कोविड १९ रुग्ण गृह विलगीकरण सुधारीत मार्गदर्शक सूचना Home Isolation in Marathi
शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.
या कोविड -19 रुग्ण गृह विलगीकरण सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार वैद्यकीयदृष्ट्या ज्या रुग्णांमध्ये कोविड – १९ ची सौम्य लक्षणे असतील किंवा लक्षणे नसतील त्यांच्या गृह विलगीकरणाची शिफारस करण्यात आली आहे. खालील लेखात गृह विलगीकरणाची सर्व माहिती दिलेली आहे. ( Home Isolation in Marathi, Home Isolation Information in Marathi, Gruha vilagikaran mahiti )
अनुक्रमणिका
कोविड -19 च्या लक्षणांचा अभाव / सौम्य लक्षणे असलेले बाधित
कोणतीही लक्षणे दिसून न येणारे आणि हवेशीर खोलीमध्ये ऑक्सिजनची पातळी ९ ४ टक्क्यांपेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणे नसलेले बाधित ( असिम्टोमॅटिक ) असे घोषित करण्यात आले आहे.
श्वासोच्छवास करताना दम लागत नसलेल्या परंतु अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्टची इन्फेक्शनची लक्षणे ( आणि / किंवा ताप ) असलेल्या आणि हवेशीर खोलीमध्ये ऑक्सिजनची पातळी ९ ४ टक्क्यांपेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीयदृष्ट्या सौम्य लक्षणे असलेले बाधित असे घोषीत करण्यात आले आहे .
गृह विलगीकरणासाठी पात्र असलेले बाधित
उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णाला वैद्यकीयदृष्ट्या सौम्य लक्षणे असलेली / लक्षणे नसलेली बाधित व्यक्ती असे घोषित केले पाहिजे .
अशा प्रकारच्या बाधित व्यक्तींच्या घरी स्वयं – विलगीकरणासाठी तसेच संपर्कात आलेल्या कुटुंबियांच्या अलगीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा असणे गरजेचे आहे .
शुश्रूषा करणारी व्यक्ती दिवसरात्र सतत उपलब्ध असली पाहिजे . गृह विलगीकरणाच्या संपूर्ण अवधीमध्ये शुश्रूषा करणारी व्यक्ती आणि रुग्णालय यांच्यामध्ये माहितीची देवाणघेवाण करण्याची सुविधा असण्याची पूर्वावश्यकता आहे .
उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने ६० वर्षांवरील वृद्ध बाधित व्यक्ती तसेच उच्च रक्तदाब , मधुमेह , हृदयविकार , फुप्फुस / यकृत / मूत्रपिंडाचे जुनाट आजार , सेरेब्रो – व्हॅस्क्युलर आजार यासारख्या सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींचे योग्य मूल्यमापन केल्यावरच अशा बाधितांना गृह विलगीकरणामध्ये राहण्याची परवानगी देण्यात येईल .
रोगप्रतिकारशक्ती कमजोर करणारे आजार असलेल्या / उपचार घेणाऱ्या ( एचआयव्ही , अवयव प्रत्यारोपण , कर्करोगावरील विशिष्ट उपचार , इत्यादी ) रुग्णांना गृह विलगीकरणाची शिफारस करण्यात आलेली नाही . मात्र उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने योग्य मूल्यमापन केल्यावर अशा बाधितांना गृह विलगीकरणामध्ये राहण्याची परवानगी देण्यात येऊ शकेल.
बाधितांची शुश्रूषा करणारी व्यक्ती आणि त्यांच्या जवळून संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी नियमानुसार तसेच उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने निर्धारित केल्यानुसार हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेणे आवश्यक आहे . याव्यतिरिक्त https://www.mohfw.gov.in/pdf/Guidelinesforhomequarantine.pdf या संकेतस्थळावर इतर सदस्यांसाठी देण्यात आलेल्या गृह विलगीकरणाविषयक मार्गदर्शक सूचनांचे देखील पालन होणे आवश्यक आहे .
