बाल आरोग्य

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

सन २०२३ – २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप अप राऊंड)

१-१९ वर्षे वयोगटातील सर्व मुलां – मुलींना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळया निशुल्क दिल्या जातील. नोंदणी न झालेल्या आणि शाळा बाहय मुला-मुलींना अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्या दिल्या जातील.

अनुक्रमणिका

आतड्यांचा जंत दोष म्हणजे काय ?

जंत हे परजीवी असतात ते मनुष्याच्या आतडयांमध्ये राहून त्यांच्या अन्नावर जगतात. आपल्या शरीरासाठी असलेले पोषक तत्व हे जंत शोषून घेतात व यामूळे रक्तक्षय, कुपोषण व वाढ खुंटते.

जंतांचा प्रादुर्भाव कसा होतो ?

अपुरी परिसर स्वच्छता व अपुऱ्या वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयींमुळे जंतसंसर्ग होतो. हा जंतसंसर्ग पुष्कळदा संसर्गित मातीतून होतो. सोबत दिलेले चित्र पहा.

जंतांच्या प्रादुर्भावापासून बचाव करावयाचे उपाय काय ?

जंतांच्या प्रादुर्भावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठीचे उपाय खालील प्रमाणे आहे.

  • हात धुणे, विशेषतः जेवणाआधी आणि शौचास जाऊन आल्यानंतर
  • शौचालयाचा वापर करणे व शौचालयाची स्वच्छता राखणे.
  • चपला / बुट वापरणे.
  • सुरक्षित आणि स्वच्छ पाणी पिणे.
  • अन्न झाकून ठेवणे.
  • नखे नेहमी स्वच्छ ठेवणे व नियमित कापणे.
  • भाज्या, फळे आणि सॅलड सुरक्षित आणि स्वच्छ पाण्यात धुणे.

जंतांच्या प्रादुर्भावामुळे काय हानी होते ? मुलांना नियमित जंतनाशक औषधी देणे का महत्वाचे आहे ?

जंताचा मुलांच्या मानसिक आणि शारिरीक विकासावर नकारात्मक परिणाम होतो. जंतसंसर्ग झालेली मुले ही बहुदा कुपोषित असतात व त्यांची वाढ खुंटते. जंतसंसर्ग जर तीव्र स्वरुपाचा व दीर्घकाळ असेल तर मुले सारखी आजारी पडतात व शिक्षणात त्यांचे लक्ष लागत नाही आणि शाळेतून नेहमी गैरहजर असतात. ज्या मुलांना नियमित जंतनाशकाचे औषध दिले जाते ती मुले :-

  • जलद गतीने वाढतात व सुदृढ असतात.
  • त्यांना वारंवार जंतसंसर्ग होत नाही व ते वारंवार आजारी पडत नाहीत.
  • शाळेत नियमित जातात.
  • शाळेत सक्रिय असतात व चांगले शिकतात.

राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणजे काय ?

राष्ट्रीय जंतनाशक दिनी सर्व १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला मुलींना एकाच वेळी जंतनाशक गोळी दिली जाईल. ही जंतनाशक गोळी सर्व शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी अनुदानित ६ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना शाळा व महाविदयालय तसेच १ ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालके, ६ ते १९ वर्ष वयोगटातील शाळेत न जाणाऱ्या मुला-मुलीना अंगणवाडी केंद्रामध्ये दिले जाईल.

इतर राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये जंतनाशक गोळी दिली असता राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्याचे काय महत्व आहे?

इतर राष्ट्रीय कार्यक्रमांमधून (NIPI, WIFS जंतनाशक औषधी दिले जाते परंतु यामध्ये सर्व जोखीम असणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहचू शकलो नाही. राष्ट्रीय जंतनाशक दिन हा एक दिवसीय कार्यक्रम संपुर्ण भारत भर राबविण्यात येत आहे जेणे करुन जास्तीत जास्त मुलांपर्यंत जंतनाशक औषधी पोहचू शकेल.

राष्ट्रीय जंतनाशक दिन कधी साजरा करावयाचा आहे ?

दि.१३ फेब्रुवारी २०२४ ला संपूर्ण राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येणार आहे तसेच ज्या लाभार्थ्यांना दि. १३ फेब्रुवारी २०२४ ला जंतनाशक गोळी दिली नसेल त्यांना दि. २० फेब्रुवारी २०२४ ला मॉपअप दिनी जंतनाशक औषधी द्यावयाची आहे.

या गोळया शिक्षक व अंगणवाडी कार्यकर्ती मार्फत तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत का वितरीत केले जात आहे ?

