अनुक्रमणिका
कोड रोग म्हणजे काय ?
कोड रोग म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर पांढरे डाग दिसतात किंवा त्वचा पूर्णपणे पांढरी होते. ज्या पेशी त्वचेला रंग असण्यास कारणीभूत असतात, त्या गेल्यामुळे किंवा त्यांचे कार्य थांबल्यामुळे, कोड रोग उद्भवतो. ह्या रोगामद्धे, त्वचेवरील पांढरे डाग आकाराने मोठे होत जातात. Melanin च्या कमतरेतेमुळे Vitiligo होतो. हा रोग असणार्यांचा आत्मविश्वास कमी होतो व त्यांना लोकांमध्ये मिसळण्यास नको वाटू शकते व ह्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. प्रामुख्याने ह्याच कारणाने vitiligo असणारे लोक ह्या रोगावरील उपचार शोधतात. ह्या लेखामद्धे आपण पाहणार आहोत, कोडाची कारणे, कोड ह्या त्वचा रोगाची लक्षणे व ह्या त्वचारोगावरील उपचार.
कोड रोग कशामुळे होतो (Causes of Vitiligo in Marathi)
- Melanin ह्या pigment मुळे त्वचेला रंग असतो. Melanocytes नावाच्या पेशी melanin तयार करतात. ह्या पेशींच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग जातो किंवा पांढरा होतो. Vitiligo चे नेमके कारण ज्ञात नाही पण असे आढळून आले आहे की कोड ही एक autoimmune condition आहे.
- अनेकदा असे दिसून येते की ज्या व्यक्तीला कोड आहे, त्याचा एखादा नातेवाईकही ह्याच रोगाने त्रस्त असतो, म्हणजेच असे म्हणता येईल की कोड रोग अनुवंशिक असावा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला हा रोग असेल, तर तिच्या कुटुंबातील इतर कोणालाही हाच रोग असण्याची शक्यता असते.
- ज्या लोकांची त्वचा गडद रंगाची आहे, त्यांना कोड रोग असण्याची जास्त संभावना असते.
पांढरे डाग येण्याचे कारण (Reasons for White Spots on Skin in Marathi)
वर नमूद केल्याप्रमाणे, melanocytes च्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग जातो, म्हणजेच त्वचा पांढरी दिसू लागते. हयाचाच अर्थ असा की कोड रोगा मध्ये त्वचेचे काही भाग पांढरे दिसतात म्हणजेच त्वचेवर पांढरे डाग पडतात.
कोड रोग संसर्गजन्य आहे का? (Is Vitiligo Contagious?)
कोड रोग अनुवंशिक किंवा जनुकीय कारणांनी होतो. वातावरणातील काही घटकांमुळे देखील कोड रोग उद्भवू शकतो किवा वाढू शकतो. परंतू कोडरोग संसर्गजन्य नाही.
कोड रोग उपचार ( Vitiligo Treatment in Marathi)
- corticosteroid :- त्वचेवर corticosteroids लावल्याने, त्वचेचा रंग सुधारू शकतो.
- रोग प्रतिकारक शक्ती वर परिणाम करणारी औषधे देखील कोड रोगावर परिणामकारक ठरतात.
- Photo therapy, ज्यामधे त्वचेवर UVB किरणांचा वापर केला जातो, हा देखील कोड रोगावरचा एक उत्तम उपाय आहे. साधारण 6 महिन्यांमध्ये, ह्या उपचार पाद्धेतीचा चांगला परिणाम दिसू शकतो, म्हणजेच, त्वचेवरील पांढरे डाग कमी होऊन, त्वचेचा रंग पूर्ववत होऊ लागतो.
- Depigmenting agent चा वापर करून, Vitiligo मुळे पांढरे नं झालेले त्वचेचे भाग पांढरट/फिकट केले जातात, ज्यामुळे संपूर्ण त्वचेचा रंग कोडामुळे बदललेल्या त्वचेसारखा दिसू लागतो.
- Skin ग्राफटिंग ह्या प्रक्रियेमधे, कोडाने बाधित त्वचेमध्ये, निरोगी त्वचेच्या काही भागाचे रोपण केले जाते.
- Blister ग्राफटिंग ह्या प्रक्रियेमधे, निरोगी त्वचेवर blisters केले जातात, आणि कोडाने बाधित त्वचेच्या भागांमध्ये ह्या blisters च्या वरच्या भागाचे रोपण केले जाते.
- सेल्यूलर सस्पेंशन ट्रन्स्प्लांट (Cellular Suspension Transplant) ह्या वैद्यकीय प्रक्रियेमधे, निरोगी त्वचेतील टिशू घेतले जातात व त्यातील पेशींना एका द्रव्यामद्धे ठेवले जाते, ज्यानंतर, कोडाचे डाग असलेल्या त्वचेवरील भागांमध्ये त्यांचे रोपण करतात. ह्या उपचार्पद्धतीचे परिणाम साधारण 4 आठवड्यामध्ये दिसू लागतात.
सारांश
ह्या लेखामद्धे आपण आढावा घेतला, कोड रोगाची कारणे (reasons behind vitiligo in Marathi), लक्षणे (vitiligo symptoms in Marathi) आणि उपचारांचा (Vitiligo Treatments in Marathi). ह्या त्वचा रोगाच्या योग्य निदानासाठी आणि त्यानुसाऱ ह्या रोगावर योग्य असे उपचार करून घेण्यासाठी, तज्ञाचे मार्गदर्शन घेणे उत्तम.
अनुभवी त्वचारोग तज्ञ (dermatologists in Marathi) तुम्हाला उत्तम सल्ला देतील, तुमच्या त्वचारोगाचे योग्य निदान करतील व तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल अशी उपचारपद्धती सुचवतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तुम्हाला त्वचेचा मूळ रंग व सौंदर्य परत मिळवता येईल.