आहार विहार

अ जीवनसत्व आहारातील स्त्रोत, कार्ये, फायदे, कमतरतेची लक्षणे, उपचार, लस, Vitamin A in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

अ जीवनसत्व (Vitamin ‘A’) हा एक महत्त्वाचा सुक्ष्मपोशक पदार्थ आहे. हा मुलांची वृदधी आणि विकास करण्यासाठी आवश्यक आहे. जीवनसत्व (Vitamin ‘A’) रोगप्रतिकार शक्ती अबाधित ठेवते तसेच हे दृष्टीसाठीही लाभदायक आहे. जीवनसत्व अ हे शरीराला लागणारे एक महत्त्वाचे जीवनसत्व असून ते मेदात विरघळते पण पाण्यात विरघळत नाही.

जीवनसत्व – अ (Vitamin ‘A’) वरील खालील लेखात अ-जीवनसत्त्व चे लाभ, अ जीवनसत्व कार्ये, अ जीवनसत्व स्त्रोत, अ जीवनसत्व उपयोग, अ जीवनसत्व कमतरतेमुळे होणारे आजार, अ जीवनसत्व कमतरतेची लक्षणे, अ जीवनसत्व लसीकरण इत्यादि अ जीवनसत्वाची ची सर्व माहीती दिलेली आहे. Vitamin A Foods in Marathi, Vitamin A in Marathi, Vitamin A Information in Marathi –

Vitamin a foods in Marathi, vitamin a in Marathi, vitamin a information in Marathi, अ जीवनसत्व आहारातील स्त्रोत, अ जीवनसत्व कार्ये, अ जीवनसत्व उपयुक्तता, अ जीवनसत्व कमतरतेची लक्षणे, अ जीवनसत्व उपचार, अ जीवनसत्व लस

अनुक्रमणिका

अ जीवनसत्वाचे फायदे/कार्ये Vitamin ‘A’ Benefits/Functions in Marathi:-

” अ ” जीवनसत्वाची उपयुक्तता, Vitamin “A” Use in Marathi –

दैनंदिन आहारात आवश्यक तेवढ्या प्रमाणात जीवनसत्व ” अ “ चा पुरवठा झाल्यास खालील आरोग्यदाई लाभ शरीरास होतो.
१ ) दृष्टी चांगली राहते, दिवसा व रात्री स्पष्ट व चांगले दिसण्यात अडचण येत नाही. रातआंपळेपणा टाळता येतो.
२ ) अ जीवनसत्वाच्या सेवनाने शरीरात रोगप्रतिकार क्षमता वाढते.
३ ) अतिसार ( जुलाब ), न्युमोनिया व गोवर सारख्या रोगांची तीव्रता कमी होते व मृत्यू टाळता येतात.
४ ) अ जीवनसत्वाची शरीरांत रक्त तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत होते.
५ ) अ जीवनसत्वाची हाडांच्या वाढीस मदत होते.
६ ) अ जीवनसत्व पुरुष व स्त्रीयांची जननक्षमता कार्यक्षम करते.
७ ) अ जीवनसत्व गर्भाच्या स्वाभाविक वाढीसाठी गर्भवतीस सहाय्यभूत होते.

८ ) अ जीवनसत्वाच्या मियमित सेवनाने त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
९ ) अ जीवनसत्व बुध्दीच्या वाढीसाठी मदत करते.
१० ) एच . आय . व्ही . ग्रस्त मातांच्या बालकांत आजार व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास अ जीवनसत्व मदत करते.

जीवनसत्व अ कोठून व कसे मिळते? Sources of Vitamin A in Marathi:-

Source of Vitamin A in Marathi, अ जीवनसत्व आहारातील स्त्रोत –

जीवनसत्व ” अ ” आहारातून उपलब्ध होऊ शकते परंतू त्याचा उपयोग दीर्घकालीन असतो.
बालकांना जीवनसत्व ” अ “ चा अभाव टाळण्यासाठी अल्पकालीन ( तात्काळ ) उपाययोजना करणे आवश्यक असते. त्यासाठी जीवनसत्व ” अ ” चे पूरक डोस देणे आवश्यक असते.

