उच्च रक्तदाब कारणे, लक्षणे, उपाय, आहार, Hypertension Meaning in Marathi

Symptoms in Marathi, Hypertension Meaning in Marathi, Hypertension in Marathi, Hypertension Diet in Marathi, Causes of hypertension in Marathi, Treatment of Hypertension in Marathi,

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

उच्च रक्तदाब म्हणजे काय?

Hypertension Meaning in Marathi, Hypertension in Marathi, High Blood Pressure in Marathi:-

प्रवाहित होतांना रक्ताचा रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर व हृदयावर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब होय.

शरीरातील विविध अवयवांना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी मर्यादित रक्तदाब आवश्यक आहे . रक्तदाब वाढल्यास किंवा कमी झाल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात .

रक्तदाब सामान्य व असामान्य पातळी:-

Normal Blood Pressure Level in Marathi, Blood Pressure Level in Marathi:-

जागतिक आरोग्य संघटनेनुसार एखाद्या व्यक्तीत रक्तदाबाचे प्रमाण दृदय आकुंचन अवस्थेत १४० मि.मी. ( पा-याचे ) व दृदय- प्रसरण अवस्थेत ९० मि.मी. ( पा-याचे ) पेक्षा अधिक आढळल्यास त्यास उच्च रक्तदाबाचा विकार झाला असे म्हणावे .

प्रकारसिस्टोलिक रक्तदाब डायस्टोलिक रक्तदाब
सामान्य (नॉर्मल)१२० पेक्षा कमी आणि ८० पेक्षा कमी
रक्तदाब पूर्व स्थिती १२० ते १३९ किंवा ८० ते ८ ९
उच्चरक्तदाब पायरी १४० ते १५९ किंवा ९ ० ते ९९
मध्यम उच्चरक्तदाब १६० किंवा १००
Normal Blood Pressure Level in Marathi, Blood Pressure Level in Marathi

उच्च रक्तदाबाची कारणे :-

Causes of Hypertension in Marathi, Hypertension Causes in Marathi, High BP Causes in Marathi:-

 1. अज्ञात कारणामुळे उद्भवणारा रक्तदाब ( Idiopathic ) – ९ ५ टक्के रुग्णात .
 2. शरीरातील इतर अवयवांच्या व्याधीमुळे उद्भवणारा उच्चरक्तदाब , यात मूत्रपिंडाचे विकार , अनुवंशिकतेने आढळलेली अरुंद मुख्य रोहिणी , अधिवृक्कीय ग्रंथीचे विकार , इ .५ टक्के रुग्णात .

रक्तदाब समस्या :-

विकसित देशात १० ते २० टक्के लोकांचा हृदय प्रसरण अवस्थेतील (डायस्टोलिक) रक्तदाब ९ ० मि.मी. ( पा-याचे ) पेक्षा जास्त आढळतो. भारतात हे प्रमाण शहरी भागात ६ ते ७ टक्के व ग्रामीण भागात ३.५ ते ४ टक्के आढळते .

उच्च रक्तदाबामुळे लकवा , दृदय – धमन्याचे विकार उद्भवतात तसेच हृदय व मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढते . उच्च रक्तदाबामुळे मृत्यू पावणा-या व्यक्तीत दृदय विकाराचे प्रमाण विकसित राष्ट्रात अधिक आढळते. जपान , तैवान , भारत या देशात उच्चरक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फाटून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे . मागील दोन दशकापासून उच्चरक्तदाब व गुंतागुंतीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे . स्त्रियांमध्ये पुरुषाचे तुलनेत मृत्यूचे प्रमाण अधिक आहे . उच्च रक्तदाबाचे नियंत्रण करण्याकरिता प्रभावी औषधे उपलब्ध आहेत .

