आजारांची माहिती

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात तर 80-90 टक्के मुलांच्या पोटात जंत असतात. माणूस खातो त्यातले बरेच अन्न त्याच्या पोटातले जंत ( Worm Meaning in Marathi ) खाऊन टाकतात. त्यामुळे बरेच लोक अशक्त, कुपोषित होतात.

आपल्या देशात पचनसंस्थेच्या जंतांचे मुख्य 3 प्रकार आहेत.

 1. गोलकृमी जंत Roundworms Ascariasis in Marathi )
 2. आकडाकृमी ( Hookworm in Marathi )
 3. टेपकृमी ( Tape Worm in Marathi )

या सर्व जंतांची अंडी विष्ठेतून सगळीकडे पसरतात. या अंडयांतून सूक्ष्म कृमी बाहेर पडून तोंडावाटे अथवा त्वचेवाटे (पावलातून) परत नवीन माणसाला जंताची बाधा होते. 

गोलकृमी जंत Roundworms Ascariasis in Marathi

लहान आतडयाच्या सुरुवातीच्या भागात हे गोलकृमी जंत आढळतात. त्यांचा आकार सर्वसाधारणतः गांडूळासारखा ( Earthworm in Marathi) गोलाकार असतो त्यामुळे यांना गोलकृमी जंत असे नाव आहे.

गोलकृमी जंत जीवनचक्र Roundworms Ascariasis Life Cycle in Marathi

 1. नर गोलकृमी जंताची लांबी १५ ते २० सेंमी व व्यास ३ मि.मी. तर गोलकृमी मादीची लांबी २५ ते ४० सेंमी व व्यास ५ मि.मी असतो . मादी फार मोठ्या प्रमाणावर अंडी टाकते आणि त्यातील बरीचशी अंडी माणसाच्या विष्ठेमधून बाहेर उत्सर्जित होतात. त्यामुळे जमीन व भाजीपाला दूषित होतो.
 2. परिस्थिती पोषक असेल तर साधारणतः दहा दिवसात गोलकृमी अंडयांचे रुपांतर भ्रूणात ( Embryo in Marathi ) होते आणि ती संसर्गक्षम ( infective ) बनतात. जंतांच्या अशा संसर्गक्षम भ्रूणित अंडयांमुळे ( Infective Embryonated eggs ) दूषित झालेला भाजीपाला सेवन केल्यास लहान आतडयात भ्रूणांचे रुपांतर छोटया अळयांमधे ( larvae ) होते.
 3. जंतांच्या या छोटया अळया लहान आतडयास भेदून रक्तावाटे यकृत ( liver in Marathi ) आणि फुफ्फुसांपर्यंत पोचतात. त्या अळया फुफ्फुसामधून श्वासनलिकेमार्फत ( Trachea in Marathi ) घशात ( Pharyx in Marathi ) पोचतात आणि थुकीसोबत गिळल्या जावून अन्ननलिकेमधन आतड्यात पोहचतात. लहान आतडयात पोचल्यानंतर जंताच्या अळया ६ ते १० आठवडयात लैंगिकदृष्टया परिपक्व बनतात.

भारतातील जंत समस्या ( Worm Problem in India )

जंतांचा त्रास भारतभर आढळतो. देशातल्या काही भागांमध्ये ( उदा . उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि आझमगढ जिल्हे ) तर ३० ते ५० टक्के लोकांना जंताची बाधा झालेली आढळते.

साथरोगशास्त्रीय घटक ( Epidemiological Factor )

 • वय ( Age ) :- ३ ते ५ वर्षाच्या बालकांमध्ये सर्वाधिक प्रमाण आढळते.
 • जमीन ( Soil ) :- रेतीमिश्रित ( Slurry Soil ) जमिनीपेक्षा जंताची अंडी माती असलेल्या ( Clay soil ) जमिनीत चांगल्या प्रकारे वाढ होऊन बरेच दिवस जिवंत राहतात.
 • मानवी सवयी ( Human habit ) – उघड्यावर शौचविधी केल्यामुळे जमीन जंताच्या अंड्यामुळे प्रदूषित होऊन रोगप्रसार होतो.
 • प्रसार पध्दत – जंताच्या संसर्गक्षम भूणित अंडयांमुळे अन्न आणि पेय पदार्थ दुषित होऊन हा रोग पसरतो.
 • अधिशयन काळ – साधारणतः दोन महिने. हा काळ म्हणजे जंताच्या अळ्या आतड्यात शिरल्यापासून ते त्यांची पूर्ण वाढ होऊन मादी जंत अंडी घालण्यापर्यंतचा काळ होय.

