आजारांची माहिती

लस, लसीचा इतिहास, कार्य, घटक, प्रकार, दुष्परिणाम संशोधन Vaccine in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

सध्या करोना च्या साथीमुळे लस हा शब्द सर्वांच्या कानावर सारखा पडत आहे. चला तर आज आपण या लस म्हणजे नक्की काय?, आणि ती कशी तयार केली जाते?, लसीचा इतिहास, लस कसे कार्य करते?, लसीचे घटक, लस संशोधनाचे टप्पे, लसीचे प्रकार, लसीचे दुष्परिणाम, इत्यादि सर्व माहिती पाहणार आहोत.

लस म्हणजे नक्की काय आणि ती कशी तयार केली जाते?

What is Vaccine in Marathi? Vaccine Meaning in Marathi, Vaccine in Marathi:-

पौराणिक कथांमध्ये देवांना ऋषी शाप द्यायचे, कधी मानवांना देव शाप द्यायचे, कधी गंधर्वांना आणि अप्सरांनाही शाप मिळायचे आणि मग त्या शापावर उ:शापही दिले जायचे. त्या उ:शापांमुळे त्या शापित व्यक्ती मुक्त व्हायच्या. आज मानवजातीला कोरोना विषाणूच्या संसर्गाचा जणू एक शापच मिळालेला आहे. पण त्या शापावरचा उ:शाप म्हणजे लस काही अजून मिळालेली नाही. महाभारतातला अश्वत्थामा ज्याप्रमाणे चिरंजीव असूनही माथ्यावरची जखम भरून यावी म्हणून तेल मागत फिरत असतो, तशीच आज समस्त मानव जात, त्यातले डॉक्टर्स, सरकारे, संशोधक सारेजण कोरोनाच्या संकटावरील उ:शाप शोधत आहेत.

कोणतीही लस म्हणजे एक अजब रसायन असते. त्यात एखाद्या आजाराचे रोगजंतू म्हणजे जिवाणू किंवा विषाणू असतात. लशीमध्ये हे रोगजंतू तीनपैकी एका पद्धतीने वापरले जातात. हे जिवाणू अथवा विषाणू एकतर मृतावस्थेत असतात, नाहीतर जिवंत पण अर्धमेले केलेले असतात किंवा विषारी गुणधर्म असलेले जिवंत स्वरूपातलेही असू शकतात.

असे हे रसायन एखाद्याला टोचल्यावर त्या व्यक्तीच्या शरीरात त्या विषाणू किंवा जिवाणूला नष्ट करण्याची आणि पर्यायाने त्या आजाराविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होते. ही लस शरीरात गेली, तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लशींत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही, पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लस तीन प्रकारे वापरतात. इंजेक्शनद्वारे टोचणे, थेंबांच्या स्वरूपात तोंडामध्ये देणे किंवा नाकात सोडणे. एखाद्याला या पद्धतीने लस देणे म्हणजे लसीकरण. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात.

लसीचा इतिहास

History of Vaccine in Marathi, lasicha Itihas:-

अठराव्या शतकाच्या शेवटी एडवर्ड जेन्नर या इंग्रज डॉक्टरने आपल्या काळातील एका शहरी दंतकथेला काही सत्य आहे का हे पडताळायचे ठरवले. त्या काळात गायीच्या आचळांना जखमा होण्याचा आजार होत असे. त्याला ‘काऊ पॉक्स’ किंवा ‘व्हॅक्सिनीया’ म्हणत असत.

गाईचे दूध काढणाऱ्या माणसांनासुद्धा हा आजार होत असे. पण फक्त त्यांच्या हातांवर काही जखमा होऊन तो बरा व्हायचा. मात्र, ज्यांच्या हातांना अशा ‘काऊ पॉक्स’ व्हायच्या त्यांना त्याच काळात होणारा देवीचा आजार म्हणजे ‘स्मॉल पॉक्स’ व्हायचा नाही. त्या काळात देवीच्या आजाराने असंख्य माणसे डागावर होती. मात्र, या काऊ पॉक्स होणाऱ्या व्यक्ती त्यातून पूर्ण बचावत असत.

