शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

सामान्यत: मासिकपाळी ही प्रत्येक महिन्याला २८ ते ३० दिवसांनी येते. परंतु २१ ते ३५ दिवसांनी येणारी मासिकपाळी/Menstrual cycle हि नॉर्मल मानली जाते. मासिकपाळीच्या चक्रामध्ये रक्तस्रावाची अवस्था Menstrual Phase ४ ते ६ दिवस असते.

मासिकपाळीच्या ( Menstrual cycle ) काळात जननेंद्रियातील काही बदल प्रत्येक महिन्याला क्रमाने पुन्हा-पुन्हा घडत असतात, म्हणून त्याला मासिकपाळीचे चक्र असे म्हणतात.

प्युबर्टी ( Puberty ):-

मुलगी वयात येणे म्हणजे काय? Meaning of Puberty in Marathi?

मुलगी वयात येणे, म्हणजेच वयाच्या १२ ते १६ वर्षाच्या दरम्यान तिला मासिकपाळी सुरू होणे. यालाच ‘ प्युबर्टी ‘ ( Puberty )असेही म्हणतात. Puberty in Marathi

मेनोपॉज ( Menopause in Marathi ):-

मेनोपॉज म्हणजे काय? Menopause meaning in Marathi ?

४५ ते ५० वयोमर्यादेच्या सरासरी काळात मासिकपाळी येणे बंद होते त्यास ‘ मेनोपॉज ‘ ( Menopause ) असे म्हणतात. Menopause in Marathi

मासिक पाळी का व कशी येते?
What happens during the Menstrual cycle in Marathi?

Menstrual cycle in Marathi, Masik Pali, MC in Marathi –

मासिकपाळीच्या अवस्था Menstrual cycle Phase :-

मासिकपाळीच्या चक्रामध्ये प्रत्येक महिन्याला खालील अवस्था क्रमाने घडत असतात .

१ ) रक्तस्रावाची अवस्था ( Menstrual Phase ) :
२ ) पुनरनिर्माण अवस्था : ( Regenerative Phase ) :
३ ) विकास अवस्था ( Proliferative Phase ) :
४ ) बीजोत्सर्ग ( Ovulation ) :
५ ) स्रावीअवस्था ( Secretory Phase ) :

Masik Pali, मासिकपाळीच्या अवस्था Menstrual cycle Phase, Menstrual cycle in Marathi

१ ) रक्तस्रावाची अवस्था Menstrual Phases :

या अवस्थेमध्ये स्त्रीच्या योनिमार्गातून रक्तस्राव होतो. ही रक्तस्रावाची अवस्था सुमारे चार दिवसांची असते . यालाच मराठी मध्ये मासिक पाळी आली असे म्हणतात.
पहिले दोन दिवस जास्त रक्तस्राव होतो. नंतरच्या दोन दिवसात या रक्तकस्रावाचे प्रमाण कमी होते व ४ ते ५ दिंवसांनी रक्तस्राव थांबतो .

२) पुनर्निर्माण अवस्था Regenerative Phase :-

ही अवस्था दोन दिवसांची असते. मासिकपाळीचा रक्तस्राव थांबल्यानंतर या अवस्थेला सुरुवात होते. या अवस्थेत स्ट्रोमासेल्स आणि ग्रंथींची वाढ होऊ लागते आणि क्षतिग्रस्त एंडोमेट्रीयम प्राकृत होते.
जखम भरून येण्याच्या क्रियेप्रमाणे ही क्रिया होऊन दोन दिवसात एंडोमेट्रियमचा पातळ पापुद्रा तयार होतो. ओव्हरीमध्ये इस्ट्रोजनची निर्मिती होते व त्यामुळे ही अवस्था घडून येते.

३) विकास अवस्था Proliferative Phase :-

विकास अवस्था, Proliferative Phase in Marathi, Masik Pali, मासिकपाळीच्या अवस्था Menstrual cycle Phase, Menstrual cycle in Marathi, MC in Marathi

ही अवस्था रिजनरेटिव्ह फेजनंतर सुरू होते. ती ओव्यूलेशन पर्यंत सुरूच असते. म्हणजे जवळ जवळ ती आठ दिवसांची असते. या अवस्थेमध्ये एंडोमेट्रियमची जाडी वाढते. तेथील रक्तवाहिन्यांची व ग्रंथींचीही संख्या वाढून फलितबीजाच्या आगमनाची तयारी पूर्ण होते.
पिच्युटरी ग्रंथीच्या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनचा परिणाम ओव्हरीवर होऊन वाढत्या प्रमाणात इस्ट्रोजनची निर्मिती होते व त्यामुळे ही अवस्था घडून येते .

