आजारांची माहिती

जपानी मेंदूज्वर सर्व माहिती Japanese Encephalitis JE Vaccine in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

जपानी मेंदूज्‍वराच्‍या घटना प्रामुख्‍याने ग्रामीण भागातील गरीब लोकांमध्‍ये विशेषतः डुकरे पाळण्‍याचा व्‍यवसाय करणा-या लोकांमध्‍ये दिसून येतात. पक्षी किंवा डुकराव्‍यतिरिक्‍त गायी, म्‍हशी आणि वटवाघुळामध्‍ये सुध्‍दा या रोगाच्या अॅन्‍टीबॉडीज आढळून येतात.

या रोगाचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्‍ये विशेष करुन आढळतो. हा आजार स्‍ञी पुरुष दोघांमध्‍येही आढळून येतो तरीही पुरुषांमध्‍ये यांचे प्रमाण जास्‍त आढळते. जपानी मेंदूज्‍वराचे रुग्‍ण विखुरलेला स्‍वरुपात आढळतात.

जपानी मेंदूज्वर JE हा काय आजार आहे ?

जापनीज इन्सेफेलाइटिस ( मेंदूचा ताप ) हा एक गंभीर , अपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा मज्जासंस्थेचा आजार आहे. जापनीज इन्सेफेलाइटिस विषाणूमुळे होतो. हा आजार infected डासांमुळे पसरतो.

ह्या आजारामध्ये मध्यवर्ती मज्जा संस्था ( Central Nervous system ) बाधित होते व त्यामुळे गंभीर अशी गुंतागुंतीची स्थिती ( Severe Complications ) कदाचित मृत्यू होवू शकतो .

जपानी मेंदूज्वर JE आजार कशामुळे होतो ?

जापनीज इन्सेफेलाईटिस ( JE ) आजाराच्या विषाणूंचा फैलाव डासांच्या ( Infected Culex Mosquitoes in Marathi ) माध्यमातून होतो . हे डास नेहमी भाताची शेती , पाणथळ जागा व तलावांमध्ये राहतात.

संक्रमणानंतर विषाणू मनुष्याच्या मेंदूत ( Brain in Marathi ) व मज्जा रज्जू ( spinal cord in Marathi ) मध्ये प्रवेश करतो .

जल पक्षी ( water bird in Marathi ) व डुकरे ( pigs in Marathi ) हे आजाराचे Host आहेत. त्यांच्या शरीरामध्ये जे. ई. व्हायरसची संख्या वाढते. Infected डास चावल्यामुळे मनुष्याला हा आजार होतो. या आजाराचा प्रसार एका माणसापासून दुस -या माणसाकडे होत नाही.

जपानी मेंदूज्वर JE आजाराचा अधिशयन काळ किती आहे ?

 • या विषाणूचा माणसांमधील अधिशयन काळ ५ ते १५ दिवसांचा आहे.
 • डासांची मादी ” विषाणू दूषित “प्राण्याला चावल्‍यामुळे दुषित होते. नंतर या दुषित मादीपासून ९ ते १२ दिवस पर्यंत या विषाणूंचा प्रसार मानवासह इतर प्राण्यांमध्ये होऊ शकतो.

जपानी मेंदूज्वर JE आजाराची लक्षणे कोणती ?

या आजाराच्या सुरुवातीला ५ ते १५ दिवसांमध्ये विविध लक्षणे दिसू लागतात.

 • फ्ल्यू ( Flu in Marathi ) सारखा आजार , ताप , थंडी वाजून येणे ,
 • थकवा ,
 • डोकेदुखी ,
 • मळमळ , उलटी इत्यादी लक्षणे दिसून येतात .
 • सदर आजार मेंदुमध्ये पसरुन गंभीर स्वरुप धारण करु शकतो.
 • ब-याच रुग्णांमध्ये झटके , फिट येणे ( convulsions ) किंवा बेशुध्दपणा ( coma ) होवू शकतो .
 • हा आजार झालेल्या ३० टक्के रुग्णांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता असते .
 • साधारण ४० टक्के रुग्णांमध्ये आजारातून बरे झाल्यानंतर मेंदूला झालेल्या इजेमुळे लकवा ( paralysis ) व मतिमंदत्व ( Mental Retardation ) असे आजार राहू शकतात .

जपानी मेंदूज्वर JE रोगाचेनिदान केले जाते?

या रोगाचे निदान प्रामुख्‍याने रुग्‍णांच्‍या रक्‍तजलातील अॅन्‍टीबॉडीज शोधून किंवा ELISA पध्‍दतीव्‍दारे तसेच पाठीच्‍या मणक्‍यातील पाण्‍याच्या तपासणी (CSF) व्‍दारे करण्‍यात येते.

