आजारांची माहिती

सांधेदुखी, आमवात, संधिवात, Meaning of Arthritis in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

सांधे दुखणे हा त्रास अनेकांना विशेषतः उतारवयातच होतो. सांधे दुखी ला संधिवात (Meaning of Arthritis in Marathi) या नावाने ओळखले जाते, या त्रासामध्ये एकाच वेळी अनेक सांधे दुखतात व त्यासोबत इतर काही त्रास नसतो.

अनेक वर्षे चालणाऱ्या या सांधेदुखीतर कोण एखादा अघोरी उपाय सुचवतो तर कोण खर्चिक रामबाण उपाय सुचवतो . पण आजाराला कंटाळून अशा उपायांच्या मागे न धावता आजाऱ्याने योग्य दिशेने उपचार घ्यावे , पथ्ये पाळावी यासाठी आपण आपुलकीचा सल्ला देऊ शकतो . त्यासाठी सर्वसाधारण सांधेदुखीची थोडी शास्त्रीय माहिती घेऊया .

मार लागल्यामुळे एखाद्या ठिकाणी सांधेसुजी झाली किंवा एखाद्या तापाच्या आजारामुळे तापासोबत कुठे साधे सुजले तर ते वेगळ्या प्रकारचे साध्याचे दुखणे असते .

सांधेदुखीचे दोन प्रमुख प्रकार

सर्वसाधारण सांधेदुखीचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

  1. झीज सांधेदुखी
  2. संधीवात

त्यांची कारणे व उपायही वेगवेगळे आहेत. पहिला प्रकार म्हणजे झीज सांधेदुखी तर दुसरा म्हणजे संधीवात त्यांची कमाने ओळख करून घेऊ.

१) झीज – सांधेदुखी ( म्हातारपणाची सांधेदुखी )

आपल्या सांध्यामध्ये सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हाडांच्या टोकाला कुर्चेचे आवरण असते. कुर्चा म्हणजे आपल्या कानाची पाळी ज्यामुळे बनली असते तो चिवट, लवचिक पदार्थ साध्यातील या कुर्चेमुळे साध्यांच्या हालचाली चांगल्या होतात उतारवयात हे कुचेचे आवरण झिजू लागते. त्यामुळे हाडे एकमेकांवर घासू लागून ती दुखू लागतात.

खूप ओझ्याची कामे केल्यामुळे किवा लठ्ठपणामुळे ही झीज लवकर किंवा जास्त होते. त्यामुळे अशा व्यक्तीमध्ये हा त्रास लवकर किंवा जास्त होतो. गुडघे , घोटे हे सांधे दुखत असतील , साध्याला सूज नसेल व जादा वजन उचलणे, लठ्ठपणा ही कारणे असतील तर झीज सांधेदुखी आहे अशी शंका घेऊन डॉक्टरांकडे पाठवावे.

झीज – सांधेदुखी ( म्हातारपणाची सांधेदुखी ) उपचार

सांधेदुखी घरगुती उपाय

१) ही सांधेदुखी पूर्ण बरी होऊ शकत नाही कारण झीज झालेला कुर्चा कोणत्याही औषधाने परत वाढत नाही. त्यामुळे या आजारावर मुख्य उपचार म्हणजे

  1. सांध्यावर वजनी ताण पडणार नाही याची काळजी घेणे ,
  2. त्यासाठी ओझी न वाहणे ,
  3. सारखी उठ – बस न करणे ,
  4. उठताना हातावर जोर देऊन उठणे ,
  5. वजन कमी करणे ,
  6. खूप न चालणे असे उपाय करायला हवे.
  7. या साध्याभोवतीच्या स्नायूंना व्यायाम देऊन ते बळकट केले तर हाडांवर पडणारा ताण काही प्रमाणात हे स्नायू झेलू शकतात.
  8. मात्र उठबाश्यांचा व्यायाम करता कामा नये .
  9. ज्यामुळे गुडघे घोट यावर ताण पडणार नाही असा व्यायाम करायला हवा, म्हणजे पोहणे, गुडघा बुडेल एवढ्या पाण्यात चालणे, खुर्चीवर बसून पाय गुडघ्यात वाकवून खाली वर करणे असे व्यायाम करायला हवे.
  10. एवढ्या हालचालीनेही दुखणे वाढते असे वाटले तर गुडघ्याची अजिबात हालचाल न करता गुडघ्याच्या स्नायूना व्यायाम दिला पाहिजे.

