आजारांची माहिती

इन्फ्ल्युएन्झा लस सर्व माहिती, Influenza Vaccine Meaning in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

सर्व मुलांना ( तसेच गरोदर माता, अतिजोखमीच्या व्यक्तींना ) इन्फ्लूएन्झा ( Influenza Vaccine in Marathi ) लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्कफोर्स आणि नव्याने स्थापन केलेल्या पीडियाट्रिक टास्कफोर्सने राज्य सरकारला दिला आहे. दोन्ही टास्कफोर्समधील डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे आवाहन केलं. इन्फ्लूएन्झाची ( Influenza Vaccine in Marathi ) लस दिल्यास कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, ज्यामुळे रुग्णालयांवरचा ताण कमी होईल, असं डॉक्टरांनी म्हटलं.

इन्फ्लूएन्झा लसीमध्ये ‘इन्फ्लूएन्झा ए’चे दोन उपप्रकार आणि इन्फ्लूएन्झा बीचे दोन उपप्रकार असतात. या लसीचे डोस मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या लसींचा हा भाग नाही. या लसीच्या एका डोसची किंमत 1,500 ते 2,000 रुपये आहे.

इन्फ्ल्युएन्झा लस कोणाला द्यावी ?

महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीने निर्देशित केल्याप्रमाणे इन्फल्यूएंझा लसीकरण खालील अतिजोखमीच्या व्यक्तींना द्यावयाचे आहे.

  • सहा महिने ते ९ वर्षे वयाच्या बालकांना इन्फ्ल्युएन्झा ( Influenza Vaccine in Marathi ) या लसीचे २ डोस एक महिन्याच्या अंतराने द्यावेत.
  • दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील गरोदर माता यांना इन्फ्ल्युएन्झा ( Influenza Vaccine in Marathi ) या लसीचा एक डोस द्यावा.
  • उच्चरक्तदाब आणि / किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्ती यांना इन्फ्ल्युएन्झा ( Influenza Vaccine in Marathi ) या लसीचा एक डोस द्यावा.
  • फ्ल्यू रुग्णांची तपासणी , देखभाल आणि उपचारात सहभागी डॉक्टर्स , नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी यांना इन्फ्ल्युएन्झा या लसीचा एक डोस द्यावा.

इन्फ्ल्युएन्झा लसीचा प्रकार व माहिती Influenza Vaccine Meaning in Marathi

इंजेक्शनव्दारे द्यावयाची त्रिगुणी किंवा चतुर्गुणी इन्फल्यूएन्झा लस ( ट्रायबॅलेन्ट / कॉड्रवेलेट इनअॅक्टीवेटेड इन्फ्ल्युएन्झा व्हॅक्सीन ) इन्फ्ल्युएन्झा लसीकरण मोहिमेसाठी पुरविण्यात आलेली त्रिगुणी लस इन्फ्ल्युएन्झा विषाणूच्या इन्फ्ल्युएन्झा ए प्रकारातील दोन उपजाती , एच १ एन १ व एच ३ एन २ तसेच इन्फ्ल्युएन्झा बी विषाणूविरुध्द कार्य करते. Influenza Vaccine Meaning in Marathi

ही लस इन्फ्ल्युएन्झा लशीच्या तीन उपजातीविरुध्द ( इन्फ्ल्युएन्झा एच १ एन १ , इन्फ्ल्युएन्झा एच ३ एन २ तसेच इन्फ्ल्युएन्झा बी ) गुणकारी आहे. वातावरणातील इन्फ्ल्युएन्झा विषाणू आणि लसीमध्ये वापरण्यात आलेला विषाणू यांच्यात जनुकीय साम्य असल्यास ही लस ७० – ९ ० % उपयुक्त ठरते.

इन्फ्ल्युएन्झा लसीचे फायदे Use of Influenza Vaccine in Marathi

  1. इन्फ्ल्युएन्झा लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात इन्फल्यूएन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवडयाचा कालावधी लागतो.
  2. याप्रकारे मिळालेली प्रतिकार शक्ती अधिकात अधिक एक वर्षापर्यंत टिकू शकते. त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक ठरते.

इन्फ्ल्युएन्झा लस कशी दयावी ?

  • इन्फ्ल्युएन्झा लस ही सिंगल डोस प्री फिल्ड सिरीज स्वरुपात पुरविण्यात आली आहे.
  • लसीचा डोस ०.५ मिली आहे.
  • ही लस इन्ट्रामस्कुलर देण्यात यावी.
  • गरोदर मातेला धनुर्वात प्रतिबंधक लस दयावयाची असल्यास या दोन लशी वेगवेगळया ठिकाणी ( वेगवेगळया हाताला ) देण्यात याव्यात.

इन्फ्ल्युएन्झा लसीचा साठा कसा करावा ?

  • ही लस आय.एल.आर. मध्ये २ सेल्सिअस ते ८ ° सेल्सिअस तापमानामध्ये ठेवावी.
  • सदरची लस कोणत्याही परिस्थितीत डीप फ्रिजरमध्ये ठेवू नये.

