मधुमेहजन्य पादवर्ण, डायबेटीक फुट, Diabetic Foot in Marathi
शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.
अनुक्रमणिका
मधुमेहजन्य पादवर्ण ( डायबेटीक फुट ) Diabetic Foot in Marathi
मधुमेहाची सर्वात प्रमुख कॉम्पलीकेशन म्हणजे मधुमेहजन्य पादवर्ण ( डायबेटीक फुट ) Diabetic Foot in Marathi होय. अतिशय त्रासिक व उपचारास लवकर दाद न देणारी समस्या. चला तर मग आज आपण मधुमेहजन्य पादवर्ण ( डायबेटीक फुट ) Diabetic Foot in Marathi ची कारणे लक्षणे प्रतिबंध व उपचाराची शास्त्रोक्त माहिती पाहूयात.
मधुमेहजन्य पाद व्रण होण्याची कारणे Causes of Diabetic Foot in Marathi
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे . ( जेवणापुर्वी १२० मिग्रॅ व जेवणानंतर १५० मिग्रॅ पेक्षा जास्त असणे )
प्रमेही व्यक्तींना पायाला वारंवार लागणे अथवा जखमा होणे ,
पायाला रक्त पुरवठा व्यवस्थित न होणे
पायाची स्वच्छता व्यवस्थित न ठेवण ,
अनवाणी पायी चालणे . किंवा कठीण पादत्राणे वापरणे ,
धूम्रपान , तंबाखूजन्य पदार्थ , सेवनामुळे पायातील असलेल्या लहान रक्तवाहीन्या खराब होतात . व त्यामुळे जखमा लवकर न भरणे .
रक्तातील साखर अतिप्रमाणात वाढल्यामुळे पायाला स्पर्शाची जाणीव होत नाही व त्यामुळे झालेल्या जखमा सुध्दा कळत नाहीत . व जखमा वाढत जातात . ( Neuropathy )
झालेल्या जखमेची व्यवस्थित निगा न राखणे .
मधुमेही लोकांची प्रतिकारक्षमता कमी असल्यामुळे जीवाणूंचा संसर्ग वाढतो . हेतू सेवन रक्तातील साखर वाढणे स्पर्शाची जाणीव न झाल्यामुळे पायाला जखमा होणे .
पायाला योग्य रक्त पुरवठा न होणे जखमेवर जिवाणूंचा संसर्ग होणे . जखमा वाढणे मधुमहजन्य पाद व्रण उत्पत्ती होणे .
मधुमेहजन्य पाद व्रण लक्षणे Symptoms of Diabetic Foot in Marathi:-
पायाला स्पर्शाची जाणीव न होणे
पादप्रदेशी रुक्षता असणे .
पायातील मांसपेशीतील बल चांगले नसणे .
त्वचेचा लवचिकपणा जाणे
रक्तातील साखरेचे प्रमाण अति प्रमाणात वाढणे ( जेवणापूर्वी १२० मिग्रे व जेवणानंतर १५० मिग्रं पेक्षा जास्त साखर असणे )
पायाचा प्रदेशी दाह होणे , मुंग्या येणे .
वेदनेची जाणीव न होणे
पायांतील संधीची सुबध्दता नष्ट होणे
मधुमेहजन्य पाद व्रण होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी Prevention of Diabetic Foot in Marathi:-