आहार विहार

आहारातील प्रोटीन ची सर्व माहिती Proteins in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

अनुक्रमणिका

प्रोटीन म्हणजे काय? What are the proteins in Marathi?

प्रथिने ( Proteins ) प्रोटीन हा शब्द ग्रीक भाषेतील “ प्रोटीआस ” ह्या शब्दापासून बनलेला आहे . या शब्दाचा अर्थ आहे आहारातील सर्वश्रेष्ट वस्तु किंवा पदार्थ.
हा शरीरामधील सर्वात महत्वाचा व आवश्यक घटक आहे. Protein in Marathi –

प्रथिने- प्रोटीन हे मिश्र सेन्द्रिय नायट्रोजिनस घटक आहेत.
प्रथिने- प्रोटीन हे मुख्यतः कार्बन, हायड्रोजन, ऑक्सीजन, नायट्रोजन आणि सल्फर ह्या घटकापासून निर्मित झालेले असतात. Protein in Marathi, Protein Foods in Marathi –

आहारातील प्रोटीन ची सर्व माहिती, Proteins in Marathi, कोणत्या प्रकारच्या जेवणात प्रोटीनचं प्रमाण जास्त असते, protein foods list in marathi

अमायनो अ‍ॅसीड म्हणजे काय? What is Meaning of Amino Acids in marathi?

प्रथिनेप्रोटीन ज्या निरनिराळया रचनात्मक व कार्यात्मक पायाभूत घटकांनपासून बनलेले असतात त्यांना अमायनो अ‍ॅसीड्स असे म्हणतात.

अमायनो अ‍ॅसीड किती प्रकारचे आहेत? Types of Amino Acids in Marathi?

२४ प्रकारचे अमायनो अ‍ॅसीड शरीराकरिता आवश्यक असतात.

आवश्यक अमायनो अ‍ॅसीड म्हणजे Essential Amino Acids in Marathi?

२४ प्रकारचे अमायनो अ‍ॅसीड शरीराकरिता आवश्यक असतात.
त्यापैकी ९ अमायनो अ‍ॅसीड ची निर्मिती आवश्यक त्या मात्रेमधे शरीरामधे होत नसल्याने त्यांना आवश्यक अमायनो अम्ल ( Essential Amino Acids ) असे म्हणतात.
हे अमायनो अ‍ॅसीडस् आवश्यकतेनुसार पुनः प्रथिना ( Proteins ) मधे रुपांतरित होतात.

आवश्यक अमायनो अम्ल ( Essential Amino Acids ) खालील प्रमाणे आहेत.

१ ) फेनिल अलेनिन ( Phenyl alanine )
२ ) ल्युसिन ( leucine )
३ ) आइसोल्युसिन ( Isoleucine )
४ ) लायसिन ( Lysine )
५ ) मेथिओनिन ( Methionine )
६ ) धियोनीन ( Thrionine )
७ ) बेलिन ( Valine )
८ ) ट्रिप्टोफेन ( Triptophane )
९ ) हिस्टीडीन ( Histidine )

ह्यापैकी हिस्टीडीन हे नवजात शिशूकरिता आवश्यक अमायनो अ‍ॅसीड मानले जात होते परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या १९८५ च्या तांत्रिक अहवालानुसार हिस्टीडीन हे प्रौढांकरिता सुद्धा आवश्यक मानलेले आहे. Amino Acids in marathi –

मर्यादित अमायनो अ‍ॅसीड म्हणजे काय? What are Limiting amino acids in Marathi?

मनुष्य हा प्रथिने एकाच स्त्रोतापासुन प्राप्त करीत नसतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणीज आणि वनस्पती आहारापासून तो आवश्यक प्रथिने घेत असतो.
धान्यांंमधे लायमिन आणि शिओनीन आणि डाळीमधे मेथीओनिन ची कमतरता ( deficiency ) असते.
म्हणून ह्यांना मर्यादित अमायनो अ‍ॅसीड ( Limiting amino acids ) असे म्हणतात.

प्रथिनांची पूरक क्रिया म्हणजे काय? What is Supplementary action of Proteins in Marathi?

जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक वनस्पती आहार एकत्र ग्रहण केले जातात तेव्हा आवश्यक अमायनो अम्लाची पूर्तता होत असते.
उदा . वरण, भात, पोळी अशाप्रकारे आहाराची योजना करुन शाकाहारी व्यक्ती उच्च दर्जाची प्रथिने कमी किंमतीत प्राप्त करतात.
ह्याला प्रथिनांची पूरक क्रिया ( Supplementary action of Proteins ) असेही म्हणतात.