उच्च रक्तदाब नियंत्रक घटक :-

How to control High BP in Marathi:-

अटळ किंवा टाळता न येणारी:-

 • अ ) वय :- रक्तदाब वयाबरोबर वाढतो . ही वाढ उच्च रक्तदाबाने पीडित असलेल्या रुग्णात जास्त.
 • ब ) अनुवांशिकता :- आई किंवा वडिलास उच्च रक्तदाबाचा विकार असेल तर मुलांना उच्च रक्तदाबाची प्रक्यता ३ टक्के असते , दोघांनाही विकार असल्यास ही प्रक्यता ४५ टक्के असते . टाळता येण्याजोगे घटक :
 • क ) लट्ठपणा / मेदवृध्दी :- लठ्ठ व्यक्तींना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते . जितके जास्त वजन तेवढी शक्यता जास्त .
 • ड ) मिठाचे सेवन :- मीठ सेवनाचे प्रमाण वाढल्यास रक्तदाब वाढते ( दर दिवशी ‘ गॅम पेक्षा जास्त ) आदिवासी व्यक्ती मिठाचे सेवन कमी प्रमाणात करतात त्यांना रक्तदाबाचा विकार कमी प्रमाणात आढळतो
 • इ ) आहारातील चरबीचे प्रमाण :- आहारात प्राणीजन्य चरबीच्या अधिक सेवनाने रक्तातील चरबीचे प्रमाण व रक्तदाब वाढतो .
 • ई ) मद्य :- मद्यामुळे हृदयाच्या आंकुचन अवस्थेतील रक्तदाब वाढतो . मद्य न घेतल्यास रक्तदाब सामान्य होतो
 • ए ) व्यायाम :- यामुळे वजन नियंत्रणात राहून रक्तदाब कमी होतो .
 • ऐ ) पर्यावरणाचा परिणाम :- शारीरिक व मानसिक ताण तणावामुळे उच्च रक्तदाबाचा विकार होतो . यामध्ये मज्जासंस्थेच्या ( Sympathetic ) उत्तेजनामुळे रक्तदाब वाढतो ,
 • ओ ) इतर घटक :- तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळयामुळे काही स्त्रियात रक्तदाब वाढतो. तसे इस्ट्रोजन , हायड्रोकॉर्टिसोन हया औषधी उपायांनी देखील रक्तदाब वाढतो . ध्वनी व कंपन, वातावरणाचे तापमान व आर्द्रता यावर देखील रक्तदाब अवलंबून आहे.

प्रतिबंधनात्मक उपाय : प्राथमिक स्तरावर:-

Prevention of Hypertension High BP in Marathi:-

अ ) समाजासाठी ब ) जोखमी गटासाठी प्राथमिक प्रतिबंधनात रोगाचे समाजामधील प्रमाण कमी करण्यासाठी रोगास कारण ठरणारे घटक कमी करण्याच्या प्रयत्नांचा अंतर्भाव होतो .

प्राथमिक स्तर प्रतिबंधन :-

अ ) समाजासाठी उपाययोजना :-

उच्च रक्तदाब सामान्य स्तरावर आणल्यास हृदयरोग व पंगुत्वाचे प्रमाण फार कमी होते . त्यासाठी औषधाव्यतिरिक्त अनेक उपाययोजना आहेत . त्यापैकी काही खालीलप्रमाणे :

 • आहार :-
  • मिठाचे प्रमाण रोज ५ ग्रॅम पेक्षा कमी ठेवणे .
  • चरबीचे आहारात अल्प सेवन करणे.
  • मद्य टाळणे व शरीराला गरज असतील तेवढाच उष्मांक पुरवठा आहारातून व्हावा .
 • वजन कमी करणे :-
  • वजन उंचीच्या प्रमाणात ठेवणे .
  • लठ्ठपणा कमी करणे ,
 • नियमित व्यायाम :-
  • यामुळे रक्तातील चरबीचे प्रमाण घटते .
 • वागणुकीतील बदल :-
  • मानसिक ताण तणाव कमी ठेवणे, धूम्रपान कमी करणे , योगाभ्यास , ध्यान धारणा , यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास फायदा होतो .
 • आरोग्य शिक्षणः-
  • लोकांना उच्च रक्तदाबाच्या कारणांची माहिती देणे व ते कमी करण्यासाठी वर्तणुकीतील बदलाची माहिती देणे .
 • स्वतःची काळजी स्वतःघेणे :- रुग्णास स्वतःचा रक्तदाब मोजून त्याचा अहवाल ठेवणे शिकविण्यात येते .

ब ) जोखमी गटासाठी उपाययोजना:-

रक्तदाब सामान्य रहावा यासाठी आवश्यक काळजीची माहिती देणे. कुटुंबात उच्च रक्तदाब असलेल्या सदस्यांची तपासणी करुन उपचार घेण्यास प्रवृत्त करणे व उच्च रक्तदाबाने पीडित रुग्णास औषधोपचार नियमित सुरु ठेवण्यास प्रवृत्त करणे.

व्दितीय स्तर प्रतिबंधन :-

 1. समाजातील उच्च रक्तदाब पीडितांचा शोध घेणे व औषधाव्दारे रक्तदाब नियंत्रित करणे रोगी लवकर शोधून काढणे.
 2. ब-याच वेळा उच्च रक्तदाब पीडित रुग्पाला कोणतेही लक्षण आढळत नाही. त्यामुळे नवीन रुग्ण कसे शोधावे हा एक प्रश्नच आहे. सर्वांचा रक्तदाब मोजपे शक्य नाही.
 3. त्यामुळे जनतेत जागरुकता आपणे एवढाच एक पर्याय राहतो व त्यासाठी सर्व लोकांना आरोग्य शिक्षण देण्यात यावे.