बाधितासांठी सूचना
बाधित व्यक्तीने स्वतःला घरातील अन्य सदस्यांपासून अलग करणे अत्यावशक असून अशा व्यक्तीने घरातील सर्वांपासून , विशेषतः वृद्ध व्यक्ती तसेच उच्च रक्तदाब , हृदयरोग , मूत्रपिंडाचे विकार यासारख्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींपासून दूर रहाणे आणि केवळ निश्चित करण्यात आलेल्या खोलीमध्येच वास्तव्य केले पाहिजे.
बाधित व्यक्तीने सतत तीन पदरी वैद्यकीय मुखपट्टीचा ( triple layered surgical mask ) वापर केला पाहिजे . वापरात असलेली मुखपट्टी दर ८ तासांनी किंवा त्यापूर्वी ती ओली झाल्यास वा खराब झाल्याचे दिसून आल्यास त्वरित टाकून दिली पाहिजे . शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीने बाधित व्यक्तीच्या खोलीत प्रवेश करताना दोन्ही उपस्थित व्यक्तींनी शक्यतो एन ९५ मुखपट्टीचा ( N95 mask ) वापर करणे अपेक्षित आहे.
बाधित व्यक्तीला खेळती हवा असलेल्या हवेशीर खोलीत ठेवले पाहिजे आणि ताजी हवा येण्यासाठी खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत.
मुखपट्टी १ % सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने निर्जंतुक केल्यावरच तिची विल्हेवाट लावावी.
बाधित व्यक्तीने भरपूर विश्रांती घेणे आणि शरीरातील पाण्याची योग्य पातळी राखण्यासाठी द्रवपदार्थांचे मुबलक प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.
बाधित व्यक्तीने स्वतःच्या वस्तू इतरांना वापरू देऊ नयेत .
श्वसनसंस्थेविषयक नियमांचे ( respiratory etiquettes ) सदैव पालन केले पाहिजे.
हात साबण आणि पाण्याने किमान ४० सेकंद वारंवार धुतले पाहिजेत किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने स्वच्छ केले पाहिजेत .
सतत स्पर्श केले जाणारे पृष्ठभाग ( जसे टेबलाचा पृष्ठभाग , दरवाज्याच्या मुठी , हँडल , इत्यादी ) १ % सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने निर्जतुक केले जात असल्याची खात्री करून घ्यावी.
पल्स ऑक्सिमीटर ने SpO2 कसा मोजावा ?
पल्स ऑक्सिमीटर वापरून शरीरातील ऑक्सिजनची पातळी आणि नाडीचे ठोके यावर नियमितपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे .
प्लस ऑक्सिमीटर सुरू करा . स्क्रीनवर आकडे दिसत असल्याची खात्री करून घ्या .
पल्स ऑक्सिमीटरमध्ये हाताचे मधले बोट योग्यरित्या घाला . नाडीचे ठोके मोजण्यासाठी आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी ( SpO2 ) स्क्रीनवर दिसण्यासाठी काही सेकंदांचा अवधी जाऊ द्या .
स्क्रीनवरील आकडे पाहा आणि प्रपत्र -१ मध्ये त्यांची नोंद करा .
सामान्य : SpO2 ९५ % किंवा त्याहून अधिक असला पाहिजे.
जर SpO2 ९ ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर बाधित व्यक्तीने पर्यवेक्षकाशी / वैद्यकीय अधिकाऱ्याशी त्वरित संपर्क साधावा .
पल्स ऑक्सिमीटर वापरण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने हाताचे बोट सॅनिटायझरने किंवा अल्कोहोलयुक्त टिश्यूने स्वच्छ करावे .
चुकीच्या आकडे दिसू नयेत यासाठी नेल पॉलिश लावलेल्या बोटांची चाचणी करू नये.
शरीराचे तापमान इन्फ्रारेड थर्मोमीटरने कसे मोजावे ?
शरीराचे तापमान दररोज घेऊन बाधित व्यक्तीने स्वतचे आरोग्य स्वतच संनियंत्रित केले पाहिजे . तसेच खाली दिलेल्या लक्षणांमध्ये अधोगती दिसून आल्यास त्याची सूचना त्वरित दिली पाहिजे.
थर्मल गन सुरू करा आणि ती अचूक तापमानाची नोंद करत असल्याची खात्री करून घ्या .
थर्मल गन कपाळापासून एक वीत ( ६ इंच ) अंतरावर धरा आणि शरीराचे तापमान पाहण्यासाठी बटण दाबा .
