आजारांची माहिती

रक्तदान सर्व माहिती Blood Donation Information in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

रक्तदान Blood donation in Marathi आपल्या शरीरास रक्ताची गरज ही प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू वाहून नेण्यासाठी असते. अपघाताचे वाढते प्रमाण, आकस्मिक शस्त्रक्रिया, थेलॅसिमिया, रक्त – कर्करोग, पर्पुरा यासारखे रक्ताचे विकार व नैसर्गिक आपत्तीमुळे रक्ताची गरज वारंवार भासते.

Blood donation in Marathi, blood donation quotes in Marathi, blood donation benefits in Marathi, blood donation information in Marathi

एखादे वेळी रुग्णांच्या नातेवाईकांचे रक्तगट जुळत नाहीत किंवा जास्त रक्ताची आवश्यकता भासते. अशावेळी रक्तदात्यांना दूरदर्शनवरुन सुध्दा आवाहन केल्या जाते . पण अशी परिस्थिती का येते याचे मुख्य कारण म्हणजे रक्तदानाबद्दलची उदासीनता, गैरसमज, भिती, या सगळयात भर पडली आहे एड्सची.

शरीरातील रक्ताचे प्रमाण

Total Volume of Blood in Human Body in Marathi

शरीराच्या वजनाप्रमाणे –

पुरुष – प्रत्येक किलो वजनामागे ७६ मिली रक्त असते.

स्त्री– प्रत्येक किलो वजनामागे ६६ मिली रक्त असते.

सुदृढ व्यक्तीमध्ये प्रत्येक किलो वजनामागे ५० मिली . रक्त पुरेसे आहे .

  • मानवी शरीरात पाच लीटर रक्त सतत प्रवाहित असते.
  • रक्तदान करतांना त्यातले ३०० मि.ली. रक्त काढले जाते . निरोगी माणसाच्या आरोग्यावर याचा कुठलाही वाईट परिणाम होत नाही .
  • रक्त दिल्याने रक्त कमी न होता वाढतच जाते . कारण रक्तदान केल्यानंतर नवीन रक्तपेशी तयार होण्यास उत्तेजना मिळते .
  • याबरोबर नातेवाईकांना , मित्रांना मदत केल्याचा आनंद तर अवर्णनीय . म्हणून रक्तदान हे पवित्र दान आहे आपि १८ वर्षावरील प्रत्येकाने आपला वाढदिवस रक्तदानाने साजरा करावा .

रक्ताची गरज कधी भासते ? Use of Blood in Marathi:-

  • अ ) अपघातात अधिक रक्तस्त्राव झालेल्यांना .
  • आ ) भाजलेल्यांना .
  • इ ) प्रसवकाळी स्त्रियांना
  • ई ) अशक्त रुग्णांना
  • उ ) थैलेसिमिया आणि हेमोफिलिया रुग्णांना .
  • ऊ ) शल्यचिकित्सेवेळी
  • ए ) कॅन्सर रुग्णांना .
  • ऐ ) ओपन हार्ट सर्जरी / बायपास – हृदयरुग्णांना .

रक्तदानास पात्र व्यक्ती रक्तदान कोण कोण करू शकते?

Who can Donate Blood in Marathi?

  • अ) रक्तदाता निरोगी व अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असला पाहिजे .
  • ब ) त्याचे वजन किमान ४५ किलोग्रॅम व
  • क ) हिमोग्लोबीन किमान १२ ग्रॅम / १०० मिली . असावे .

रक्तदानास अपात्र व्यक्ती – रक्तदान कोण करू शकत नाही?

Who Can’t Donate Blood in Marathi?

  • ४५ किलोपेक्षा कमी वजन असल्यास .
  • १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापक्षा जास्त वय असलेल्यानी
  • उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब असल्यास .
  • हिमोग्लोबीन कमी असल्यास . .
  • ३ वर्षापूर्वीच्या काळात कावीळ झालेला असेल ,
  • ३ महिन्यापूर्वी हिवताप झालेला असेल
  • एक / दीड महिन्यात अपघात किंवा इतर काही कारणाने रक्तस्त्राव झाला असेल ,
  • कॉलरा , विषमज्वर किंवा धनुर्वातासाठी इंजेक्शन नुकतेच घेतले असेल
  • दमा , क्षय , अपस्मार व हिमोफिलीयासारख्या व्याधी असतील ,
  • एक वर्षाच्या काळात श्वानदंश किंवा श्वानदंशाकरीता इंजेक्शन घेतले असेल ,
  • मासिक पाळी चालू असतांना ,
  • गर्भवती स्त्रीस्तनपान करणारी स्त्रीने रक्तदान करू नये .

