कोरोना लसीचा बुस्टर प्रिकॉशन डोस सर्व माहिती Third Dose of Covid Vaccine in Marathi

Third Dose of Covid Vaccine in Marathi, Booster Dose of Covid Vaccine in Marathi, कोरोना लसीचा बुस्टर डोस, कोरोना प्रिकॉशन डोस,

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.
  • सध्या कोरोना (Coronavirus in Marathi) रुग्णाची देशातील संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे देशात 10 जानेवारी 2022 पासून कोरोनाचा तिसरा डोस (third dose of covid vaccine in Marathi) देण्यात येणार आहे.
  • नॅशनल हेल्थ मिशनचे अतिरिक्त सचिव आणि मिशन डायरेक्टर विकास शील यांनी सांगितले की, ‘बूस्टर डोस’साठी ऑनलाइन अपॉइंटमेंटची सुविधा को-विनवर (coWIN) देण्यात आली आहे.
  • जे बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन अपाईंटमेंट घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्यासाठी नवीन नोंदणीची आवश्यकता नाही.
  • ज्या लोकांना COVID-19 लसीचे दोन डोस मिळाले आहेत ते कोणत्याही लसीकरण केंद्रात थेट लस घेऊ शकतात किंवा वॉक-इन लसही घेऊ शकतात. 10 जानेवारी 2022 पासून देशात बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.
  • मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना तिसरी लस म्हणून बूस्टर डोस देण्याची घोषणा केली होती.
  • आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना देखील लसीचा बूस्टर डोस दिला जाईल.

पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना नवीन नोंदणी करण्याची गरज नाही.

त्या व्यक्तीला केवळ लसीसाठी लसीकरण केंद्रात अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. जर त्याला कोणत्याही कारणास्तव अपॉइंटमेंट घेणे शक्य नसेल तर तो थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतो.

कोणत्या लशीचा बुस्टर डोस देणार?

भारतात येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांना लशीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस दिला जाणार आहे.

यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी आधी ज्या लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्याच लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

बूस्टर डोस देण्याबाबत आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वेही प्रसिद्ध केले आहेत

  • Comorbidity असल्याचे दाखवण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र, प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही.
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोस घेण्यात यावा.
  • ज्यांनी दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले असतील अशांना हा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

बूस्टर डोस किती गरजेचा

  • अनेक देश त्यांच्या नागरिकांना असे बूस्टर डोस देत आहेत. भारतात, याला बूस्टर डोस असे न म्हणता प्रिकॉशन डोस म्हटले जात आहे.
  • हा तिसरा डोस लागू करण्याचा निर्णय अलीकडेच कोविड-19 रुग्णांच्या संख्येत जागभरात झालेली वाढ लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.
  • भारतातही केसेस झपाट्याने वाढत आहेत आणि 24 नोव्हेंबर रोजी समोर आलेला Omicron व्हेरिएंट देखील यासाठी कारण असल्याचे मानले जाते.
  • बूस्टर डोस किंवा प्रिकॉशन डोस घेतल्या नंतर अगोदरच्या २ कोरोना लसीमुळे मिळालेली प्रतिकारशक्ती आणखी वाढेल. नव्याने येणाऱ्या Omicron व्हेरिएंट चा प्रतिकार हा बुस्टर घेतल्यास अधिक चांगल्या प्रकारे होईल.
Copyright Material Don't Copy © 2022