आजारांची माहिती

यकृतदाह, कावीळ अ, ब, Hepatitis in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

कावीळ म्हणजेच यकृतदाह ( Hepatitis in Marathi ) होय. कावीळ हा अ आणि ब प्रकारच्या विषाणूच्या संसर्गामुळे होणारा व यकृतावर विपरित परिणाम करणारा आजार आहे. कावीळ यकृतदाह ( Hepatitis in Marathi ) चे महत्वाचे तीन प्रकार – यकृतदाह अ (Hepatitis A in Marathi), यकृतदाह ब ( Hepatitis B in Marathi) , यकृतदाह इ (Hepatitis E in Marathi) आहेत.

अनुक्रमणिका

“अ” कावीळ, यकृतदाह “अ” ( Hepatitis A in Marathi )

यकृतदाह अ ( Hepatitis A in Marathi ) हा मुख्यत्वे आतड्याच्या विषाणूसंसर्गामुळे होणारा रोग असून त्याची प्रमुख लक्षणे म्हणजे थकवा , ताप , मळमळ , उलटया आणि त्वचा व डोळयाचा पिवळेपणा ही आहेत. बहुतांशी रुग्ण ३ ते ६ आठवडयात पूर्णपणे बरे होतात, पण काही रुग्णांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यू ओढवतो. हा रोग जगात सर्व भागात सातत्याने आढळणारा रोग असून साथीच्या स्वरुपातही आढळतो.

साथरोगशास्त्रीय घटक – कारकः –

यकृतदाह अ नावाचा विषाणू च्या संसर्गामुळे यकृतदाह “अ” ( Hepatitis A in Marathi ) ची लागण होते.

संसर्गस्त्रोत – मानव हा एकमेव संसर्ग स्त्रोत आहे . अनेकदा रुग्णास झालेला विषाणू संसर्ग हा सौम्य स्वरुपाचा असून निदानक्षम नसतो . या रोगाची वाहक अवस्था नसते .

यकृतदाह “अ” ( Hepatitis A in Marathi ) ची लक्षणे

अधिशयन काळ – लक्षणे दिसण्यापूर्वी दोन आठवडे आणि दिसल्यानंतर एक आठवडा .

  • थकवा ,
  • ताप ,
  • मळमळ ,
  • उलटया आणि
  • त्वचा व डोळयाचा पिवळेपणा

यकृतदाह “अ” ( Hepatitis A in Marathi ) प्रसार कसा होतो?

मुख्यत्वे मानवी विष्ठा , दुषित पाणी , रुग्णाचे रक्त याद्वारे यकृतदाह “अ” ( Hepatitis A in Marathi ) चा प्रसार होतो. मुख्यत्वे मलमुख मार्गः- दूषित पाणी व अन्नामधून होणारा प्रसार हा फार महत्वपूर्ण आहे.

दूषित हात , अस्वच्छ पदार्थ तसेच गर्दीमुळे रोगप्रसारास मदत होते . क्वचितच रक्तातून प्रसार होऊ शकतो .

वय – हा रोग बालक व तरुणात सामान्यपणे आढळतो . वयाच्या पाच वर्षापर्यंत जवळपास ९ ० टक्के बालकांना यकृतदाह अ च्या विषाणूंचा संसर्ग झालेला असतो . हे त्यांच्या रक्तातील रक्तद्रवाची तपासणी करुन ओळखता येते .

रोगप्रतिकार क्षमता – ज्या प्रदेशात हा रोग सातत्याने आढळत असतो त्या प्रदेशातील बहुतांश लोकांना सौम्य संसर्गामुळे रोग प्रतिकारक्षमता प्राप्त होते . यकृतदाह अ हा रोग एकदा होऊन गेला की साधारणतः दुस – यांदा होत नाही कारण रोगामुळे दीर्घकालीन रोग प्रतिकार क्षमता प्राप्त होते .

यकृतदाह “अ” ( Hepatitis A in Marathi ) उपचार

बहुधा कावीळ अ म्हणजेच यकृतदाह “अ” ( Hepatitis A in Marathi ) या आजारात गुंतागुंत न झाल्यास रुग्ण आपोआप बरा होतो. रुग्णाला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगावे. रोग लक्षणानुसार औषधोपचार करावा .