रक्तदात्याला रक्तदानाचा फायदा काय ?

Benefits of Blood Donation in Marathi:-

रुग्णाचा जीव वाचवल्याचे व मदत केल्याचे समाधान मिळते , तसेच रक्तदान केल्यावर नवीन रक्तपेशी तयार होण्यास उत्तेजना मिळते . डोनर कार्ड दाखवल्यास कुटुंबातील व्यक्तीला किंवा मित्राला रक्त लागल्यास सर्व्हिस चार्जेसमध्ये सूट मिळते .

रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताची तपासणी :

  • अ ) रक्तगट
  • ब ) लैंगिक रोग –
  • यकृतदाह – ब,
  • उपदंश ( सिफिलीस ),
  • एड्स
  • क ) मलेरिया
  • ड ) रक्तगट जुळवणे etc सर्व तपासणीचा खर्च रक्तपेढी करते.

रक्त घटक विभागणी म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय ?

Blood Components in Marathi:-

रक्तात वेगवेगळे घटक असतात – रक्तद्रव , लाल पेशी , पांढ-या पेशी , रक्तबिंबिका इत्यादी घटक असतात . हे रक्त घटक वेगवेगळे करुन आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या रुग्णांना देता येतात . उदा . रक्तक्षयाच्या रुग्णांना लालरक्तपेशी , याचा मुख्य उपयोग म्हणजे रुग्णांना ज्या विशिष्ट घटकांची आवश्यकता असते तेवढेच घटक पुरवता येतात आणि त्यामुळे एका रक्ताच्या पिशवीतून दोन तीन रुग्णांची गरज भागवता येते . तसेच काही घटक वर्ष दोन वर्षेपर्यंत टिकवता येतात .

रक्तपेढी : रक्त कोठे साठवतात?

Blood bank in Marathi:-

रक्तदात्याने रक्त दिल्यानंतर त्याची पूर्ण तपासणी केल्यावर रक्तगटांप्रमाणे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात येते . त्याचे तापमान ८ ° से.ग्रे . असते . रक्तगटांप्रमाणे वेगवेगळया रंगाचे लेबल असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये ३५ दिवस व बाटलीत २१ दिवस साठवता येते .

रक्तसूची

Blood Donner List in Marathi:-

प्रत्येक दवाखाना , शाळा , सरकारी कार्यालये , बँका येथे रक्तसूची ठेवाव्यात व आवश्यकतेनुसार त्याचा उपयोग करून रक्तदात्यांनी रक्तदान करावे . कमी प्रमाणात आढळणारे रक्तगट उदा . आर एच निगोटिव आणि ओबी यांची सूची असणे अत्यावश्यक आहे . कारण आकस्मिक रक्ताची गरज पडल्यास रक्तदात्यांबरोबर ताबडतोब संबंध प्रस्थापित केला जाऊ शकतो .

Commercial Blood Donner in Marathi:-

कुठल्याही व्यावसायिक रक्तदात्याचे रक्त घेऊ नये . कारण नेहमी नेहमी रक्तदान केल्यामुळे त्याच्या रक्तातील लाल रक्तपेशी ( HB ) चे प्रमाण फारच कमी असते . त्यामुळे त्याच्या रक्ताचा अपेक्षित परिणाम होत नाही . अशा व्यावसायिक रक्तदानाला कायद्याने बंदी आहे .

रक्तदान प्रश्नोत्तरे

Blood Donation FAQ in Marathi:-

त्रास न होता रक्तदान किती वेळा करता येते ?

रक्तदान तीन महिन्यातून एकदा म्हणजे वर्षात चार वेळा करता येते . एकावेळी स्त्री किंवा पुरुष ३६० मिली रक्तदान करु शकेल .