मुले शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांच्याबरोबर अधिक चांगल्या प्रकारे एकरुप होतात आणि समाज तसेच पालकांना त्यांच्याविषयी अधिक आत्मविश्वास आहे. मुलभूत प्रशिक्षणानंतर शिक्षक आणि अंगणवाडी कार्यकर्ती मुला – मुलींना सहजरित्या जंतनाशकाची औषधी देऊ शकतात. काही राज्यात शिक्षक आणि अंगणवाडी कार्यकर्ती यांनी जंतनाशक मोहिमे अंतर्गत मुला मुलींना यशस्वीरित्या जंतनाशक औषधी दिलेली आहे आणि जगभरातील ३० देशात सुध्दा याची प्रभावी अंमलबजावणी झालेली आहे.

काही मुले आजारी दिसत नसली तरी सर्वांना एक सारखे जंतनाशक गोळया का दिल्या जातात ?

जंतबाधेचा दुष्परिणाम लगेच दिसू शकत नसला तरी, दीर्घावधी नंतर मुला मुलीमध्ये याचे दुष्परिणाम दिसू शकतात. जसे आरोग्य, शिक्षण आणि इतर बाबींवर याचा दुष्परिणाम होऊ शकतो. मुलांमध्ये जंत बाधा झाली तरी ते बरेच काळ लक्षात येत नाही. जोपर्यंत मुले आजारी पडत नाहीत किंवा शाळेत त्यांची प्रगती असमाधानकारक असते किंवा त्यांची वाढ व्यवस्थित नसते. जंतबाधेचे निदान करणे महाग आहे व जंतनाशकाची गोळी सुरक्षित असल्यामुळे सर्व मुलांचे जंतनाशन करणे योग्य आहे.

आतड्यांसंबंधी जंतापासून बचावासाठी कोणते उपचार करणे गरजे आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे जंतनाशकासाठी अल्वेंडाझोल नावाची गोळी वापरली जाते. ही गोळी संपूर्ण जगात आतडयातील जंतसंसर्ग कमी करण्यास वापरली जाते. १ ते २ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठी अल्बेडाझोलची अर्धी गोळी (२०० मीलीग्रॅम) तर २ ते १९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठी अल्बेंडाझोलची (४०० मीलीग्रॅम) एक गोळी द्यावी. लहान मुलांसाठी गोळीची चूर्ण करुन व पाण्यात विरघळवून ही गोळी द्यावी.

जंतनाशक औषधीचा काही दुष्परिणाम आहे का ?

जंतनाशक औषधीमुळे होणारे दुष्परिणाम सौम्य स्वरुपाचे आहेत त्यात सौम्य प्रमाणात चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे किंवा डोके दुखी यांचा समावेश आहे हे सर्व लाभार्थीच्या शरीरात जंतसंसर्गामुळे व त्यावर होणाऱ्या औषधाच्या परिणामामुळे होते. हे सर्व दुष्परिणाम थोडयाच वेळात नाहीसे होतात. ज्या मुलांमध्ये तीव्र जंतसंसर्ग असतो त्यांना या प्रकाराच्या दुष्परिणामाचा अनुभव येतो. औषधी दिल्यावर २४ तासाच्या आत दुष्परिणाम कमी न झाल्यास किंवा दुष्परिणाम तीव्र स्वरुपाचे असल्यास ताबडतोब नजीकच्या आरोग्य केंद्रास लाभार्थ्याला घेऊन जावे.

आजारी मुला मुलींना जंतनाशकाची गोळी देऊ शकतो का ?

आजारी असतील तर त्यांना जंतनाशकाची जर मुले – मुली आजारी गोळी देऊ नये. लाभार्थ्यांची प्रकृती सामान्य असल्यासच जंतनाशकाची गोळी दया.

१३.

जंतनाशक गोळी घेतल्यानंतर मुला मुलीना नकारात्मक प्रतिक्रिया किंवा त्याच्यावर प्रतिकूल परिणाम झाल्यास शिक्षकांनी/ आशा/ अंगणवाडी कार्यकर्तानी काय करावे?

असे काही झाल्यास, ताबडतोब हेल्प लाईन नंबर १०४ यांना संपर्क करावा, लाभार्थ्याला सावलीत विश्रांती करण्यास घेऊन जावे व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. जर प्रतिक्रीया गंभीर स्वरुपाची असेल तर हे जंतनाशक औषधीशी निगडीत नसून इतर काही कारणांमुळे सुध्दा असू शकते. अशा वेळी ताबडतोब नजीकच्या आरोग्य संस्थेला लाभार्थ्याला घेऊन जावे. आवश्यकतेनुसार टोल फ्रि क्र. १०८ चा वापर संदर्भ सेवेसाठी करावा.

Recent Posts

SRDP उपचार: संपूर्ण माहिती, फायदे आणि प्रक्रिया

प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More

05/03/2025

सोरायसिस कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आधुनिक उपचार

प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More

27/02/2025

PCOD उपचार: कारणे, लक्षणे, उपाय आणि जीवनशैलीतील बदल

प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More

25/02/2025

केस गळती थांबवण्याचे उपाय, कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि नवीन उपचार

प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More

22/02/2025

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग: कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध, लस आणि नवीन उपचार

प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More

21/02/2025

आम्लपित्त – ऍसिडिटी उपचार, कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More

20/02/2025