यकृतदाह “अ” आहार Hepatitis A Diet in Marathi

  • रुग्णाला भरपूर प्रमाणात कर्बोदके व प्रथिनेयुक्त आहार द्यावा.
  • परंतु स्निग्ध पदार्थ ( तेल व तूप ) वर्ण्य करावे .
  • अन्नधान्यामध्ये भाकरी , साखरभात , पोहे , मुरमुरे , लाह्या , खिचडी , डाळीमध्ये प्रामुख्याने मुगाची डाळ , मोड आलेली कडधान्ये वापरावी .
  • तसेच उसाचा रस , फळे व फळांचा रस उदा . मोसंबी , संत्री , सफरचंद , टरबूज व अननस इ .
  • साय विरहित दूध सुध्दा देता येईल

यकृतदाह “अ” गुंतागुंत ( Hepatitis A Complications in Marathi )

  • काविळात यकृतदाह झाल्यामुळे यकृताच्या कार्यात बिघाड होऊन पोटात पाणी तयार होते .
  • काविळात विषाणूंचा मेंदूमध्ये संसर्ग झाल्यास रुग्ण बेशुध्द होतो अशावेळेस रुग्णाची तज्ञाकडे ताबडतोब रवानगी करावी .
  • गरोदर मातेला काविळची लागण झाल्यास त्याचा गर्भावर अनिष्ट परिणाम होतो .
  • वरील गुंतागुंत आढळल्यास रुग्णाची सामान्य रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयात रवानगी करावी .

यकृतदाह “अ” प्रतिबंधन आणि नियंत्रण ( Hepatitis A Prevention in Marathi )

  1. रुग्णाने पाणी उकळून प्यावे व समाजात साथींच्या दिवसात शुध्दीकरण केलेले पाणी प्यावे .
  2. रुग्णाच्या शौच व वापरलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करावे .
  3. परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी .
  4. सुया व पिचका – यांचे योग्य निर्जंतुकीकरण करावे .
  5. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना एक आठवडयाच्या आत तसेच रुग्णाचा संपर्क होऊ शकेल अशी शक्यता असलेल्यांना नॉर्मल हयूमन इम्यूनोग्लोब्यूलिन देऊन त्याचा बचाव करता येतो .
  6. लसः- कावीळ अ लसीच्या दोन मात्रा स्नायूमध्ये ६ ते १८ महिन्याच्या अंतराने देतात.

‘ब’ कावीळ यकृतदाह ‘ब’ ( Hepatitis B in Marathi )

यकृतदाह ब ( Hepatitis B in Marathi ), पूर्वी रक्तजन्य कावीळ म्हणून ओळखल्या जाणारा हा रोग यकृतदाह ब विषाणूमुळे होतो. संपूर्ण शरीरावर विषाणूसंसर्गाचा परिणाम होत असला तरी यकृतावर त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम दिसून येतो.

दीर्घकालीन अधिशयन काळ असलेल्या या रोगामुळे गुंतागुंत होवून यकृताचा कर्करोग, जुनाट यकृतदाह निर्माण होऊ शकतो. जगभर सातत्याने आढळणारा आजार असून रक्त , लैंगिकमार्ग स्रावामार्फत पसरतो.

साथरोग शास्त्रीय घटक : कारक ( Agent ) – यकृतदाह ” ब ” विषाणू

‘ब’ कावीळ यकृतदाह ‘ब’ संसर्गजन्य काळ ( Hepatitis B Infectivity Period in Marathi )

यकृतदाह ब ( Hepatitis B in Marathi ) चे विषाणू अधिशयन काळात रुग्णाच्या रक्तात असतात. संसर्गजन्य काळ रुग्णाच्या रक्तातून आस्ट्रेलिया ऍन्टीजन ( HBs Ag ) नाहीसे होईपर्यंत असतो.