प्रोटीनचे मुख्य स्रोत कोणते आहेत? Protein Foods List in Marathi :-

प्रथिनांचे स्त्रोत Sources of Protein in marathi –

अ ) प्राणीज वर्ग ( Animal food ) –

 • दुध,
 • अंडे,
 • मासे,
 • मांस,
 • पनीर,
 • दही

ह्यामधे शरीराला आवश्यक अमायनो अम्ल योग्य त्या मात्रेमधे असतात ह्यांना पूर्ण प्रथिने ( complete Protein ) असे म्हणतात.

ब ) वनस्पती वर्ग ( Vegetables food ) –

 • सर्व प्रकारच्या डाळी , ( Pulses )
 • सोयाबीन , अन्नधान्य ( cereals ) ,
 • कडधान्ये ( beans ) ,
 • नारळ किंवा टणकफळे ( Nuts )
 • शेंगदाने ( तेलचीया ) ( Oil seeds )
 • हिरव्या पालेभाज्या इत्यादिपासून प्रथिने प्राप्त केली जातात .

ह्यामध्ये शरीराला आवश्यक अमायनो अम्ल अल्पमात्रेमधे असतात. त्याकरिता ह्यांना अपूर्ण प्रथिने ( Incomplete Protein ) असे म्हणतात.

पूर्ण प्रथिने / कंप्लीट प्रोटीन म्हणजे काय? What are Complete Protein in Marathi?

ज्या प्रोटीन मध्ये शरीराला आवश्यक सर्व अमायनो अम्ल/अ‍ॅसीड योग्य त्या मात्रेमधे असतात त्यांना पूर्ण प्रथिने ( complete Protein ) असे म्हणतात.

उदा. – प्राणीज वर्गा ( Animal food ) पासून मिळणारे प्रोटिन हे पूर्ण प्रथिने ( complete Protein ) आहेत.

अपूर्ण प्रथिने ( Incomplete Protein ) म्हणजे काय? What are Incomplete Protein in Marathi?

ज्या प्रोटीन मध्ये शरीराला आवश्यक अमायनो अम्ल/अ‍ॅसीड अल्पमात्रेमधे असतात. त्यांंना अपूर्ण प्रथिने ( Incomplete Protein ) असे म्हणतात.

उदा. वनस्पती वर्ग ( Vegetables food ) पासून मिळणारे प्रोटीन हे अपूर्ण प्रथिने ( Incomplete Protein ) आहेत.

प्रोटीन क्षमता अनुपात म्हणजे काय? What is the Protein efficiency ratio in Marathi?

प्रयोगशाळेमधे प्राण्याना प्रथिने दिली जातात आणि त्यांचे मधे वाढणाऱ्या वजनाची नोंद केली जाते. दिल्या जाणारी प्रथिनांची मात्रा आणि वजनातील वृद्धि याचा अनुपात काढल्या जातो.
ह्या अनुपाताला ( Ratio ) प्रोटीन क्षमता अनुपात ( Protein efficiency ratio ) असे म्हणतात.

ह्या अनुपातानुसार घेतल्या जाणारी प्रथिनांची/प्रोटीन जेवढी अधिक मात्रा शरीराकरिता उपयोगात आणली जाते तेवढी त्याचे वजनामधे वृद्धि होते.

आहारामधे घेतल्या जाणारी प्रथिने शरीराकरिता आवश्यक आहे किंवा नाही हे वरील परिक्षणावरून कळते.

प्रथिनांचे जैविक मूल्य म्हणजे काय? What is Biological value of Proteins in Marathi?

प्रथिने ही शरीराला नायट्रोजन देतात. शरीरा करिता उपयोग झाल्यानंतर उर्वरित नायट्रोजन हे मूत्राद्वारे यूरिया व अमोनियम लवनाच्या रुपाने बाहेर टाकले जाते.

प्रथिना द्वारे शरीराला मिळणारी नायट्रोजनची मात्रा तसेच मुत्राद्वारे बाहेर पडणारी नायट्रोजनची मात्रा ह्यातील अंतर म्हणजे प्रथिनांचे जैविक मूल्य (Proteins Biological value ) होय .

ह्या दोन मात्रेमधे जेवढे जास्त अंतर असेल प्रथिनांचे जैविक मूल्य तितकेच अधिक असते.
ह्यादृष्टीने सुद्धा परीक्षण केले असता असे आढळुन येते की, प्राणीजन्य प्रथिनांचे प्रोटीन क्षमता अनुपात आणि जैविकमूल्य अधिक असते .

