आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बोरीपार्धी अंतर्गत जागतिक योग दिन साजरा डॉ गणेश केशव भगत

Published by Team Marathi Doctor on

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बोरीपार्धी अंतर्गत नाथनगर विद्यालय बोरीपार्धी येथे 21 जून 2022 रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

योग शास्त्र याची शास्त्रीय माहिती देताना डॉ गणेश केशव भगत, समुदाय आरोग्य अधिकारी, बोरीपार्धी

यावेळी योग शास्त्र याची शास्त्रीय माहिती व शरीरा क्रिया व रचना यावर होणारे परिणाम संबधींचे अभ्यासपूर्ण सविस्तर माहिती डॉ गणेश केशव भगत, समुदाय आरोग्य अधिकारी, बोरीपार्धी यांनी दिली.

तसेच प्रात्यक्षिक दरम्यान पूर्व अभ्यास, दंडावस्था, बैठकीत, पोटावर व पाठीवर झोपून असे जवळपास 23 योगासने यांचे प्रात्यक्षिक व कृती यावर माहिती देऊन आसाने करण्यात आली.

कपालभाती, अनुलोम विलोम, ब्रामारी प्राणायाम, ध्यान करण्यात आले. शेवटी योग शास्त्र च्या आठ अंग यांची सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी बोलताना डॉ भगत यांनी सांगितले कि आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैली, आहार यामधील बदल झाल्यामुळे अनेक असंसर्गजन्य आजार यांचे प्रमाण समाजात वाढत आहे. त्यामुळे अकाल मृत्यू चे प्रमाणात हि 60% एवढ्या मोठ्या प्रमाणात वृध्दी झाली आहे. हे मृत्यू योग्य जीवनशैली चा अवलंब केला तर टाळता येण्यासारखे आहे.

शिवाय कुटुंबाच्या उत्पन्न मधून अशा आजारावर होणारा अतिरिक्त खर्च हि कमी करता येईल. यासाठी सुदृढ आरोग्य व निरामयता ( Health and Wellness) साध्य करण्यासाठी गावोगावी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथे नियुक्त झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे हि विनंती करण्यात येत आहे.

यावेळी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील आशा स्वयंसेविका सौ पाटोळे, सौ रुक्मिणी नेवसे, सौ मीना नेवसे उपस्थित होत्या. तसेच विद्यालयातील सौ कांबळे मॅडम (मुख्यद्यापिका), श्री सुपनवर सर, श्री टेंगले सर, श्री बारवकर सर, श्री शिंदे सर, श्री कांबळे सर, श्री ठाकर सर, श्री सोनवणे सर आदी उपस्थित होते.

डॉ गणेश केशव भगत, समुदाय आरोग्य अधिकारी, बोरीपार्धी यांचे आभार मानताना सौ कांबळे मॅडम

Digiprove sealCopyright Material Don't Copy © 2022
Categories: uncategorized

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published.

error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.