‘ब’ कावीळ यकृतदाह ‘ब’ संसर्गस्त्रोत

रुग्ण आणि वाहक . या रोगातील वाहक स्थिती अनेक वर्षे टिकते . संसर्गजन्य पदार्थ – रक्त , लाळ आणि वीर्य या सारखे स्त्राव देखील संसर्गजन्य असतात .

वय ( Age ) – हा रोग सामान्यतः प्रौढांना होतो .

जोखमीचे गट :- अतिधोकादायक गटांमध्ये ( High risk group ) दंत शल्य चिकित्सक , ( Dentist ) , शल्य चिकित्सक , परिचारिका , रक्तपेढीतील ( Blood Bark ) तसेच रुग्णालय व प्रयोग शाळेतील कर्मचारी , अंमली पदार्थाच्या व्यसनी व्यक्ती , वेश्यागमन व असुरक्षित संभोग करणा-या व्यक्ती

‘ब’ कावीळ यकृतदाह ‘ब’ प्रसार पध्दत ( Hepatitis B Spread in Marathi )

  • दूषित रक्त किंवा रक्त पदार्थ
  • दूषित सुया पिचका-या
  • लैंगिक स्वावातून
  • मातेपासून अर्भकाकडे

‘ब’ कावीळ यकृतदाह ‘ब’ लक्षणे ( Hepatitis B Symptoms in Marathi )

१) संक्रमण तीव्र आहे की घातक यावर लक्षणे अवलंबून असतात तीव्र हॅपटायटिस बी तीव हॅपटायटिस बीची लक्षणे याप्रमाणे असतात

  • साधारण अंगदुखी आणि वेदना
  • 38 ° C ( 1004 ) किंवा अधिक ताप
  • सतत आजारी असल्याची जाणीव
  • भूक न लागणे
  • थकवा
  • मळमळ
  • उलटी
  • पोटदुखी
  • गडद रंगाची तघवी
  • माती किंवा राखेच्या रंगाचे शौच
  • डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे ( कावीळ )

२) घातक हॅपटायटिस बी घातक हॅपटायटिस बी असलेल्या बहुतांश लोकांना कोणतीच सामान्य लक्षणे अनुभवास येत नाहीत आणि अनेक वर्षे ते लक्षणांपासून मुक्त असतात.

लक्षणे दिसतात, तेव्हा ती तीव्र संक्रमणासारखीच असतात लक्षणांमध्ये खाद्यपदार्थ सिगारेट इ घेण्याची इच्छा न होणे आणि मधल्यामध्ये पोटाच्या वरच्या भागात सौम्य ते मध्यन स्वरूपाची वेदना होऊ शकतात.

कावीळ अ प्रमाणे निदान : कावीळ ब चे निदानाकरिता ऑस्ट्रेलिया अॅन्टिजन ही रक्त तपासणी करतात . गुंतागुंत : कावीळ ब चा संसर्ग झालेल्या रुग्णापैकी ८५ ते ९ ० टक्के रुग्णात प्रतिकार शक्ती निर्माण होवून रुग्ण बरे होतात . ५ ते १० टक्के रुग्ण दीर्घकाळ वाहक होतात व त्यांना यकृतदाह होऊन यकृताचा कर्करोग किंवा यकृतात सिरोसिस ( Cintrsis ) होते . त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो .

‘ब’ कावीळ यकृतदाह ‘ब’ उपचार ( Hepatitis B Treatment in Marathi )

१) तीव्र हॅपटायटिस बी :- तीव्र सक्रमणामध्ये , उपचार हे लाक्षणिक केले जातात. व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्याच्या पुनरुत्थानावर केंद्रित असतात.

२) घातक हॅपटायटिस बी :- घातक संक्रमणाचे उपचार साधारणपणे टेनॉफोव्हिर किंवा एटेकॅव्हिरसारख्या मौखिक विषाणूरोधी औषधे देऊन केले जातात. उपचाराचे लक्ष सिरोसीस टाळणे किंवा मंदावणे आणि यकृताच्या कर्करोगाची शक्यता कमी करणे असते.