२) त्यासाठी जमिनीवर बसून गुडघ्याच्या मागे टॉवेलची घडी ठेवावी व ही घडी जमिनीकडे सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दाबावी, असे करताना गुडघ्याच्या वाटीवरचे स्नायू घट्ट होत आहेत हे लगेच लक्षात येईल. ही घडी थोडावेळ दावून सोडणे असे वारवार करावे , हा व्यायाम अशा आजायता शिकवावा. त्याचप्रमाणे घोट्याभोवतीच्या त खुल्याभोवतीच्या स्नायूंना हे साधे न हलवता व्यायाम देता येतो.

३ ) साधे फार दुखल्यास डॉक्टरांकडून उपाय करावेत.

४ ) धान्याचे गरम पॅड्स ने शेकून पहा.

५) तळ हात आणि पायावर तसेच दुखऱ्या जॉइन्ट्स ना मसाज द्या.

६) ओमेगा ३ असलेले पदार्थ आवर्जून खा. ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे शरीरातील इंफ्लेमेशन बरे करते आणि अर्थरायटीसचा त्रास निर्माण करण्याच्या प्रक्रियेलाही थांबवते.

७) व्हिटॅमिन डी चे सेवन उत्तम. व्हिटॅमिन ‘डी’ शरीरातील हाडे मजबूत करते, आपली पाचन शक्ती सुधारते आणि त्यामुळे संधिवात किंवा सांधेदुखी होण्याची शक्यता कमी करते.

२) आमवात ( Gout in Marathi )

आमवात संधीवाताच्या या प्रकारात कुर्चा, हाडे यांच्यामध्ये दोष नसतो तर सांध्याच्या भोवतीचे आवरण सुजते. त्यामुळे हाताचा कोपरा, मनगटे, गुडघा इत्यादीपैकी काही किंवा सर्व साधे सुजतात. दुखतात, लालसर होतात. अगदी सडपातळ लोकांनाही हा आजार होऊ शकतो आजाऱ्याच्या काही रक्ताच्या नातेवाईकामध्येही हा आजार असू शकतो. काही जणांना विशिष्ट हवामानात, पावसाळ्यात जास्त त्रास होतो.

या आजारावरील उपचारात व्यायाम, वजन कमी करणे यापेक्षा औषधांवर जास्त भर द्यावा लागतो. व्यायामाचा हेतु स्नायू बळकट करणे हा नसून सांधे आखडू नयेत म्हणून ते पूर्णपणे हलवणे एवढाच असतो. आवश्यकतेनुसार आयुर्वेद , होमिओपॅथी डॉक्टरांचे उपचार घेतल्यास चांगला फायदा होताना दिसून येते. क

आमवात झाल्याची शंका का व केव्हा घ्यावी ?

खालील लक्षणे दिसल्यावर आमवाताची शंका घेऊन डॉक्टराकडे पाठवावे .

  • एकावेळी अनेक लहान मोठे सांधे सुजतात . लालसर होतात व दुखतात . बहुधा हातापायाच्या बोटाचे सांधे सुजतात .
  • त्रास कमी – जास्त होत राहतो काही लोकांना वर्षानुवर्षे त्रास चालू राहतो.
  • सकाळी उठल्यानंतर साधे आखडतात , तेव्हा जास्त त्रास होतो.
  • रक्ताच्या नातेवाईकामध्येही हा त्रास असतो.

आमवात झाल्यावर डॉक्टर उपचार काय करतात ?