गोलकृमी जंत रोगलक्षणे Roundworms Ascariasis Symptoms in Marathi

 1. आतडयात जंतांचा प्रादुर्भाव होऊन देखील कोणतेही रोगलक्षणे आढळत नाही. जंत परजिवी ( Worm Parasite in Marathi ) असतात.
 2. माणसाच्या आतडयात ते यजमानाच्याच आहारावर आपले पोट भरतात आणि त्यामुळे यजमानाच्या पोषणावर विपरित परिणाम होतो. पोषणावरील हल्ला विशेषतः लहान मुलात जास्त धोकादायक ठरतो .
 3. जंताच्या शरीरातील विषारी द्रवामुळे अर्टीकॅरीया म्हणजे अंगावर लाल खाजणारे चट्टे उठणे होय.
 4. आतडयात जंत जास्त प्रमाणात असतील तर पोटदुखीचा त्रास होतो.
 5. लहान मुलात तर त्यामुळे आतडयात अडथळा ( Intestinal Olstruction in Marathi ) निर्माण होऊ शकतो.
 6. रुग्णाच्या शौचाची , तपासणी करुन निदान करता येते .

गोलकृमी जंत उपचार Roundworms Ascariasis Treatment in Marathi

जंतावरील प्रभावी औषधयोजनेमध्ये पिपरॅझीन ( Piperazine in Marathi ), अल्बेन्डझोल (Albendazole in Marathi) आणि मेबेंडाझॉल ( Mebendazole in Marathi ) या औषधांचा समावेश प्राधान्यक्रमाने होतो.

इतर औषधे व जीवनसत्वे लक्षणे चिन्हानुसार द्यावीत. रक्तक्षयाकरिता लोहयुक्त गोळया द्याव्यात.

गोलकृमी जंत गुंतागुंत (Roundworms Ascariasis Complications in Marathi)

 • १ ) रक्तक्षय
 • २ ) आतडयात कृमी अडकल्यामुळे आतडयात अडथळा Intestinal Obstruction )
 • 3) आतडयात अडथळा निर्माण होणे ही एक आपत्कालीन परिस्थिती असून यात रुग्णाला ताबडतोब तज्ञाकडे पाठवावे .

गोलकृमी जंत प्रतिबंधन व नियंत्रण (Roundworms Ascariasis Prevention in Marathi)

 1. परिसर स्वच्छता ( Sanitation measures ) ग्रामीण भागात यासाठी आरोग्यदायी शौचकूपांचा ( Saritary latrines ) वापर वाढविण्यावर भर दिला पाहिजे.
 2. जंताच्या प्रतिबंधासाठी मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावली गेल्यास त्याचे दूरगामी परिणाम फार – चांगले घडतात.
 3. वैयक्तिक स्वच्छता : – जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे.
 4. नखे वाढू देऊ नये.
 5. शौचाहून आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावे.
 6. आरोग्य शिक्षण ( Health education ) – आरोग्य शिक्षणात , वैयक्तिक आणि घरातील स्वच्छतेचा दर्जा वाढविण्यावर भर दिला पाहिजे उदा . शौचाहून आल्यावर तसेच जेवण करण्यापूर्वी हात – पाय साबण व पाणी यांचा वापर करुन स्वच्छ धुवून घेणे आणि अन्नपदार्थांचे माश्यापासून संरक्षण करणे इ.
Worm in Marathi, Worm Meaning in Marathi, Roundworm Meaning in Marathi, Hookworm, Tapeworm Meaning in Marathi, stomach worm meaning in marathi, worm infection in marathi

आकडाकृमी ( Hookworm in Marathi )

आकडाकृमी लहान आतडयाच्या आणि त्यातल्या त्यात लहान आतडयाच्या मध्य भागाच्या ( Jejunum ) आतील श्लेष्मल पटलाला ( mucous membrane ) चिकटलेले आढळतात. या कृमिच्या तोंडाच्या आकड्या सारख्या आकारामुळे नाव आकडाकृमी असे पडले आहे.

