आजारांची माहिती

हैजा, पटकी रोग, कॉलरा आजाराची सर्व माहिती Cholera Meaning in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

कॉलरा (Cholera in Marathi) हा आजार व्‍हीब्रीओ कॉलरा ( Vibrio Cholerae in Marathi ) या नावाच्या विशिष्‍ट जीवाणुमुळे होतो. कॉलरा (Cholera Meaning in Marathi) हा आजारामध्ये प्रथमतः जुलाब सुरु होतात व त्‍यानंतर उलट्याही होतात. कॉलरा रोगामध्‍ये पाण्‍यासारखे किंवा भाताच्‍या पेजेसारखे पातळ जुलाब होतात. या आजारामध्‍ये निर्जलीकरण (Dehydration in Marathi) अत्‍यंत वेगात होते.

कॉलरा या आजाराला मराठी मध्ये पटकी किंवा हैजा असे म्हणतात. कॉलरा (पटकी) ची लागण तुरळक व साथ उद्रेक स्‍वरुपात होते. आजाराचा प्रसार वेगाने होतो. भारतात विशेषतः पावसाळ्यात कॉलरा किंवा पटकी किंवा हैजा आजार साथीच्या स्वरुपात आढळुन येतो.

हैजा, पटकी रोग, कॉलरा आजाराची सर्व माहिती Cholera Meaning in Marathi, Cholera Video

अनुक्रमणिका

कॉलरा / हैजा / पटकी ( Cholera in Marathi ) रोगाचे स्वरुप

व्हिब्रीओ कॉलरी नावाच्या जिवाणूमुळे तात्काळ होणारा सांसर्गिक रोग म्हणजे कॉलरा / हैजा / पटकी ( Cholera in Marathi ) होय. या रोगाची विशिष्ट लक्षणे असलेला रुग्ण उलट्या आणि जुलाबामुळे ( Faeces meaning in Marathi ) येणा-या गंभीर शुष्कतेमुळे ( Dehydration in Marathi ) मृत्यूमुखी पडतो.

कॉलरा / हैजा / पटकी रोगाचा इतिहास :-

  • फार पुरातन काळापासून भारतात हैजा हा रोग आढळतो.
  • १९ व्या शतकात भारतात उगम पावलेल्या या रोगाच्या अनेक साथी जगभर आणि त्यातल्या त्यात पाश्चिमात्य राष्ट्रांत पसरल्या होत्या.
  • सध्या १९६१ ला सुरु झालेली आणि इंडोनेशियातून उगम पावलेली या रोगाची साथ ( एल टॉर व्हिब्रीओ मुळे ) अधूनमधून संपूर्ण जगभर चालू आहे. आशिया , अफ्रिका आणि युरोप खंडातील जवळपास ८० देशांना या साथीचा फटका बसलेला आहे .

भारतातील कॉलरा / हैजा / पटकी ( Cholera Epidemiological factors in Marathi ) –

भारतातील हैजाचे प्रमाण पूर्वी पेक्षा खूप कमी झालेले असले तरी सातत्यपुर्ण प्रमाणात रोग आढळत असून व्यापक परिसर अस्वच्छतेमुळे रोगाची साथ उद्भवण्याची शक्यता असते.

साथरोग शास्त्रीय घटक ( Cholera Epidemiological factors in Marathi ) :-

कारक :- दोन प्रकारच्या व्हिब्रीओ जिवाणूमुळे ( Vibrio Cholerae in Marathi ) हैजा होतो .

  1. अ ) क्लासिकल व्हिब्रीओ
  2. ब ) एल टॉर व्हिब्रीओ .

अनेक ठिकाणी क्लासिकलची जागा एल टॉर व्हिब्रिओने घेतलेली आहे.

संसर्ग स्त्रोत :- हैजाचा रुग्ण किंवा वाहक.

संसर्गजन्य पदार्थ :- रुग्णाची शौच व उलटी , पाणी , अन्न , इतर निर्जीव वस्तू व माशा दूषित होतात.

