गरोदर पणातील आहार, काळजी व सल्ला Pregnancy Care Tips Marathi

pregnancy care tips marathi, pregnancy care tips marathi, care in pregnancy in marathi, गरोदर पणातील आहार, काळजी व सल्ला, मराठी माहिती, Care During Pregnancy in Marathi, Pregnancy Diet in Marathi, Pregnancy Care Tips In Marathi, pregnancy care in marathi, how to care in pregnancy in marathi language, pregnancy care marathi sites, after pregnancy care in marathi,

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

गरोदर पणातील काळजी व सल्ला, Care During Pregnancy in Marathi, Pregnancy Care Tips In Marathi गरोदरपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा काळ असतो. परंतु या कालावधीत कशी काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, आहारात काय बदल करावा, डॉक्टरांकडे कधी किती वेळा तपासणीस जावे, कोणती औषधे सेवन करावीत. हे असे अनेक प्रश्न पडतात. खालील लेखात या सर्व प्रश्नांची शास्त्रोक्त उत्तरे पाहूयात.

नोंदणी

गर्भवती असल्याचे कळताच जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वत : ची नोंदणी करावी . गरोदर मातेला प्रसुतीपूर्व ४ तपासण्या करुन घेणे आवश्यक आहे .

पहिली प्रसुतीपूर्व तपासणी पाळी चुकल्या नंतर लगेचच किंवा तीन महिन्याच्या आत
दुसरी प्रसुतीपूर्व तपासणी गरोदरपणाच्या चौथ्या ते सहाव्या महिन्याच्या आत . ( १६ ते २४ आठवड्या दरम्यान )
तिसरी प्रसुतीपूर्व तपासणी गरोदरपणाच्या सातव्या ते आठव्या महिन्यामध्ये . ( २८ आठवडे ते ३२ आठवड्या दरम्यान )
चौथी प्रसुतीपूर्व तपासणी गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात ( ३६ ते ३८ आठवडे दरम्यान )
pregnancy care tips marathi, care in pregnancy in marathi, गरोदर पणातील आहार, काळजी व सल्ला, मराठी माहिती, Care During Pregnancy in Marathi,

नियमितपणे प्रसुतीपूर्व तपासणी केल्याने स्वत : चे व गर्भाचे गुंतागुंती पासून संरक्षण करता येते , आई व बालक दोघांचं आरोग्य चांगले राहते .

प्रसुतीपूर्व तपासणी

पाळी चुकल्यानंतर तात्काळ गर्भारपणाची खात्री करून घ्यावी व पहिल्या तिमाहीमध्ये फोलीक अॅसिडची गोळी घ्यावी . प्रत्येक प्रसुतीपूर्व तपासणीमध्ये रक्त व लघवीची तपासणी , रक्तदाब , वजन व पोटावरील तपासणी करुन घ्यावी .

आपल्याला जंतनाशक , लोहयुक्त व कॅल्शियमच्या गोळ्या मिळाल्याचे व धनुर्वात प्रतिबंधक लसचे दोन डोस मिळाल्याची खात्री करा . जर गरज असेल किंवा आपल्याला सल्ला दिला असेल , तर तज्ञांकडून तपासणी करुन घ्या .

प्रसुतीपूर्व प्रयोशालेय तपासण्या

  • लघवीची तपासणी:- लघवीमध्ये अल्बुमिन व साखर तर नाही यासाठी तपासणी करुन घ्या .
  • स्वत : चे वजन करून घ्या . ( गरोदरपणात सरासरी ९ ते ११ किलो वजन वाढते . )
  • रक्तातील हिमोग्लोबीनच्या तपासणीमुळे रक्तक्षयाचे प्रमाण किती आहे , हे कळण्यासाठी व त्यावर उपचार करण्याला मदत होते .
  • लघवीमधील अल्बुमिन व साखरेचे प्रमाण कळाल्यास स्वत : चे व गर्भाचे संभाव्य गुंतागुंती पासून संरक्षण करता येते .
  • रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घ्यावे .
  • रक्तातील TSH चे प्रमाण तपासून घ्यावे .
  • रक्तक्षय जाणून घेण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण किती आहे यासाठी तपासणी करुन घ्या .
  • रक्तगट माहिती करून घ्या .
  • VDRL / HIV या चाचणी करून घ्या .

