एम. पी. डब्ल्यू. चे प्रमोशन होऊन आरोग्य सहाय्यक Health Assistant Job Chart in Marathi होता येते. यांचे काम खालील प्रमाणे.
आरोग्य सहाय्यक ( पुरुष ) यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या
Health Assistant Job Chart in Marathi:-
बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी योजनेंतर्गत पुरुष आरोग्य सहाय्यकानी एकूण २०,००० लोकसंख्येला सेवा देणे अपेक्षित असून एकुण ४ उपकेंद्र व ४ आरोग्य कर्मचारी ( पु ) यांचे पर्यवेक्षण करणे बंधनकारक आहे.
त्याच प्रमाणे प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम व कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रमांचे प्राथमिक आरोग्य सेवेत होणाऱ्या विलीनिकरण अनुषंगाने व इतर राष्ट्रीय कार्यक्रमात झालेला बदल लक्षात घेता पुरुष आरोग्य सहाय्यकाच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे आहेत .
पर्यवेक्षण व मार्गदर्शन
- कार्यक्षेत्रंतील सर्व पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे संनियंत्रण , पर्यवेक्षण त्यांच्या कामाची आखणी व कौशल्यवृध्दीसाठी त्यांना मार्गदर्शन .
- पर्यवेक्षणासाठी नियमित व अकस्मित भेटी .
- वैद्यकिय अधिकारी , आरोग्य कर्मचारी व लाभार्थी याच्यांत आरोग्य सेवा संबंधाने योग्य समन्वय साधणे
- आरोग्य सहाय्यक ( स्त्री ) च्या सहाय्याने सर्व कर्मचाऱ्यांची सभा व कामाचा आढावा घेणे .
- मसिक सभेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा देणे .
- आरोग्य सेवकाला साधनसामुग्रीचा पुरवठा .
- आरोग्य सेवकाच्या नोंदवहया व दप्तर पडताळणी व मार्गदर्शन .
- आरोग्य सेवकाकडून आलेल्या अहवालाचे एकत्रिकरण छाननी व अहवाल सादरीकरण ,
ब ) साहित्य सामुग्री व्यवस्थापन
- आरोग्य सहाय्यिके सोबत नियमित व आकस्मिक उपकेंद्र साठा तपासणी .
- साहित्य सामुग्रीचे मागणीपत्रक योग्य वेळी सादर करून पुरवठा प्राप्त करणे .
- उपकेंद्र औषधीसाठा व इतर साहित्याच्या योग्य साठवणुकिकडे नियमित लक्ष .
- पुरुष आरोग्य कर्मचाऱ्याच्या किटची नियमित पडताळणी .
क ) संघकार्य
- पुरुष आरोग्य कर्मचाऱ्याना संघकार्य सुलभ करणे .
- आरोग्य सहाय्यिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कार्याचे समन्वय व गटपातळीवर आयोजित सभेत सहभाग .
- प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभेत नियमित सहभाग .
- कार्यक्षेत्रात विविध आरोग्य सेवांचे आयोजनासाठी वैद्यकिय अधिकाऱ्यांना मदत करणे , इतर कर्मचाऱ्यांसह आरोग्य सेवा शिबीरांचे आयोजन व सहभाग .
ड ) अहवाल व नोंदी
- आवश्यक नोंदी व अहवाल तत्परतेने सादर करणे .
- पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्राप्त नोंदी व अहवालांचे योग्य संकलन करुन वैद्यकिय अधिकाऱ्यांना सादर करणे .
१ ) राष्ट्रीय हिवतांप प्रतिरोध कार्यक्रम
- आरोग्य सेवकांच्या सर्वेक्षण भेटीचे नियोजन व पर्यवेक्षण
- घराभेटीत आढललेल्या रुग्णाचे रक्तनमने गृहितोपचार हिवताप रुग्णांना समूळ उपचार ,
- ताप उपचार केंद्र व गोळया वाटप केंद्र यांची पडताळणी
- किटकनाशक फवारणी कार्यक्रमावर देखरेख
- डास उत्पत्तीस्थाने पडताळणी .