संसर्गजन्य काळ :- ७ ते १० दिवस पर्यावरण

स्थितीः – निकृष्ट दर्जाची वैयक्तिक आणि पर्यावरण स्वच्छता असलेल्या सामाजिक व आर्थिक दृष्टीने मागासलेल्या वर्गातील लोकांना हा आजार प्रामुख्याने होतो.

वय :- हा रोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होवू शकतो .

कॉलरा / हैजा / पटकी रोगप्रसार पध्दत ( Cholera Mode of Transmission in Marathi )

  • मुख्यत्वे मलमुखमार्ग , दूषित पाणी व दूषित अन्न या पध्दतीने या आजाराचा प्रसार होतो. ( दुषित हात , बोटे , वस्तु व माशा )
  • रोगप्रतिकार क्षमता :- रोगामुळे किंवा जंतूसंसर्गामुळे मिळणारी रोगप्रतिकारक्षमता काही महिनेच टिकते.
  • वाहक :- कमी व दीर्घ कालावधीचे आढळतात.
  • आधिशयन काळ :- काही तासांपासून ते पाच दिवसांपर्यन्त ( साधारणतः १-२ दिवस )

कॉलरा / हैजा / पटकी रोग लक्षणे ( Cholera Symptoms in Marathi )

  1. क्लासिकल प्रकारच्या रुग्णामधे रोगाची सुरुवात एकदम गंभीर अतिसार ( भाताच्या पेजेसारखे – Rice Water Stool ) आणि उलटयाने होते.
  2. शौच आणि उलटीतून शरीरातील पाणी व क्षार कमी झाल्यामुळे जलशुष्कता ओढवते.
  3. रुग्णाला अतिशय तहान लागते आणि पायात व पोटात कळा येतात.
  4. कॉलरा या रोगातील प्रमुख लक्षणे म्हणजे-
    1. डोळे खोल जाणे,
    2. गाल बसणे,
    3. शारीरिक तापमान कमी होणे,
    4. रक्तदाब कमी होणे,
    5. लघवी कमी होणे.
    6. पाण्‍यासारखे/तांदळाच्‍या पेजेसारखे वारंवार जुलाब
    7. उलटया
    8. हदयाचे ठोके वाढणे
    9. तोंडाला कोरड पडणे
    10. तहान लागणे
    11. स्‍नायूंमध्‍ये गोळे येणे
    12. अस्‍वस्‍थ वाटणे
  5. रोगाच्या गंभीर अवस्थेमध्ये रुग्ण बेशुध्दावस्थेत ( Coma in Marathi ) जावू शकतो.
  6. वेळेवर औषधोपचार न मिळाल्यास रुग्ण मृत्यू पावतो.
  7. या उलट एल टॉर कॉल – यामधे अतिसार गंभीर स्वरुपाची नसते आणि या प्रकारचा हैजा सौम्य व सामान्य स्वरुपाचा असतो व त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता कमी असते .

कॉलरा / हैजा / पटकी रोगनिदान ( Cholera Diagnosis in Marathi )

  • रुग्णाचा शौच नमुना अथवा रेक्टल स्वब नमुना प्रयोग शाळेत तपासून त्यात कॉल याचे जिवाणू आढळल्यास रोगनिदान निश्चित होते. शौच नमुना अथवा रेक्टल स्वब सी.बी मिडीयामध्ये टाकून तो ताबडतोब जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवावा.
  • सोबत रुग्णाचे नाव, आई किंवा वडिलाचे नाव, लिंग, लक्षणांची सुरुवात झाल्याची तारीख, पूर्ण पत्ता, शौच नमुना घेतल्याची तारीख इ. माहिती द्यावी.
  • शक्यतोवर रुग्णास प्रतिजैविके सुरु करण्याआधी शौच नमुना घ्यावा.
  • ठराविक पध्दतीने पाणी नमुने व अन्न नमुने घेऊन पाठवावे.
  • शौच नमुना निर्जंतुकीकरण : – शौच नमुना इतक्याच प्रमाणात जंतूनाशक त्यात टाकून ( ब्लिचिंग पावडर , फेनाल , केसाल , फॉरमॅलिन ) एक ते दोन तास ठेवावे. जंतूनाशक उपलब्ध नसल्यास उकळते पाणी टाकावे. नंतर संडासात फेकावे.

