आजारांची माहिती

इन्फ्ल्युएन्झा फ्लू कारणे, लक्षणे, उपचार Influenza Flu Meaning in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

इन्फ्ल्युएन्झा, Influenza in Marathi, फ्लू, Flu in Marathi हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर. एन. ए. जातीच्या विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. सामान्यपणे ‘फ्ल्यू’ ( Flu in Marathi ) या नावाने ओळखल्या जाणार्‍या या रोगाची लागण पक्ष्यांना आणि माणसांना होते.

Influenza Meaning in Marathi, Flu Meaning in Marathi, Common Cold Meaning in Marathi:-

इन्फ्ल्युएन्झा (Influenza in Marathi) अ, ब आणि क असे तीन प्रकार असलेल्या विषाणूंमुळे हा रोग होतो. इन्फ्ल्युएन्झा (Influenza in Marathi) हा एक पक्षी, पशु व मानवामध्ये आढळणारा विषाणूजन्य आजार आहे. इन्फ्ल्युएन्झा (Influenza in Marathi) ला संक्षिप्त रूपात ” कॉमन फ्लू / फ्लू” हा प्रचलित शब्द आहे.

इन्फ्ल्युएन्झा फ्लू आजाराची कारणे:-

Causes of Influenza, Flu in Marathi, Flu Causes in Marathi:-

इन्फ्लुएंझा (Influenza in Marathi), फ्लू हा आजार मुख्यतः इन्फ्लुएंझा (Influenza in Marathi) विषाणू अ, इन्फ्लुएंझा विषाणू ब, इन्फ्लुएंझा विषाणू क यांच्यामुळे होतो. हे तिन्ही विषाणू ऑर्थोमिक्झोव्हायरीडे ह्या विषाणू कुटुंबात मोडतात.

इन्फ्ल्युएन्झा फ्लू आजाराचा प्रसार:-

हे विषाणू मुख्यत्वे तीन प्रकारांनी एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत जातो. How Influenza Flu Spread in Marathi:-

 • थेट संक्रमण म्हणजे शिंकण्यातून उडलेले कण श्वासाद्वारे अथवा तोंडाद्वारे दुसऱ्याच्या शरीरात जाणे
 • हवेद्वारे संक्रमण म्हणजेच रोग्याच्या शिंकेतील, खोकल्यातील अथवा थुंकीतील अतिशय छोट्या कणांचा श्वासाद्वारे संसर्ग होणे
 • दूषित पृष्ठभागांद्वारे हाताच्या हाताशी , नाकाशी वा तोंडाशी होणाऱ्या स्पर्शाद्वारे संसर्ग होणे.

हे विषाणू आपल्या शरीराच्या बाहेरही नीट राहू शकत असल्यामुळे आपल्या रोजच्या वापराच्या गोष्टी जसे नाणीनोटा, दरवाज्याच्या कड्या, विजेच्या उपकरणांची बटणे इ. द्वारेही पसरू शकतात. त्यामुळे रोग्याला सर्व गोष्टी अतिशय काळजीपूर्वकरित्या हाताळल्या पाहिजेत.

Influenza Flu Meaning in Marathi, Influenza Meaning in Marathi, Flu Meaning in Marathi, Common Cold Meaning in Marathi, Cold and Flu Meaning in Marathi, Viral Flu Meaning in Marathi, Influenza in Marathi, Influenza Virus in Marathi, Influenza Information in Marathi, Influenza Vaccine in Marathi, what is flu in marathi, influenza marathi mahiti, इन्फ्ल्युएन्झा फ्लू कारणे, इन्फ्ल्युएन्झा लक्षणे, इन्फ्ल्युएन्झा उपचार, फ्लू कारणे, फ्लू लक्षणे, फ्लू उपचार

इन्फ्ल्युएन्झा (Influenza in Marathi) फ्लू ( Flu in Marathi ) चे हे विषाणू प्लास्टिक अथवा धातुसारख्या टणक व अछिद्र पृष्ठभागांवर एक ते दोन दिवस ; कागदासारख्या वस्तुंवर १५ – २० मिनिटे तर मानवी त्वचेवर फक्त ५ मिनिटे टिकू शकतात. परंतु कफासारखे पदार्थ या विषाणूला तब्बल १७ दिवसांपर्यंत जगवू शकतात.

इन्फ्ल्युएन्झा फ्ल्यू ची लक्षणे:-

Influenza, Flu Symptoms in Marathi, Flu chi lakshane:-

इन्फ्लुएंझा (Influenza in Marathi) ची लक्षणे जंतूंचे संक्रमण झाल्यापासून लगेचच दोन ते तीन दिवसात दिसतात.