प्रसुतीपूर्व शारीरिक तपासण्या

  1. उच्च रक्तदाब जाणून घेण्यासाठी स्वत : च्या रक्तदाबाची चाचणी करुन घ्या . उच्च रक्तदाब हे तुम्हाला व गर्भाला धोकादायक ठरु शकते .
  2. गरोदरपणात शिशुची वाढ समजण्यासाठी पोटावरुन तपासणी करणे आवश्यक आहे . गरोदरपणामध्ये पोटावरुन तपासणीमुळे गर्भावस्थेतील शिशुची वाढ आणि त्याची प्रगती समजण्यास मदत होते .

धनुर्वात प्रतिबंधक लस ( टी.टी. इंजेक्शन )

एका महिन्याच्या अंतराने धनुर्वात प्रतिबंधक ( टी.टी. इंजेक्शन ) लस दोनदा घ्यावी किंवा मागील ३ वर्षामध्ये गर्भधारणेत जर २ टीटी ( IT ) च्या मात्रा घेतल्या असतील तर टीटी बुस्टर डोस घ्यावा .

धनुर्वात प्रतिबंधक ( टी.टी. इंजेक्शन ) लस माता व बालक यांना जीवघेण्या धनुर्वातापासून ( टिटेनस ) वाचवते .

आयर्न फॉलिक अॅसिड, जंतनाशक कॅल्शियम कार्बोनेट गोळ्या

  • आयर्न फॉलिक अॅसिड ( आय.एफ.ए. ) जंतनाशक व कॅल्शियम कार्बोनेट गोळ्या घ्या. गरोदरपणामध्ये रक्तवाढीसाठी आयर्न ( लोह ) व फोलिक अॅसिडच्या १८० गोळया व रक्तदाब वाढू नये यासाठी कॅल्शियम कॉर्बोनेटच्या ३६० गोळया दिल्या जातात .
  • गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यापासून बाळंतपण होईपर्यंत ( सहा महिने ) आय.एफ.ए. ची एक गोळी दररोज जेवण झाल्यावर २ तासानंतर घ्यावी .
  • जर आपल्या शरीरामध्ये रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण ११ ग्रॅम टक्के पेक्षा कमी असेल तरे , आपणास आय.एफ.ए.च्या दोन गोळया रोज घेण्याचा सल्ला दिला जाईल . एक गोळी सकाळी आणि एक गोळी सायंकाळी जेवण झाल्यावर दोन तासानंतर घ्यावी .
  • गरोदरपणाच्या ४ थ्या महिन्यापासून बाळंतपण होईपर्यंत कॅल्शियम कॉर्बोनेटच्या २ गोळया १ सकाळी / दुपारी व १ संध्याकाळी / रात्री जेवणानंतर लगेचच घ्याव्यात .
  • दररोज आय.एफ.ए. ची एक गोळी ( लोहयुक्त गोळी ) घेतल्याने आईच्या रक्तात हिमोग्लोबीनची कमतरता होत नाही , आणि निरोगी शिशुचा जन्म सुनिश्चित होतो . आय.एफ .ए . ची गोळी जेवण झाल्यावर २ तासानंतर घ्यावी . त्यामुळे मळमळणे किंवा उलटी होणे हे टाळले जाते . आय.एफ .ए . ची गोळी चूकवू नये .
  • कॅल्शियम कार्बोनेटच्या २ गोळ्या १ सकाळी व १ संध्या . जेवणानंतर लगेच घ्याव्यात , आय.एफ .ए . व कॅल्शियम कार्बोनेटच्या गोळया एकत्र घेवू नये .
  • टॅबलेट अल्बेंडॅझोल ( ४०० मिली ग्रॅ . ) सदरची एक जंतनाशक गोळी सर्व गरोदर स्त्रीयांनी गरोदरपणाच्या ४ थ्या महिन्यात ( १४ ते १६ आठवडे ) घ्यावी .

वरील सर्व गोळ्या आपल्या जवळच्या उपकेंद्र / आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपलब्ध आहेत .

