आजारांची माहिती

कोरोना लसीकरण सर्व माहिती Corona Vaccine Information in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

अनुक्रमणिका

कोरोना लस का घ्यावी़?

कोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यु होत आहेत. लसिकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात १ इतके कमी प्रमाणात आहे आणि तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसिकरण करणे जरूरी आहे.

कोरोना लस कार्यक्षम आहे का?

सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्युपासून बचाव करण्यासाठी १०० टक्के कार्यक्षमता आहे. गंभीर कोविडच्या विरूध्द अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोगप्रतिकारक क्षमता आहे.

कोरोना लस सुरक्षित आहे का?

हो. कोरोना लस पुर्णपणे सुरक्षित आहेत.

आम्हाला कोणती लस मिळणार? पर्याय आहे का?

आता तरी सगळीकडे कोविशिल्ड – सिरम, पुण्याची लस उपलब्ध आहे.

काही सेंटरमध्ये भारत बायोटेक कंपनी ची कोवाक्सिन नावाची लस आहे पण दोन्ही लसी अतिशय सुरक्षित आहेत त्यामुळे नामको लसिकरण सेंटरला जे उपलब्ध आहे ते घ्या.

दुसर्या टप्प्यात कोण-कोण लस घेवू शकते?

६० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार इ. यांना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल. त्यासाठी कोविन ॲप वर नोंदणी करावी अथवा नामको लसिकरण केंद्रामध्ये येवून नोंदणी करावी.

Free Corona Vaccine in Marathi करोना लसीकरण पात्रता, करोना लसीकरण नोंदणी कशी करावी, Corona Vaccine Registration in Marathi, Covid Vaccine in Marathi

कोरोना लस घेतल्यानंतर काय दुष्परिणाम होवू शकतात?

Corona Vaccine Side Effects in Marathi:-

  • ताप,
  • अंगदुखी,
  • डोकेदुखी,
  • मळमळ,
  • उलटी,
  • अशक्तपणा हे सर्वसामान्य

इत्यादी पैकी एखादा किंवा एकापेक्षा जास्त दुष्परिणाम साधरणपणे दिसतात.

हे १ ते २ दिवस राहतात. साध्या पॅरासिटामोल या औषधाने बरे वाटते. काहींना तर काहीच लक्षण दिसत नाहीत.

वरीलपैकी काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरीराची प्रतिकार शक्ती कार्यान्वीत झाल्याचे लक्षण आहे.

कोरोना लस घ्यायला जाण्यापूर्वी काय तयारी करावी?

कोरोना लस घ्यायला शक्यतो भरल्यापोटी जेवण करून जावे. उपाशीपोटी जावू नये. लसिकरण सेेंटरवर कमी जास्त वेळ लागु शकतो त्यामुळे पाण्याची बाटली, कोरडा खाऊ, बिस्कीटे, कोकम सरबत किंवा लिंबू सरबत घेवून जावे.

तसेच जातांना सोबत आपले आधारकार्ड व पॅनकार्ड घेवून जावे.

कोरोना लस किती वेळा घ्यावे?

कोरोना लसीचा पहिला डोस घेतला की साधारणपणे २८ दिवसांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यावा.

कॅन्सर व इतर आजाराच्या रूग्णांनी कोरोना लस घ्यावी का?

हो नक्कीच, फक्त आधी आपल्या कॅन्सर तज्ञांचा सल्ला घ्यावा व कोविडचे लसिकरण करून घ्यावे.

ह्दयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण, संधिवात स्टिराॅइड घेणार्या लोकांनी लस घ्यावी का?

१०० टक्के…. मुळात कोरोना लस याच लोकांसाठी बनली आहे ज्यांना असे आजार – Co-morbidity आहेत. फक्त लस घेण्यासाठी योग्य तो कालावधी कोणता हे कळावे म्हणून वरील रूग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्याने लसिकरण करावे.

ॲलर्जीक ब्रोन्कायटीस (दमा) असलेल्या लोकांनी लस घ्यावी का?

नक्कीच घेऊ शकता परंतु ॲलर्जी खूप तीव्र असेल तर त्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कोविड (कोरोना) होवून गेल्यावर पण लस घ्यावी का?

हो १०० टक्के कारण कोविड (कोरोना) होऊन गेल्या नंतर मिळणारी प्रतिकार क्षमता कालांतराने नष्ट होतात. लसीने मिळणारी प्रतिकार क्षमता जास्त कालावधी पर्यंत राहते.

नुकताच कोविड (कोरोना) झाला असेल तर लस कधी घ्यावी?

कोविड (कोरोना) होवून गेल्यावर ८ ते १२ आठवडयांनी लस घ्यावी.

मी सर्व नियम पाळतो मला वर्षभरात कोरोना झाला नाही, माझी प्रतिकारशक्ती चांगली आहे तरी मला लस घेण्याची गरज आहे का ?

१०० टक्के. हो.

लहान मुलांना लस दयावी का?

१६ वर्षाखालील मुलांना देवू नये. १६ वर्षापेक्षा जास्त वयाच्या बालकांना करोना लस देऊ शकता.

गर्भवती महिलांना लस दयावी का?

सध्या त्याचा डेटा उपलब्ध नाही त्यामुळे सध्या तरी देवू नये.

लस घेतल्यावर पण मास्क लावावे लागणार का?

हो. लसिकरण नंतरही हलगर्जिपणा करून चालणार नाही. मास्क, सॅनिटायझर हे वापरणे गरजेचे आहे.

लस नंतर १०० टक्के कोरोना होणार नाही का?

असे अजिबात नाही पण झाला तरी तो सौम्य असेल.

जर लस घेवूनही कोरोना होणार असेल तर लसिचा फायदा काय?

१. कोविडची दुसरी लाट टाळणे.
२. मृत्यू दर कमी करणे.
३. गंभीर रूग्णांचे प्रमाण कमी करणेे.

लस घेतल्यावर रोग प्रतिकारक शक्ती कधी तयार होणार?

पहिल्या डोस घेतल्यानंतर ४५ दिवसानंतर रोग प्रतिकारक शक्ती तयार होते पण त्यासाठी २८ दिवसानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.

४५ ते ५९ वयोगटातले व्याधीग्रस्त व ६० वर्षावरील सर्वांनी हे लसीकरण करून स्वतःला व आपल्या परीवाराला कोरोना संक्रमणापासुन सुरक्षीत ठेवा.

कोरोना लस कशी व कुठे मिळेल नोदणी कशी करावी ?

Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023