भारतामधे पूर्वी मसुरिका, देवी रोग साथीच्या स्वरुपात यायचा. त्यामुळे मोठया प्रमाणात प्राणहानी होत असे. या आजाराला देवी, माता, चेचक या नावाने पण ओळखतात.
देवी रोग, मसुरिका व्याधीमधे अंगावर येणाऱ्या पिटीका रंग, रूप व आकाराने मसुरीच्या डाळीप्रमाणे असल्यामुळे या व्याधीला मसुरिका म्हणून संबोधण्यात येते. इंंग्रजी मधे Masurika, Smallpox असे म्हणतात.
अनुक्रमणिका
मसुरिका, देवी रोगाचे इंंग्रजी नाव – Smallpox, Masurika
Masurika, Smallpox मराठी नावे – मसुरिका, देवी रोग, देवी, माता, चेचक इ.
देवी रोगाचे संस्कृत नाव – मसुरिका, Masurika
मसुरिका, देवी रोगाला इग्रजी मधे Smallpox असे म्हणतात.
Masurika, Devi Disease called as Smallpox in English.
मसुरिका, देवीरोग कारणीभूत घटक – ( Smallpox Causative factor ) –
मसुरिका, देवीरोगाचे कारण व्हॅरिओला विषाणु – Variola – virus आहे.
ह्या व्याधीचा वय, लिंग, जात, वंश, व्यवसाय यांच्याशी सबंंध नसला तरी प्रामुख्याने हा बाल्यावस्थेत अधिक प्रमाणात आढळुन येतो.
जन्मापासून ते ४ वर्षा पर्यंत च्या वयाच्या बालकात याचे प्रमाण अधिक असते.
गर्भवति स्त्री ला मसुरिका, देवीरोगाची लागण झाल्यास गर्भावर सुद्धा याचे विपरीत परिणाम होतात.
एकदा मसुरिका, देवीरोग येऊन गेला की शरीरामध्ये मसुरिका, देवी या रोगाविरुद्ध कायमची आयुष्यभर टिकणारी प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्या व्यक्तीला पुन्हा मसुरिका, देवीरोग होत नाही.
मसुरिका, देवीरोग या व्याधीचा संचयकाय ७ ते १७ दिवस आहे.
१ ) मसुरिका, देवीरोगाने संक्रमित व्यक्तीच्या नाकातील स्राव, श्वासोच्छ्वास, शिंक, खोकला म्हणजे तुषार संसर्ग ह्याद्वारे या ब्याधीचा प्रसार होतो.
२ ) त्वचेवरच्या पूरळ व त्यातील लस यांच्या संपर्काने मसुरिका, देवीरोगाचा प्रसार होतो.
३ ) एकदा हा व्याधि होऊन गेल्यानंतर सहसा पुन्हा होत नाही.
१ ) ज्वर/ताप- सुरूवातीचे तीन दिवस ताप ( १०३ ते १०४ फॅरेनहिट पर्यंत ) येतो.
२ ) डोकेदुखी, अंगदुखी, सर्वांगशैथिल्य, काम, प्रकाशसंत्रास ( Photophobia ),
उलटि इत्यादि लक्षणे तर बालकांमधे झटके, प्रलाप ही लक्षणे आढळतात.
३ ) ज्वरानंतरच्या तिसऱ्या दिवशी शंख प्रदेशावर लाल रंगाचे चकते ( Macules ) येतात.
४ ) त्यानंतर हे लाल रंगाचे चकते ( Macules ) हात, पाय व चेहरा यावर पसरतात.
५ ) काही तासामधे त्यावर कठिण पूरळ उत्पन्न होतात, याला पिटीका ( Papules ) म्हणतात.
६ ) त्या पिटीकेमधे लस तयार होते, या तरल अवस्थेला स्फोट ( Vesicles ) म्हणतात.
याचा आकार नाभीप्रमाणे किंवा वृत्ताकार असतो.
७ ) ४ – ५ दिवसानंतर यांत पूपनिर्मिती होते पाला पूयस्फोट ( Pustules ) म्हणतात.
