pregnancy care tips marathi, pregnancy care tips marathi, care in pregnancy in marathi, गरोदर पणातील आहार, काळजी व सल्ला, मराठी माहिती, Care During Pregnancy in Marathi, Pregnancy Diet in Marathi, Pregnancy Care Tips In Marathi, pregnancy care in marathi, how to care in pregnancy in marathi language, pregnancy care marathi sites, after pregnancy care in marathi,
गरोदर पणातील काळजी व सल्ला, Care During Pregnancy in Marathi, Pregnancy Care Tips In Marathi गरोदरपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा काळ असतो. परंतु या कालावधीत कशी काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, आहारात काय बदल करावा, डॉक्टरांकडे कधी किती वेळा तपासणीस जावे, कोणती औषधे सेवन करावीत. हे असे अनेक प्रश्न पडतात. खालील लेखात या सर्व प्रश्नांची शास्त्रोक्त उत्तरे पाहूयात.
अनुक्रमणिका
गर्भवती असल्याचे कळताच जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वत : ची नोंदणी करावी . गरोदर मातेला प्रसुतीपूर्व ४ तपासण्या करुन घेणे आवश्यक आहे .
पहिली प्रसुतीपूर्व तपासणी | पाळी चुकल्या नंतर लगेचच किंवा तीन महिन्याच्या आत |
दुसरी प्रसुतीपूर्व तपासणी | गरोदरपणाच्या चौथ्या ते सहाव्या महिन्याच्या आत . ( १६ ते २४ आठवड्या दरम्यान ) |
तिसरी प्रसुतीपूर्व तपासणी | गरोदरपणाच्या सातव्या ते आठव्या महिन्यामध्ये . ( २८ आठवडे ते ३२ आठवड्या दरम्यान ) |
चौथी प्रसुतीपूर्व तपासणी | गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात ( ३६ ते ३८ आठवडे दरम्यान ) |
नियमितपणे प्रसुतीपूर्व तपासणी केल्याने स्वत : चे व गर्भाचे गुंतागुंती पासून संरक्षण करता येते , आई व बालक दोघांचं आरोग्य चांगले राहते .
पाळी चुकल्यानंतर तात्काळ गर्भारपणाची खात्री करून घ्यावी व पहिल्या तिमाहीमध्ये फोलीक अॅसिडची गोळी घ्यावी . प्रत्येक प्रसुतीपूर्व तपासणीमध्ये रक्त व लघवीची तपासणी , रक्तदाब , वजन व पोटावरील तपासणी करुन घ्यावी .
आपल्याला जंतनाशक , लोहयुक्त व कॅल्शियमच्या गोळ्या मिळाल्याचे व धनुर्वात प्रतिबंधक लसचे दोन डोस मिळाल्याची खात्री करा . जर गरज असेल किंवा आपल्याला सल्ला दिला असेल , तर तज्ञांकडून तपासणी करुन घ्या .
एका महिन्याच्या अंतराने धनुर्वात प्रतिबंधक ( टी.टी. इंजेक्शन ) लस दोनदा घ्यावी किंवा मागील ३ वर्षामध्ये गर्भधारणेत जर २ टीटी ( IT ) च्या मात्रा घेतल्या असतील तर टीटी बुस्टर डोस घ्यावा .
धनुर्वात प्रतिबंधक ( टी.टी. इंजेक्शन ) लस माता व बालक यांना जीवघेण्या धनुर्वातापासून ( टिटेनस ) वाचवते .
वरील सर्व गोळ्या आपल्या जवळच्या उपकेंद्र / आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपलब्ध आहेत .
अनेक प्रकारच्या खादय पदार्थांपासून मिळून तयार झालेला संतुलित आहार गर्भाच्या वाढीला मदत करतो आणि रक्तातील हिमोग्लोबीनची कमतरता होवू देत नाही .
१) लोह घटक –
हिरव्या पालेभाज्या , कडधान्ये , सुकामेवा , शेंगदाणे , मांस , गुळ
२) कॅल्शियम –
IMILKI दूध आणि दुग्धजन्य पदार्थ , तिळ , बदाम , सोयाबिनचे दूध , अंडे
३) जीवनसत्त्वे –
संत्री व हिरव्या पालेभाज्या , रसाळ फळे , सफरचंद , टोमॅटो , आवळा , मांस , मासे , दूध व दुग्धजन्य पदार्थ
४) प्रथिने –
पनीर , दूध आणि दुग्धजन्य पदार्थ , धान्य / कडधान्याचे मिश्रण ( भाजणी ) , शेंगदाणे , अंडी , मांस , कोंबडी व सोयाबिन
५) स्निग्धपदार्थ –
लोणी , तूप , तेल , शेंगदाणे
आपल्या परिसरामध्ये आढळणारी सर्व प्रकारची मोसमी फळे , भाज्या व पदार्थांचे सेवन करा .
योग्य विश्रांतीमुळे आपला शारीरिक व मानसिक ताण दूर होतो . जे आपल्या व गर्भातील वाढणाऱ्या शिशुसाठी चांगले असते .
गरोदरपणात पती , सासू इतर नातेवाईकांकडून काळजी व सहयोग आणि आधार मिळाल्यास गर्भवती मातेमध्ये भावनिक आधार व विश्वास निर्माण होतो.
जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More
bhagar-khatana-kay-kalaji-ghyavi-bhagar-vhishbadha-bhagar-acidity Read More
सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More
गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More
जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More
उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More