” स्क्रीनवरील आकडा ” पाहा आणि त्यानुसार प्रपत्र -१ मध्ये नोंद करा . कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बाबतीत या कृतीची पुनरावृत्ती करावी .
ताप :- शरीराचे तापमान १००.४० फॅरनहाइट ( ३८० सेल्सियस ) किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर ताप आला आहे असे समजा.
थर्मल गन दुसऱ्या व्यक्तीच्या हाती देतेवेळी ती सॅनिटायझरने किंवा अल्कोहोलयुक्त टिश्यूने स्वच्छ करा .
संनियंत्रण तक्ता
शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीसाठी सूचना
मुखपट्टी ( mask ) –
HOW TO WEAR MASK SAFELY
शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीने तीन पदरी वैद्यकीय मुखपट्टी ( triple layered surgical mask ) लावावी . बाधित व्यक्तीच्या खोलीमध्ये असताना शक्यतो एन९५ मुखपट्टीचा वापर करणे अपेक्षित आहे.
मुखपट्टी लावल्यावर तिच्या समोरील भागाला स्पर्श करू नये किंवा तो भाग हाताळू नये.
जर मुखपट्टी ओली झाली किंवा नाकातोंडातील स्त्रावामुळे खराब झाली तर ती त्वरित बदलणे आवश्यक आहे.
मुखपट्टी वापरल्यावर टाकून द्यावी आणि तिची विल्हेवाट लावल्यावर हातांच्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे.
शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या / तिच्या चेहयाला , नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळावे.
हातांची स्वच्छता कशी करावी ?
बाधित व्यक्तीला स्पर्श केल्यावर किंवा बाधित व्यक्तींच्या आजूबाजूच्या गोष्टींना स्पर्श केल्यावर हातांच्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
स्वयंपाक करण्यापूर्वी आणि केल्यावर, अन्नाचे सेवन करण्यापूर्वी , शौचालयाचा वापर केल्यानंतर आणि जर हात मलीन झाल्याचे दिसून आले तर , प्रत्येक वेळी हातांच्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन करा.
हात किमान ४० सेकंद धुण्यासाठी साबण आणि पाण्याचा वापर करा. जर हात अस्वच्छ असल्याचे दिसून आले नाही तर अल्कोहोलयुक्त हँड – रबचा वापर केला पाहिजे .
साबण आणि पाण्याने हात धुतल्यावर ते कोरडे करण्यासाठी एकवेळ वापर करण्याजोग्या कागदाचा वापर करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारचा कागद उपलब्ध नसल्यास कापडाचा स्वच्छ टॉवेल केवळ हात पुसण्यासाठीच ठेवावा आणि तो ओला झाल्यास नवा टॉवेल वापरावा.
बाधित व्यक्तीला तिच्या खोलीतच भोजन देणे आवश्यक आहे . बाधित व्यक्तीने वापरलेली जेवणाची भांडी आणि ताट – वाट्या घासताना हातमोजे घालून ती साबण / डिटर्जंट आणि पाण्याने साफ करणे जेवणाची भांडी आणि ताट – वाट्या पुन्हा वापरता येऊ शकतात .
हातमोजे काढल्यावर किंवा वापरलेली भांडी हाताळल्यावर हात स्वच्छ धुवा . पृष्ठभाग , बाधित व्यक्तीचे कपडे किंवा चादरी हाताळताना किंवा स्वच्छ करताना तीन पदरी वैद्यकीय मुखपट्टी ( triple layered surgical mask ) आणि एकवेळ वापरण्याजोगे हातमोजे वापरा .
बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट
घरामध्ये संसर्ग आणखी पसरू नये यासाठी कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जात असल्याचे सुनिश्चित करा . केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या ( सीपीसीबी ) मार्गदर्शक सूचनांना अनुसरून ( ज्या http://cpcbenvis.nic.in/pdf/1595918059_mediaphoto2009.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत ) कचऱ्याची ( मुखपट्ट्या , एकवेळ वापरल्यावर टाकून देण्याजोग्या वस्तू , पदार्थांची पाकीटे , इत्यादी ) विल्हेवाट लावावी .
