अश्वगंधा ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे.आयुर्वेद उपचारांमधील ही अतिशय महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. हिला इंडिअन जिनसँग ( Winter Cherry in marathi) म्हणूनही ओळखले जाते. वृष्य व वाजीकर अशी ही अश्वगंधा वनस्पती आहे.
औषधामध्ये अश्वगंधा वनस्पती च्या मुळ, क्षार, राख, पाने, साल यांंचा वापर आयुर्वेद चिकित्सेमध्ये केला जातो.
खालील लेखामध्ये अश्वगंधा गुण, अश्वगंधा फायदे, अश्वगंधा औषधी उपयोग, अश्वगंधा चुर्ण, अश्वगंधा पावडर, अश्वगंधा औषधी मात्रा, इंडिअन जिनसँग, Indian Ginseng in Marathi, Ashwagandha in Marathi, Winter Cherry in marathi इत्यादि सर्व माहिती दिलेली आहे.
अनुक्रमणिका
अश्वगंधा ( आस्कंद ) सर्व भारतभर अश्वगंधाचे ५ ते ६ फूट उंचीचे झाड आढळते.
अश्वगंधाच्या मुळाचा उपयोग औषध म्हणून केला जातो. फांद्या गोलाकार, चारही बाजूस असणाऱ्या असतात.
Ashwagandha Plant in Marathi, Ashwagandha in Marathi Information –
पाने – एकांतराने येणारी, ५ ते १० सें. मी. लांब, गोल, पांढरी लव असणारी अशी असतात.
फुले – पत्रकोणापासून निघणारी, पिवळट, हिरवट चिलमीसारखी व गुच्छांनी येतात. शरदऋतूत फुले येतात व नंतर फळे येतात.
फळे – लहान , गोल रसरसलेली, कोशाच्या आत असणारी, पिकल्यावर लाल गुंजेसारखी दिसतात. ( ढोरगुंज म्हणण्याचे कारण हेच आहे. )
बीज – लहान , गुळगुळीत व चपटे असते.
मूळ – बाहेरुन राखी, आतून पांढरे, बोटासारखे जाड, १ / ३ ते १ / २ मीटर लांब असते.
कच्च्या ओल्या मुळाला घोड्यासारखा गंध येतो म्हणून याला अश्वगंधा म्हणतात.
Ashwagandha Meaning in Marathi अश्वगंधा मराठी अर्थ –
अश्वगंधा वनस्पतीच्या सेवनाने घोड्यासारखा उत्साह व वाजी शक्ती प्राप्त होते, म्हणूनही हिला अश्वगंधा हे नाव आहे. Ashwagandha Meaning in Marathi
Ashwagandha Meaning in Marathi, Indian Ginseng in Marathi –
अश्वगंधा शास्त्रीय नाव – Withania Somnifera विथानिया सोम्निफेरा
अश्वगंधा संस्कृत नाव – हयप्रिया, वाराहकर्णी, बलदा, कुष्ठगंधिनी, वाजिनामा, वाजिगंधा
अश्वगंधा English name – विंटर चेरी ( Winter Cherry )
अश्वगंधा हिंदी नाम – असगंध, अश्वगंधा
Ashwagandha in Marathi, Ashwagandha Names in Sansrit, English, Hindi, Marathi. अश्वगंधा मराठी अर्थ –
Ashwagandha Wikipedia in Marathi –
देशभेदाने गावठी आणि जंगली (वन्य ) असे त्याचे २ प्रकार आहेत.
अवसादक , स्वापजनन व मूत्रल
हिचा वापर बाह्य: उपचारार्थ करतात.
आभ्यंतर प्रयोगासाठी ग्राम्य अश्वगंधा उपयोगात आणावी.
अश्वगंधाची उत्पती संपूर्ण भारतात होते.
Chemical Compositions of Ashwagandha in Marathi –
१ ) वन्य जातीच्या अश्वगंधा मुळात सॉम्निफेरिन ( Somniferin ) हे तत्त्व असते व यायोगे ती स्वप्नजनन व अवसादक आहे.
२ ) ग्राम्या जातीच्या अश्वगंधा साखर, वसा, राळ व थोडे रंजक द्रव्य असते.
Above are the Chemical Properties of Ashwagandha in Marathi.