- गप्पीमासे पैदास केंद्र तपासणी .
- मजूर शिबीरांना आठवडी भेट .
- मच्छरदाणी वाटप .
२) साथरोग नियंत्रण
- हगवण , अतिसार , काविळ , विषमज्वर मेंदूज्वर , घटसर्प , गोवर ई.साथीवर नियंत्रण व लक्ष्य .
- उद्रेकाच्या प्रसंगी त्वरीत कार्यवाहि , उद्रेक नियंत्रण पथक तयार करणे . विहिरी निर्जतुकीकरण , ओ . टी.पर्यवेक्षण , दूषित पाणी नमुन्याअनुषंगाने कार्यवाही ग्रामपंचासत भेटी , ब्लिचींग पावडर साठा तपासणी .
- प्रतिबंधनात्मक कार्यवाही व वरिष्ठांना आवश्यक ती माहिती सादर करणे .
- उद्रेक होऊ नये म्हणून साथरोगविषयक आरोग्य शिक्षण ,
- रेबिज प्रतिबंधन लावारिस कुत्यांचा बंदोबस्त
३ ) राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम
- मोतिबिंदू रुग्णांची यादी तयार करुन घेणे व शिबीर नियोजन ,
- शाळेत जाणा – या सर्व मुलांची दृष्टीदोष , तिरळेपणा व इतर नंत आजारांकरिता तपासणी होईल याची खात्री करणे व त्यांना उपचार देण्याची व्यवस्था करणे ,
४ ) राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
- निदान व नियमित उपचार
- संशयित रुग्णांचा त्वचानमुना घेणे व तपासणीसाठी पाठवणे .
५ ) राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
- नियमित औषधोपचार
- आरोग्य कर्मचा-यांकडून घेतलेले थुकी नमुन्याची पडताळणी .
६ ) प्रजनन व बालआरोग्य
१) सार्वत्रिक लसटोचणी कार्यक्रम:-
- लसीकरणासाठी लागणारा साधनसामुग्रीचा साठा अद्ययावत ठेवणे .
- पल्स पोलिओ लसीकरण लसीकरण गाबाचे पर्यवेक्षण
२) क्षारसंजीवनी उपचार:-
- अतिसाराच्या रुग्णांना क्षारसंजीवनी उपचार
- आरोग्य सेवक स्त्री पुरुष यांना क्षारसंजीवनीचा पुरवठा करणे
३) शालेय आरोग्य कार्यक्रम:-
- लसीकरणासाठी आरोग्य कर्मचा-यांना सहाय्य .
- विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण ,
४) कुटुंब कल्याण:-
- कुटुंब पाहणीचे वेळी पर्यवेक्षण व गोषवारे काढणे .
- प्रतिसाद न देणा – या जोडप्यांचे मतपरिवर्तन .
- निरोध डेपोहोल्डर – नियमित साधनपुरवठा .
- कुटुंब नियोजन शिबीरे आयोजित करण्यासाठी सहाय्य ,
- लाभार्थीचा पाठपुरावा व पर्यवेक्षण .
- पुरुषांचा कार्यक्रमात सहभाग वाढवणेसाठी प्रयत्न
५) उपकेंद्र नियोजन व मार्गदर्शन:-
- आरोग्य सेविकेला उपकेंद्र नियोजन आराखडा तयार करणेसाठी आवश्यक मार्गदर्शन व मदत .
- पुरुष आरोग्य कर्मचा-याचा सहभाग निश्चित करणे ,
- लाभार्थ्यांच्या गरजा व निश्चितीसाठी मदत व मार्गदर्शन ,
६) लोकसंख्या धोरण व आरोग्य शिक्षण:-
- लोकसंख्या धोरणाची उद्दिष्टे व प्रमुख बाबी
- प्रस्तावित उपाययोजनांची माहिती
- सेवांची उपलब्धता व गुणवत्ता सुधारणे .