प्रोटीनची कार्ये कोण-कोणती आहेत? What are the Functions of Proteins in Marathi?

१ ) शारीरिक वृद्धी व विकास :-

शरीरामधील कोषाणु ( cells ) , उतक ( Tissue ) , पेशी ( Muscles ) यांची निर्मिती व पोषण तसेच क्षतिपूर्ती करून शरीराची वृद्धी व विकास घडुन आणणे.

२ ) उर्जानिर्मिती :-

प्रथिनांचे ऑक्सीकरण ( पचन ) होऊन शरीरामधे उर्जेची निर्मिती होते . . . ग्राम प्रथिनापासुन ४ . २८ किलो कॅलरी शक्ति ( उर्जा ) प्राप्त होते.

३ ) निर्मिती:-

प्रोटीन शरिरामध्ये प्रतिपिंडे ( Antibodies ), रक्तजल ( Plasma ), हिमोग्लोबीन ( Haemoglobin ), एन्झाइमम् ( Enzymes ), संप्रेरक ( Hormone ) रक्तगोटविणारे घटक ( Coagulation factors ) यांची निर्मिती करते.

४ ) रोगनिवारण क्षमता :-

प्रोटीन शरिरामध्ये प्रतिपिंडे ( Antibodies ) ची निर्मिती करून रोगांपासून शरीराचे रक्षण करते.

५ ) न्याधिक्षमत्व :-

शरीराच्या या घटकाशी प्रधिनांचा जवळचा संबंध आहे. यामुळे व्याधिक्षमत्व वाढते.

६ ) शरीरामधील जल वितरण व्यवस्था नियमित ठेवते.

७ ) शरीराचे तापमान स्थिर ठेवते.

८) शरीराची झिज भरुन काढणे‌‌:-

प्रोटीन शरिरामध्ये झालेली स्नायु, मसल व इतर पेशी, उती व अवयवांनची झिज भरुन काढतात.

These are the Protein Importance in Marathi

शरीर शौष्ठवता निर्माण कारणारा आहार म्हणजे काय? Body building food in Marathi?

ज्या आहारांत प्रधिने प्रोटीन अधिक मात्रेत असतात त्यांना शरीर शौष्ठवता निर्माण कारणारा आहार ( Body building food ) असे म्हणतात.
उदा . सोयाबीन, मटन, चिकन इ. Body building food in Marathi –

उत्तम आरोग्यासाठी आहारात किती प्रमाणात प्रोटीन आवश्यक आहेत? Daily need of Protein in Marathi:-

प्रत्येक व्यक्तिकरिता प्रथिनांची/प्रोटीनची मात्रा त्या व्यक्तिच्या वजनानुसार व शारिरीक अवस्थेनुसार निश्चित केली जाते.

एक ग्रॅम प्रती किलो प्रती दिवस हि प्रथिनांची मात्रा आहे.
( 1gm / kg body wt / per day )

उदा. तुमचे वजन ६० किलो आहे तर तुम्हाला रो ६० ग्राम येवढ्या प्रोटीनची आवश्यकता आहे.

लहान मुले , गर्भवती स्त्रिया , सुतिका यांना प्रथिनांची अधिक मात्रा आवश्यक असते.

कोणत्या प्रकारच्या जेवणात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते? Protein Rich foods list in marathi :-

प्रोटीनयुक्त शाकाहारी अन्नपदार्थ कोणते? Protein foods Veg list in Marathi:-

 • सर्व प्रकारच्या डाळी, ( Pulses )
 • सोयाबीन,
 • अन्नधान्य ( cereals ) – ज्वारी , बाजरी , मका , गहू.
 • गोदुग्ध, पनीर,चीझ, दूध पावडर व दुधापासून बनवलेले पदार्थ.
 • चनाडाळ,
 • काजु, बदाम,
 • कडधान्ये ( beans ) – तूर, मूग, मटकी, हरभरा, उडीद, मसूर, कुळीथ, शेंगदाणे.
 • नारळ किंवा टणकफळे ( Nuts ),
 • शेंगदाने ( तेलबीया ) ( Oil seeds ),
 • हिरव्या पालेभाज्या इत्यादिपासून प्रथिने प्राप्त केली जातात.

प्रोटीनयुक्त प्राणीजन्य/मांसाहारी अन्नपदार्थ कोणते? Protein foods Non-Veg list in Marathi:-

 • अंडी,
 • मांस- चिकन, मटण.
 • मासे, खेकडे इ. जलचर
 • दुध,
 • पनीर,
 • दही,
 • चिझ,
 • लोणी,
 • चिकन, मटण सूप.