गुण – लघु , स्निग्ध
रस – मधुर, कषाय , तिक्त
वीर्य – उष्ण
विपाक – मधुर
Ashwagandha Benefits in Marathi –
१ ) अश्वगंधा कडू, मधुर व तुरट रस, लघु, स्निग्ध, उष्ण व वात – कफनाशक आहे.
२ ) अश्वगंधा रसायन, अग्निदीपक, वाताचे अनुलोमन करणारा, कृमिनाशक आहे.
३ ) अश्वगंधा लघवीचे प्रमाण वाढविणारी, सूज व वेदना नाहीसे करणारी, रक्तशोधक आहे.
४ ) अश्वगंधा हि गर्भाशयातील सूज नाहीशी करून गर्भधारणेस मदत करणारी आहे.
५ ) अश्वगंधा खोकला व दम्यावर उपयोगी, हृदयाला हितकारक आहे.
६ ) अश्वगंधा स्नायुना व जननेंद्रियांना बलदायक, शुक्रवर्धक व अंगावरचे दूध वाढविणारी आहे.
७ ) अश्वगंधा कृशता नाहीशी करणारी व पाय दुखतअसल्यासही उपयोगी.
८ ) अश्वगंधा वातरक्त, आमवात, पाठ दुखणे व कंबर दुखण्यावर उपयोगी आहे.
९ ) अश्वगंधा केस पिकणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे व वृद्धावस्था लवकर येऊ न देण्यासाठी उपयोगी रसायन आहे.
१०) अश्वगंधा हि दोष – कफवातशामक, कफवातज विकारांवर उपयोगी आहे.
These are the Benefits of Ashwagandha in Marathi.
मूळ, क्षार, राख, पाने, साल ( मुळीची शुध्दी दुधात उकडून होते. )
अश्वगंधा मुळ चूर्ण – ३ ते ५ ग्रॅम
अश्वगंधारिष्ट – २० मिलिलिटर
क्षार व राख – २ ते ३ ग्रॅम.
अश्वगंधा अतिशय शुक्रल व उत्तम वाजीकर आहे.
१ ) दोष – वातकफशामक
२ ) धातु –
३ ) मल – मूत्र ( दाहनाशक )
४ ) अवयव – जननेंद्रिये ( उभयतांची )
Ashwagandha Uses in Marathi, अश्वगंधा उपयोग मराठी –
१ ) यामुळे गलगंड, गाठीची सूज यांवर पाने अथवा मूळ यांचा लेप करतात. मुळांनी सिध्द केलेल्या तेलाचा अभ्यंग अशक्तता व वातव्याधीत करतात.
२ ) अश्वगंधासालीचा अश्वगंधा पानांत पुटपाक करुन तो रस कर्णस्रावावर कानांत टाकावा .
Ashwagandha Uses to Increase Sperm Count in Marathi –
१ ) पिंपळीसहित अश्वगंधा चूर्ण तूप व मधाबरोबर द्यावे.
२ ) अश्वगंधाचे चूर्ण तूप व मधाबरोबर सायंकाळी खावे व वर दूध प्यावे.
Ashwagandha in Pregnacy
गर्भिणी व गर्भास पुष्टिकर व मुलांना शक्तिदायक अश्वगंधाचे चूर्ण तूप व मधाबरोबर खाऊन वर दूध प्यावे.
Ashwagandha for Infertility in Marathi –
मूल होत नसल्यास व प्रदर ( धुपणी रोग ) व रक्तप्रदर अश्वगंधासिद्ध दूध तूप द्यावे .
प्रसूतीनंतरचा अशक्तपणा व दूध वाढण्यासाठी अश्वगंधा चूर्ण सिद्ध दूध प्यावे.
Ashwagandha for Insomnia in Marathi –
झोप येत नसल्यास – अश्वगंधा चूर्ण तूप व मधाबरोबर द्यावे.
स्तन व जननेंद्रिय शिथिल झाली असता – अश्वगंधामूळ दुधांत उगाळून त्याचा लेप स्तनांवर व शिस्नावर लावावा.
Ashwagandha for Lactation in Marathi –
दूध वाढविण्यासाठी – अश्वगंधा, भुईकोहळा व जेष्ठमध यांचा काढा गाईच्या दुधाबरोबर प्यावा.
