सूर्य नमस्कार – Surya Namaskar in Marathi

Published by Team Marathi Doctor on

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

भारतीय संस्कृतीमधे आरोग्यप्राप्ती करिता सूर्याची उपासना केली जाते. येथे आपण सूर्य नमस्कार कसा करावा? सुर्य नमस्काराचे फायदे, सूर्य नमस्काराचे नियम, सूर्य नमस्कार आसन व मंत्रोच्चार, सुर्य नमस्कार कोणी करू नये सूर्य नमस्कार व्हिडिओ इ. सुर्य नमस्काराची सर्व माहिती पाहणार आहोत.

बालकापासून तर वृद्ध व्यक्ति पर्यंत सर्वच सूर्य नमस्काराचा अभ्यास करु शकतात . सूर्य नमस्कार हा बीजमंत्रासह सूर्यदेवतेच्या विविध नावांचे उच्चारण करुन केल्यास उपासना व व्यायाम या दोन्ही गोष्टि घडतात. 

अनुक्रमणिका

सूर्य नमस्कार व्हिडिओ Surya Namaskar Video in Marathi :-

Courtesy-Yoga With Modi, सूर्यनमस्कार व्हिडिओ, Surya Namaskar Video in Marathi, मराठी डॉक्टर, Dr. Vivekanand Ghodake, www.marathidoctor.com

सूर्य नमस्कार म्हणजे काय ? What is Surya Namaskar in Marathi ?

सकाळी सूर्योदयाच्या वेळी, श्वास व शारिरीक हालचालींचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १२ योगासने ( १२ स्टेप्स् द्वारे ८ योगासने ) करणे याला सूर्य नमस्कार असे म्हणतात.

सूर्य नमस्काराचे फायदे Benefits of Surya Namaskar in Marathi :-

१ ) जे दररोज सूर्य नमस्कार करतील, त्यांना हजार जन्म दारिद्र येत नाही. (काहीही कमी पडत नाही)

” आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने।
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्ऱ्यं नोपजायते ।। “

२ ) सूर्य नमस्कारामुळे संपूर्ण शरीराला बल प्राप्ती होते.

३ ) मन प्रसन्न होते, उत्साह वाढतो.

४ ) सूर्य नमस्कार द्यी – धृति , स्मृतिवर्धक असून ह्यामुळे इंद्रियाचे आरोग्य सुधारते.

५ ) सूर्य नमस्काराच्या अभ्यासाने निरोगी शरीर , निकोप मन , व सर्वांगीन आरोग्याची प्राप्ती होते.

६ ) सूर्य नमस्काराने शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो, त्यामुळे सूर्य नमस्काराला संपूर्ण व्यायामाचा प्रकार माणले जाते.

७ ) शीर, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, सर्व सांधे बळकट होतात.

८ ) शरीर लवचीक, स्थिर, दृढ होते. वजन नियंत्रित राहते, पाठीचा मनका व स्नायू मजबूत होतात.

९ ) सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार केल्याने शरीर व हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारे ‘ड’ जीवनसत्व Vitamin ‘D ‘ मिळते.

१० ) रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते, अग्नि प्रदीप्त होतो भूक लागते. मधुमेह रोगामध्ये विषेश फायदा होतो.

११ ) सूर्य नमस्काराच्या नियमीत अभ्यासाने दोष, धातू, मल हे घटक समप्रमाणात राहिल्याने व्याधि प्रतिबंध होतो.

जागतिक सूर्य नमस्कार दिवस World Sun Salutation day in Marathi :-

भारतीय कालगणने नुसार माघ महिन्यातील रथ सप्तमी (शुक्ल सप्तमी), या दिवशी जागतिक सूर्य नमस्कार दिवस साजरा केला जातो. 

सूर्य नमस्कार संबंधी सामान्य नियमावली Rules for Surya Namaskar in Marathi :-

१ ) ९ वर्षाचे खालील मुलांनी करु नये . 

२ ) सूर्योदयाचे वेळी पूर्वेकडे मुख करुन करावे . 

३ ) सूर्य नमस्काराचे वेळी सैल कपड़े वापरावे . सूर्य नमस्कार रिकाम्या पोटी करावे . 

४ ) ह्या काळात मादक पदार्थांचे सेवन टाळावे . 

५ ) सूर्य नमस्कारानंतर थोडा वेळ शवासन करावे . 

६ ) मासिक पाळीचे काळात तसेच गर्भावस्थेमधे व प्रसृतिनंर ४ महिने सूर्य नमस्कार करु नये. 