कोणकोणत्या आहारातून अ जीवनसत्व मिळते? Vitamin A Foods in Marathi:-

अ जीवनसत्व युक्त अन्नपदार्थ, Vitamin A Foods in Marathi, जीवनसत्व अ आहारातील स्त्रोत

  • हिरव्या पालेभाज्या – जसे मेथी, अळू, पालक, मुळ्याची पाने, माठ, शेपू , कोथिंबर, कडीपत्ता, शेवग्याच्या शेंगा, फुले इ
  • तूप, ऊस, ब्रोकोली, लोणी, कोबी, बेल, मिरची
  • टोमॅटो, स्पिरुलिना, दूध व दूधाचे पदार्थ.
  • फळे – आंबा, पपई, गाजर, टरबूज, लाल भोपळा इ
  • मांसाहारी पदार्थ – डुकराचे मांस, मासे, कोंबडीचे मांस, अंड्यातील पिवळा भाग,
  • हिरव्या पालेभाज्या विशेषत: आळू , शेवगा घरातील परसबागेत लावून सहजासहजी आपल्या आहारात जीवनसत्व ” अ ” चा समावेश करता येईल.
  • आर्थिक दृष्ट्या ऋतूनुसार व उपलब्धतेनुसार आपल्याला परवडतील अशी फळे व हिरव्या भाज्यांच्या आहारात वापर ” अ ‘ जीवनसत्वाची गरज भागवतील.
Vitamin a foods in Marathi, vitamin a in Marathi, vitamin a information in Marathi, अ जीवनसत्व आहारातील स्त्रोत, अ जीवनसत्व उपयुक्तता, अ जीवनसत्व युक्त आहार

अन्न पदार्थातील अ जीवनसत्व अबाधित कसे ठेवाल? How to Preserve Vitamin A during Cooking?

हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या फळभाज्यातील व फळातील ” अ ” जीवनसत्व अबाधित ठेवण्यासाठी खाण्यापूर्वी व शिजविण्यापूर्वी खालील प्रमाणे दक्षता येणे आवश्यक असते.
१ ) फळे चिरण्यापूर्वी स्वच्छ पुवून घ्यावीत .
२ ) भाज्या चिरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. भाज्या चिरल्यानंतर धुवू नयेत. भाज्या जास्त बारीक चिरू नयेत.
३ ) भाज्या शिजवताना झाकण ठेवावे.
४ ) शिजवलेल्या भाज्यातील पाणी फेकून देऊ नये.
५ ) स्वयंपाक करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.

अ जीवनसत्व कमतरतेची लक्षणे, Vitamin A Deficiency Symptoms in Marathi:-

Vitamin A Deficiency in Marathi – अ जीवनसत्वाच्या कमतरतेची शरिरात खालील लक्षणे निर्माण होतात.

१ ) रातआंधळेपणा Night Blindness in Marathi –

१ ) रातआंधळेपणा म्हणजेच रात्रीचे नीट न दिसणे हा आजार होय, रातआंधळेपणा हे जीवनसत्व – अ च्या कमतरतेचे पहिले लक्षण आहे.

२ ) अंधत्व Blindness in Marathi –

जीवनसत्व ” अ ” च्या अभावामुळे अंधत्व येऊ शकते. सध्या दृष्टीहीन होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी जीवनसत्व ” अ ” च्या अभावामुळे आजही बालकांना होणारे आजार किंवा मृत्यूच्या प्रमाणात अपेक्षित घट साध्य करता आलेली नाही.

३ ) जीवनसत्व ” अ “ मुळे बालकांमध्ये होणारे अतिसार ( जुलाब ), न्युमोनिया, रातआंधळेपणा इ रोगांचा प्रतिबंध करता येतो.

४ ) अ जीवनसत्वाच्या सेवनाने गोवरामुळे होणाऱ्या गुंतागुतीची तीव्रता कमी होते व मृत्यू टाळता येतात. यामुळे बालकांच्या मृत्यूत ३० टक्के घट होते.
५ ) जीवनसत्व ” अ ” मुळे शरीरातील फुप्फुस , पचन संस्थेतील अवयव व मेंदूच्या आवरणातील श्लेष्मांत प्रतिकार क्षमता निर्माण होते.

अ जीवनसत्व कमतरतेवर उपचार, Treatment of Vitamin a deficiency in Marathi:-

जीवनसत्व ” अ ” कोठून व कसे मिळते? Vitamin A Information in Marathi –

जीवनसत्व ” अ ” आहारातून उपलब्ध होऊ शकते परंतू त्याचा उपयोग व फायदा हा त्वरीत दिसून न येता तो दीर्घकालीन असतो.

बालकांना व प्रौढाांमधिल जीवनसत्व ” अ ” चा अभाव टाळण्यासाठी अल्पकालीन ( तात्काळ ) उपाययोजना करणे आवश्यक असते. त्यासाठी जीवनसत्व ” अ ” चे पूरक डोस देणे आवश्यक असते.

जीवनसत्व ” अ ” चे डोसेज व वेळापत्रक, Vitamin A Doses in Marathi:-

१ ) जीवनसत्व ” अ ” सोल्युशन १०० मि. ली. च्या तपकिरी रंगाच्या बाटलीमधून उपकेंद्रास, प्राथमिक आरोग्य केंद्रास व मेडिकल दुकाणात पुरविले जाते.
२ ) जीवनसत्व ” अ “ ची क्षमता कायम राहण्यासाठी या बाटल्या सूर्यप्रकाशापासून दूर व सर्वसाधारण थंड ठिकाणी ठेवणे आवश्यक असते.
३ ) बाटलीसोबत होसच्या खुणा असलेला चमचा दिलेला असतो .