४) बीजोत्सर्ग Ovulation :-

Ovulation in Marathi –

ओव्हरीमधील एक ग्राफियन फॉलिकल पक्व होऊन पृष्ठभागावर येते व ते फुटून परिपक्व स्त्रीबीज बाहेर पडते. यालाच ओव्हुलेशन असे म्हणतात.
पुढची पाळी येण्याअगोदर चौदाव्या दिवशी ओव्हुलेशन होते.

५) स्रावीअवस्था Secretory Phase :-

Premenstrual Phase in Marathi –

यालाच स्रवण अवस्था असेही म्हणतात. ही अवस्था मासिकपाळीच्या आधी असते.
म्हणून प्रिमेन्स्टुअल फेज ( Premenstrual Phase ) असेही म्हणतात.
या अवस्थेत वाढलेल्या एंडोमेट्रियमची ( गर्भाशयाचा आतील स्तर) जाडी अजून वाढते. म्युकस ग्रंथीची वाढ योग्य प्रमाणात होऊन म्युकस स्रावांचे प्रमाणही वाढते व त्यामुळे फलितबीज रुजण्यासाठी जणू मऊ अशी शय्या तयार होते.

पिच्युटरी ग्रंथीच्या ल्युटिनायझींग हॉर्मोनचा परिणाम होऊन फुटलेल्या ग्राफियन फॉलिकलचा कॉर्पस ल्यूटियम तयार होतो, व त्यामधून निर्माण होणाऱ्या प्रोजेस्टेरॉनमुळे तसेच वाढत्या प्रमाणात तयार होणाऱ्या इस्ट्रोजनमुळे ही अवस्था घडून येते.

रक्तस्रावाची अवस्था / Menstruation in Marathi / MC in Marathi –

Menstruation in Marathi / MC in Marathi –

गर्भधारणा झाली नाही तर, स्त्रीबीज मरुन जाते, त्यामुळे प्रोजेस्टेरॉनची निर्मिती थांबते, त्याचे रक्तातील प्रमाण कमी होते. परिणामी गर्भाशय अंत: त्वचेवर तयार झालेला नवीन स्तर ( गर्भ शय्या) , हा गर्भाशय अंत: त्वचे पासून सुटू लागतो.
सुटलेला नविन स्तर, त्यातील सुक्ष्म रक्तवाहिन्या, म्युकस व रक्त ह्याचे मिश्रण गर्भाशयातून योनीमार्गाव्दारे बाहेर टाकले जाते यालाच रक्तस्रावाची अवस्था असे म्हणतात. यालाच मासिकपाळी आली असे म्हणतात .

यावेळी सर्वसाधारणपणे ३० ते ८० मि. लि. रक्त स्त्रीच्या शरीरातून बाहेर टाकले जाते स्त्रीयांना रक्तक्षय होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण समजले जाते.

मासिक पाळी संदर्भातील प्रश्न व उत्तरे / FAQ

१) प्रश्न :- मासिक पाळी दरम्यान शरीर संबंध ठेवणे योग्य आहे का ?

उत्तर :- मासिक पाळी दरम्यान शरीर संबंध ठेऊ नये याची २ महत्वाची कारणे आहेत
कारण १ ) मासिक पाळी दरम्यान शरीर संबंध ठेवल्याने गर्भधारणा होत नाही.
२ ) मासिक पाळी दरम्यान शरीर संबंध ठेवल्याने संबंधाद्वारे पसरणारे लैैंगिक आजार होण्याची शक्यता किंत्येक पटीने वाढते. त्यामुळे या दरम्यान शरीर संबंध ठेऊ नये.

२) प्रश्न :- गर्भधारणा होण्यासाठी शरीरसंबध कधी ठेवावेत? How to get Pregnant easily in marathi?