८ ) नंतर ह्या पिटीका सुकुन त्यावरील खपल्या पडतात. परंतु या जागी कायम स्वरुपात जन्मभर व्रण राहतो.
९ ) या पिटीका नाक, कान, डोळे ह्या अवयवामधे ही होतात. परिणामस्वरुप रुग्ण स्वस्थ होऊनही अनेकाना कायमचे बहिरेपण व आंधळेपण येते.
आयुर्वेदानुसार मसुरिका, देवीरोग लक्षणे –
Smallpox Symptoms According to Ayurveda in Marathi –
याः सर्वगात्रेषु मसूरमात्रा मसूरिकाः पित्तकफात् प्रदिष्टाः । । (चरक)
पित्त व कफ दोषाच्या प्रकोपामुळे मसुर डाळीच्या आकाराच्या पिटीका संपूर्ण शरीरावर येतात.
१ ) विज्ञप्ति –
मसुरिका, देवी या व्याधीचा रुग्ण आढळल्यास याची सूचना त्वरित आरोग्य विभागाला द्यावी.
२ ) पृथ्यकरण ( Isolation ) –
मसुरिका, देवीरोगाच्या रुग्णाला रोगाची लक्षणे दिसू लागल्या पासून ते त्वचेवरील खपल्या पडेपर्यंत वेगळे ठेवणे आवश्यक आहे. कारण या दरम्यान रुग्णाच्या संपर्कात येणार्यास या रोगाची लागण होऊ शकते. म्हणून रुग्णास इतरानी भेटण्यास मनाई असावी.
३ ) विसंक्रमण ( Disinfection) –
रोग्याशी संबंधित वस्त्रे, भांडी, वस्तू आणि खोलीचे विसंक्रमण केसॉल किंवा फार्मेल्डीहाईड ने करावे.
४ ) व्याधीग्रस्त मुलांना शाळेत पाठवु नये. तसेच निरोगी बालकांचा रोग्याशी संपर्क टाळावा.
६ ) लसीकरण –
ब्रिटीश शास्त्रज्ञ एडवर्ड जेन्नर यांनी १७९८ साली देवी या रोगाची प्रतिबंधात्मक लस शोधली व संपूर्ण जगाला या रोगापासून मुक्त केले.
मसुरिका, देवी ह्या व्याधीचा प्रतिबंध करण्याकरिता पूर्वी लसीकरण देण्यात येत होते, परंतु ह्या व्याधीचे समूळ निर्मुलन झाले असल्यामुळे सध्या मसुरिका, देवी या रोगाच्या प्रतिबंधासाठीचे लसीकरण दिले/केले जात नाही.
६ ) मसुरिका, देवीरोगाचा रुग्णाच्या शवाची विल्हेवाट –
रुग्णाचा मृत्यु झाल्यास त्या शवाला कार्बोलिक अम्ल किंवा फॉर्म्यालिन च्या द्रावणामधे भिजविलेल्या कपड्याने गुडाळून त्वरित पुरावे किंवा जाळावे.
Eradication Of smallpox in Marathi –
१ ) जागतिक आरोग्य संघटनेने इ. स. १५६७ ते १९७९ पर्यंत मसुरिका, देवी ह्या व्याधीचे निर्मूलन करण्याच्या उद्धेशाने मोहिम राबविली.
२ ) त्याच्या परिणामस्वरूप भारतामधे मसुरिका, देवी व्याधीचा शेवटचा रुग्ण २४ मे १९७५ मधे आढळला.
३ ) एप्रिल १९७७ ला भारता मधून ह्या व्याधिचे निर्मुलन झाले, असल्याचे घोषित करण्यात आले.
४ ) ८ मे १९८० ला जागतिक आरोग्य संघटनेने मसुरिका, देवी या व्याधीचे जागतिक स्तरावर निर्मुलन झाले असल्याची घोषणा केली.
जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More
bhagar-khatana-kay-kalaji-ghyavi-bhagar-vhishbadha-bhagar-acidity Read More
सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More
गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More
जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More
उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More