  • जीवनसत्व ” अ ” डोस वेळापत्रक ( बालकांसाठी )
  • पहिला डोस ( १लाख आय . यु . ) ९व्या महिन्यात गोवर लसीसोबत
  • दुसरा डोस ( २ लाख आ . यु . ) डी . पी . टी . बुस्टरसोबत
  • तिसरा डोस ( २ लाख आ . यु . ) २४ महिन्यानंतर
  • चौथा डोस ( २ लाख आ . यु . ) ३० महिन्यानंतर
  • पाचवा डोस ( २ लाख आ . यु . ) ३६ महिन्यानंतर

जीवनसत्व ” अ ” पुरक मात्रा वितरण राष्ट्रीय कार्यक्रम आहारातून जीवनसत्व ” अ ” चा पुरवठा होतो. परंतू जीवनसत्व ” अ ” चा अभाव टाळण्यासाठी व बालकांना जीवनसत्व ” अ “ च्या अभावाच्या दुष्परिणामापासून संरक्षण करण्यासाठी शासन जीवनसत्व ” अ “ पुरक मात्रा वितरण उपाय योजना राबवत आहे. या योजने खाली ९ महिने ते ३ वर्षेवयोगटापर्यंत प्रत्येक सहामाहीस जीवनसत्व ” अ “ च्या सोल्युशनचे डोस दिले जातात.

जीवनसत्व ” अ ” चे डोस लसीकरण सत्रात व एरव्हीही सर्व सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाड्यांतून मोफत दिले जातात.

गोवरच्या उपचारादरम्यान जीवनसत्व अ चे खालील प्रमाणे डोस द्यावे – Measles Vitamin A Doses in Marathi:-

गोवरच्या उपचारादरम्यान जीवनसत्व – अ चे खालील प्रमाणे डोस दयावे –

       वय            निदान झाल्याच्या दिवशी       दुसऱ्या दिवशी
६ महिन्यांहून लहान बाळ    ५०,००० आई. यू.        ५०,००० आई. यू.
६ ते ११ महिन्यांचे बाळ     १,००,००० आई. यू.      १,००,००० आई. यू.  
१२ महिन्यांहून मोठे मूल     २,००,००० आई. यू.     २,००,००० आई. यू.

अ जीवनसत्वा बाबत साधारणतः विचारले जाणारे प्रश्न FAQ About Vitamin A in Marathi:-

प्रश्न १ ) अ जीवनसत्व ही एक लस आहे का ?

अ जीवनसत्व लसीकरण, Vitamin A Vaccination in Marathi –

उत्तर :- नाही, जीवनसत्व -अ ही कोणतीही लस नाही , जीवनसत्व – अ हा एक सुक्ष्मपोशक पदार्थ आहे. हा मुलांची वृदधी आणि विकास करण्यासाठी आवश्यक आहे.
अ जीवनसत्व रोगप्रतिकार शक्ती अबाधित ठेवतो तसेच हे दृष्टीसाठीही लाभदायक आहे.

प्रश्न २ )मुलांमध्ये अ जीवनसत्वाच्या कमतरतेची कोणती लक्षणे दिसून येतात?

Vitamin A Deficiency Symptoms in Marathi –

उत्तर :- रातआंधळेपणा म्हणजेच रात्रीचे नीट न दिसणारा आजार , हे जीवनसत्व – अ च्या कमतरतेचे पहिले लक्षण आहे. रातआंधळेपणाने बाधित झालेल्या मुलांना अंधारात नीट दिसत नाही , मात्र स्वच्छ प्रकाशात ते सामान्यपणे पाहु शकतात. डॉक्टरांमार्फत कोणत्याही आरोग्य केंद्रावर जीवनसत्व – अध्या कमतरतेचे निदान केले जाऊ शकते.

प्रश्न ३ ) अ जीवनसत्वाचे एकूण किती डोस मुलांना दिले जातात ?

Vitamin A Dose in Marathi –

उत्तर :- जीवनसत्व – अ चे एकूण ९ डोस मुलांना दिले जातात . जीवनसत्व – अ चा पहिला डोस वयाचे ९ महिने पूर्ण झाल्यानंतर गोवर लसीच्या पहिल्या डोससोबत दिला जातो.
त्याप्रमाणे, दुसरा डोस गोवर लसीच्या दुसऱ्या डोस सोबत वयाच्या १६-२४ महिन्यापर्यंत दिला जातो. तिसरा ते नववा डोस वयाच्या ५ वर्षापर्यंत दर महिन्यांनी दिला जातो.