उत्तर :- ज्या दिवशी स्त्रीबीज उत्सर्गीत होते म्हणजेज Ovulation ज्या दिवशी होते त्या दिवशी स्त्री शरीर हे गर्भधारणेस अनुकुल असते. या दिवशी शरिरसंबध आल्यास गर्भधारणा राहते.मासिक पाळी किती दिवसांची आहे त्यानुसार हा दिवस ठरतो, जर स्त्रीची मासिक पाळी रेेग्युलर असेल तर हा दिवस ओळखने सोपे जाते.
मासिक पाळीच्या दिवसातून १४ दिवस वजा केल्यावर जो दिवस येतो, तो म्हणजे स्त्रीबीज उत्सर्जन / Ovulation day या दिवशी ( आधिचा १ दिवस व नंतरचे २ दिवस शरिरसंबध आल्यास गर्भधारणा राहते.

परंतु त्या दिवशी नक्की कधी स्त्रीबीज उत्सर्गीत होते, हि वेेळ ठरविणे अवघड आहे. त्यासाठी Ovulation च्या आधीचे २ दिवस व नंतरचे २ दिवस महत्वाचे मानावे. या ५ दिवसांमध्ये शरिरसंबध आल्यास गर्भधारणा राहते.

उदा. तुमची मासिकपाळी ३0 दिवसांनी येत असेल तर ३० – १४ = १६, तुमच्या साठीचा तो दिवस १६ वा दिवस असेल. म्हणजेच मासिकपाळीच्या १४, १५, १६, १७, १८ व्या दिवशी शरिरसंबध आल्यास गर्भधारणा राहण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. (येथे पाळी सुरु झाली तो दिवस पहिला मानावा.)

३) प्रश्न :- मासिक पाळी चा सेफ पिरीयड म्हणजे काय? Safe Period of Menstrual cycle in Marathi?

उत्तर :- ज्या दिवशी शरीरसंबध आले तरी गर्भधारणा होत नाही किंवा गर्भधारणा राहण्याची शक्यता खुपच कमी असते त्या दिवसांना सेफ पेरियड / Safe Period असे म्हणतात.आता सेफ पेरियड / Safe Period कसा कोणता ते पाहुयात,
पुनरनिर्माण अवस्था : ( Regenarative Phase ), विकास अवस्था ( Proliferative Phase ), स्रावीअवस्था ( Secretory Phase ) हे दिवस सेफ पेरियड / Safe Period आहेत.

सोप्या भाषेत जर तुमची मासिक पाळी हि २८ दिवसांची असेल तर, तुमच्यासाठी पाळीचे ५ ते १० दिवस व २० ते २८ दिवस सेफ पेरियड / Safe Period आहेत.
या दिवशी शरीरसंबध आले तरी गर्भधारणा राहत नाही किंवा गर्भधारणा राहण्याची शक्यता खुपच कमी असते.

४ ) प्रश्न :- मासिकपाळी न येण्याची कारणे कोणती? Causes of Missed Period in Marathi ?

उत्तर :-
१ ) जर स्त्री गरोदर राहीली
२ ) अंतःस्रावीग्रंथींचे रोग
३) हार्मोनल इमबॅलन्स
४ ) अ‍ॅनेमिया – स्त्रीच्या शरिरात रक्त कमी असल्यास मासिकपाळी येत नाही.
५ ) प्रसृती नंतर काही महिण्यासाठी मासिकपाळी येत नाही, परंतु या दरम्यान मासिकपाळी शिवाय बीजोत्सर्ग होऊ शकतो जर त्या दरम्यान सेक्स / शरिरसंबध आले तर गर्भधारणा राहू शकते.
६ ) गर्भाशयाच्या विविध आजारांमध्ये मासिकपाळी येत नाही.

५ ) प्रश्न :- मुलगी वयात येण्यापूर्वी मासिकपाळी का येत नाही? Why there no menses Before Puberty in Marathi?

उत्तर :- मुलगी वयात येण्यापूर्वी ओव्हरी आणि इतर जननेंद्रियांची कार्ये सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे वयात येण्यापूर्वी मासिकपाळी येत नाही.

६ ) प्रश्न :- जननक्षम/प्रजननक्षम काळ म्हणजे काय? What is Fertility period in Marathi?

उत्तर :- प्युबर्टी ‘ ( Puberty ) ते मेनोपॉज ‘ ( Menopause ) यादरम्यानचा वयोमर्यादेचा सरासरी काळ म्हणजे १५ ते ४५ वर्षे वयोमर्यादेला जननक्षम काळ असे म्हणतात. या काळात सामान्यपणे अगदी नियमितपणे मासिकपाळी येत असते .