कॉलरा / हैजा / पटकी गुंतागुंत ( Complications of Cholera in Marathi )

  • अतिसारामध्ये शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी झाल्यामुळे शुष्कता येऊन रुग्ण दगावतो.
  • संदर्भ सेवा : रुग्णात गंभीर शुष्कता आढळल्यास जलसंजीवनी सुरु करुन रुग्णाची ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात रवानगी करावी.
  • हैजाचे नियंत्रण :- हैजानियंत्रणासाठी अतिसार नियंत्रण कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी आवश्यक आहे. खाली दिलेल्या नियंत्रणात्मक उपाययोजना केवळ हैजालाच नव्हे तर अतिसाराच्या सर्व आजारांसाठी लागू पडतात.
  • निदानाची पडताळणी :- प्रतिजैविके देण्यापूर्वी रुग्णाच्या विष्ठेचा किंवा उलटीचा नमुना प्रयोगशाळेत तपासून जीवाणूंची ओळख करणे आवश्यक असते.
  • वर्दी देणे ( Notification ) :- स्थानिक , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉलरा हा नोंदणीकृत आजार आहे. साथीचा भाग हैजामुक्त जाहीर होईपर्यत हैजा रुग्णांची संख्या याबाबत दररोज तसेच दर आठवडयास अहवाल सादर करावा लागतो.
  • रुग्णाचा शोध लवकर लागल्यास हैजा नियंत्रणास खूपच मदत होते. त्यामुळे रुग्ण बेशुध्द होण्यापूर्वीच उपचार सुरु करणे शक्य असते.

ओ.आर.एस. क्षारसंजीवनी ( Oral Rehydration ORS in Marathi )

हैजाच्या आधुनिक उपचार पध्दतीत क्षारसंजीवनीला फार महत्वपूर्ण स्थान आहे. क्षारसंजीवनी मध्ये खालील घटक असतात.

सोडियम क्लोराईड ( मीठ ) ३.५ ग्रॅम
सोडियम सायट्रेट २.९ ग्रॅम
पोटॅशियम क्लोराईड १.५ ग्रॅम
ग्लुकोज ( डेक्स्ट्रोज ) २० ग्रॅम

ओ. आर. एस. क्षारसंजीवनी तयार करण्याची पध्दत How to Prepare ORS Liquid in Marathi

  • ओ.आर.एस. ( क्षारसंजीवनी ) चे पाकिट घ्या.
  • हात स्वच्छ धुवा.
  • १ लिटर स्वच्छ पिण्याचे पाणी घ्या.
  • क्षारसंजीवनीचे पाकिट फोडून संपूर्ण पावडर पाण्यात मिसळा व पाणी ढवळून क्षारसंजीवनी तयार करा.
  • क्षारसंजीवनी असलेले भांडे झाकून ठेवा .

तयार झालेली क्षारसंजीवनी २४ तासाचे आत वापरा.

ओ. आर. एस. क्षारसंजीवनी घरी तयार करण्याची पध्दत How to Prepare ORS Liquid at Home in Marathi

  • क्षारसंजीवनीचे, जागतिक आरोग्य संघटनेने पुरस्कृत केलेले पाकिट / मिश्रण उपलब्ध नसल्यास, १ लीटर पिण्याच्या पाण्यात स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ ( ५ ग्रॅम ) आणि साखर ( २० ग्रॅम ) टाकून ते द्रावण वापरावे.
  • खालील तक्ता मध्ये शुष्कतेचे प्रमाण ( Degree of dehydration in Marathi ) ओळखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत.
  • कॉल-याच्या सौम्य तसेच मध्यम स्वरूपाच्या रुग्णांवर केवळ क्षारसंजीवनीचा वापर करुन उपचार करता येतो.
  • उपचाराच्या सुरवातीला प्रौढ व्यक्तीस दर तासाला ७५० मि.ली. तर बालकांना प्रत्येक तासाला ३०० मि.ली. क्षारसंजीवनी पाजावी.

