शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :-

गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते तेव्हा त्याला गरोदरपणातील मधुमेह म्हणतात.

गरोदरपणातील मधुमेहाचे महत्त्व GDM Guidelines in marathi

 • भारतातील 10 ते 14% गर्भवती महिलांना गर्भधारणा मधुमेह विकसित होण्याची शक्यता.
 • गरोदरपणातील मधुमेहाची योग्य वेळी ओळख अथवा तपासणी न झाल्यास माता आणि होणाऱ्या बाळाला अनेक प्रकारचे धोके उद्भवू शकतात.
 • गरोदर माता आणि तिच्या होणाऱ्या बाळामध्ये मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी गर्भधारणेदरम्यान मधुमेहाची तपासणी आणि व्यवस्थापन करणे आवश्यक.

गरोदरपणातील मधुमेहामुळे उद्भवणारे धोके Complications of GDM in Marathi

गर्भवती मातेला उद्भवणारे धोकेनवजात बाळाला उद्भवणारे धोके
गर्भपातगर्भात बाळाचा मृत्यू होणे.
गर्भजलाचे प्रमाण वाढणे, ज्यामुळे गर्भपिशवी अकाली फुटू शकतेमुलाच्या आकारात आणि वजनात सामान्यपेक्षा जास्त वाढ होणे.
गरोदरपणात झटके येणे.प्रसूती दरम्यान बाळाचा खांदा अडकणे.
सिझेरियन ऑपरेशनचे प्रमाण वाढणेप्रसूतीच्या वेळी दुखापत
आडवे/पायाळू मुलमृत मुलाचा जन्म / उपजत मृत्यू
प्रसूतीनंतर अधिक रक्तस्त्रावप्रसूतीनंतर नवजात शिशुमध्ये श्वासोच्छवासाची समस्या
जंतूसंसर्गप्रसूतीनंतर नवजात शिशुमध्ये ग्लुकोजचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी होणे.
गर्भधारणा मधुमेह असलेल्या मातांच्या मुलांना लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.गर्भधारणा मधुमेह असलेल्या 50 टक्के गर्भवती महिलांना पुढील 5 ते 10 वर्षात मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

गर्भावस्थेत मधुमेहाची तपासणी GTT Test in Marathi

300 एम.एल. पाण्यात 75 ग्रॅम ग्लुकोज पावडरचे मिश्रण प्यायल्यानंतर 2 तासांनी गर्भवती महिलेच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाते.

 1. पहिली तपासणी : पहिल्या ANC भेटी दरम्यान पहिली तपासणी करावी.
 2. दूसरी तपासणी: पहिल्या तपासणी मध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण है 140 मि. ग्राम/डीएल पेक्षा कमी असल्यास 24 ते 28 आठवड्या (6-7 व्या महिन्यात) दरम्यान करावी.


गरोदरपणात साखरेची पातळी किती असते?

गरोदरपणात रक्तातील साखरेचे प्रमाण है ८० ते 140 मि. ग्राम/डीएल हे सामान्य मानले जाते.

गर्भावस्थेतील मधुमेहाचे व्यवस्थापन Treatment of GDM in marathi

 1. दररोज 20 ते 30 मिनिटे पायी चालावे.
 2. रोज सहा वेळेस थोडे थोडे जेवण करावे.
 3. ज्यामध्ये तीन वेळेस मुख्य जेवण आणि दोन ते तीन वेळेस हलका नास्ता करावा.
 4. नास्तामध्ये मोड आलेले कडधान्य, मुरमुरे, पोहे, इडली, ताक, सुका मेवा ई. चा समावेश असावा.
 5. जेवणात मुख्यतः पालेभाज्या, काकडी, बिट, गाजर, मुळा, टोमॅटो इत्यादी तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ (पनीर, ताक, दही) यांचा समावेश असावा.
 6. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. (Management of GDM in marathi)

गर्भधारणा मधुमेह कोणत्या टप्प्यावर होतो?