७ ) प्रश्न :- मासिक पाळी कमी रक्तस्त्राव होणे कारणे व उपाय? Causes of less bleeding during Menses in Marathi ?

उत्तर :-
कारणे :-
१ ) मासिक पाळीमध्ये होणा-या पोटदुखी च्या गोळ्या खाल्ल्यामुही काही स्त्रीयांना कमी रक्तस्त्राव होतो.
२) अंतःस्रावीग्रंथींचे रोग- अंतःस्रावीग्रंथींच्या काही आजारात कमी रक्तस्त्राव होतो.
३) हार्मोनल इमबॅलन्स.
४ )अ‍ॅनेमिया – स्त्रीच्या शरिरात रक्त कमी असल्यास कमी रक्तस्त्राव होतो
५ ) प्रसृती नंतर काही महिण्यासाठी मासिकपाळी येत नाही किंवा कमी रक्तस्त्राव होतो.
६ ) गर्भाशयाच्या विविध आजारांमध्ये कमी रक्तस्त्राव होतो.

उपाय :- तुमचे डॉक्टर कमी रक्तस्त्रावाच्या कारणांनुसार उपचार करतात. अशा वेळी स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. उदा- रक्तवाढिच्या गोळ्या, हार्मोनल थेरपी

८ ) प्रश्न :- मासिक पाळी चुकल्यावर काय करावे? Missed Period What can i do in Marathi ?

उत्तर :- मासिक पाळी चुकणे हे स्त्रीयासाठी आनंदाच्या बातमीची चाहूल असू शकते
मासिक पाळी न आल्यास काय करावे ?
यु.पी,टी. किट (UPT KIT) च्या मदतीने गर्भधारणा झाली असल्याची खात्री करता येते.
अशा वेळी स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.

९ ) प्रश्न :- मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे?

उत्तर :- मासिक पाळी नंतर रक्तस्राव थांबल्यानंतर म्हणजेच ५ व्या दिवसानंर संबंध ठेऊ शकता.

१० ) प्रश्न :- मासिक पाळी मध्ये काय करावे आणि काय करू नये. Do and Don’t during Menstruation in Marathi?

उत्तर :-
१) जास्ती कष्टाची कामे करु नये, आराम करावा.
२) गुप्तांगाची व सर्व शरीराची स्वच्छता पाळावी.
३) कापड वापरत असल्यास प्रत्येक २ तासाला कापड बदलावे, बदललेले कापड साबणाने धुवून कडक उन्हात वाळवावे.
४) पॅड वापरत असल्यास प्रत्येक ४-६ तासांनी पॅड बदलावे, ६ तासांपेक्षा जास्तवेळ एकच पॅड वापरू नये.
५) पॅड कागदात गुंडाळू ओल्या कच-यात त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.
६) पाळीच्या समस्यांसाठी त्वरीत स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.

११ ) प्रश्न :- मासिक पाळीचे कप म्हणजे काय ? What is Menstrual Cup ?

उत्तर :- सिलिकॉन पासून निर्मित पॅड ला पर्याय म्हणून वापयल्या जाणा-या उपकरणास मासिक पाळीचे कप असे म्हणतात.

१२ ) प्रश्न :- मासिक पाळीचा कप कसा वापरावा ? How to Use Menstrual Cup ?

उत्तर :- Menstrual Cup in Marthi –

१) वापरण्यापूर्वी मासिक पाळीचे कप ३ ते ५ मिनीट उकळत्या पाण्यात टाकूण निंरजंतुक करुण घ्यावा.
२) कप ला लुब्रीकंट लावून लुब्रीकेट करावे.
३) त्यांतर कप दुमडून योनीमार्गात ढकलावा.
४) योग्य ठीकानी पोहोचल्यावर त्यावरील दुमडण्याठी दिलेला दाब काढूण घ्यावा. कप आपोआप त्याचा आकार घेईल व योनीमार्गात बसेल.
५) किती रक्तस्राव होतो त्यानुसार कप ६ ते १२ तासांनी काढावा.
६) कप काढल्या नंतर त्यातील रक्त टॉयलेटच्या सिंन्क मधे ओतावे.
७) पुर्णरवापरा पूर्वी कप निंरजंतुक करुण घ्यावा.
८) ज्यादाच्या सुरक्षेसाठी कप सोबत, पॅड ही वापरावे.