प्रोटीनचे विविध अन्न पदार्थातील प्रमाण Percentage of Protein in Foods:-

अन्न पदार्थ (१०० ग्राम प्रती पदार्थ) प्रोटिनची क्षमता (टक्केवारी)
सोयाबिन ४३ %
दूध पावडर ३८ %
चीझ २४ %
तूर , मूग , उडीद , शेंगदाणे २३ ते २६ %
चनाडाळ २२.५ %
अंडी मांस व मासे २२ %
काजु २१.२ %
बदाम २०.८ %
दाणे १८ ते २५ %
अखंड डाळी १८ ते २५ %
डाळी १८ ते २४ %
मांस मासे १८ ते २० %
पनीर १५ %
ज्वारी , बाजरी , मका , गहू ११ ते १२ %
दूध ४ %
गोदुग्ध ३.२ %
प्रोटीनचे विविध अन्न पदार्थातील प्रमाण Percentage of Protein in Foods, Proteins in Marathi, Proteins Foods list in Marathi, protein in marathi, protein foods in marathi, protein diet in marathi, protein information in marathi, protein chart in marathi,

प्रोटीनच्या कमतरते मुळे होणारे परिणाम आणि धोके – Protein Deficiency, Symptoms And Risk in Marathi :-

अ ) बालक –

क्वाशीऑरकोर , मॅरॅस्मस , अप्रगल्भता , शारीरिक व मानसिक वाढिमध्ये अडथळा निर्माण होतो.

ब ) प्रौढ :-

वजनामधे कमी , उंची व वजन प्रमाणबद्ध नसणे , स्नायू दौर्बल्य , रक्तक्षय , जंतुसंसर्ग , कर्म असमर्थता.

क ) गर्भिणी :-

मृत अर्भक जन्म, कमी वजनाचे अर्भक जन्माला येणे, रक्तक्षय निर्माण होणे.

ड ) व्याधि :-

प्रोटिनच्या कमरतरतेमुळे पुढिल व्याधी होतात – रक्तक्षय (Anaemia), शोथ (Odema), यकृतवृद्धी(Hepatomegaly), त्वकरुक्षता, जलोदर ( ascitis ), अतिसार (diarrhoea , dysentery ), कृशता इत्यादि.

प्रोटीनच्या अधिक सेवना मुळे होणारे धोकादायक परिणाम, Side-Effects Of High Intake Of Protein in Marathi:-

 • फेनिल किटोनरिया ( Phenylketonuria )
 • शरीरातील क्रेअ‍ॅटिनीन वाढते.
 • वजन अति वाढणे.
 • श्वासाला दुर्घंधी येते
 • बद्धकोष्ठता – शरीरात फाबर चे प्रमाण कमी होते आणि मलावरोधाचे दुखणे सुरू होते.
 • जास्तीचे प्रोटीन हाडांना मजबूत करण्याऐवजी कमजोर करते.
 • प्रथिनांच्या जास्तीच्या सेवनामुळे शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि संधिवाताचे दुखणे संभवते.
 • निर्जलीकरण
 • मूत्रपिंडाचे निकामी होते
 • कर्करोगाचा धोका वाढतो
 • हृदयरोग धोका वाढतो.

व्हे प्रोटीन म्हणजे काय? Whey Protein meaning in Marathi:-

Whey Protein हे शुद्ध शाकाहारी प्रोटीन असून ते दुधापासुन तयार केले जाते, हे एक पूर्ण प्रथिने Complete Protein आहे.

जेव्हा जेव्हा जिम वर्कआउट्स आणि बॉडीबिल्डिंगचा विचार केला जातो तेव्हा व्हे प्रोटीन बॉडीबिल्डर्स आणि फिटनेस प्रेमींची पहिली पसंती असते. Whey Protein in Marathi

व्हे प्रोटीन कसे तयार करतात? Whey Protein Comes from in Marathi?

 • व्हे प्रोटीन हे दुधापासून बनविलेले जाते.
 • दूधापासून दही किंवा चीज बनविताना त्यतून जो द्रव पदार्थ शिल्लक राहातो तो वेगळा केला जातो. तो बॅक्टेरिया रहित केला जाते.
 • त्यानंतर मायक्रोस्ट्रीटेशन आयओएन एक्सचेंज प्रक्रियेद्वारे दुग्धशर्करा आणि चरबी काढून टाकली जाते.
 • त्यानंतर अंतिम टप्प्यात ते वाळवले जाते आणि पावडरमध्ये रूपांतरित केले जाते, अशा प्रकारे या प्रक्रियेचा वापर करुन व्हेे प्रोटीन दुधापासून बनविला जातो.

