अनुक्रमणिका
मूत्र उत्सर्जन संस्था ( Urinary System ) प्रस्तावना :-
मानवी शरीराच्या विविध प्रक्रियेत विविध आवश्यक तसेच अनावश्यक पदार्थ तयार होतात. अनावश्यक पदार्थ शरीराबाहेर फेकल्या गेले नाही तर शरीरात जमा होऊन विकृती निर्माण होईल. काही अवयवांद्वारे व संस्थेद्वारे अनावश्यक पदार्थ शरीराबाहेर फेकल्या ( उत्सर्जित ) जाण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन म्हणतात. शरीराच्या चयापचयाच्या क्रियेत प्रथिने , पिष्टमय व स्निग्ध पदार्थाचे प्राणवायूच्या संयोगाने ज्वलन होऊन उर्जा , कर्बवायू , पाणी , यूरिया , यूरिक आम्ल , द्रव रुपातील नत्र पदार्थ ( Non Gaseous Nitrogenous waste product ) तयार होतात .
- १ ) लाल रक्त पेशीचा ( RBC ) कार्यकाळ संपल्यानंतर त्याचे विघटन होऊन पित्तकण प्लीहामध्ये वेगळे होऊन पित्तरंगे मलमूत्रातून उत्सर्जित होतात .
- २ ) श्वसन संस्थेद्वारे कर्बवायू व पाणी , त्वचेतून क्षार व पाणी , मोठया आतडयातून मल ( विष्ठा ) व पाणी उत्सर्जित होते
- ३ ) जास्तीचे पाणी , यूरिया , यूरिक आम्ल , द्रव रुपातील नत्र पदार्थ , तसेच काही औषधी , शरीराकरिता अनावश्यक असलेले पदार्थ मूत्रपिंडात रक्तातून वेगळे करुन मूत्र रुपाने उत्सर्जित केल्या जातात.
विविध अवयव मिळून मूत्र उत्सर्जित होत असल्यामुळे संबंधित सर्व अवयवांना मूत्र उत्सर्जनसंस्था म्हणतात .
मूत्र उत्सर्जन संस्थेतील अवयव ( Organs of family system ) खालीलप्रमाणे आहेत.
- मूत्रपिंड ( Kidneys in Marathi ) ————————– 2
- मूत्रवाहिन्या ( Ureters in Marathi ) ———————– 2
- मूत्राशय ( Urinary bladder in Marathi ) —————– 1
- मूत्रनलिका ( Urethra ) ———————————— 1
मूत्र उत्सर्जन संस्थेतील अवयवांची रचना व कार्ये :-
१. मूत्रपिंड ( Kidney ) :-
मूत्रपिंड रचना ( Kidney Anatomy in Marathi ):-
- आकार – काजूच्या किंवा घेवडयाच्या बियासारखे असून रंग तपकिरी लालसर असतो व वजन १२५ ते १७० ग्रॅम असते. उदर पोकळीत मागच्या बाजूस कमरेच्या मणक्याच्या दोन्ही बाजूस एक एक मूत्रपिंड असते .
- उदरपोकळीच्या उजव्या भागात यकृत ग्रंथी असल्याने उजवे मूत्रपिंड डाव्या मूत्रपिंडाच्या तुलनेत थोडे खाली असते . प्रत्येक मूत्रपिंडाची तीन आवरणे असतात –
मूत्रपिंडाची ढोबळ रचना :-
१ ) बाहय ( Gray ) तंतू पडद्याचे
२ ) मध्य – चरबीचे
३ ) आंतर – श्वेत तंतू पडद्याचे .
मूत्रपिंडाचा बाह्य भाग वक्राकार असून आतील भागात खाच ( Pilum ) असते . खाचेत निला , रोहिणी व मूत्र वाहिनी असते . मूत्रपिंडाचा उभा छेद घेतल्यास दोन भाग पडतात .
१. बाहय ( Cortex ) २ ) आतील ( Medulla ) . या दोन्ही भागात मूत्र गाळण्या ( Nephrons ) व मूत्र गोळा करणा-या नलिका ( Collecting drts ) असतात . प्रत्येक मूत्रपिंडात दहा लाखापेक्षा जास्त मूत्र गाळण्या असून त्या अतिसूक्ष्म व पातळ असतात . नलिकेचे विविध भाग असून सुरवातीचा भाग चहा गाळणीसारखा असतो . हयात केशवाहिन्यांचा गुच्छ असतो .