ही गोष्ट लक्षात घेऊन एडवर्ड जेन्नरने एक प्रयोग केला. आज अमेरिकेतील एफडीए किंवा भारतातील आयसीएमआर अजिबात मान्यता देणार नाही, असा हा प्रयोग होता. जेन्नरने जेम्स फिप्स नावाच्या एका आठ वर्षांच्या मुलाला काऊ पॉक्स झालेल्या गायीच्या व्रणातून आलेला द्राव टोचला. त्याला तो आजार होऊन गेल्यावर दीड महिन्याने त्या मुलाला देवीचे जंतू असलेले इंजेक्शन दिले आणि अहो आश्चर्यम…

त्या मुलाला देवीचा आजार झाला नाही. त्यानंतर जेन्नरने आणखी २२ जणांवर पुन्हा हा प्रयोग करून पाहिला. त्यांनाही देवी झाल्या नाहीत. नंतर ही प्रक्रिया अनेकांवर करत १७९८ मध्ये जेन्नरने ‘वेरियोला व्हॅक्सीन: कारणे आणि परिणाम’ हा आपला प्रबंध सादर केला.

काऊ पॉक्सला ‘व्हॅक्सिनीया’ म्हणत असल्याने, नंतर त्यावरून निघालेला उपचार म्हणजे व्हॅक्सीन, म्हणजेच लस हा शब्द प्रचलित झाला. मनाची आणि बुद्धीची कवाडे उघडी ठेवणाऱ्या एका डॉक्टरमुळे वैद्यकीय विश्वाला लसीचा एक अनोखा उपचार मिळाला आणि त्यातून आलेल्या लसीकरणामुळे पुढे देवीच्या आजारातून मानवजातीला कायमचे मुक्त होता आले.

लस कसे कार्य करते?

Vaccine Effect, Work in Marathi:-

एखाद्या व्यक्तीला लस दिल्यावर त्यामध्ये असलेले कमी संख्येतील जिवंत, मृत किंवा अर्धमेले जंतू शरीरातील पांढऱ्या पेशींना एक रंगीत तालीम देतात आणि त्यामधून प्रतिपिंडे निर्माण होतात. ही टी-लिम्फोसाईट्सच्या स्मृतीत राखून ठेवली जातात. त्यानंतर जेव्हा कधी खरोखरच्या रोगजंतूंचा संसर्ग होतो आणि शरीरावर त्यांचे आक्रमण होते. त्यावेळेस या स्मृतीपेशी प्रतिपिंडे तयार करतात आणि रोगजंतूंचा पाडाव करतात.

लसीचे घटक

Vaccine Contents in Marathi:-

लशीमध्ये रोगजंतू किंवा त्यांच्याशी संबंधित गोष्टी वगळता इतरही काही घटक असतात. त्यामुळे लस द्रवस्वरूपात काही ठराविक काळापर्यंत टिकून राहते. यात ऑडजुव्हन्टस्, स्टॅबिलायझर्स, फॉर्माल्डीहाईड वापरली जातात. मल्टीडोस व्हायल्समध्ये थिमर्सोल नावाचा रासायनिक घटक वापरला जातो.

लस, लसीचा इतिहास, लस कार्य, लस घटक, लस प्रकार, लस दुष्परिणाम, लस संशोधन, Vaccine in Marathi, लस संशोधनाचे टप्पे

लस संशोधनाचे टप्पे

Vaccine Phases in Marathi:-

कोणतीही लस तयार करण्यापूर्वी त्या जिवाणू किंवा विषाणूचा पूर्ण शास्त्रीय अभ्यास केला जातो. त्या रोगजंतूच्या सर्व क्रिया-प्रक्रियांची पडताळणी केली जाते. त्यानंतर लस तयार करून प्रथम प्रयोगशाळेत जिवाणूंवर प्रयोग केले जातात. त्याला ‘इनव्हिट्रो स्टडीज’ म्हणतात. त्यानंतर उंदीर-ससा अशा प्राण्यांवर तसेच माकडांवर प्रयोग केले जातात. याला ‘इनव्हिट्रो स्टडीज’ म्हणतात. यामध्ये लशीचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यास माणसांवरील प्रयोगांच्या पहिल्या टप्प्याला परवानगी मिळते. त्यात एकूण तीन टप्पे किंवा फेजेस असतात.