सध्या आमवातावर कायमचा उपचार उपलब्ध नाही पण सूज व दुखी जास्त झाली तर ती तात्पुरती कमी करण्यासाठी डॉक्टर त्यासाठी खास गोळ्या देतात.

सांधेदुखी, आमवात, संधिवात, Meaning of Arthritis in Marathi, joint pain in marathi, arthritis in marathi, rheumatoid arthritis in marathi, gout in marathi, meaning of gout in marathi, what is gout in marathi, sandhivata in marathi, Symptoms of Sandhivat in Marathi,संधिवात कशामुळे होतो, संधिवात लक्षणे मराठी

संधीवातावर घरगुती उपाय, पत्थ – अपत्थ

संधीवातावर काय काय नैसर्गिक उपाय, आहारात बदल केले पाहिजे याबद्दल माहिती घेऊयात.

  1. संधीवातावर लसूण खूपच परिणामकारक ठरतात, दोन ते तीन लसूण पाकळ्या गायीच्या तुपात तळून जेवणापूर्वी घेतल्याने संधिवात आराम मिळतो. त्याच बरोबर लसून चिरडून जो भाग दुखत असेल त्या भागावर डायरेक्ट लावल्यामुळे सुद्धा ते रस त्वचेच्या आत पर्यंत शिरते त्यामुळे पटकन आराम मिळतो,
  2. एक कप अननसाचा रस सांध्या वरील सूज कमी होते आणि सांधे दुखणे थांबते.
  3. संधीवातावर बटाट्यांचे पाणी खुपच उपयुक्त ठरतं बटाट्याची सालं काढून त्या साल्यांना पाण्यात उकळून पाणी रोज घेतल्याने आपल्या शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात आणि आपल्याला आराम मिळतो.
  4. त्याच बरोबर रोज जेवणापूर्वी दोन चमचे कच्च्या बटाट्याचा रस घेतल्याने सुद्धा सांद्याची दाह कमी होते आणि आराम मिळतो.
  5. रोजच्या पोळी किंवा भाकरी पिठामध्ये एरंडेल तेल किंवा तुपाचं मोहन करावं त्याचबरोबर ते पीठ मळताना फूड प्रोसेसरमध्ये मारण्या ऐवजी हाताने मळावे त्यामुळे आपली बोटे देखील मोकली होतील.
  6. संधीवातावर आले खूपच उपयुक्त ठरतात, यात दाह विरोधी प्रॉपर्टी आहेत, त्यामुळे जर आपण रोजच्या पिण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे आले टाकून ते पाणी उकळून ते पाणी आपण रोज प्यायलो तर सांधे सुजणे दुखणे, सांध्ये दुखणे हे त्रास आपल्याला होणारच नाहीत.
  7. रोज आल्याचा चहा घेतल्याने सुद्धा फायदा होईल रोज आंघोळीच्या अर्धा ते एक तास आधी सर्वांगाला कोमाट तिळाच्या तेलाने मसाज करावा आणि त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करावी, यामुळे संपूर्ण शरीराला सांध्याला शेक मिळेल व आराम सुद्धा मिळेल.
  8. हल्ली च्या रीसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे की, संधिवातात ध्यान किंवा मेडीटेशन केल्याने सुद्धा खूपच फायदा होतो, त्यामुळे रोज किमान दहा ते पंधरा मिनिट मेडिटेशन आपण केलं पाहिजे.
  9. रोज सकाळी उठल्या उठल्या लिंबू पाणी पिल्याने सुद्धा संधिवातात खूपच आराम मिळतो.
  10. त्याच बरोबर गव्हांकुर चिकित्सेचा सुद्धा संधिवातावर खूपच फायदा होतो.
  11. आहारात नियमितपणे पालेभाज्या, फळे, गाजर, दुधी भोपळा , मुग , मटकी, आले, लसून , पेरू, तूप, पपई अशा पदार्थांचा सामेश केला पाहिजे.
Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023