बर्ड फ्लू कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार Bird flu meaning in Marathi
खालील लेखात बर्ड फ्लू कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार इत्यादी सर्व माहिती मराठी भाषेत देण्यात आलेली आहे. सध्या बर्ड फल्यूच्या अनुषंगाने घाबरून जाण्याची गरज नसली तरी या बाबतीत काय काळजी घ्यावी हे सर्वसामान्य जनतेस आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातुन सांगणे गरजेचे आहे. खालील लेखात बर्ड फ्लू कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार इत्यादी सर्व माहिती मराठी भाषेत देण्यात आलेली आहे.
अनुक्रमणिका
पक्षांमध्ये पसरणाऱ्या फ्लूचे म्हणजेच बर्ड फ्लूचे अनेक उपप्रकार आहेत. त्यातील H म्हणजे हेमाग्युलेटीन (Hemagglutinin) आणि N म्हणजे न्यूरामिनीडिज (Neuraminidase) हे दोन्ही या विषाणूचे प्रोटीन स्ट्रेन आहेत. आणि याच्याच उपप्रकारांना नंबर दिलेले आहेत.
H म्हणजेच हेमाग्युलेटीनचे 18 उपप्रकार आहेत, तर N म्हणजेच न्यूरामिनीडिजचे 11 उपप्रकार आहेत. यातील फक्त H5, H7 आणि H10 याच स्ट्रेन माणसाच्या मृत्यू कारण ठरु शकतात. त्यामुळं H5N1 हा माणसांसाठी अधिक धोकादायक मानला जातो. यामधील H17N10 आणि H18N11 हे फक्त वटवाघुळांमध्येच आढळतात. बाकी पक्षांमध्ये याचा प्रसार होत नाही.
1900च्या दशकात इटलीमध्ये सर्वात आधी हा फ्लू आढळला होता. त्यानंतर 1961 मध्ये दक्षिण आफ्रिकेत या फ्लूमुळे लाखो पक्षी संक्रमित झाले. डिसेंबर 1983 ला पेन्सिलवेनिया आणि व्हर्जिनियात या फ्लूनं थैमान घातलं. त्यानंतर 50 लाख कोंबड्या आणि बदकांना मारण्यात आलं. 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये 18 लोकांना हा फ्लू झाला. त्यातील 5 लोकांचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूमुळे मृत्यू होण्याची ही जगातील पहिलीच घटना होती. त्यानंतर हाँगकाँगमद्ये तब्बल 15 लाख पक्षांना मारण्यात आलं.
2003 साली नेदरलँडमध्ये 84 लोकांना H7N7 या नवी स्ट्रेनचा फ्लू झाला, त्यातील एकाचा मृत्यू झाला. 31 जुलै 2012 ला H3N8 या नव्या फ्लूच्या स्ट्रेनमुळं तब्बल 160 सील माशाच्या पिलांच्या मृत्यू झाल्याचं शास्रज्ञांनी उघड केलं. 2019 ला जगभरात तब्बल 1568 लोकांना या फ्लूची लागण झाली,तर त्यातील 616 लोक दगावले, हा H7N9 प्रकारातला फ्लू होता.
2006 साली पहिल्यांदा महाराष्ट्रातच बर्ड फ्लूनं संक्रमित पक्षी आढळले होते. महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली होती. त्यावेळी राज्यभरात तब्बल अडीच लाख कोंबड्या मारल्या गेल्या. तर 5 लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली. या संक्रमण काळात कुठल्याही मृत्यूची नोंद सापडत नाही.
बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर
बर्ड फ्लूवर औषध उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. याशिवाय रेलेन्झा (Relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये. कारण, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टॅमी फ्लूसह इतर गोळ्यांचे सेवन केल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.
या सोबतच एखादया भागात मृत पक्षी आढळल्यास दक्षता घ्यावी तसेच या मृत पक्षांची विल्हेवाट कशी लावावी, या संदर्भातील पशुसंवर्धन विभागाच्या सूचना चे पालन करावे.
प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More
प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More
प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More
प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More
प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More
ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More