लस संशोधन फेज १

Vaccine Phase 1 in Marathi:-

यामध्ये पाच ते दहा व्यक्तींवर या लशीचा प्रयोग केला जातो. यात लशीचा रोगजंतू नष्ट करण्याचे कार्य आणि सुरक्षितता समजून येते आणि परिणामकारक डोस ठरवला जातो.

लस संशोधन फेज २

Vaccine Phase 2 in Marathi:-

यामध्ये सुमारे १०० ते २०० व्यक्तींवर आणि क्वचित प्रसंगी एक हजार व्यक्तींवर लशीचे परिणाम पडताळले जातात. लस या सर्वांमध्ये सातत्याने तेवढाच अपेक्षित परिणाम देते आहे ना? हे पाहिले जाते आणि लशीच्या साइड इफ्फेक्ट्सची नोंद केली जाते. जास्त गंभीर दुष्परिणाम असल्यास प्रयोग थांबवले जाऊ शकतात.

लस संशोधन फेज ३

Vaccine Phase 3 in Marathi:-

यामध्ये हजारो लोकांवर व्यापक स्वरूपात प्रयोग केले जातात. यामध्ये निरनिराळ्या वंशाच्या, वर्णाच्या, वयाच्या निरोगी स्त्रीपुरुषांचा समावेश केलेला असतो. यात लशीच्या उपयुक्ततेचे आणि दुष्परिणामांचे अनुभव सर्वेक्षणात नोंदवले जातात. यामध्ये क्वचित प्रसंगी उद्‌भवणारे दुर्मीळ साइड इफेक्टसुद्धा पाहिले जातात.

लस संशोधन फेज ४

Vaccine Phase 4 in Marathi:-

तिसऱ्या टप्प्यानंतर लस बाजारात आणली जाते किंवा निरनिराळ्या देशात ती देण्याचे कार्य सुरू होते. यामध्येही सर्वेक्षण सुरू ठेवतात. लशीचे आधी लक्षात न आलेले दुष्परिणाम, जंतूंचे बदललेले स्वरूप याकडे लक्ष पुरवले जाते. अनेकदा या टप्प्यातदेखील लशीच्या स्वरूपात महत्त्वाचे बदल करून ती उपलब्ध केली जाते.

लसीचे प्रकार

Types of Vaccine in Marathi, Vaccine Types in Marathi:-

  1. लशींच्या निर्मितीनुसार त्यांचे विविध प्रकार पडतात.
  2. जिवंत सूक्ष्म जिवाणू किंवा विषाणू असणाऱ्या लशी.
  3. रोग संक्रमण क्षमता कमी करण्यात आलेल्या सूक्ष्म विषाणू किंवा
  4. जिवाणूंपासून निर्मिती केलेल्या लशी.
  5. मृत सूक्ष्म जिवाणू/विषाणूंपासून केलेल्या लशी.
  6. एकाच प्रकारचे सूक्ष्म जंतू असणाऱ्या लशी.
  7. अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतूंचे एकत्रीकरण केलेल्या लशी किंवा मिश्र प्रकारच्या लशी.

लसीचे दुष्परिणाम

Side Effects of Vaccine in Marathi, Vaccine Side Effect in Marathi:-

उपलब्ध असलेल्या सर्व लशी प्रदीर्घ संशोधन आणि सर्वेक्षण करून तयार केलेल्या असतात. त्यामुळे त्या देण्याबाबतीत सुरक्षित असतात. तरीही त्यात ताप येणे, इंजेक्शनची जागा सुजणे, अंगावर पुरळ येणे असे त्रास दिसून येतात.

लस वापरण्यासंबंधी, ती साठवून ठेवण्यासंबंधी, काही पावडर स्वरूपात असलेल्या लशींमध्ये द्राव मिसळून ते तयार करण्यासंबंधी, लशीचे डोसेजेस, ती देण्याची पद्धत, ती देताना बालकांना सर्दी-ताप नसणे अशा गोष्टींच्या सूचना लशीबरोबर असलेल्या परिपत्रकावर दिलेल्या असतात. त्याचे पालन नीट न झाल्यास क्वचित प्रसंगी काही गंभीर दुष्परिणाम दिसून येतात.

Copyright Material Don't Copy © 2020

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023