आकडाकृमी जीवन इतिहास ( Hookworm Life Cycle in Marathi )

 1. आकडाकृमी दोन प्रकारचे असतात – अॅन्किलोस्टोमा ड्युओडिनेल ( Alstom Cinderella ) आणि निकेटर अमेरीकन्स ( Nectar Americans ) प्रत्येक आकडाकृमी साधारणतः ८ ते १० मि.मि. लांबीचा असतो.
 2. प्रौढ अॅन्किलोस्टोमा ड्युओडिनलचे आयुष्य सर्वसाधारणतः एक वर्ष इतके असते आणि प्रौढ निकेटेर अमेरीकन्स सामान्यतः चार वर्षे जिवंत राहतो.
 3. आकडाकृमी रुग्णाच्या विष्ठेतून बाहेर टाकले जातात.
 4. जीवनचक्र : मादी कृमी अंडी घालते आणि रुग्णाच्या शौचातून अंडी बाहेर टाकली जातात.
 5. एक मादी दररोज दहा ते वीस हजार पर्यंत अंडी घालू शकते. रुग्णाच्या विष्ठेतून बाहेर पडलेली अंडी नंतर मातीत / जमिनीत परिपक्व होतात आणि त्यांचे अळयांमध्ये ( larvae ) रुपांतर होते आणि त्यानंतर अळया संसर्गक्षम ( Infective ) बनतात.
 6. जेव्हा एखादी व्यक्ती, आकडाकृमीच्या संसर्गक्षम अळयांमुळे दूषित झालेल्या जमिनीवरुन अनवाणी पायाने चालते तेव्हा अळया पायाच्या त्वचेतून भेद करुन त्याच्या शरीरात प्रवेश करतात.
 7. नंतर त्या अळया लसिकाद्रव ( lymph ) आणि रक्तप्रवाहामधून फुफ्फुसात पोचतात त्यानंतर फुफ्फुसामधून श्वासनलिके मार्फत ( Tiracha ) घशातून थुकीसोबत गिळल्या जाऊन आतडयापर्यंत पोचतात.
 8. लहान आतडयात अळयांचे रुपांतर लैंगिकदृष्टया परिपक्व कृमीमध्ये ( Sexually mature worms ) होते. हा साधारणतः ६ आठवडयात होतो आणि मादी कृमी अंडी देण्यास सुरुवात करते.

भारतातील समस्या ( Problem in India ) – भारतात साधारणतः ४५ दशलक्ष लोक आकडाकृमीमुळे संसर्गित आहेत. ही समस्या आसाम ( चहाचे मळे ), केरळ, प. बंगाल उत्तर प्रदेशाचा काही भाग, बिहार , ओरिसा आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू या राज्यात फार मोठया प्रमाणावर आहे.

साथरोगशास्त्रीय घटक ( Epidemiological factor )

 • वय : या रोगाचे प्रमाण १५ ते २५ व
 • मातीची स्थिती : भुसभुसीत ( Porous ) आणि ओलसर ( Moist ) माती वाढीला पोषक असल्यामुळे आणि त्यात जैविक पदार्थ ( organic matter ) असल्यास आकडाकृमीच्या अळयाची वाढ होते .
 • मानवी सवयी – उघड्यावर शौचविधीच्या सवयीमुळे माती दूषित होते आणि हया रोगाच्या प्रसारास पोषक वातावरण तयार होते . त्याचप्रमाणे चप्पल , बूट ( पादत्राणे ) न घालता अनवाणी पायाने फिरण्याच्या सवयीमुळेही या रोगाच्या प्रसारास वाव मिळतो.
 • प्रसार पध्दत – मातीतील आकडा कृमीच्या संसर्गक्षम अळया अनवाणी पायाच्या त्वचेच्या भेगातून व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात.
 • अधिशयन काळ – सहा आठवडे .