मासिक पाळीचा कप कसा वापरावा? How to Use Menstrual Cup? Menstrual cycle in Marathi, MC in Marathi

१३ ) प्रश्न :- मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनेवर उपाय? Abdominal pain during Menstruation upay in Marathi ?

उत्तर :- मासिक पाळीत होणाऱ्या पोटदुखीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने Tb Meftal spas किंवा Tb Cyclopam घ्यावी.

१४ ) प्रश्न :- मासिक पाळी ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ? Masik Pali meaning in English ?

उत्तर :- Menstrual cycle

१५ ) प्रश्न :- मासिक पाळी लवकर का येते ? Why Menses before date in marathi ?

उत्तर :- हारमोनल इमबॅलन्स मूळे तसेच प्रजनन संस्ठेच्या काही आजारामुळे मासिक पाळी लवकर येते. Menses before date in marathi –

१६ ) प्रश्न :- मासिक पाळी येण्यासाठी घरगुती उपाय ? How to prepone Menstrual Cycle ?

उत्तर :-
१) पिकलेली पपई खाणे
२) मुळा , सोया , मेथी व गाजराच्या बिया समप्रमाणात घेऊन ४ – ४ ग्रॅम खाऊन वरून पाणी प्यावे.
३) डोक्यावरुन आंघोळ करावी.

गर्भधारणेची शक्यता वाटत असल्यास कोणतेही घरगुती उपाय करु नयेत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

१७ ) प्रश्न :- मासिक पाळी किती दिवसांनी येते ? What is the duration of Menstrual Cycle in Marathi ?

उत्तर :- सामान्यत: मासिक पाळी ही प्रत्येक महिन्याला २८ ते ३० दिवसांनी येते . परंतु २१ ते ३५ दिवसांनी येणारी मासिकपाळी हि नॉर्मल मानली जाते.

१८ ) प्रश्न :- मासिक पाळीत रक्तस्राव किती दिवस होत असतो ? How many day’s Bleeding occur in Menstrual Cycle in marathi?

उत्तर :- सामान्यत: रक्तस्रावाची अवस्था Menstrual Phase ४ ते ६ दिवस असते.

१९ ) प्रश्न :- मासिकपाळीचे चक्र म्हणजे काय ? What is the meaning of Menstrual Cycle in Marathi ?

उत्तर :- मासिकपाळीच्या काळात जननेंद्रियातील काही बदल प्रत्येक महिन्याला क्रमाने पुन्हा-पुन्हा घडत असतात, म्हणून त्याला मासिकपाळीचे चक्र असे म्हणतात .

२० ) प्रश्न :- मासिक पाळीत किती रक्तस्राव होतो ? How much Blood loss during Menstrual Cycle in marathi ?

उत्तर :- प्रत्येक मासिक पाळीत सर्वसाधारणपणे ३० ते ८० मि. लि. रक्तस्राव होतो. स्त्रीयांना रक्तक्षय होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण समजले जाते .

२१ ) प्रश्न :- स्त्री शरीरात गेल्यांंतर शुक्राणू किती वेळ जिवंत राहतात?

उत्तर :- स्त्री शरीरात गेल्यांंतर शुक्राणू ५ दिवसांपर्यंत जिवंत राहतात.

२२ ) प्रश्न :- बीजोत्सर्गा / Ovulation नंतर स्त्रीबीज / Ovum किती वेळ जिवंत राहते? Life-Span of Ovum after Ovulation in Marathi?

उत्तर :- बीजोत्सर्गा / Ovulation नंतर स्त्रीबीज / Ovum २४ तासांपर्यंत जिवंत राहते.

By

Dr.Vivekanand V. Ghodake

डॉ. विवेकानंद विठ्ठलराव घोडके

Copyright Material Don't Copy © 2021

View Comments

  • माझा एक प्रश्न आहे?... मला पाळी आली कि 8-9 दिवस blooding होते...आणि खुप पोट, पाय दुखते.. . मग dr दाखवावं लागेल का?? Pls मला sanga

    • याला पाळीतील अतिरक्तस्राव म्हनतात. हो, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांना दाखवून घ्या. याची कारणे शोधून (सोनोग्राफी व ईतर तपासण्या करुन) त्यानुसार डॉक्टरांकडून उपचार करून घ्या.

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023