इतर

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास

जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या आणि आरोग्याशी संबंधित अधिकारांबद्दल जागरूक केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल १९५० मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापने बरोबरच जागतिक आरोग्य दिनाचीही पायाभरणी झाली. जगातील अनेक देशांनी आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांना गंभीर आजारांपासून जागरूक आणि सुरक्षित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

जागतिक आरोग्य दिन १९५० मध्ये स्थापन झाल्यानंतर दोन वर्षांनी प्रथमच साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी आरोग्य दिन साजरा करण्यासाठी एक वेगळी थीम तयार केली जाते.

जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो?

जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. डब्युएचओ (WHO) ची स्थापना करण्याचा उद्देश आरोग्याच्या दृष्टीकोनातून जीवनाचा दर्जा सुधारणे हा होता. तसेच आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करणे आणि प्रत्येकाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश होता. हे उद्दिष्ट अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.


वर्ष २०२४ ची थीम काय आहे?

जागतिक आरोग्य दिन २०२४ ची थीम माझे आरोग्य, माझे हक्क (My Health My Right) आहे. या वर्षीची थीम जगभरातील आरोग्य समस्या आणि संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

प्रत्येकाला अत्यावश्यक आरोग्य सेवा, आरोग्य शिक्षण आणि संबंधितमाहिती सर्वत्र मिळावी, हा ही थीम तयार करण्याचा उद्देश आहे.

शुद्ध पिण्याचे पाणी, शुद्ध हवा, आवश्यक पोषण, राहण्यासाठी चांगले घर, चांगले वातावरण आणि काम करण्याची परिस्थिती हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. आणि हाच विचार करून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) २०२४ सालासाठी जागतिक आरोग्य दिनाची थीम ठेवली आहे – माझे आरोग्य, माझे हक्क.

Recent Posts

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023

पांढरे डाग, कोड त्वचारोग लक्षणे, कारणे, निदान, उपचार, घरगुती उपाय, Vitiligo in Marathi

कोड रोग म्हणजे काय ? कोड रोग म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर… Read More

19/02/2023