आकडाकृमी जीवन रोगलक्षणे ( Hookworm Symptoms in Marathi )

 1. आतडयात जंतांचा प्रादुर्भाव होऊन देखील कोणतेही रोगलक्षणे आढळत नाही.
 2. जंत परजिवी ( Worm Parasite in Marathi ) असतात. माणसाच्या आतडयात ते यजमानाच्याच आहारावर आपले पोट भरतात आणि त्यामुळे यजमानाच्या पोषणावर विपरित परिणाम होतो.
 3. पोषणावरील हल्ला विशेषतः लहान मुलात जास्त धोकादायक ठरतो .
 4. जंताच्या शरीरातील विषारी द्रवामुळे अर्टीकॅरीया म्हणजे अंगावर लाल खाजणारे चट्टे उठणे होय. आतडयात जंत जास्त प्रमाणात असतील तर पोटदुखीचा त्रास होतो.
 5. लहान मुलात तर त्यामुळे आतडयात अडथळा ( Intestinal Obstruction in Marathi ) निर्माण होऊ शकतो.
 6. रुग्णाच्या शौचाची , तपासणी करुन निदान करता येते.

गोलकृमीप्रमाणे गुंतागुंत ( Hookworm Complications in Marathi )

 • लहान आतडयात आणि त्यातल्या त्यात लहान आतडयाच्या मध्य भागात आकडा कृमी आढळतात. त्यांच्यामुळे लहान आतडयात सूक्ष्म जखमा ( Small ulcer ) होतात आणि त्यामुळे हळुहळू जुनाट असा रक्तस्त्राव ( Chronic blood loss ) होतो.
 • आकडाकृमी संसर्गाचे दुष्परिणाम म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय, सूज, दृदयविकार, रोगप्रतिकार क्षमतेची आणि जास्त वेळ परिश्रम करण्यातील अपात्रता होय.
 • आतडयातील परजीवी कृमींच्या नियंत्रणासाठी , मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावणे हा मार्ग फार परिणामकारक ठरतो

प्रतिबंधन आणि नियंत्रण ( Hookworm Prevention and control in Marathi)

 1. औषधोपचार – आकडाकृमी संसर्गात मेबेंडाझॉल आकडाकृमी तसेच गोलकृमींच्या संसर्गात परिणाम कारक ठरते.
 2. ज्या प्रदेशात आकडा कृमीचे प्रमाण अतिशय जास्त असते त्या प्रदेशातील सर्व व्यक्तींना मेबेंडाझॉल हे औषध द्यावे लागते.
 3. आकडा कृमीमुळे झालेल्या रक्तक्षयासाठी लोह आणि फोलिक आम्ल देतात.
 4. स्वच्छताविषयक उपाययोजना – ग्रामीण भागात सुरक्षित शौचकूपाचा वापर वाढविण्यावर भर दिला पाहिजे त्यामुळे मातीचे प्रदूषण टाळता येते.
 5. आरोग्य शिक्षण – यामध्ये सुरक्षित शौचकूपाच्या वापराचे महत्व , वैयक्तीक पातळीवरील खबरदारीची उपाययोजना म्हणून पायदानाचा नियमित वापर आणि जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे याचे महत्व यांचा समावेश असला पाहिजे.
 6. थोडक्यात म्हणजे स्वच्छतेत सुधारणा , आरोग्य शिक्षण आणि पादत्राणाचा नेहमी वापर या त्रिसूत्रीचा वापर करुन आकडाकृमी संसर्गाचे योग्य नियंत्रण करता येते .

टेपकृमी ( Tape Worm in Marathi)

हे कृमी आकाराने चपटे व लांब असतात. व्यक्तीला हा आजार प्रत्यक्षपणे या आजाराच्या रुग्णापासून होत नाही. हया कृमीचे अंडे मनुष्याच्या आतडयात गेल्यामुळे हा आजार होतो.

मांसाहारी , कच्चे किंवा कमी शिजवलेले मांस खाणा-या व्यक्तींना हा आजार होतो.

कृमी : या आजाराच्या कृमी चापट व लांब असून त्यांची लांबी १० ते १२ फूट असते. हे कृमी खंड स्वरुपात टेप सारखे असून सुरवातीचे खंड लहान असतात व दुस-या टोकाकडे वाढत जातात.

कृमीचे डोके लहान असते व त्याला हुकसारखा भाग असतो. हा भाग आतडयात अडकतो. या कृमीला मान आणि धड असते.