दिलेले रक्त किती दिवसात भरुन निघेल ?

रक्तद्रव २ दिवसात व रक्तपेशी ६० दिवसात भरुन निघतात .

रक्तदानानंतर अधिक आहाराची किंवा टॉनिक घेण्याची आवश्यकता आहे का ?

मुळीच नाही .

रक्तदानानंतर किती वेळात माणूस कामावर जाऊ शकतो ?

१५ मिनिटात माणूस कामावर जाऊ शकतो

रक्तदान केल्याने एड्स होईल का ?

नाही .

रक्तदान घोषणा, Blood Donation Quotes in Marathi

तुमचे रक्त दुसऱ्याचे जीवन आहे.

रक्तदान सर्वश्रेष्ठदान

मंदीरात जाऊन करता ईश्वरसेवा,रक्तदान करून करा समाजसेवा.

रक्तदान ही जन सामान्यांची सेवा, यालाच मानुया ईश्वरसेवा.

रक्त हे केवळ शरीरातच तयार होतं हे माहीतीये नं? मं वाट कसली पहाताय? चला रक्तदान करूया!

दानात दान रक्तदान, समाजात वाढेल मान!

रक्तदान श्रेष्ठदान मानुया,चला रक्तदान करूया.

रक्ताला कुठली जात भाषा, रक्तदान करा झटका निराशा.

रक्ताचा थेंब् न थेंब् मनुष्याकरता वरदान, उठा चला करूया रक्तदान.

आपल्या वाढदिवसाला वाचवु एखाद्याचे प्राण, अनमोल भेट देऊया करूया रक्तदान!

रक्तदानाला पर्यायी समजु नकारक्तदान करणे अनिवार्य समजा.

रक्तदान करून जोडा नविन नाते, असे केल्याने आपले काय जाते?

पुण्यक्षेत्री दान धर्म करत बसण्यापेक्षा, रक्तदान करून आपल्या शरीरालाच मंदिर बनवुया.

रक्ताची गरज कुणाला आहे, तुलाही आहे मलाही आहे.

रक्त कधी कारखान्यात बनेल का? नाही नां, आपल्याला रक्तदान करावेच लागणार

जसा पाण्याचा थेंब् न थेंब धरणात साठायला हवा, तसा रक्ताचा थेंब् न थेंब रक्तपेढीत साठवायला हवा.

रक्तदान करूया… राष्ट्रीय एकात्मता वाढवुया.

रक्तदान आहे जीवनदान, कारण यामुळेच वाचतात अनेकांचे प्राण.

मनी असेल मानवसेवेचा भाव, रक्तदाना सारखा दुसरा नाही उपाय.

आता सगळे मिळुन मानवहितार्थ कार्य करूया, चला आपण सगळेजण रक्तदान करूया.

रक्तदान केल्याने येत नाही कमजोरी, ही कुठुन आणलीत मजबुरी?

रक्तदानासारखे नाही दुसरे कुठले पुण्य, तरीही त्याचे प्रमाण का आहे नगण्य?

तुम्ही आज करा रक्तदान, उद्या पुढची पिढी ठेवेल तुमचा मान.

गंगेचे पाणी कधीही आटणार नाही, रक्तदान करणे आम्ही सोडणार नाही.

सेवाधर्म पुण्य आहे, रक्तदान महापुण्य आहे.

रक्ताची गरज कुणालाही पडु शकते, रक्तदानाकरीता नेहमी तत्पर राहा.

रक्तदाता हा जिवनदाता असतो.

Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

SRDP उपचार: संपूर्ण माहिती, फायदे आणि प्रक्रिया

प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More

05/03/2025

सोरायसिस कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आधुनिक उपचार

प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More

27/02/2025

PCOD उपचार: कारणे, लक्षणे, उपाय आणि जीवनशैलीतील बदल

प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More

25/02/2025

केस गळती थांबवण्याचे उपाय, कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि नवीन उपचार

प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More

22/02/2025

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग: कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध, लस आणि नवीन उपचार

प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More

21/02/2025

आम्लपित्त – ऍसिडिटी उपचार, कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More

20/02/2025