७ ) सूर्य नमस्कार स्नान केल्यानंतर करावे . 

सूर्य नमस्कार आसन व मंत्रोच्चार Surya Namaskar postures and Mantra-Chants in Marathi :-

सूर्य नमस्कार घालताना, प्रथम सूर्याचे नाव घ्यावे ‘ओम मित्राय नमः’ मंत्र म्हणावा, त्यानंतर खालील बारा मंत्रोच्चार करावे.

एक सूर्य नमस्कार पूर्ण झाल्यावर सूर्याचे दुसरे नाव घेऊन दुसरा सूर्य नमस्कार करावा, अश्या पद्धतीने सुर्यांची बारा नावे घेऊन बारा नमस्कार करावेत.

१ ) उर्ध्वनमस्कार – ॐ मित्राय नमः  

२ ) हस्तपादासन – ॐ रवये नमः

३ ) दक्षिणपादप्रसरणासन – ॐ सूर्याय नमः  

४ ) द्विपादप्रसरणासन – ॐ भानवे नमः

५ ) भूजान्वासन – ॐ खगाय नमः

६ ) साष्टांग प्रणिपातासन – ॐ पूष्णे नमः 

७ ) भूजंगासन – ॐ हिरण्यगर्भाय नमः 

८ ) भूधरासन – ॐ मरीचये नमः 

९ ) भूजान्वासन – ॐ आदित्याय नमः 

१० ) दक्षिणपाद संकोचनासन – ॐ सवित्रे नमः 

११ ) हस्तपादासन – ॐ अर्काय नमः 

१२ ) नमस्कारासन – ॐ भास्कराय नमः

सूर्य नमस्कार स्टेप्स ( पायर्‍या ) Surya Namaskar Steps in Marathi :-

१ ) उर्ध्वनमस्कारासन विधी व लाभ:-

विधी – 

१ ) टाचा जोडून , हात नमस्कार स्थितीमधे छातीजवळ ठेऊन व हनुवटी किंचीत कंठाशी ठेऊन उभे राहावे . 

२ ) श्वास घ्यावा व नमस्कारामधे असलेले हात तसेच पूढे ताणून हाताकडे पहात हात वर उचलून थोडे मागे वाकावे . 

३ ) हात कानाशी चिकटलेले असावे .
 

लाभ –

उदर व कटि विकार नाहीसे होतात तसेच ‘ उंची वाढते .

सबीज मंत्रोच्चारासह केल्यास समान ‘ वायूची शुद्धी होऊन पचनक्रिया सुधारते . कांस , क्षय ह्यात उपयोगी .

२ ) हस्तपादासन विधी व लाभ:-

विधी – 

१ ) हात कानावर दाबलेले ठेऊनच कंबरेतून समोर वाकावे . 

२ ) गुडघे न वाकवता पायाजवळ हात जमिनीवर टेकवावे . 

३ ) ह्या स्थितीत कपाळ गुडघ्यांना लावावे . 

४ ) श्वास सोडावा . 

लाभ – 

१ ) कटि , जानू यातील विकार दूर होतात . 

२ ) उंची वाढते . 

३ ) पोट पातळ होते . 

४ ) यकृत , प्लीहा यांचे कार्यात सुधारणा होते . बीजमंत्रासह ही क्रिया केल्यास कंठ , तालु , हृदय ह्यावर परिणाम होतो . जाठराग्नीची वृद्धी होते . कंठविकार दूर होतात . 

३ ) दक्षिणपादप्रसरणासन विधी व लाभ:-

विधी – 

१ ) डावा पाय गुडघ्यामधे वाकवून दोन्ही हाताच्या मधे ठेवावा . 

२ ) उजवा पाय मागे लांब ताणावा . 

३ ) छाती उंच करुन वर पाहावे . 

४ ) स्वास घ्यावा . 

लाभ –

१ ) उदर व प्लीहे संबंधी विकार नाहीसे होतात . 

२ ) हृदय व फुफ्फुसे सुदृढ होतात . 

३ ) सबीज मंत्रोच्चारणासह ही क्रिया केल्याने यकृत , प्लीहा , अग्न्याशय इ . उदरस्थ अवयवांचे कार्यात सुधारणा होते .

४ ) पचनक्रिया सुधारते . यकृत प्लीहेसंबंधी विकार दूर होतात . 

४ ) द्विपादप्रसरणासन विधी व लाभ:-

विधी – 

१ ) उजवा पाय सुद्धा उजव्या पायाबरोबर मागे न्यावा . 