जपानी मेंदूज्वर आजार कोणाला होण्याची जास्त शक्यता असते ?

ज्या भागामध्ये मोठया प्रमाणावर भाताची शेती व डुकरांची संख्या आहे अशा भागांतील लोकांमध्ये हा आजार पसरु शकतो .

१ वर्ष ते १५ वर्षे या वयोगटातील मुले / मुलींना हा आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते .

जपानी मेंदूज्वर आजारावर उपाययोजना कोणती ?

JE आजारावर specific अशी उपाययोजना ( Treatment ) उपलब्ध नाही. JE विषाणू विरुध्दचे परिणाम कारक औषधे उपलब्ध नाहीत. JE आजाराच्या लक्षणांवर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे . जेणे करुन आजाराची complications टाळता येवू शकतात .

जपानी मेंदूज्‍वरावर कोणताही विशिष्ट असा उपचार नाही. रुग्णास हालवताना खालील काळजी घेणे आवश्‍यक आहे

 1. रुग्‍णास एका कडेवरच झोपवून ठेवावे.
 2. रुग्‍णाच्‍या तोंडाची पोकळी व नाक स्‍वच्‍छ ठेवा. चिकटया ओढून घेण्‍याच्‍या यंञाचा उपयोग करावा.
 3. रुग्‍णास मान वाकवू देऊ नये.
 4. ताप जास्‍त असल्‍यास रुग्‍णांचे शरीर ओल्‍या फडक्‍याने पुसून काढावे.
 5. मोठे आवाज व प्रखर प्रकाश टाळावा

जपानी मेंदूज्वर आजार होणे कशा प्रकारे टाळू शकतो ?

आपण हे करु शकता –

 1. JE आजारावर प्रतिबंध करण्यासाठी JE लसींने लसीकरण करणे ( JE Vaccination ) हाच प्रभावी उपाय आहे .
 2. डासांपासून संरक्षण केल्यामुळे देखील JE आजाराचा प्रसार टळतो .
 3. रुग्‍ण मोठया रुग्‍णालयात हालवण्‍यासाठी वाहतूक व्‍यवस्‍था करणे.
 4. घरांमधील फवारणी, डास अळीप्रतिबंधक उपाययोजना खड्डे बुजवून पाण्‍याचे साठे कमी करणे, डुकरांच्‍या संख्‍येवर नियंञण्‍ करणे, वेळोवेळी भातशेती मधील पाण्‍याचा निचरा करणे.
 5. वैयक्तिक संरक्षणासाठी मच्‍छरदाणीचा वापर करणे, डास प्रतिबंधक विविध साधनांचा वापर करणे.
 6. डुकरांची निवासस्‍थाने वस्‍तीमध्‍ये न ठेवणे.
 7. आपापल्या गावांमध्‍ये मेंदूज्‍वराचा रुग्‍ण आढळल्‍यास ताबडतोब आरोग्‍य कर्मचा-यांना किंवा गावच्‍या सरपंचांना सूचित करणे.

JE vaccination देण्याबाबत काय धोरण आहे ?

 • केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सुरुवातीला १ वर्षे ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुला / मुलींचे एकाच वेळेस JE लसीच्या एका डोसने लसीकरण केले जाते . ( JE Vaccination Campaign )
 • त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत JE लसीचे दोन डोस ( १ ला डोस वयोगट ९ ते १२ महिने व २ रा डोस १६ ते २४ महिने दिले जातात .

जपानी मेंदूज्वर लसीचे side effects काय आहे ?

JE vaccine ही सुरक्षित लस आहे . लस दिल्यानंतर काही बालकांमध्ये ताप , इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणे , अंगावर बारीक पुरळ , किरकिर इत्यादी . लक्षणे दिसू शकतात . ( JE vaccine Adverse Events in Marathi)

जपानी मेंदूज्वर लस बालकांना कधी देण्यात येवू नये ?

 • a ) जर पूर्वी JE लस घेतली असेल व त्यानंतर serious Reaction आली असेल तर देण्यात येवू नये .
 • b ) JE लसींमध्ये असणा – या विविध components ना Allergic reactions ची History असल्यास
 • c ) HIV / AIDS बाधित किंवा ज्या व्यक्तींची प्रतिकार शक्ती क्षीण झालेली आहे .
 • d ) गरोदर माता
 • e ) जर लाभार्थ्यांना जास्त प्रमाणात ताप असल्यास ( 38.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ताप )

जपानी मेंदूज्वर जे. ई. लसीकरण सर्व माहिती, कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार, लस कोणी व कधी घ्यावी, JE Vaccine in Marathi, Japanese Encephalitis in Marathi

Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023