- विविध क्षेत्रांचा व विभागांचा सहभाग
७) प्रजनन मार्ग जंतुसंसर्ग:-
- पुरुष रुग्णांसाठी निदान व उपचार , प्रजनन जंतुसंसर्गाचे परिणाम व निदान .
- प्रतिबंधनात्मक उपाययोजना उपचार व पध्दती .
८) लैंगिक शिक्षण:-
- किशोरवयीन मुलामुलींना लैंगिक शिक्षण , सुरक्षात्मक उपाययोजना .
- दुष्परिणामांची जाणीव करून देणे .
फ ) जीवनविषयक आकडेवारी:-
- आरोग्य कर्मचा-यांनी गोळा केलेल्या जन्म मृत्युच्या माहितीचे एकत्रिकरण .
- एम.आय.एस. चालू असलेल्या प्रा.आ.केंद्रतील कार्यावर देखरेख व गळती .
- ग्रामपंचायतमध्ये केल्या जाणा-या जन्म मृत्यूनोंदीबाबत सर्वेक्षण व पडताळणी .
- अहवाल संकलन .
ग ) परिसर स्वच्छता:-
- सुरक्षित पाणी पुरवठा .
- शोषखड़ा , परसबाग , खतखडे , आरोग्यदायी संडास , बिनधुराची चूल तयार करण्यासाठी जनतेला प्रोत्साहन व मार्गदर्शन .
- पाण्याच्या निर्जंतुककिरणाबाबत ओ.टी.टेस्ट .
- पाणी नमुने गोळा करून चाचणीसाठी प्रयोगशाळेसाठी पाठवणे व अहवाल ग्रामपंचायतीकडे पाठवणे व पाठपुरावा करणे .
- पाणी शुध्दीकरणासाठी ग्रामपंचायत कर्मचारी प्रशिक्षण
- दूषित पाणी नमुना असलेल्या स्त्रोताकरिता योग्य उपाययोजना .
घ ) प्रथमोपचार व किरकोळ आजार व संदर्भसेवा:-
- आरोग्य सेवकाकडे प्रथमोपचार व किरकोळ आजारांच्या उपचारासाठी लागणारे सर्व साहित्य असल्याची खात्री .
- आरोग्य सेवकाचे निरंतर प्रशिक्षण , किरकोळ आजार , उपचार व अपघात प्रकरणी प्रथमोपचार व संदर्भसेवा .
- आरोग्य कर्मचा-यांकडून संदर्भित रुग्णांवर योग्य उपचार व आवश्यक तेथे पुढील संदर्भसेवेसाठी रुग्ण रवानगी
न ) आयोडीन न्युनता विकार कार्यक्रम:-
- आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार / आजार आणि आयोडीनयुक्त मिठाचा आहारातील वापराबाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे ,
- वापरण्यात येणारे मिठाचे नमुने आयोडीनचे प्रमाण तपासण्याकरिता प्रयोगशाळेकडे पाठविणे .
प ) आरोग्य शिक्षण , प्रशिक्षण संप्रेषण व समोपदेशन:-
- महत्वाच्या कार्यक्रमात गटसभेचे आयोजन .
- साथरोग , परिसर स्वच्छता , प्रजनन बालकार्यक्रम माहिती व संप्रेषण कार्यक्रमाचे आयोजन
- शालेय भेटीदवारे आरोग्य शिक्षण
- यात्रा समारंभ इत्यादी चे वेळी प्रदर्शनीचे आयोजन .
- पुरुष आरोग्य कर्मचा – यांच्या मदतीने स्थानिक नेत्यांचे प्रशिक्षण , आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण .
१ ) समोपदेशन सनांचे आयोजन:-
- कुटुंब नियोजन साधने वापरण्यासाठी लैंगिक मार्गजंतुसंसर्ग .
- लैंगिक आजार व बैकल्ये . एच.आय.व्ही . / एड्स .
क्ष ) अंगणवाडी तसेच आश्रमशाळा भेट देणे.
संदर्भ:-
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग ( शासन निर्णय क्रमांक – आरईएस १०.१००१ / प्र.क्र .१२२ / सेवा १ दिनांक -११/१२/२००१ )