व्हे प्रोटीनचे फायदे Benefits of Whey Protein in Marathi :-

१ ) जे लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत, त्यांना बॉडी बनवायचे आहे, परंतु कोणत्याही प्रकारे मांस-मासे खाण्याची इच्छा नाही, अशा लोकांसाठी व्हे प्रोटीन वरदानआहे.

२ ) ज्यांंना प्रथिने समृद्ध अन्न शिजवण्यासाठी वेळ नसतो. तेव्हा हे तयार स्वरुपातील व्हे प्रोटीनचे फायद्ययाचे ठरते.

३ ) व्हे प्रोटीन कधीही कुठेही सहज पाण्यात किंवा दुधात मिसळून सेवन करता येते.

४ ) हे दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेले आहे, त्यामुळे योग्य मात्रेत सेवन केल्यास Whey Protein चा कोणताही दुष्परिणाम होत नाही.

५ ) व्हे प्रोटीन हे शरीरात चांंगल्या पद्धतीने शोषले जातेे.

६ ) खेळाडू व बॉडी बिल्डर यांच्या शरीरात होणारी स्नायूची झिज भरुन काढण्यासाठी Whey Protein चे सेवन करणे हा अतिशय चांगला उपाय आहे.

७ ) प्रत्येकाची Protein ची शारिरीक गरज वेगवेगळी असते त्या गरजेचा विचार करुन योग्य मात्रेत याचे सेवन करावे.

Top 5 Whey Protein Powder सर्वात चांगले व्हे प्रोटीन, protein foods in marathi, protein diet in marathi, protein information in marathi, protein chart in marathi,

प्रोटीनचे तोटे/ दुष्परिणाम Side Effects of Whey Protein in Marathi:-

१ ) प्रोटीन Protein गरजे पेक्षा जास्त प्रमाणात सेवन करु नये, तसे केल्यास त्याचे तोटेच होतात.

२ ) स्टिरॉईड युक्त प्रोटीन Protein चे सेवन करू नये. वरती सांंगितलेल्या टॉप ५ व्हे प्रोटीन मध्ये स्टिरॉईड नाही

३ ) क्रियाटिनीन युक्त प्रोटीन Protein चे सेवन करू नये. वरती सांंगितलेल्या टॉप ५ व्हे प्रोटीन मध्ये क्रियाटिनीन नाही.

४ ) स्टिरॉईड युक्त व क्रियाटिनीन युक्त प्रोटीनचे सेवन केल्यास शरीरावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात, जसे वंध्यत्व, ह्रद्यविकार किडण्या खराब होणे इ.

प्रोटीन बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरं – FAQs about Protein in Marathi:-

१ ) प्रश्न – रोजच्या जेवणात किती कॅलरीज प्रोटीन मधून मिळतात?

उत्तर – प्रोटीन Protein हे उर्जेचे मुख्य स्त्रोत नाहित, जेव्हा शरीराला उर्जेच्या मुख्य स्त्रोतापासून उर्जा मिळत नहि तेव्हाच शरीर प्रोटिन द्वारे उर्जा निर्मिती करते.

१ ग्रॅम प्रोटीन Protein पासून ४ कॅलरीज एवढी उर्जा मिळते.

२ ) प्रश्न – दूधात जास्त प्रोटीन आहे का मटणमध्ये?

उत्तर – मटणा मध्ये दुधापेक्षा जास्त प्रोटीन असते.

३ ) प्रश्न – पुरुषांना महिलांच्या तुलनेत जास्त प्रोटीनची आवश्यकता असते का?

उत्तर – हो.

याची मुख्य २ कारणे आहेत

१ ) पुरुषांचे वजन हे स्त्रीयांपेक्षा जास्त असते.

२ ) पुरुष महिल्यांंच्या तुलनेने जास्ती कष्टांची कामे करतात.

मात्र गरोदरपणात स्त्रीयांची प्रोटीनची आवश्यकता वाढते.

४ ) प्रश्न – what is proteins called in marathi ?

उत्तर – प्रथिने

५ ) प्रश्न – प्रोटीनचे मुख्य स्रोत – Source Of Protein In Marathi ?

उत्तर – दुध, अंडे, मासे, मांस, पनीर, दही, सर्व प्रकारच्या डाळी, सोयाबीन, नारळ, शेंगदाने हे प्रोटीनचे मुख्य स्रोत आहेत.

Copyright Material Don't Copy © 2020-2021
Share
Published by

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023