आजारांची माहिती

हंता व्हायरस कारणे, लक्षणे, प्रसार, प्रतिबंध व उपचार Hantavirus in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

सध्या चीन मधे हंंता व्हायरस (Hantavirus in Marathi) चे काही रुग्ण सापडले असून त्यातील एका व्यक्तीचा हंंता व्हायरस या विषाणूची लागणं झाल्यामुळे मृत्यु झाला आहे.

खालील लेखामधे हंता व्हायरस कारणे, लक्षणे, प्रसार, प्रतिबंध व उपचार, Hantavirus in Marathi, Hantavirus Causes in Marathi, Hantavirus Diagnosis in Marathi, Hantavirus Treatment in Marathi इत्यादि हंता व्हायरस सर्व माहिती दिलेली आहे.

हंंता व्हायरस म्हणजे काय? Hantavirus in Marathi :-

What is Hantavirus in Marathi –

हंंता व्हायरस हा एक व्हायरस (विषाणू) चा गट आहे जो काही उंदीर प्रजातीच्या प्राण्यांंमधे आढळूण येतो.

उंदीर प्रजातीच्या प्राण्यांंद्वारे माणसानांही या विषाणूची लागण होऊ शकते. माणंसाना हंंता व्हायरस ची लागणं झाल्यास हंंताव्हायरस पल्मोनरी सिंंड्रोम नावाचा एक दुर्मिळ पण प्राणघातक आजार होऊ शकतो.

हंंताव्हायरस पल्मोनरी सिंंड्रोम ला एचपीएस HPS म्हणतात.

हंंता व्हायरस हे विषाणू सामान्यपणे उंदीर प्रजातीच्या प्राण्यांंना संसर्ग करतात परंतु त्यांच्यात रोगराई उद्भवत नाही. उंदीर प्रजातीच्या प्राण्यांंच्या शरीरात हंंता व्हायरस सुप्त अवस्थेत राहतात.

हंंता व्हायरस बाधित उंदीर प्रजातीच्या प्राण्यांंच्या मल, मूत्र, व शरीरातील स्रावांद्वारे बाहेर टाकले जातात.

Hantavirus in Marathi, Hantavirus Causes in Marathi, Hantavirus Symptoms in Marathi, Hantavirus Spread in Marathi, हंता व्हायरस कारणे, हंता व्हायरस लक्षणे, हंता व्हायरस प्रतिबंध

हंंता व्हायरस ची माहिती:-

Hantavirus information in Marathi –

हंंता व्हायरस विषाणूंचा व्यास सुमारे १२०-१६० नॅनोमीटर (एनएम) आहे.

वस्तुमानानुसार, विषाणूमध्ये ५०% पेक्षा जास्त प्रथिने, २०-३०% लिपिड आणि २-७% कर्बोदकांमधे असतात.

हंंता व्हायरस नाव कसे पडले ?

Hantavirus Meaning in Marathi –

हा हंंता व्हायरस विषाणू दक्षिण कोरियामधील हंटन नदी परिसरामधे पहिल्यांंदा आढळला यावरुन त्याला हंंता व्हायरस नाव पडले आहे.

हंंता व्हायरस कारणे Hantavirus Causes in Marathi:-

१ ) यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) ने दिलेल्या माहिती नुसार हंंता व्हायरस मुख्यत: उंदरांद्वारे पसरतो.

२ ) हंंता व्हायरस बाधित उंदीर प्रजातीच्या प्राण्यांंच्या मल, मूत्र, व शरीरातील स्रावांद्वारे बाहेर टाकले जातात.

३ ) या हंंता व्हायरस बाधित उंदीर प्रजातीच्या प्राण्यांंच्या व त्यांच्या मल, मूत्र, व शरीरातील स्रावांशी संपर्क आल्यास माणसाला या हंंता व्हायरस विषाणूची बाधा होऊ शकते.

४ ) अँडिस विषाणू ज्यामुळे हंंताव्हायरस हेमोरॅजिक फिव्हर होतो तो अँडिस विषाणू वगळता इतर हंंता व्हायरस एका व्यक्तीद्वारे दुस-या व्यक्तीकडे प्रसार होताना दिसून आलेला नाही.

५ ) हंंता व्हायरस कुळातील अँडिस विषाणू चा एका व्यक्तीद्वारे दुस-या व्यक्तीकडे प्रसार होतो. These are the Causes of Hantavirus in Marathi.

हंंता व्हायरस लक्षणे Hantavirus Symptoms in Marathi:-

हंंता व्हायरस लक्षणांचे तीन वेगळ्या टप्प्यात वर्गिकरण केले जाते.

१ ) सुरवातीची लक्षणे –

Hantavirus Early Symptoms in Marathi –

  • ताप
  • सर्दी
  • डोकेदुखी
  • अंगदुखी – स्नायूमधे वेदना
  • उलट्या
  • अतिसार किंवा ओटीपोटात वेदना

इत्यादि फ्लूसारख्या लक्षणे या सुरुवातीच्या अवस्थेत दिसून येतात, हंंता व्हायरसची लक्षणे व इन्फ्लूएन्झा, न्यूमोनिया किंवा इतर विषाणूजन्य आजारामधे फरक करणे कठीण आहे.

२ ) हंंता व्हायरस पल्मोनरी सिंंड्रोम –

Hantavirus Pulmonary Syndrome in Marathi –

चार ते १० दिवसांनंतर खालील लक्षणे निर्माण होतात.

  • स्रावयुक्त खोकला
  • श्वास घेण्यास त्रास
  • दम लागणे
  • फुफ्फुसांमध्ये द्रव जमा होणे
  • फुफ्फुसांवर सुज येते
  • रक्तदाब कमी होणे आणि
  • हृदयाची कार्यक्षमता कमी होणे यासारखे गंभीर चिन्हे आणि लक्षणे दिसतात.

