प्रोजेक्ट प्लॅटिना, कोरोना उपचारासाठी प्रोजेक्ट प्लॅटिना महाराष्ट्रात सुरु, Project Platina in Marathi, प्लाझ्मा थेरपीची सर्व माहिती, Plasma Therapy in Marathi
भारतात कोरोना या जीवघेण्या आजाराचा सर्वाधिक फटका आपल्या महाराष्ट्राला बसला आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच कोरोना रूग्णांवर रेमडेसिवीर इंजेक्शनद्वारे उपचार करणे सुरू केले आहे. त्यातच आता राज्य सरकारने ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ मोहिम हाती घेतली आहे.
Plasma Therapy ला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने नुकतीच कोरोना विषाणू च्या रुग्णांच्या उपचारासाठी क्लिनिकल ट्रायल मध्ये वापरण्याची मान्यता दिलेली आहे. खालील लेखात प्रोजेक्ट प्लॅटिना, Project Platina in Marathi, Plasma Therapy in Marathi, Plasma Therapy for Coronavirus Treatment in Marathi इत्यादि प्लाझ्मा थेरपी व प्रोजेक्ट प्लॅटिना ची सर्व माहिती दिलेली आहे.
अनुक्रमणिका
What is Project Platina in Marathi?
प्रोजेक्ट प्लॅटिना यावर महाराष्ट्रातील २१ वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये काम सुरू केले जाणार आहे. यामधे ५०० कोरोना बाधितांवर प्लाझ्मा थेरपी द्वारे प्रोजेक्ट प्लॅटिना या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात उपचार केले जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात या प्लाझ्मा थेरपीची ट्रायल घेणारे महाराष्ट्र राज्य देशातीलच नव्हे तर जगातील पहिले राज्य ठरणार आहे.
What is Plasma Therapy in Marathi?
पूर्णपणे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या पेशी म्हणजेच अॅन्टिबॉडी तयार झालेल्या असतात. या अॅन्टिबॉडी कोरोना बाधित रूग्णांच्या शरीरात शिरेद्वारे टाकल्या जातात.
त्यामुळे कोरोनाग्रस्त व्यक्तीची कोरोनाच्या विषाणू विरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. यामुळे कोरोना बाधित व्यक्ती लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता असते, या सगळ्या उपचार पद्धतीला प्लाझ्मा थेरपी असे म्हणतात.
Benefits of Plasma Therapy in Marathi:-
रिकव्हरी रेट म्हणजे रूग्ण ठणठणीत बरा होण्याचा दर प्लाझ्मा थेरपीमुळे वाढू शकतो, ही खूप दिलासादायक बाब आहे.
सर्वप्रथम अमेरिकेत प्लाझ्मा थेरपी उपयोग केला गेला. तेथे असे दिसुन आले की, कोरोनाचा नाश करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही खूप उपयोगी आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत असताना प्लाझ्मा थेरपीमुळे रूग्ण बरे देखील होत आहेत.
मुंबईनंतर आता पुण्यात देखील प्लाझ्मा थेरपी या उपचार पद्धतीला यश मिळाले आहे. तसेच या प्लाझ्मा थेरपीला आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील काही प्रमाणात यश मिळत आहे.
Plasma Therapy ला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने नुकतीच कोरोना विषाणू च्या रुग्णांच्या उपचारासाठी क्लिनिकल ट्रायल मध्ये वापरण्याची मान्यता दिलेली आहे.
प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More
प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More
प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More
प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More
प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More
ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More