गरोदरपणातील मधुमेह हा साधारणपणे गर्भधारणेच्या २४ व्या आठवड्याच्या आसपास विकसित होतो, त्यामुळे तुमची दुसरी चाचणी २४ ते २८ आठवड्यांच्या दरम्यान केली जाते. तुम्हाला गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका जास्त असल्यास, तुमचे डॉक्टर तुमची आधी चाचणी करू शकतात.

काय खाऊ नये GDM Diet in Marathi

मिठाई, केक, पेस्ट्री, फळांचा रस (ज्यूस), शीतपेये, गोड लस्सी, बिस्किट, आईस्क्रिम, थंड, तळलेले पदार्थ जसे समोसा, कचोरी ई, लोणी, अधिक प्रमाणात तेल किंवा तूप, मलाईयुक्त दूध, इत्यादी पदार्थ खाऊ नयेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न GDM FAQ in Marathi

१) प्रश्न – गरोदर असताना गर्भधारणा मधुमेह होण्याची शक्यता किती आहे?

उत्तर – भारता मध्ये, प्रत्येक 100 पैकी 6 गर्भवतींना गर्भधारणा मधुमेह होतो . जर तुमचे वय २५ पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला गर्भावस्थेतील मधुमेह असण्याची शक्यता जास्त आहे.

२) प्रश्न – गर्भावस्थेतील मधुमेहावर उपचार न केल्यास काय होते?

उत्तर – उपचार न केल्यास, गर्भावस्थेतील मधुमेह गर्भधारणेच्या गुंतागुंत आणि प्रक्रियांचा धोका वाढवू शकतो, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे: मॅक्रोसोमिया. याचा अर्थ जन्मावेळी तुमच्या बाळाचे वजन 8 पौंड, 13 औंस (4,000 ग्रॅम) पेक्षा जास्त असते.

३) प्रश्न – इन्सुलिन प्रतिरोधकतेची चाचणी कशी करता? insulin resistance test in marathi

उत्तर – इन्सुलिन प्रतिरोधकतेसाठी सर्वात अचूक चाचणी क्लिष्ट आहे. GTT सोबत रक्तातील इन्सुलिन तपासणी केली जाते.

४) प्रश्न – HbA1C चाचणी कश्यासाठी करतात ?

उत्तर – एखाद्याला पूर्व-मधुमेह आहे की नाही हे शोधण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करतात. प्रीडायबेटिसचे निदान करण्यासाठी डॉक्टर बहुतेक वेळा फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज (FPG) चाचणी किंवा HbA1C चाचणी वापरतात.

५) प्रश्न – इन्सुलिनच्या प्रतिकाराचे मुख्य कारण काय आहे? Cause of insulin resistance in marathi ?

उत्तर – इन्सुलिनच्या प्रतिकारामध्ये योगदान देणारे दोन मुख्य घटक म्हणजे शरीरातील अतिरिक्त चरबी, विशेषत: तुमच्या पोटाभोवती चरबी, आणि शारीरिक हालचालींचा अभाव . ज्या लोकांना प्रीडायबेटिस आणि टाइप 2 मधुमेह आहे त्यांच्यामध्ये सामान्यत: काही प्रमाणात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता असते. टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांना देखील इन्सुलिन प्रतिरोधक अनुभव येऊ शकतो.

६) प्रश्न – क्राफ्ट टेस्ट म्हणजे काय ? Craft test in marathi ?

उत्तर – क्राफ्ट टेस्ट हि GTT सोबत रक्तातील इन्सुलिन तपासणी करणे आहे. यामध्ये ५ वेळा रक्तातील साखर व रक्तातील इन्सुलिन तपासणी केली जाते. सुरवातीला पहिली तपासणी केली जाते त्यानंतर पेशंट ला ८२.५ ग्राम ग्लुकोस पावडर खाऊ घातली जाते. त्यानंतर अर्धा तास, एक तास , दोन तास व ३ तासांनी रक्तातील साखर व रक्तातील इन्सुलिन तपासणी केली जाते.

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023

पांढरे डाग, कोड त्वचारोग लक्षणे, कारणे, निदान, उपचार, घरगुती उपाय, Vitiligo in Marathi

कोड रोग म्हणजे काय ? कोड रोग म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर… Read More

19/02/2023