जीवनसत्व – अ च्या कोणत्याही २ डोस मध्ये किमान ६ महिन्यांचे अंतर असावे.
जीवनसत्व – अ चा पहिला डोस ( १ वर्षाआतील बालकांस ) १ मिली म्हणजेच १ लाख इंटरनॅशनल युनिट इतका दयावा. चमच्यावरील अर्धी खुण १ लाख इंटरनॅशनल युनिट दर्शिवते. जीवनसत्व – अ चा दुसरा ते नववा डोस २ मि. ली. म्हणजेच २ लाख इंटरनेशनल युनिट इतका दयावा. संपुर्ण चमचा २ लाख इंटरनॅशनल युनिट दर्शविते.

प्रश्न ३ ) जीवनसत्व – अ कसे द्यावे ?

How to Give Vitamin A in Marathi ?

उत्तर :- जीवनसत्व – अ हे गडद रंगाच्या बाटली मध्ये द्रव रुपात उपलब्ध असते.
प्रत्येक बाटली सोबत एक स्वतंत्र चमचा प्रदान केला जातो आणि या चमच्यावरील खूण औषधी मात्रेचे प्रमाण दर्शविते. जीवनसत्व – अ ची बाटली उघडण्यापूर्वी त्याची मुदतबाह्य दिनांक तपासून घ्यावी.

प्रश्न ४ ) जीवनसत्व – अ ला तोंडावाटे दिल्या जाणाया अन्य लसीसोबत दिले जाऊ शकते का ?

Vitamin A with other Vaccines in Marathi –

उत्तर :- हो , जीवनसत्व – अ हे तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या अन्य लसी जसे, पोलिओ ( ओ. पी. वी. ) किंवा रोटावायरस व्हॅक्सिनसोबत निश्चितच दिले जाऊ शकते.
मात्र ध्यानात ठेवावे की, जीवनसत्व – अ व अन्य लसींना मिसळून / एकत्रित देऊ नये.

प्रश्न ५ )जीवनसत्व – अ चे डोस देताना कोणती काळती घ्यावी ?

Vitamin A Precautions in Marathi –

उत्तर :- जीवनसत्व – अ चे डोस देताता खालील बाबी लक्षात ठेवाव्यात – जीवनसत्व – अ ची बाटली एकदा उघडल्यानंतर ८ आठवडयांपर्यंतच वापरावी.
म्हणूनच, एकदा बाटली उघडल्यानंतर लेबलवरती बाटली उघडल्याची तारीख स्पष्टपणे नमूद करावी, जीवनसत्व – अ च्या बाटलीला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.
जीवनसत्व – अ चा डोस सोबत पुरविण्यात आलेल्या चमच्यानेच दयाया ( प्रत्येक चमच्यावर योग्य औषधी मात्रेची खूण केलेली आहे ).
जीवनसत्व – अ औषधी मात्रा देण्यापूर्वी बाटली उघडल्याची दिनांक तसेच मुदत्तबाहय दिनांक ( एक्सपायरी डेट ) तपासून घ्यावी.

प्रश्न ६ ) जीवनसत्व – अ च्या कमतरतेची चिन्हे दिसल्यास बालकांचा उपचार कसा करावा ?

Vitamin A deficiency treatment in Marathi –

उत्तर:- जीवनसत्व – अ च्या कमतरतेची लक्षणे आढळल्यास किंवा त्याचे निदान झाल्यावर जीवनसत्व – अ चा २ लाख इन्टरनॅशनल युनिट ( २ मि. ली. ) औषधी डोस दयावा.
तसेच १ ते ४ आठवडयानंतर लाख इन्टरनॅशनल युनिट ( मि. ली. ) चा औषधी डोस दयावा.

प्रश्न ७ ) अ जीवनसत्वाचा अतिरिक्त डोस गोवर बाधित रुग्णांना का दिला जातो?

Vitamin A for Measles in Marathi –

उत्तर:- जीवनसत्व – अ चा अतिरिक्त डोस गोवर आजाराच्या उद्रेकामध्ये गोवरने बाधित रुग्णांना दिला जातो. गोवर आजारामुळे होणाऱ्या मृत्यूदरामध्ये जीवनसत्व – अ चा डोस दिल्यानंतर निश्चितच घट दिसून येते.

गोवर आजाराच्या संसर्गामध्ये, शरीरामध्ये उपलब्ध असलेल्या जीवनसत्वांचा ( जीवनसत्व – अ ) योग्यप्रकारे उपयोग होत नाही. म्हणूनच, जरी पूर्वी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत किंवा रोग – प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जीवनसत्व – अ दिले गेले असेल तरीही, गोवरने बाधित झालेल्या सर्व बालकांना जीवनसत्व – अ चा औषधी डोस देण्यात यावा.

Copyright Material Don't Copy © 2020

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023