२ ) कंबर अधिक उंच वा खाली करू नये . या स्थितिमधे पोट आंत ओढुन घ्यावे . 

लाभ –

१ ) हस्त , पाद , मेरुदंण्ड व उदर यांना लाभ होतो . 

२ ) सबीज मंत्रोच्चारण करुन ही क्रिया केल्याने कंठ, अन्ननलिका, फुफ्फुस , हृदय व मूत्रपिंड ह्यावर सकारात्मक परिणाम होऊन त्यासंबंधीचे विकार दूर होतात .

५ ) भूजान्वासन विधी व लाभ :-

विधी – 

१ ) श्वास सोडून गुडघे व हनुवटि जमीनीवर टेकवावी. 

२ ) कुल्ले / कंंबर उंच करावी. ह्या अवस्थेत स्थिर रहावे, हात हलवु नये . 

लाभ – 

१ ) श्वासनलिका , मांडया , पोटन्या , भूजान्यासन पाठीचा कणा , मान आणि हात ह्या अवयवांना लाभ मिळतो . 

२ ) सबीज मंत्रोच्चारणा करुन ही क्रिया केल्यास बद्धकोष्ठता दूर होते .

३ ) पचनक्रिया सुधारते . 

६ ) साष्टांग प्रणिपातासन विधी व लाभ :-

विधी –

 १ ) श्वास घेऊन हात , पाय व गुडघे न हलविता छाती व डोके जमीनीला टेकवावे . 

२ ) पोट आंत ओढावे व श्वास सोडावा . 

३ ) हनुवटी गळ्यावर दाबून ठेवावी . 

लाभ – 

१ ) छाती रुंद होते . 

२ ) पाचनशक्ति वृद्धिंगत होते . साष्टांग प्रणिपातासन 

३ ) पाठीचा कणा व कटि सुदृढ होते . 

४ ) सबीज मंत्रोच्चारणासह ही क्रिया केल्याने कंठ , तालु , हृदय , फुफ्फुसे व श्वासनलिका यांवर परिणाम होऊन त्या अवयवांचे विकार नाहीसे होतात .

५ ) रक्ताभिसरणात सुधारणा होते .

७ ) भूजंगासन विधी व लाभ :-  

विधी – 

१ ) पोटावर झोपून दोन्ही हात कोपरामधे दुमडून हाताचे तळवे दोन्ही पार्श्वबाजुला जमीनीवर टेकवावे व हनुवटी पण जमीनीस टेकवावी . 

२ ) हाताचे भारावर डोके , छाती वर उचलावी . कंबर उचलू नये . 

३ ) काही काळ ह्या स्थितीमधे राहून डोके पूर्ववत खाली टेकवावे . 

लाभ – 

सबीज मंत्रोच्चारणासह ही क्रिया केल्यास पचनक्रिया सुधारते . 

१ ) छाती भरदार होते . 

२ ) स्त्रियांचे गर्भाशय व मासिक पाळी संबंधी विकार दूर होतात . 

३ ) जठराग्निवर्धक 

४ ) मूत्राशय , मलाशय यांचे विकार दूर होतात . 

५ ) स्थौल्य व पृष्ठवंशासंबंधी विकारांचा प्रतिबंध करते .

८ ) भूधरासन विधी व लाभ :-

विधी – 

१ ) हात , पाय जागेवरुन न हलविता कंबर वर करुन डोके खाली करावे . 

२ ) हनुवटी गळ्यावर दाबावी . 

३ ) टाचा जमीनीला लावाव्या . 

४ ) ह्यावेळेस पोट आत ओढून श्वास बाहेर सोडावा . 

लाभ – 

१ ) उदर , हस्त , पाद , सक्थि , जानू यांना लाभ होतो . 

२ ) सबीज मंत्रोच्चारणासह ही क्रिया केल्यास कंठ , तालु , हृदय , जठराग्नि हयावर परिणाम होऊन त्यांचे कार्य सुधारते .

९ ) भूजान्वासन विधी व लाभ :-

विधी –

 १ ) श्वास सोडून गुडघे व डोके जमीनीवर टेकवावे . 

२ ) कुल्ले ( नितंब ) टाचांवर टेकवावे . ह्या अवस्थेत हात हलवु नये . 


लाभ – 

१ ) श्वासनलिका , मांडया , पोटऱ्या , पाठीचा कणा , मान आणि हात ह्या अवयवांना लाभ मिळतो . 

२ ) सबीज मंत्रोच्चारणा करुन ही क्रिया केल्यास बद्धकोष्ठता दूर होते .