धडाचा भाग देखिल खंडाच्या स्वरुपात असतो. कृमीच्या मध्य भागात लैंगिक ग्रंथी आणि शेवटच्या खंडात अंडे असतात

टेपकृमीचे जीवन ( Tape Worm Life Cycle in Marathi)

 1. संपूर्ण वाढ झालेल्या कृमीपासून अंडी तयार होतात व उघडयावर शौचाला बसल्यामुळे व्यक्तीच्या विष्ठेतून गवतावर पसरतात.
 2. ही गवतावर पसरलेली अंडी, प्राण्यांनी दुषित गवत खाल्यामुळे त्या प्राण्यांच्या ( उदा . डुक्कर , मासे , बकरे , गाई , इ . ) पोटात जातात.
 3. पोटात गेल्यानंतर त्या अंडयावरील आवरण विरघळून जाते , व त्यातून भ्रूण बाहेर येतो.
 4. या प्राण्यांचे मांस सुदृढ व्यक्तीच्या खाण्यात आल्यानंतर पोटातील ऑम्ल रसात विरघळतात व त्यामुळे कृमीच्या भ्रूणाचे डोके वेगळे होऊन व्यक्तीच्या आतडयात जाऊन तेथे वाढ होते.
 5. साधारणपणे दोन महिन्यात पूर्ण वाढ होऊन कृमी बनतो व त्याचे खंड तसेच कृमीची अंडी व्यक्तीच्या विष्ठेद्वारे बाहेर पडतात.
 6. कृमीची नावे : १. टिनीया साजिनेटा ( Taenia Saginata ) : हा कृमी गाय , बैल , म्हैस इ . प्राण्यांच्या मांसात असता . २. टिनीया सोलियम ( Taenia Solium ) : हा कृमी डुकराच्या मासात असतो .
 7. अधिशयन काळ : ८ ते १४ आठवडे
 8. रोग प्रसार : १. कृमीचे अंडे पाणी व अन्नाद्वारे पोटात गेल्यामुळे . २. डुकराचे किंवा बैलाचे कृमी असलेले मांस खाल्यामुळे

टेपकृमी रोग लक्षणे ( Tape Worm Symptoms in Marathi)

 • रुग्णाच्या पोटात दुखते व ही पोटदुखी दीर्घकाळ असते .
 • रुग्णाला अन्न नीट पचत नाही.
 • भूक लागत नाही .
 • त्याचे वजन कमी होते .
 • रुग्णाला घाबरल्यासारखे व बेचैन वाटते.
 • रोगनिदानः
  • १.रुग्णाच्या विष्ठेत पूर्ण वाढ झालेले कृमी किंवा कृमीचे खंड दिसतात .
  • २.रुग्णाची क्ष – किरणाद्वारे तपासणी केली रोगाची तीव्रता संसर्गाचे ठिकाण ओळखता येते.

रोगाचे प्रतिबंधन आणि नियंत्रण

आरोग्य शिक्षण :

 • १. जेवणापूर्वी हात , नखे नीट स्वच्छ करावी . शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे .
 • २. रुग्णाच्या शौचामुळे माती , पाणी व अन्न दूषित होऊ देऊ नये .
 • ३. मांसाहारी लोकांनी मांस , किंवा मासे पूर्णपणे शिजवून खावे .
 • ४. आरोग्य विभागाने मांस आणि मासे याची नियमित तपासणी करुनच खाण्याकरिता योग्य आहे किंवा नाही ते ठरवावे .
 • नियंत्रणः औषधोपचारः
  • १. प्रॉझिक्यटिल ( Praziquantel ) : १५ मि.ग्रॅ . दर कि.ग्रॅ . वजनाप्रमाणे एकच मात्रा
  • २.निक्लोसामाईड ( Niclosamide ) ६० मि . ग्रॅ . दर कि . ग्रॅ . वजनाप्रमाणे दररोज ५ ते ७ दिवस

सारांश

या सर्व जंतांचे जीवनचक्र अस्वच्छतेवर अवलंबून असते. मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावली गेली तर जंतांची बाधा होत नाही. म्हणून जंतांचे उच्चाटनासाठी मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे. घरोघरी सुरक्षित संडास हाच यावरचा खरा उपाय आहे.

Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023

पांढरे डाग, कोड त्वचारोग लक्षणे, कारणे, निदान, उपचार, घरगुती उपाय, Vitiligo in Marathi

कोड रोग म्हणजे काय ? कोड रोग म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर… Read More

19/02/2023