गरोदरपणातील आहार

  • गरोदरपणाच्या काळात आपण नेहमीपेक्षा एक अतिरिक्त जेवण घेणे आवश्यक आहे .
  • दूध आणि दही , ताक , पनीर यासारखे दुधाचे पदार्थ घ्या , यामध्ये कॅल्शियम , प्रथिने आणि जिवनसत्त्व याचे प्रमाण जास्त असते .
  • ताजी / मोसमी फळे आणि भाज्या खा , कारण यापासून जीवनसत्त्व आणि खनिजे मिळतात , तृणधान्ये / कडधान्ये आणि डाळी यामध्ये प्रथिनांचा चांगला स्त्रोत असतो .
  • हिरव्या भाज्यांमध्ये लोहघटक आणि फोलिक अॅसिड भरपूर असते .
  • मुठभर ( ४५ ग्रॅम ) शेंगदाणे आणि कमीत कमी २ कप डाळीपासून शाकाहारी लोकांची दिवसभराची प्रथिनाची गरज पूर्ण होते .
  • मांसाहारी लोकांसाठी मांस , अंडी , कोंबडी तसेच मासे हे प्रथिने , जीवनसत्त्व आणि लोह घटकाचे चांगले स्त्रोत आहेत .
  • रोज जेवणानंतर एका लिंबू वर्गीय फळाचे ( उदा . लिंबू , संत्रे , मोसंबी ) सेवन करावे .

अनेक प्रकारच्या खादय पदार्थांपासून मिळून तयार झालेला संतुलित आहार गर्भाच्या वाढीला मदत करतो आणि रक्तातील हिमोग्लोबीनची कमतरता होवू देत नाही .

आवश्यक पोषक घटकांचे भरपूर स्त्रोत

१) लोह घटक

हिरव्या पालेभाज्या , कडधान्ये , सुकामेवा , शेंगदाणे , मांस , गुळ

२) कॅल्शियम –

IMILKI दूध आणि दुग्धजन्य पदार्थ , तिळ , बदाम , सोयाबिनचे दूध , अंडे

३) जीवनसत्त्वे –

संत्री व हिरव्या पालेभाज्या , रसाळ फळे , सफरचंद , टोमॅटो , आवळा , मांस , मासे , दूध व दुग्धजन्य पदार्थ

४) प्रथिने –

पनीर , दूध आणि दुग्धजन्य पदार्थ , धान्य / कडधान्याचे मिश्रण ( भाजणी ) , शेंगदाणे , अंडी , मांस , कोंबडी व सोयाबिन

५) स्निग्धपदार्थ –

लोणी , तूप , तेल , शेंगदाणे

आपल्या परिसरामध्ये आढळणारी सर्व प्रकारची मोसमी फळे , भाज्या व पदार्थांचे सेवन करा .

साफसफाई

  • प्रत्येक वेळी स्वयंपाक बनवण्यापूर्वी , जेवणापूर्वी व शौचावरुन आल्या नंतर किंवा बाळाची शी धुतल्या नंतर हात साबणाने धुवावेत .
  • नियमीतपणे नखे कापावीत .
  • व्यक्तिगत स्वच्छतेमुळे स्वत : चा तसेच आपल्यामुळे बालकाला आजार होण्यापासून बचाव करता येतो .

गरोदरपणात विश्रांती

  • रात्री आठ तास व दिवसा किमान दोन तास विश्रांती घ्यावी .
  • डाव्या कुशीवर झोपा कारण यामुळे गर्भातील शिशुला होणाऱ्या रक्ताच्या पुरवठयामध्ये वाढ होत .
  • जड वजन उचलण्याचे व जास्त कष्टाची कामे टाळा .
  • जास्त कामे स्वत : वर घेवू नका , आणि काही कामे दुसऱ्यावर सोपवा .

योग्य विश्रांतीमुळे आपला शारीरिक व मानसिक ताण दूर होतो . जे आपल्या व गर्भातील वाढणाऱ्या शिशुसाठी चांगले असते .

कुटुंबाचा सहभाग

  • कुटुंबातील वागणूक ही आनंदाची व उत्साह वर्धक असावी .
  • कुटुंबाने गरोदर खिला सकस आहार पुरेशा प्रमाणात मिळेल व वेळेवर आरोग्य केंद्रामध्ये जाईल ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे . कुटुंबीयांनी प्रसुतीच्या कळा सुरु झाल्यावर किंवा कोणत्याही जोखमीची लक्षणे आढळल्यावर आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्यामध्ये विलंब करु नये .
  • कुटुंबाने योग्य प्रमाणात पैशाची तरतूद करुन ठेवावी . शासकीय रुग्णवाहिका टोल फ्री दुरध्वनी क्र . १०२/१०८ वर मोफत उपलब्ध आहे .
  • कुटुंबातील / मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती निश्चित करावी , ज्याची आकस्मिकता उदभवल्यास रक्त देण्यासाठी तयारी असेल .

गरोदरपणात पती , सासू इतर नातेवाईकांकडून काळजी व सहयोग आणि आधार मिळाल्यास गर्भवती मातेमध्ये भावनिक आधार व विश्वास निर्माण होतो.

Copyright Material Don't Copy © 2021