उपचार केवळ विषाणू दुप्पट होण्याचा वेग कमी करतो त्याने रोग बरा होत नाही म्हणून बहुतांश लोकांना हे उपचार आयुष्यभर घ्यावे लागतात

जीवनशैली व्यवस्थापन :- असे खूप जीवनशैली बदल आहेत, ज्याने लोक हॅपटायटिस बी संक्रमणाचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करू शकतात. उदा

  1. मद्यपान व धूम्रपान दोन्हींमुळे यकृताची हानी होत असल्यामुळे दोन्ही टाळा कारण यकृताला पहिलेच हेपटायटिस बी संक्रमणादरम्यान त्या विषाणूद्वारे इजा झालेली असते
  2. वनस्पतीजन्य औषधे किंवा व्हिटॅमिन पूरक तत्त्वे घेणे सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कारण या पर्यायी उपचारांपैकी काही यकृताला निकामी करू शकतात किंवा तुमच्या विहित औषधामध्ये बाधा आणतात.
  3. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय, सहज मिळणारी औषधे उदा. पॅरासिटमॉत घेऊ नका, कारण अशा बहुतांश औषधांवर यकृताद्वारे प्रक्रिया होते आणि यांमुळे यकृताची हानी होऊ शकते.
  4. स्कॅलॉप, म्युसेल किंवा क्लॅमसारखे कच्चे किंवा कमी भाजलेले मासे खाणे टाळा, कारण त्यांच्यामध्ये व्हायब्रिओ व्हुल्लिफिकस नावाच्या एका जंतूचे जिवाणूजन्य संक्रमण असते, जे यकृतासाठी खूप विषारी आहे.
  5. पेंट थीनर ( भिंतीचे रंग पातळ करणारे पदार्थ ), घरगुती साफसफाईची उत्पादने, नेल पॉलिश रिमूव्हर यांसारखे तीव्र गंध श्वासात घेणे टाळा , कारण त्यांच्यामध्ये विषारीपणाचा संभव असतो.
  6. भरपूर भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्ये असलेले निरोगी आहार घ्या पातकोबी, ब्रोकोली आणि फुलकोबी विशेषकरून यकृताची सुरक्षा करण्याचे कार्य करतात.
  7. दाणे, मका, शेंगदाणे आणि बाजऱ्यावरील मोड पाहूनच त्यांचे सेवन करा. मोड असल्याने त्यांच्यात एफ्लाटॉक्सिन असू शकतात, जे यकृतासाठी घातक असतात.
  8. नियमित व्यायाम करा.
  9. यकृतातील दाह प्रमाणाबाहेर होऊ न देण्यासाठी, आजाराच्या तीव्रतेनुसार जेवणात प्रथिन द्रव्य आणि मिठाचे वापर नियंत्रित केले.

कावीळ ब प्रतिबंधन ( Hepatitis B Prevention in Marathi )

या रोगाविरुध्द हमखास उपाय उपलब्ध नाही. सुदैवाने सध्या क्रियाशील लसीकरणासाठी कावीळ ब ची लस उपलब्ध आहे. ९५ टक्के रुग्णांमध्ये ही लस प्रभावी ठरते.

ही लस प्रत्येकी ०.५ मि.ली. या प्रमाणात डाव्या मांडीच्या स्नायुमध्ये तीनदा दिली जाते. पहीली मात्रा सहा आठवडयात त्रिगुणी लससोबत देण्यात येते , दुसरी व तिसरी मात्रा एक एक महिन्याच्या अंतराने दिली जाते.

दवाखान्यात प्रसुती झाल्यास बाळाला २४ तासाच्या आत लस ( झिरो डोज ) दयावा. डॉक्टर आणि परिचारिका यांच्यासारख्या जोखमीच्या गटांसाठी ही अत्यंत उपयुक्त लस आहे.

ह्या गटातील व्यक्तींना जोखीम उद्भवल्यास तातडीचे संरक्षण देण्यासाठी कावीळ ब इम्युनोग्लोबुलीन दिले पाहिजे.

जास्त परिणामकारक ठरण्यासाठी संपर्क झाल्यावर इम्युनोग्लोबुलीन चोवीस तासाच्या आत द्यावे. सध्या ही लस राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत १ वर्षाखालील बालकांना दिली जाते .

Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023