३ ) पचनक्रिया सुधारते . 

१० ) दक्षिणपादसंकोचनासन विधी व लाभ :-

विधी – 

१ ) श्वास घेऊन उजवे पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये ठेवावे . 

२ ) डावा पाय मागे लांब ताणावा . 

३ ) कंबर खाली दाबून छाती उंच करुन वर पाहावे .

लाभ – 

१ ) यकृताचे विकार दूर होतात .  

२ ) मान , छाती , उदर व कटि यांतील विकार नाहीसे होतात . 

३ ) सबीज मंत्रोच्चारण करुन ही क्रिया केल्यास कंठ , हृदय , फुफ्फुसे , अन्ननलिका , मूत्रपिंड या संबंधिचे विकार दूर होतात . 

११ ) हस्तपादासन विधी व लाभ :-

विधी – 

१ ) हात कानावर दाबलेले ठेऊनच कंबरेतून समोर वाकावे . 

२ ) गुडघे न वाकवता पायाजवळ हात जमिनीवर टेकवावे . 

३ ) ह्या स्थितीत कपाळ गुडघ्यांना लावावे . 

४ ) श्वास सोडावा . 


लाभ – 

१ ) कटि , जानू यातील विकार दूर होतात . 

२ ) उंची वाढते . हस्तपादासन 

३ ) पोट पातळ होते . 

४ ) यकृत , प्लीहा यांचे कार्यात सुधारणा होते .

५ ) बीजमंत्रासह ही क्रिया केल्यास कंठ , तालु , हृदय ह्यावर परिणाम होतो .

६ ) जाठराग्नीची वृद्धी होते .

७ ) कंठविकार दूर होतात .

१२ ) नमस्कारासन विधी व लाभ :-

विधी – 

१ ) सरळ होऊन टाचा जोडून , हात नमस्कार अवस्थेत छातीजवळ ठेऊन उभे राहावे . 

२ ) हनुवटी ही किंचीत कंठाकडे वळलेली असावी . 


लाभ – 

१ ) मन शांत होते . 

२ ) सद्सद्विवेक बुद्धीजागृत होऊन संयम व धैर्य वाढते .

३ ) सबीज मंत्रोच्चारणामुळे कंठ , तालु , छाती , हृदय , श्वासनलिका , उदर , ह्या अवयवावर परिणाम होऊन यांचे कार्य सुधारते .

४ ) रक्ताभिसरणामधे सुधारणा होते .

सूर्य नमस्कार कोणी करू नयेत ? Contra Indications for Surya Namaskar in Marathi :-

१ ) उच्चरक्तदाबाच्या रुग्णांंनी डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय सूर्य नमस्कार करू नयेत.

२ ) हार्निया व जठराचा किंंवा आतडाचा अल्सर असणार्‍या रूग्णांनी सूर्य नमस्कार करू नयेत.

३ ) सायटिका, मणक्याच्या आजार असणार्‍या रूग्णांनी सूर्य नमस्कार करू नयेत.

तीव्र संधीवात किंवा तीव्र सांधेदुखी असताना सूर्य नमस्कार करू नयेत.

४ ) स्त्रियांनी मासिक पाळी दरम्यान, गरोदर पणात व प्रसृति नंतर ४ महिने सूर्य नमस्कार करु नये. 

५ ) ९ वर्षा पेक्षा कमी वयाच्या बालकांंनी सूर्य नमस्कार करु नये. 

सूर्य नमस्कार प्रश्नोत्तरे FAQ about Surya Namaskar in Marathi :-

प्रश्न १ ) सूर्य नमस्कार किती करावेत ? How many surya namaskar should be done in a day ?

उत्तर – सूर्य नमस्कार १२ वेळा करावा.

प्रश्न २ ) सूर्य नमस्कार स्टेप्स ( पाय-या ) कोणत्या? What are the 12 poses of surya namaskar?

उत्तर – १ ) उर्ध्वनमस्कार, २ ) हस्तपादासन, ३ ) दक्षिणपादप्रसरणासन, ४ ) द्विपादप्रसरणासन, ५ ) भूजान्वासन, ६ ) साष्टांग प्रणिपातासन, ७ ) भूजंगासन, ८ ) भूधरासन, ९ ) भूजान्वासन, १० ) दक्षिणपाद संकोचनासन, ११ ) हस्तपादासन, १२ ) नमस्कारासन या सूर्यनमस्कार १२ स्टेप्स आहेत.

प्रश्न ३ ) What is Surya Namaskar meaning in English ?

उत्तर- Sun Salutation

error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.