उच्च रक्तदाब उपचार:-

Treatment of High Blood Pressure in Marathi, Hypertension Treatment in Marathi:-

रक्तदाब १४० / ९ ० मि.मी. पातळीच्या खाली राहील. प्रचलित धोरणानुसार सौम्य रक्तदाबाचा सुध्दा उपचार करावयास पाहिजे . रक्तदाब नियंत्रित केल्यास लुळेपणा , हृदयरोग व इतर गुंतागुंत टळते . रुग्णाने औषधोपचार नियमित घेतल्यास उच्च रक्तदाबास आळा घालता येतो .

अति रक्तदाबाचा औषधोपचार हा तज्ज्ञ डॉक्टराकडूनच घ्यावा. एकदा का हा रक्तदाब नॉर्मल (योग्य) पातळीवर आला की मग वाटले तर रक्तदाबाचे मोजमाप करण्यासाठी नियमितपणे आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाण्यास काही हरकत नाही. मध्ये मध्ये हृदयतज्ज्ञ डॉक्टरकडे जाणे योग्य आहे.
वैद्यकीय औषधोपचाराबद्दल मी इथे विशेष काही लिहीत नाही, कारण हा व्यक्तिसापेक्ष असतो. प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारची औषधे वेगवेगळ्या प्रमाणात द्यावे लागतात. दहापेक्षा अधिक वेगवेगळ्या औषधांचे ग्रुप आहेत. त्यातून योग्य व्यक्तीसाठी योग्य औषधे योग्य प्रमाणात निवडणे हे तज्ज्ञ डॉक्टरचे काम आहे.


रक्तदाब कमी करण्यासाठी ज्या औषधाव्यतिरिक्त गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्या खालीलप्रमाणे आहेत.

१) मिठाचा उपयोग कमी प्रमाणात करावा –

Low Salt Diet in Marathi:-

मिठाचा अतिरेक टाळावा. बऱ्याच लोकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय अतिरक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फार धोकादायक आहे. दररोज जेवणात फक्त तीन ते पाच ग्रॅम मिठाचाच वापर करावा. लिंबाचा रस, मिरे, मोहरी, जिरे या पदार्थाचे सेवन केल्यास मिठाची उणीव भासणार नाही.

२) धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन टाळा

अतिरक्तदाबाचे हृदयावर होणारे दुष्परिणाम हे धूम्रपानामुळे वाढतात. ते लवकर व अधिक प्रमाणात होतात. धूम्रपान करणाऱ्या रुग्णांना औषधांचा सुद्धा जास्त डोस (मात्रा) लागतो. त्यामुळे धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळावे.

३) वजन कमी करणे

Weight Loss to Control High BP in Marathi:-

 • वजन कमी केल्याने थोडय़ा फार प्रमाणात रक्तदाब कमी होतो. अतिरिक्त वजन म्हणजे हृदयाला अतिरिक्त काम करावे लागते. चरबीच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. हा अतिरिक्त बोजा हृदयाला हानीकारक होऊ शकतो.
 • स्थूल व्यक्तींच्या रक्तामध्ये कॉलेस्टेरॉल (रक्तातील एक चरबी)चे प्रमाण जास्त असते. ते कालाप्रमाणे रक्तवाहिन्यांत जमा होत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद व टणक बनतात. तसेच त्यांचा लवचीकपणा कमी होतो. या कारणांमुळे हृदयविकार व अतिरक्तदाब होतो.

४) उच्च रक्तदाब आहार Hypertension Diet in Marathi:-

Diet Chart for Hypertension in Marathi, High BP in Marathi:-

वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात पालेभाज्या, भाज्यांची कोशिंबीर, गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, कच्च्या भाज्यांची सॅलाड भरपूर प्रमाणात खावीत. ताजी फळे खावीत. भात, वरण, भाजी, पोळय़ा असा सात्त्विक आहार योग्य प्रमाणात दोन वेळा योग्य वेळी घ्यावा.

 • पोळय़ांना तूप किंवा तेल लावू नये. तळलेल्या पदार्थाचे सेवन टाळावे.
 • दुधाचा, मलाईचा अतिरेक टाळावा. चहा-कॉफी व इतर उत्तेजक टाळावे.
 • केक, आईक्रीम, चॉकलेट, मिठाई, जाम, बटर, चीज, सुकामेवा, दारू टाळावी.
 • मांसाहार कमीत कमी करावा. जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत.
 • कॅल्शियम व पोटॅशियम क्षार यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा.

