Measles in Marathi, गोवर कारणे, लक्षणे, उपाय, लसीकरण

गोवर हा अत्यंत संक्रामक विषाणुजन्य रोग आहे आणि बालपणात गोवरची लागण होणं हा बालकास तसेच त्याच्या माता-पित्याना एक अत्यंत त्रासिक अनुभव असतो. गोवर आजाराने आपल्या देशांमध्ये दरवर्षी अंदाजे ८०,००० बालकांचा मृत्यू होतो.
गोवर म्हणजे काय ? What is Measles in Marathi ?
गोवर हा अत्यंत संक्रामक विषाणुजन्य रोग आहे. या आजारात ताप, सर्दि, खोकला, डोळे लाल होणे व अंगावर गोवर चे पुरळ उठणे ही मुख्य लक्षणे आढळतात.
Measles Meaning in Marathi – गोवर
गोवर होण्याची कारणे काय आहेत? What is the cause of Measles in Marathi?
गोवर विषाणू हा Paramyxo virus या कुटुंबातील एक आरएनए व्हायरस (RNA Virus) आहे. या विषाणूच्या संक्रमणामुळे गोवर नावाचा आजार होतो.
गोवर चा प्रसार कसा होतो? How Measles Spread in Marathi?
Nosocomial Infection– श्वसन क्रियेतून निघणा-या जलबिंदुद्वारे (ज्यात गोवर व्हायरस आहेत) गोवर चा प्रसार होतो. गोवर विषाणूच्या प्रवेश श्वसनमार्गाद्वारे किंवा कंजेक्टिवाद्वारे ( डोळ्यातील स्रावामार्फत) होतो.
गोवरची पुरळ येणे सुरू होण्यापुर्वी ३ दिवस व गोवरची पुरळ आल्यानंतर ४-६ दिवसांपर्यंत रुग्ण संक्रामक असतात. गोवरची हा अतिशय संक्रमक रोग आहे, गोवर चा रुग्ण एखाद्या खोलीत येवून गेल्यानंतर १ तासापर्यंत तेथील हवेत गोवरचे विषाणू जिवंत राहतात व तेथे येणा-या निरोगी व्यक्तीला गोवर ची लाग़णं होऊ शकते.
गोवर ची लक्षणे काय असतात ? -What are the Measles symptoms in Marathi ?
१ ) तीव्र ताप
२ ) सर्दि – नाक वाहणे
३ ) कोरडा खोकला – गोवरच्या मुख्य लक्षणांपैकी खोकला सर्वात जास्त काळ राहतो.
४ ) डोळे लाल होणे, Photophobia – प्रकाशा कडे बघताना डोळ्याना त्रास होतो.
५ ) कोप्लिक स्पॉट- गोवरचे पुरळ सुरू होण्यापूर्वी १ ते ४ दिवस आधी दाढेशेजारच्या गालाच्या आतील भागावर वाळूच्या कणाच्या आकाराची राखाडी / पांढरी पूरळ उठते, तिला कोप्लिक स्पॉट असे म्हणतात. कोप्लिक स्पॉट्स गोवरचे प्रतिनिधित्व करतात आणि ते गोवर रोगजनक लक्षण आहेत.

६ ) लक्षणे सुरू झाल्या पासून च्या ३ र्या किंवा ४ थ्या दिवशी सर्वांगावर पुरळ येतात.
गोवरची हि लक्षणे ५ ते ७ दिवस राहतात. त्यानंतर ती लक्षणे कमी होतात.
गोवर मुळे उद्भवणार्या समस्या / गुंतागुंत कोणत्या असतात ? What are the Complications of Measles in Marathi ?
गोवर मुळे खालील समस्या / गुंतागुंत उद्भवतात
मुख्य गुंतागुंत :-
- Laryngitis – स्वरयंत्रात दाह,सुज
- Bronchitis श्वासनलिकेवर सुज
- Pneumonia – न्यूमोनिया,
- Acute encephalitis – मस्तिष्कदाह
- Bronchiectasis आणि सुप्त असलेल्या क्षयरोगाची लागण होणे.
कमी प्रमाणात उद्भवणार्या गुंतागुंत :-
- सतत अतिसार,
- अपेंडिसाइटिस,
- हिपॅटायटीस आणि कोलायटिस
- गोवर कुपोषण वाढवू शकते आणि गालावर नोमा किंवा गॅंग्रीन होऊ शकतात.
गोवर चा उपचार ? What is Measles Treatment in Marathi ?
हायजिन, पुरेसा आहार, पाणी द्यावे. बाळाला त्वरीत डॉक्टरांकडे घेऊन जावे.
गोवर आजारामध्ये मुख्यत: सहाय्यक म्हणजेच लाकक्षणिक चिकित्सा केली जाते.
१ ) Antipyretics –
तापाचे औषध बाळाच्या वजनानुसार प्रत्येक ६-८ तासांनी द्यावे. तापासाठी प्यारासिटेमॉल हे औषध बाळाच्या वजना नुसार दिले जाते.
२ ) Cough syrup / Antihistamines –
खोकला व सर्दिसाठी औषध दिले जाते.
३ ) Vitamine A –
व्हिटॅमिन ए मुळे गोवर व त्यामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण कमी होते. गोवर मध्ये व्हिटॅमिन ए ची एकच मात्रा (Single Dose) तोंडावाटे बाळाला दिली जाते.
व्हिटॅमिन ए चा डोस:-
१ वर्षाखालील बाळाला १ लाख IU युनिट
आणि १ वर्षापेक्षा जास्त वयाच्या बाळाला २ लाख IU युनिट द्यावे असे Indian Academy of Pediatrics (IAP) सुचविते.
५ ) गोवर मुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीचा योग्य प्रकारे उपचार करावा.
६ ) बाळ खात-पीत नसल्यास किंवा वरील सांगितलेल्या पैकी कोणती हि गुंतागुंत निर्माण झाल्यास बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात अॅडमीट करावे.
७ ) सर्वांंत महत्वाचे आपल्या कडे गोवर झाल्यावर सर्वसाधारण पणे बाळाला तेल लावून आंंघोळ घालण्याची प्रथा आहे ती पूर्णपणे चुकिची असून, तशी तेल लावूण आंंघोळ घालू नये.
गोवर कसा टाळावा ? How to Prevent Measles in Marathi ?
गोवर लसीकरण Measles Vaccination:-

गोवर लस हि भारतामध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात समाविष्ठ केलेली आहे.
गोवर लसीचा १ ला डोस बालाळा ९ महिणे पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.
२ रा डोस बाळ १५ महिण्यांचे झाल्यानंतर दिला जातो.
३ रा डोस बाळ ५ वर्षांचे झाल्यानंतर दिला जातो.
गोवर चित्र Measles Photo:-




1 Comment
Suresh · 06/03/2020 at 10:01 am
Utkrusht Mahiti dilyabaddal dhanywaad