कॉलरा / हैजा / पटकी उपचार ( Treatment of Cholera in Marathi )

  1. जुलाब – वांत्‍या चालू आहेत पण जलशुष्‍कता नाही क्षारसंजीवनीचा वापर करावा, तसेच पेज, सरबत इत्‍यादि घरगुती पेयांचा वापर करावा.
  2. जलशुष्‍कतेची लक्षणे असल्‍यास – क्षारसं‍जीवनी व घरगुती पेय द्यावी.
  3. तीव्र जलशुष्‍कता असल्‍यास रुग्‍णास नजिकच्‍या प्राथमिक आरोगय केंद्र / ग्रामीण रुगणालय येथे उपचारासाठी भरती करावे व रिंगर लॅक्‍टेट देण्‍यात यावे.
  4. झिंक टॅबलेट मुळेअतिसाराचा कालावधी २५ टक्‍याने कमी होतो. तसेच उलटीचे प्रमाण‍ही घटते.

जलशुष्‍कता कमी करण्‍याबरोबर योग्‍य प्रतिज्यविकांची (अॅन्टीकबायोटिक्स्ची) योग्‍य माञा (डोस) देण्‍यात यावी.

शुष्कतेचे प्रमाण व लक्षणे पुनर्जलीकरण पध्दती प्रतिजैविके

शुष्कतेचे प्रमाण व लक्षणेपुनर्जलीकरण पध्दती ( मात्रा व कालावधी ) प्रतिजैविके ( Antibiotics in Marathi )
सौम्य ( Mild ) :-
रुग्ण तहानलेला, नाडी, सामान्य, जीभ ओलसर
५० मि.ली. / कि.ग्रॅम क्षारसंजीवनी चार तासाच्या आत.टेट्रासायक्लिन X ३ दिवस
(सर्वांकरिता)
मध्यम ( Moderate ) :-
रुग्ण तहानलेला , नाडी
जलद आणि क्षीण, डोळे खोल गेलेले , जीभ कोरडी
१०० मि.ली / प्रति कि. ग्र. क्षारसंजीवनी द्रावण चार तासाचे आत.टेट्रासायक्लिन X ३ दिवस किंवा
सेप्ट्रान गोळी X ३ दिवस
( सर्वांकरिता )
गंभीर ( Severe ) :-
बेशुध्द अवस्था,
नाडी न लागणे
रिंगरलॅक्टेट शिरेतून, प्रकृती थोडी सुधारताच इंट्राव्हेनस उपचारानंतर त्याला क्षारसंजीवनी पाजावी.प्रकृती सुधरताच प्रौढ व्यक्तीस
टेट्रासायक्लिन X ३ दिवस किंवा
सेप्ट्रान X ३ दिवस (सर्वांकरिता)

निर्जंतुकीकरण ( Disinfection in Marathi )

निर्जंतुकीकरण ( Disinfection ) :

  • अ ) शौच आणि उलटी – शौच अथवा उलटीमध्ये तितकेच ५ टक्के केसॉल टाकतात . केसॉल किंवा लायसॉलचे द्रावण उपलब्ध नसल्यास शौच वांतीच्या निर्जंतुकीकरणासाठी ३० टक्के ब्लिचिंग पावडरचे द्रावण देखील वापरतात .
  • ब ) कपडे – केसॉलच्या अडीच टक्के द्रावणात कपडे तीस मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत आणि त्यानंतर साबण व पाणी वापरुन स्वच्छ धुवावेत .
  • क ) खोलीचे निर्जंतुकीकरण – जमीन आणि तीन फूट उंचीपर्यंत सर्व भिंती केसॉलच्या पाच टक्के द्रावणाने धुवाव्यात .
  • ड ) हात – केसॉलच्या एक टक्का द्रावणात हात बुडवावेत आणि नंतर साबण वापरुन पाण्याने स्वच्छ धुवावेत .
  • इ ) स्वयंपाक आणि भोजनाची भांडी :– पंधरा मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवावीत आणि नंतर सोड्याचा वापर करुन पाण्याने धुवावीत.