Ashwagandha for Eye in Marathi –
दृष्टी वाढविण्यासाठी – अश्वगंधा, त्रिफळा व जेष्ठमध चूर्ण तूप व मधाबरोबर चाटावे.
Ashwagandha Benefits in Marathi – अश्वगंधा फायदे मराठी
नाडी संस्थान –
वातवाहिन्यांची क्षीणता, भ्रम, अनिद्रा व वातव्याधीत वातवाहिन्यांना शक्ती देणे व मस्तिष्कशामक या गुणांमुळे उपयोगी पडते.
पाचनसंस्थान – (Ashwagandha for Digestive Disease in Marathi) –
१ ) दीपन, अनुलोमन व कृमिघ्न असल्याने शूल, विष्टभ इत्यादी उदररोगांत, तसेच कृमीतही उपयोगी पडते.
२ ) परिणामशूल कमी होण्यास अश्वगंधा सालचूर्ण उपयोगी.
रक्तवहसंस्थान – (Ashwagandha for Heart Disease in Marathi) –
हृद्य, रक्तशोधक, शोथहर असल्याकारणाने हृदयदौर्बल्य, रक्तविकार व शोथ यांत उपयोगी पडते. आमवातावर सालीचा काढा उपयोगी.
श्वसनसंस्थान (Ashwagandha for Lung Disease in Marathi) –
कफघ्न व श्वासहर या कर्मामुळे तिचा उपयोग कासांत करतात. श्वासातही अश्वगंधाची राख मध व तुपात चाटवितात.
( तथैव वाजिगंधायाः लिह्यात् श्वासी कफोल्बणः । वा . चि . अ . ४ – ३९ )
फार पातळ कफ असताना या क्षाराचा व राखेचा उपयोग होतो. श्वासकासात ती बल्य म्हणूनही उपयोगी पडते. श्वासकासात सालीचा काढा थोड्या प्रमाणात द्यावा.
प्रजनन संस्थान – Ashwagandha for Reproductive System in Marathi –
अश्वगंधा अधिक ज्ञात आहे ती तिच्या वाजीकरण कर्मामुळे, शुक्रदौर्बल्यात हिचा उपयोग करतात. गर्भाशयाच्या सुजेमुळे उत्पन्न झालेल्या श्वेतप्रदरात अश्वगंधेचा चांगला उपयोग होतो.
५ ग्रॅम अश्वगंधाचूर्ण + १२ ग्रॅम तूप + २५० मि. लि. दूधव साखर याने बाळंतपणानंतरचा कटिशूल अजिबात बंद होतो. हा प्रयोग बल्य , पौष्टिक व वृष्य आहे.
मूत्रवहसंस्थान – (Ashwagandha for Urinary Disease in Marathi) –
१ ) मूत्रल आहे.
२ ) मूत्राघातात उपयोगी आहे.
३ ) मेदाच्या शैथिल्यात उपयोगी आहे.
त्वचा – (Ashwagandha for Skin Disease in Marathi) –
कुठघ्न या कर्मामुळे श्वित्र व कुष्ठांत वापरतात.
मुळाची काळी राख व्रणावर लावल्याने कुष्ठाचे फोड लवकर शुध्द होतात व रुजतात.
सात्मीकरण –
बल्य, बृहण, रसायन, वाजीकरण या गुणांनी परिपूर्ण असल्याकारणाने क्षय – शोषात अश्वगंधा उपयोगी आहे. विशेषतः बालशोषात हिचा उपयोग अधिक होतो.
अश्वगंधा चे फायदे मराठी, These are the Uses of Ashwagandha in Marathi.
१ ) अश्वगंधा उष्णवीर्य असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना देऊ नये.
२ ) जास्त प्रमाणांत सेवन केल्यास पित्तविकार वाढतात.
अश्वगंधेचा अतियोग झाल्यास त्यासाठी आवळा व तूप सेवन करावे.
अश्वगंधा अतिशय शुक्रल व उत्तम वाजीकर आहे.
जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More
bhagar-khatana-kay-kalaji-ghyavi-bhagar-vhishbadha-bhagar-acidity Read More
सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More
गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More
जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More
उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More