  • या नोंदवहीत कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी व त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती नोंदविली जाते .
 10. भेट पुस्तिका ( Visit Book ) :-
  • या नोंदवहीत वरिष्ठ अधिकारी , प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राला भेट दिल्यानंतर , कार्याची पाहणी करुन त्याबद्दल नोंद घेतात .
 11. संदर्भ सेवेची नोंदवही ( Referral Book ) :-
  • या नोंदवहीत संदर्भ सेवा दिलेल्या रुग्णांची नोंद असते . आरोग्य कर्मचारी ( स्त्री व पुरुष ) यांनी आपल्या कामाची दररोज दैनंदिनीत नोंद घेऊन त्यावरून त्यांनी आपली दर महिन्याला दौरावही सादर करावी.
Digiprove sealCopyright Material Don't Copy © 2021
error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.