इन्फ्ल्युएन्झा लस देताना घ्यावयाची दक्षता

  • लसीमध्ये असलेल्या क्रियाशील घटकाची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींना ही लस देऊ नये.
  • लसीकरण लाभार्थीस ताप अथवा संसर्गाची लक्षणे असल्यास अशा व्यक्तीचे लसीकरण ती व्यक्ती पूर्णपणे बरी होईपर्यंत पुढे ढकलावे.
  • लसीकरण लाभार्थीनी आपण घेत असलेल्या अथवा नुकत्याच घेतलेल्या औषधांची / इतर लसींची माहिती देणे आवश्यक आहे.
  • लसीकरण लाभार्थी स्टिरॉईडस् अथवा सायटोटॉक्सीक औषधे घेत असेल तर प्रतिकारशक्ती निर्माण होण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात.
  • लसीकरणानंतर उदभवणाऱ्या प्रतिक्रिया लसीकरणानंतर काही व्यक्तींना सर्वसाधारण पुढील प्रतिक्रिया उदभवू शकतात.
  • डोकेदुखी . / घाम येणे . – स्नायू अथवा सांध्यांमध्ये वेदना . ताप , बरे न वाटणे , थंडी वाजणे , थकवा . – स्थानिक प्रतिक्रिया – लसीकरण दिल्याचे जागी व अवतीभोवती लालसरपणा , सूज , वेदना. सर्वसाधारणपणे या प्रतिक्रिया उपचाराशिवायही एक ते दोन दिवसात कमी होतात.
  • यासर्वसामान्य प्रतिक्रियांशिवाय काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये गंभीर स्वरुपाची अॅलर्जीक प्रतिक्रिया , गुलीन बारी सिंड्रोम , रक्तपेशी कमी होणे अथवा इतर प्रतिक्रियाही आढळू शकतात.
  • अधिक माहितीसाठी लसीसोबत उत्पादकाने दिलेल्या माहितीपत्रकाचा अभ्यास करावा.
  • नियमित लसीकरणाप्रमाणेच इन्फल्यूएन्झा लसीकरणानंतर उदभवणाऱ्या प्रतिक्रियांची ( ए.ई.एफ.आय. ) माहिती राज्य तसेच केंद्र सरकारला कळविणे बंधनकारक आहे.
Influenza Vaccine Meaning in Marathi, Use of Influenza Vaccine in Marathi, इन्फ्ल्युएन्झा लस सर्व माहिती, Influenza Vaccine Meaning in Marathi, इन्फ्ल्युएन्झा लस, Influenza Vaccine in Marathi, Flu Vaccine in Marathi,

इन्फ्ल्युएन्झा लसीकरण – कार्यपध्दती

  1. सदर इन्फल्यूएंझा लसीकरण हे ऐच्छिक स्वरुपाचे आहे .
  2. आपल्या जवळच्या सर्व ग्रामिण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयात इन्फल्यूएंझा लसीकरण सुरु आहेत.
  3. प्रत्येक लसीकरण केंद्राच्या ठिकाणी खालीलप्रमाणे ठळक बोर्ड लावलेला असतो.
    1. इन्फल्यूएंझा मोफत लसीकरण केंद्र : ( गरोदर माता , मधुमेही , उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण उपलब्ध )
    2. बाहय रुग्ण विभागाच्या वेळेत सदर लसीकरण उपलब्ध राहील , याची दक्षता घ्यावी .
    3. गरोदर मातांसाठी ज्या ज्या ठिकाणी ये.एन.सी. क्लिनिक घेण्यात येते , तिथेही इन्फल्यूएंझा लसीकरणाची सुविधा उपलब्ध असते.
  4. गरोदर मातेच्या ए.एन.सी. कार्डवर फल्यू लसीकरणाची नोंद करण्यात येते.
  5. लसीकरण सत्राच्या ठिकाणी संभाव्य प्रतिक्रियावर उपचार देण्यासाठी इमर्जन्सी ट्रे तयार असतो तसेच तातडीच्या रुग्ण व्यवस्थापनाकरीता आवश्यक साधने व उपकरणे उपलब्ध असतात.
  6. प्रत्येक महानगरपालिकेने इन्फल्यूएंझा लस त्यांच्या पातळीवर खरेदी करतात, आवश्यकता असल्यास त्यांनाही लससाठा राज्य व केंद्र सरकार कडून देण्यात येतो. महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र कार्यरत असणे , आवश्यक आहे .
  7. प्रत्येक जिल्हयातील लसीकरण केंद्राची स्थानिक स्तरावर जाहिरात करावी , वैद्यकीय अधिकारी , आरोग्य कर्मचारी यांच्या सोशल मिडिया ग्रुपवरुन त्या संदर्भात माहिती द्यावी.

Influenza Vaccine Meaning in Marathi, Use of Influenza Vaccine in Marathi, इन्फ्ल्युएन्झा लस सर्व माहिती, Influenza Vaccine Meaning in Marathi, इन्फ्ल्युएन्झा लस, Influenza Vaccine in Marathi, Flu Vaccine in Marathi

Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023