 • ताप डोकेदुखी
 • घशात खवखवणे
 • घश्यात दुखणे
 • खोकला
 • डोकेदुखी
 • अंगदुखी
 • सर्दी
 • क्वचित जुलाब

फ्ल्यू ( Flu in Marathi ) झालेल्या रुग्णाच्या शिंके / खोकल्यावाटे या आजाराचे विषाणू पसरतात.

इन्फ्ल्युएन्झा फ्लू चे संक्रमण थांबवण्यासाठी काही सोप्या गोष्टी:-

How to Prevent Influenza, Flu in Marathi:-

 • आपल्या नाकाला तोंडाला डोळ्याला हात लावू नका.
 • सतत आपले हात साबण लावून स्वच्छ धुणे.
 • आजारी असलेल्या लोकांपासून दूर राहणे.
 • आपण आजारी असाल तरी घरीच थांबणे.
 • शिंकताना व खोकताना नाक व तोंड झाकणे.
 • सार्वजनिक जागेत थुंकू नका.
 • बाहेर जाताना तोंडावर मास्क लावा.
 • सिगरेट ओढणा-यांबरोबरच त्याचा वास घेणा-यांनाही त्रास होतो म्हणूनच सार्वजनिक जागेत सिगरेट ओढू नये.
 • घरातल्या घरात जंतू पसरण्यापासून रोखण्यासाठी घर साफ ठेवा.

हे करा:-

 • शिंकताना, खोकताना, नाका तोंडाला चार पदराची घडी करून रुमाल धरावा.
 • शिंकल्यांवर / खोकल्यावर व इतर वेळा साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवा.
 • चौरस आहार घ्या.
 • आहारात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थाचा ( लिंबू , आवळा ) समावेश करा.
 • भरपूर पाणी प्या.
 • पुरेशी झोप घ्या.
 • फ्ल्यू सारखी लक्षणे आढळल्यास कोमट पाण्यात मीठ टाकन गुळण्या करा.

करू नका:-

 • फ्ल्यू सारखी लक्षणे असताना सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
 • फल्यू आजार असताना हस्तांदोलन करु नका.
 • अतिताण , जागरण करु नका.
 • फ्ल्यू सारखी लक्षणे अंगावर काढू नका.
 • इतस्ततः धुंकू नका.
 • डॉक्टरांचे सल्ल्याशिवाय सर्दी तापावरची औषधे घेऊ नका.

इन्फ्ल्युएन्झा फ्लू ची लस:-

Influenza, Flu Vaccine in Marathi

विश्व आरोग्य संघटन म्हणजेच World Health Organisation व अमेरिकेच्या रोग नियंत्रण व शमन संस्था ह्यांने वृद्धांना, बालकांना, हृदयविकार असलेल्यांना, मधुमेह असलेल्यांना व अस्थमा च्या त्रासाने पिडीत असलेल्या लोकांना इन्फ्लुएंझा लस वापरण्याचा सल्ला दिला आहे.

इन्फ्ल्युएन्झा (Influenza in Marathi) हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. परंतु काही उच्चरक्तदाब, मधुमेह व स्थुलपणा असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करु शकतो.
दरवर्षी इन्फ्ल्युएन्झा लसीकरण (Influenza Vaccine in Marathi) हा आजार टाळण्याचा महत्वाचा उपाय आहे.

खालील अतिजोखमीच्या व्यक्तींनी इन्फ्ल्युएन्झा लस घ्यावी:-

 • उच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती,
 • दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर माता.
 • फ्लू रुग्णोपचारात सहभागी डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी लक्षात ठेवा.
 • फ्लूवर प्रभावी औषध उपलब्ध आहे.

इन्फ्ल्युएन्झा फ्लू चे उपचार:-

Influenza Flu Treatment in Marathi

इन्फ्ल्युएन्झा (Influenza in Marathi), फ्लू ( Flu in Marathi ) ची लक्षणे सुरु झाल्यापासून २ दिवसात ऑसेलटॅमीवीर हे औषध सुरु केल्यास ते अधिक प्रभावी ठरते. औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.

लक्षात ठेवा बरे वाटले तरी आँसेलटॅमिव्हीर गोळ्यांचा पाच दिवसांचा पूर्ण डोस घेणे आवश्यक आहे

प्रतिकारशक्ती वाढविणे हाच सर्वोत्तम उपाय स्वत : काळजी घ्या. इतरांना घेण्यास सांगा. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे इन्फ्ल्युएन्झा फ्लू ची लस मोफत दिली जाते.

Copyright Material Don't Copy © 2020

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023