5) उच्च रक्तदाब व्यायाम आणि योगासने Yoga and Exercise for Hypertension in Marathi:-

 • वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत व्यायाम-योगासने करणे आवश्यक आहे.
 • व्यायाम आणि योगासने केल्याने वाढलेला रक्तदाब हा कमी करता येतो. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.
 • भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, एरॉबिक्स, धावणे हे व्यायामाचे प्रकार अतिरक्तदाबाच्या व्यक्तीला अत्यंत फायदेशीर आहेत (या सर्व प्रकारांना आयसोटोनिक ISOTONIC EXERCISE असे म्हणतात). यात हृदयाची कार्यक्षमता व सहनशक्ती वाढते आणि रक्तवाहिन्यांतून रक्त वेगाने धावून रक्तवाहिन्यांची RIGIDITY (कठिणीकरणाची प्रक्रिया) सुद्धा कमी होते.
 • अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी वजन उचलण्याचे व्यायाम, दंडबैठका, सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम करू नयेत.
 • योगासने करणे लाभदायक असते. विशेषत: शवासन, पद्मासन, योगमुद्रा, धनुरासन, कोनासन करावे. यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षकाची मदत घ्यावी. ज्यात मस्तक खाली राहते व पाय वर असतात, अशी आसने (शीर्षांसन) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी करू नये.
 • योगा’ या जीवनशैलीचा फायदा रक्तदाबाच्या रुग्णांना होतो. त्यातील प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या गोष्टींमुळे अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते. यांना ‘मेडिटेशन’ असे म्हणतात.

6) ताण-तणाव कमी करणे Stress Management in Marathi:-

 • उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मानसिक ताण-तणाव कमी करणे आवश्यक आहे. अवाजवी काळजी (TENSION) किंवा तणाव घेणे म्हणजे रक्तदाब वाढवणे.
 • नेहमी हसतमुख राहणे, मन कुठे ना कुठे रमवणे, आपल्याला आवडेल आणि परवडेल असा काही छंद करावा.
 • अतिमहत्त्वाकांक्षी, असमाधानी, नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब सहसा जास्तच असतो.
 • त्यामुळे आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून कर्मयोगी व्हावे. म्हणजेच फळाची इच्छा-अपेक्षा न राखता नियतकार्य करणे. त्याच्या परिणामाची दखल योग्य प्रमाणातच घ्यावी. पुन्हा प्रयत्न करावे.
 • क्रोधाची-संतापाची हकालपट्टी करावी. राग-लोभ-मत्सर यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वत:ची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करावा. चांगली पुस्तके, चांगली व्याख्याने, चांगली संगत ठेवावी.
 • मनावरील ताण हलका करण्यासाठी श्वसनाचे काही व्यायाम आहेत. ते केल्यास मन स्थिर व शांत राहण्यास मदत होते. ते विचलित होत नाही. खंबीर राहते.
 • दररोज सात ते आठ तास रात्री शांत झोप घ्यावी. त्यासाठी झोपेच्या गोळय़ा घेऊ नयेत.
 • आठवडय़ाच्या सहा दिवसांचा ताण घालवण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा भरपूर उपयोग घ्यावा.
 • मन रमेल आणि नेहमीच्या कामाचा विसर पडेल असे काही करण्यात भर द्यावा.
 • परिवारासोबत बाहेर फिरायला जाणे, पर्यटन करणे म्हणजे मनातील मरगळ झटकून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करावी.

‘आहार-विहार-विचार-आचार’ यांच्यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनांना दूर ठेवावे. मद्यपान, धूम्रपान टाळावे. ‘HURRY, WORRY, CURRYX’ या गोष्टी आजाराला निमंत्रण देतात. या टाळण्याचा प्रयत्न करावा. या सर्व गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष दिल्यास आपण सर्व दीर्घायुषी व्हाल यात शंकाच नाही.

hypertension meaning in marathi, hypertension in marathi, hypertension diet in marathi, उच्च रक्तदाब, उच्च रक्तदाब कमी करण्याचे उपाय, उच्च रक्तदाब आहार, उच्च रक्तदाब लक्षणे, उच्च रक्तदाब आयुर्वेदिक उपचार,

Symptoms in Marathi, Hypertension Meaning in Marathi, Hypertension in Marathi, Hypertension Diet in Marathi, Causes of hypertension in Marathi, Treatment of Hypertension in Marathi,

Copyright Material Don't Copy © 2021