३ ) रेनल सिंड्रोमसह हिमरेजिक फिवर –

Hemorrhagic Fever With Renal Syndrome in Marathi –

हा एक लक्षण किंवा आजारांचा समुह आहे. याला कोरियन हिमरेजिक फिवर, साथीचा हिमरेजिक फिवर, आणि नेफ्रोपॅथिया महामारी म्हणून देखील ओळखले जाते.

याची लागण झाल्यापासून लक्षणे निर्माण होण्यास १ ते ८ आठवडे कालावधी लागतो.

१ ) सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, पाठ आणि ओटीपोटात वेदना, ताप, थंडी, मळमळ आणि अंधुक दृष्टीचा समावेश होतो.

२ ) व्यक्तींचा चेहरा लाल होतो, डोळ्यांचा दाह होतो.

३ ) नंतरच्या लक्षणांमध्ये कमी रक्तदाब, रक्तवहिन्या मधून प्लासमा लीक होतो.

४ ) काही रुग्णांमधे मूत्रपिंड निकामी होऊ शकते, त्यामुळे शरीरावर सुज येते.

हंंता व्हायरस प्रसार Hantavirus Spread in Marathi:-

१ ) या हंंता व्हायरस बाधित उंदीर प्रजातीच्या प्राण्यांंच्या व त्यांच्या मल, मूत्र, चावा घेणे व शरीरातील स्रावांशी संपर्क आल्यास माणसाला या हंंता व्हायरस विषाणूची बाधा होऊ शकते.

२ ) एका माणसाद्वारे दुस-या माणसाला याची बाधा होऊ शकते अशी शक्यता काही संशोधकांंना वाटत आहे.

३ ) हंंता व्हायरस कुळातील अँडिस विषाणू चा एका व्यक्तीद्वारे दुस-या व्यक्तीकडे प्रसार होतो.

हंंता व्हायरस निदान Hantavirus Diagnosis in Marathi:-

हंंता व्हायरस ची सुरवातीची लक्षणे इन्फ्लूएन्झा किंवा साद्या सर्दि पडश्यासारखीच असतात. त्यामुळे हंंता व्हायरस चे निदान करणे सुरवतीच्या अवस्थेत कठीण ठरते.

त्यामुळे रुग्ण दुस-या अवस्ठेत जातो, या अवस्ठेत फुफ्फुसांमध्ये द्रव जमा होते, फुफ्फुसांवर सुज येते व फुफ्फुस निकामी होतात.

हंंता व्हायरस मृत्युदर:-

Hantavirus Mortality rate in Marathi –

हंंता व्हायरस चे निदान लवकर होत नाही तसेच दुस-या अवस्थेत फुफ्फुस, किडनी निकामी होणे यामुळे हंंता व्हायरस मृत्युदर ३८ % पर्यंंत आहे.

हंंता व्हायरस उपचार Hantavirus Treatment in Marathi:-

हंंता व्हायरस विषाणूमुळे निर्माण होणा-या आजारावर रिबाविरिन हे औषध व लाक्षणिक चिकित्सा केली जाते.

१ ) रिबाविरिन

Ribavirin for Hantavirus Treatment in Marathi –

रिबाविरिन एचपीएस आणि एचएफआरएस साठी एक औषधी पर्याय असू शकतो परंतु ते किती प्रभावी आहे याची माहिती अजून उपलब्ध नाही.

चीन आणि कोरियामध्ये रीबाविरिनचा उपचारामधे वापर केला जातो, ताप येण्यास सुरवात झाल्यापासून ७ दिवसांच्या आत रीबाविरिन चालू केली जाते. यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते.

२) लाक्षणिक चिकित्सा

Symptomatic Treatment for Hantavirus in Marathi –

१ ) संशयित हंंता व्हायरस रुग्णास जर श्वसनाच्या तीव्र त्रासात, श्वास घेण्यास मदत करण्यासाठी ऑक्सिजन आणि कृत्रिम श्वसन प्रणालीवर ठेवण्यासाठी रुग्णालयात दाखल केले जाते.

२ ) एचएफआरएस साठी कोणतेही उपचार किंवा लस नाही.

३ ) एचएफआरएस मधे लाक्षणिक चिकित्सेत रेनल डायलिसिससह व सहाय्यक औषोपचाराचा समावेश करतात.

सारांश :-

चीन हे विविध विषाणूजन्य आजारांचे माहेरघर बनत आहे, संंपुर्ण जगाने एकत्र येऊन चीनवर कठोर कारवाई केली पाहिजे.

हंंता व्हायरस च्या कुळातील फक्त अँडिस विषाणू चा एका व्यक्तीद्वारे दुस-या व्यक्तीकडे प्रसार होतो. परंतु याचा मृत्युदर कोरोना पेक्षा जास्त जवजवळ ३८% आहे.

योग्य उपाययोजना केल्यास याचा प्रासार थांबता येईल.

Copyright Material Don't Copy © 2020
Share
Published by

Recent Posts

SRDP उपचार: संपूर्ण माहिती, फायदे आणि प्रक्रिया

प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More

05/03/2025

सोरायसिस कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आधुनिक उपचार

प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More

27/02/2025

PCOD उपचार: कारणे, लक्षणे, उपाय आणि जीवनशैलीतील बदल

प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More

25/02/2025

केस गळती थांबवण्याचे उपाय, कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि नवीन उपचार

प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More

22/02/2025

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग: कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध, लस आणि नवीन उपचार

प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More

21/02/2025

आम्लपित्त – ऍसिडिटी उपचार, कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More

20/02/2025