सौम्य लक्षणे / लक्षणांचा अभाव असलेल्या गृह विलगीकरणातील बाधित व्यक्तींसाठी उपचार
बाधित व्यक्तींनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आणि प्रकृती बिघडल्यास त्याची खबर डॉक्टरांना त्वरित देणे आवश्यक आहे.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अन्य सहव्याधींसाठी असलेली औषधे नियमित चालू ठेवा.
ताप , वाहती सर्दी आणि खोकला असल्यास बाधित व्यक्तींनी लक्षणांच्या व्यवस्थापनाचे डॉक्टरांच्या शिफारसीनुसार पालन करावे .
बाधित व्यक्तींनी कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात किंवा दिवसातून दोन वेळा वाफ घ्यावी .
दिवसातून चार वेळा देण्यात आलेल्या ६५० मि.ग्रॅ . पॅरासिटमॉलच्या गोळ्यांच्या अधिकतम मात्रेमुळे जर ताप नियंत्रित झाला नाही तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जे नॉन स्टिरॉयडल अँटी – इन्फ्लमेटरी ( एनएसएआयडी ) ( उदा . नॅप्रोक्सेनच्या २५० मि.ग्रॅ.च्या गोळ्या दिवसातून दोन वेळा ) यासारख्या इतर औषधांचे सेवन करण्याचा सल्ला देऊ शकतात.
आयव्हरमेक्टीनच्या गोळ्या ( २०० मायक्रोग्रॅम / किलो दिवसातून एकवेळा रिकाम्या पोटी ) ३ ते ५ दिवस घ्याव्यात.
जर संसर्ग झाल्यानंतर ५ दिवसांपेक्षा अधिक काळ लक्षणे ( ताप आणि / किंवा खोकला ) तशीच चालू राहिली तर श्वसनाद्वारे घेण्याजोगे ब्युडेझोनाईड ( स्पेसर असलेल्या इन्हेलरद्वारे ८०० मायक्रोग्रॅमची दिवसातून दोन वेळा ५ ते ७ दिवस देण्यात येणारी मात्रा ) दिले जावे.
रेमडेसिवीर किंवा कोणतीही अन्य प्रायोगिक उपचारपद्धती केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने तसेच रुग्णालयाच्या वातावरणात हाताळणे आवश्यक आहे . बाधित व्यक्ती घरी असल्यास रेमडेसिवीर प्राप्त करण्याचा किंवा त्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये.
आजाराचे स्वरूप सौम्य असल्यास मुखावाटे देण्यात येणाऱ्या सिस्टिमॅटिक स्टिरॉईडची शिफारस करण्यास आलेली नाही.
जर लक्षणे ७ दिवसांपेक्षा अधिक काळ ( न हटणारा ताप , वाढत गेलेला खोकला , इत्यादी ) दिसून आली तर स्टिरॉईडच्या कमी प्रमाणातील मात्रेचे सेवन करण्यासाठी उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जर शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली किंवा श्वासोच्छ्वास करताना त्रास होऊ लागला तर बाधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणे तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा / निरीक्षण गटाचा सल्ला त्वरित घेणे गरजेचे आहे.
वैद्यकीय सल्ला केव्हा घ्यावा
बाधित व्यक्तीने स्वतःच्या किंवा शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीने बाधिताच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवावे . गंभीर चिन्हे किंवा लक्षणे विकसित झाल्यास वैद्यकीय सल्ला त्वरित घेणे आवश्यक आहे . यामध्ये खालील चिन्हांचा / लक्षणांचा समावेश आहे.
श्वासोच्छ्वास घेताना त्रास होणे.
शरीरातील ऑक्सिजनची पातळी एकाएकी खालावणे ( हवेशीर खोलीत Spo२ ९४ टक्क्यांहून कमी असणे ) इ.
छातीत सतत दुखणे वा दाब पडणे.
मानसिक संभ्रम किंवा लैंगिक निरुत्साह निर्माण होणे.
घरी विलगीकरणात रहाणे केव्हा बंद करावे ?
covid – 19 ची लक्षणे सुरू झाल्यापासून 10 दिवसानंतर आणि सलग तीन दिवस ताप नसेल तर रुग्ण घरी विलगीकरणात रहाणे बंद करू शकतो. ( किंवा सौम्य लक्षणे असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरचे 10 दिवस ) घरी विलगीकणात राहण्याचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा covid – 19 ची टेस्ट करणे गरजेचे नाही.