मूत्र गाळणीचे शेवटचे टोक मूत्र गोळा करणा-या नलिकेत उघडतात . शंकु तंतू आवरण शंकूचे टोक मुत्र गोळा करणारी नासिका मुत्रपिंड मूत्रपिंडाचा उभा छेद कार्य : १. अतिरिक्त पाणी , विविध दूषित पदार्थ , खनिज पदार्थ व काही औषधे शरीराबाहेर टाकणे .
२. शरीराला आवश्यक पाणी , क्षार , ग्लुकोज वगैरे मूत्र गाळणीच्या विविध भागातून शोषून रक्तात परत आणणे . ( अल्डोस्टेरॉन व जलरोधक संप्रेरकाच्या सहाय्याने )
३. शरीरातील पाण्याचे व क्षारांचे संतुलन ठेवून रक्तदाब नियंत्रित ठेवणे .
४. रक्ताला आम्लारी ठेवणे .
५.जीवनसत्व ” ड ” चे चयापचय करणे .
६.लाल रक्त पेशींच्या निर्माण कार्यात सहाय्य करणे .
७. रक्तदाब कमी झाल्यास मूत्रपिंडातून रेनीन स्वाव निघतो , त्यामुळे रक्तदाबाचे नियंत्रण होते.
२. मूत्रवाहिनी ( Ureter in Marathi ) :-
मूत्रवाहिनी रचना ( Ureter Anatomy in Marathi ) :-
मूत्रवाहिनी आकारमान – मूत्रवाहिनीचा वरचा भाग पसरट असून मूत्रपिंडाच्या खाचेतून द्रोणिकेसोबत जुडलेला असतो . खालचा भाग निमुळता होऊन मूत्राशयात उघडतो .
मूत्रवाहिनीची तीन आवरणे असतात –
१ ) बाह्य -संयोगी पेशीजालाचे
२ ) मध्य – अनैच्छिक स्नायूंचे
३ ) आतील- परिवर्तीय पेशीजालाचे .
मूत्रवाहिनी कार्य ( Ureter Function in Marathi ) :-
मूत्र वाहिनीतील अनैच्छिक स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणामुळे मूत्रपिंडाच्या द्रोणिकेमध्ये गोळा झालेले मूत्र मूत्राशयात आणले जाते .
३. मूत्राशय ( Urinary Bladder in Marathi ) :-
मूत्राशय रचना ( Urinary Bladder Anatomy in Marathi ) :-
- शंकूच्या आकाराची त्रिकोणी पिशवी असून तिची क्षमता ७०० ते ८०० मि . ली . असते.
- मूत्राशय कटीपोकळीच्या हाडाच्या मागच्या भागात स्थित असून मूत्राशयाच्या वरच्या भागात दोन्ही मूत्र वाहिन्या उघडतात .
- मूत्राशयाच्या खालच्या टोकात मूत्र नलिकेचे द्वार असते .
- मूत्राशयाच्या भिंतीत स्नायूंची तीन आवरणे असतात .
स्त्री आणि पुरुषाच्या मूत्राशयातील फरक ( Difference Between Male and Female Urinary Bladder in Marathi ) :-
स्त्री मूत्राशय Female Urinary Bladder in Marathi | पुरुष मूत्राशय Male Urinary Bladder in Marathi |
मूत्राशयाच्या मागे गर्भाशय असून मलाशय गर्भाशयाच्या मागे असते असते. | मूत्राशयाच्या मागील भागात मलाशय मूत्राशयाच्या खालील भागात मूत्र नलिकेला पुरस्थ ग्रंथींचा विळखा असतो. |
,
मूत्राशयाला चेतातंतूचा पुरवठा ( Nerve supply of Urinary Bladder in Marathi ) :-
- १. अनुकंपी ( Sympathetic Neve )
- २. परानुकंपी ( Parasympathetic Nerve )
मूत्राशय कार्य ( Urinary Bladder Function in Marathi ) :-
- मूत्रपिंडातून आलेले मूत्र तात्पुरते साठविणे .
