आजारांची माहिती

वरी, वरई, भगरीचे सेवन करताना काय काळजी घ्यावी?

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात घडत आहेत. भगर सेवन करताना कोणती काळजी घावी याची सविस्तर माहिती खालील लेखात देण्यात आलेली आहे.

वरीवरई किंवा भगर हे भारतात उगवणारे एक भरड धान्य तथा तृणधान्य आहे. महाराष्ट्रात याच्यापासून भात, पुऱ्या, भाकरी, थालपिठे आदी उपवासाचे अन्नपदार्थ बनतात. हे धान्य वऱ्याचे तांदूळ किंवा भगर म्हणूनही ओळखले जाते.

 महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. भगर हि उपवासाकरीता वापरली जाते.

भगर खाल्याने का अन्न विषबाधा होते ?

भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस (Aspergillus) प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन (Fumigaclavine) यासारखी विषद्रव्ये (Toxins) तयार होतात. ऑक्टोबर महिन्यातील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे भगर खाताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

भगर खाताना काय काळजी घ्यावी ?

  1. बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या, ब्रैड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा.
  2. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.
  3. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी.
  4. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा,

भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.

भगर खाल्याने ऍसिडिटी का होते ?

भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ऍसिडिटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात.

या पदार्थांचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादेतच करावे.

भगर विक्रेत्यांनी काय काळजी घ्यावी ?

  1. विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी.
  2. भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या.
  3. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये.
  4. सुटी भगर व खूले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.

अन्न व औषध प्रशासनाचे वतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात केली जाऊ शकते.

Recent Posts

SRDP उपचार: संपूर्ण माहिती, फायदे आणि प्रक्रिया

प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More

05/03/2025

सोरायसिस कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आधुनिक उपचार

प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More

27/02/2025

PCOD उपचार: कारणे, लक्षणे, उपाय आणि जीवनशैलीतील बदल

प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More

25/02/2025

केस गळती थांबवण्याचे उपाय, कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि नवीन उपचार

प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More

22/02/2025

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग: कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध, लस आणि नवीन उपचार

प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More

21/02/2025

आम्लपित्त – ऍसिडिटी उपचार, कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More

20/02/2025