स्वच्छता विषयक उपाय योजना ( Sanitation Measures in Marathi )

  • अ ) पाणी नियंत्रण ( Water control ) – सार्वजनिक पाणी पुरवठयाचे क्लोरीनच्या सहाय्याने योग्य निर्जतुकीकरण करणे . तसेच घरच्या घरी पाण्याचे निर्जंतुकीकरण क्लोरीन द्रावण किंवा गोळया वापरून करता येईल .
  • ब ) विष्ठेची विल्हेवाट ( Excreta disposal ) त्यासाठी वाटर सील ( जलबंधित ) प्रकारच्या संडासांचा वापर केला पाहिजे . त्याच प्रमाणे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे .
  • क ) माशा ( Flies ) पर्यावरण स्वच्छतेच्या आधारे माशांची पैदास स्थळे नष्ट केली पाहिजे .
  • ड ) अन्न स्वच्छता ( Food Sanitation ) – ताजे व गरम अन्न सेवन व अन्न पदार्थ झाकून ठेवावे .
  • लसीकरण ( Cholera Vaccine in Marathi )- मृत जिवाणू असलेली ही लस फारशी उपयोगी नाही.

कॉलरा / हैजा / पटकी प्रतिबंधात्‍मक उपाय ( Cholera Prevention in Marathi )

  1. शुध्‍द पाणी पुरवठा
  2. वैयक्तिक स्‍वच्‍छता
  3. हात नेहमी साबणाने व स्‍वच्‍छ पाण्‍याने धुवावेत –
    • खाण्‍यापूर्वी व स्‍वयंपाकापूर्वी
    • बाळाला भरविण्‍यापूर्वी
    • शैाचानंतर
    • बाळाची शी धुतल्‍यानंतर
    • जुलाब असलेल्‍या रुग्‍णांची सेवा केल्‍यानंतर
    • साबण उपलब्‍ध नसेल तर आपण आपले हात राखेनेही स्‍वच्‍छ करु शेकतो.
  4. मानवी विष्‍ठेची योग्‍य विल्‍हेवाट
  5. रुग्‍णांवर त्‍वरित उपचार
  6. बालकाचे गोवर प्रतिबंधात्‍मक लसिकरण अतिसाराच्‍या नियंञणासाठी आवश्‍यक आहे.

औषधीय प्रतिबंधन :-

यासाठी टेट्रासायक्लिन व फ्यूरोझोलिडॉनचा वापर केला जातो. टेट्रासायक्लिन प्रौढ व्यक्तींमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने तीन दिवस दिले पाहिजे.

आरोग्य शिक्षण :-

आरोग्य शिक्षणाचा भर वैयक्तिक स्वच्छता आणि अन्न – पाण्याच्या योग्य स्वच्छतेवर व त्यातल्या त्यात शिजविलेल्या गरम अन्नाचे फायदे , स्वच्छ व शुध्द पाणी , शौचाहून आल्यावर व जेवणापूर्वी , स्वयंपाक करण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची आवश्यकता , यावर असला पाहिजे.

तसेच जलशुष्कता आढळल्यास क्षारसंजीवनीचा वापर करावा.

cholera meaning in marathi, cholera in marathi, cholera disease in marathi, cholera disease meaning in marathi, faeces meaning in marathi, dysentery meaning in marathi, enteritis meaning in marathi, vibrio meaning in marathi, cholera definition in marathi, cholera meaning in marathi, पटकी रोग, vibrio cholerae meaning in marathi,

Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023

पांढरे डाग, कोड त्वचारोग लक्षणे, कारणे, निदान, उपचार, घरगुती उपाय, Vitiligo in Marathi

कोड रोग म्हणजे काय ? कोड रोग म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर… Read More

19/02/2023

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बोरीपार्धी अंतर्गत जागतिक योग दिन साजरा डॉ गणेश केशव भगत

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बोरीपार्धी अंतर्गत नाथनगर विद्यालय बोरीपार्धी येथे 21 जून 2022 रोजी जागतिक योग दिन… Read More

22/06/2022