- आम्ल मूत्रापासून मूत्राशयाचे रक्षण करणे .
- पाण्याचे शोषण करुन शरीरातील पाण्याचे संतुलन ठेवणे
४. मूत्रनलिका ( Urethra in Marathi ) :-
मूत्रनलिका रचना ( Urethra Anatomy in Marathi ) :-
- मूत्रनलिका ( Urethra in Marathi ) मूत्राशयाच्या खालच्या टोकातून निघते.
- पुरुषात ७ ते ९ इंच लांब असून शिश्नातून शिश्नमणीच्या टोकात उघडते .
- स्त्रियात – १.५ इंच लांब असून योनीच्या वरच्या भागात उघडते .
- मूत्राशयाच्या मानेच्या तसेच मूत्र नलिकेच्या उगमासभोवार गोलाकार स्नायूंचे जाड थर ( Sphimcter ) असतात .
- हया थरामुळे स्नायूद्वार निर्माण होते .
मूत्रनलिका कार्य ( Urethra Function in Marathi ) :-
१ ) मूत्र विसर्जन करणे .
२ ) पुरुषात संभोगानंतर वीर्य बाहेर टाकणे .
मूत्र गाळण्याची क्रिया ( Urine Filtration in Marathi ) :-
- मूत्रपिंडात येणा-या रोहिणीच्या व्यासापेक्षा बाहेर निघणा-या रोहिणीचा व्यास कमी असतो . त्यामुळे केसवाहिन्यांच्या गुच्छातील रक्तदाबातील फरकामुळे मूत्र गाळण्याची क्रिया होते .
- २४ तासात दोन्ही मूत्रपिंडात १७०० लिटर रक्त प्रवाहित होते . त्यापैकी १७० लिटर द्रव , दूषित व जड पदार्थ मूत्र गाळण्यातून गाळले जातात . त्यातील १६८.५ लिटरचे रक्तात शोषण होऊन दीड लिटर द्रव , दूषित पदार्थासोबत मूत्र रुपात बाहेर टाकल्या जाते .
मूत्र विसर्जन ( Micturition in Marathi ) :-
- अनुकंपी चेतातंतूमुळे मूत्राशयाच्या स्नायुंचे ( Sphincter ) प्रसरण होते व मूत्राशय द्वाराचे आंकुचन होते त्यामुळे लघवी होत नाही .
- २०० ते ४०० मि.ली.मूत्र मूत्राशयात साठल्यानंतर मूत्र बाहेर टाकण्यासाठी मेंदू व चेतातंतूकडे संवेदना पाठविल्या जातात .
- परानुकंपी चेतातंतूमुळे मूत्राशयाच्या स्नायूंचे आंकुचन व मूत्राशयद्वाराचे प्रसरण होऊन लघवी होते .
लघवीवरील नियंत्रण Urination Control in Marathi ) :-
लहान मुलात बिछान्यात लघवी ( Nocturnal Enuresis in Marathi ) :-
केंद्रीय चेतासंस्थेचा ( Central Nervous System ) विकास झालेला नसतो. म्हणून लहान मुले नकळत लघवी करतात. रात्री झोपेत घाबरणे , मानसिक असंतुलन किंवा मानसिक ताण वाढल्यास लहान मुले न कळत बिछान्यात लघवी ( Nocturnal Enuresis in Marathi ) करतात .
वृध्द रुग्णात बिछान्यात लघवी ( Nocturnal Enuresis in Marathi ) :-
मज्जा केंद्रांना इजा झाल्यास मूत्राशयद्वाराच्या गोलाकार स्नायूंचे नियंत्रण जाणे , मूत्राशयद्वाराचे स्नायू अशक्त होणे या सर्व प्रकारात स्नायूवरील नियंत्रण होत नसल्यामुळे नकळत लघवी होते .
मूत्रातील घटक (Composition of urine in Marathi) २४ तासात:-
- १ ) पाणी – १.५ लीटर
- २ ) क्षार – १५ ग्रॅम ,
- ३ ) यूरिया + युरिक आम्ल – ३० ग्रॅम