डेक्सामिथासोन कोरोनावर प्रभावी Corona and Dexamethasone in Marathi

Coronavirus Dexamethasone in Marathi, डेक्सामिथासोन कोरोनावर प्रभावी, new injection for corona in marathi, new treatment for corona in marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

कोरोना व्हायरस विरुद्ध वेगवेगळ्या औषधांचे उपाय योजले जात आहेत यासाठी जगभरातील संशोधक कामाला लागले आहेत. असाच एक रिसर्च समोर आला आहे त्यानुसार डेक्सामिथासोन हे औषध कोरोना व्हायरस वर गुणकारी आहे हे सिद्ध झाले आहे.

डेक्सामिथासोन हे औषध काय आहे? डेक्सामिथासोन कशासाठी वापरले जाते? भारतामध्ये किती प्रमाणात याचा वापर होऊ शकतो? त्याची किंमत काय आहे? आणि ते नक्की काम कसे करते? या सगळ्या प्रश्नणांची उत्तर खालील लेखात दिलेली आहेत.

डेक्सामिथासोन हे औषध नक्की काय आहे?

डेक्सामिथासोन हे ग्लूकोकॉरटिकॉईड या गटातलं औषध आहे आणि त्याचा वेगवेगळ्या व्याधींवर वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो.

या औषधांच्या बाबतीत एक फायदा असा झाला की आधीच अस्तित्वात असल्यामुळे, त्याच्या सुरक्षिततेसाठी म्हणून वेगळ्या काही चाचण्या किंवा वेगवेगळ्या रुग्णांवर किंवा कंट्रोल घेण्याच्या स्वरूपात इतर कुठलेही अभ्यास/प्रयोग करण्याची गरज भासली नाही. सहाजिकच त्यामुळेच या औषधांचा उपयोग हा करोणा व्हायरसच्या उपचार पद्धतीमध्ये थेट करणं हे डॉक्टरांना शक्य झाले.

डेक्सामिथासोन चा वापर भारतामध्ये होतो का? कशा पद्धतीने होतो ?

ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे इंग्लंडमधील काही रुग्णालयांमध्ये ह्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या उपचारासाठी डेक्सामिथाझोन या औषधाचा वापर करण्यात आला वास्तविक पाहता डेक्सामिथासोन हे काही कोरोना व्हायरस वरचं नविन शोधले गेलेले औषध नाही. हे औषध जवळपास १९५० ते १९६० सालापासून वेगवेगळ्या आजारांवर वापरले जात आहे.

स्टिरॉइड्स हे कश्या प्रकारे काम करतात?

स्टिरॉइड्स या प्रकारातील जी औषधं आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. स्टिरॉइड्स चे महत्वाचे काम म्हणजे शरीरातली इन्फ्लामेटरी रीअ‍ॅक्शन किंवा शरीरामध्ये दाह निर्माण करणाऱ्या ज्या क्रिया-प्रतिक्रिया घडतात त्या सगळ्या आटोक्यात ठेवणं हे आहे.

डेक्सामिथासोन कोरोना वर कसे काम करते?

डेक्सामिथासोन हे औषध कोरोना व्हायरसच्या संसर्गा मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे इंग्लंडमधील काही रुग्णालयांमध्ये वापरले गेले आहे.

कोरोना व्हायरसच्या संंसर्गानंतर ज्या रुग्णांना अत्याधिक त्रास होतो अशा रुग्णांच्या मध्ये मुख्यतः फुप्फुसांमध्ये म्हणजे श्वसन संस्थेमधे आणि त्याच्या जोडीला शरीराच्या इतर वेगवेगळ्या संस्थांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्लामेशन होते.

ज्याला ARDS (म्हणजेच अ‍ॅक्युट रीस्पिरेटरी डिसट्रेस सिंंड्रोम) व त्याचबरोबर मल्टिपल ऑर्गन फेल्युअर (म्हणजे श्वसन संस्थेचा दाह आणि त्याच्या जोडीला इतर संस्था किंवा इतर अवयवही निकामी) होत जाणे.

या स्वरूपाची जी गुंतागुंत उद्भवते त्याच्यावर गुणकारी ठरण्यासाठी म्हणून स्टिरॉइड्स जातीच्या औषधांचा उपयोग केला गेला आणि अशा औषधांपैकीच एक डेक्सामिथाझोन आहे.

कोरोनाच नव्हे तर कोणत्याही आजारात शरीरातील Inflammatory Reaction कमी करायला ते वापरले जाते. दम्याच्या रुग्णांमध्ये खूप दम लागल्यावर, एखादी गंभीर अ‍ॅलर्जी उद्भवल्यावर, संधिवातात सांधे सुजल्यावर हे औषध अनेक वर्षे वापरले जाते आहे.

यामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण गंभीर अवस्थेत असताना त्याच्या शरीरांतर्गत inflammatory क्रिया त्यामुळे ताब्यात आणल्या जातात.

डेक्सामिथासोन हे फक्त वेन्टिलेटर वरती असणाऱ्या रुग्णांंसाठी फायदेशीर आहे की इतर रुग्णांनाही त्याचा फायदा होऊ शकतो?

त्याचा हा संपूर्ण अभ्यास हा ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे इंग्लंडमधील काही रुग्णालयांमध्ये केला गेला त्यांंच्या निकालाप्रमाणे

  • १ ) ज्या रुग्णांमध्ये वेन्टिलेटर वापरावा लागेल इतकी गंभीर परिस्थिती होती, अशा रुग्णांमध्ये डेक्सामिथासोन चा खूप चांगला उपयोग दिसून आला.
  • २ ) त्यापाठोपाठ ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची गरज होती मात्र वेन्टिलेटर ची गरज नव्हती अशा रुग्णांमध्ये त्याखालोखाल डेक्सामिथासोन उपयोगी पडतं असं दिसून आलं.
  • ३ ) पण ज्या रुग्णांमधे ऑक्सिजन अथवा वेन्टिलेटर ची गरज पडत नव्हती अशा रुग्णांच्या बाबतीत मात्र डेक्सामिथासोन चा तेवढा फायदा आढळला नाही.

थोडक्यात डेक्सामिथासोन च्या उपयोगामुळे क्रमांक १ व २ (वर उल्लेख केलेल्या) दोन्ही प्रकारातले रुग्णांमधे सुधारणा तर दिसून आलीच पण त्यांचा जिवही वाचला (कित्येक रुग्णांच्या बाबतीत अन्यथा ते रुग्ण दगावले असते).

अश्या रुग्णांचा जीव वाचवण्यात डेक्सामिथासोन या औषधाची कामगिरी ही प्रभावी ठरली आहे असे या अभ्यासात आढळून आलेला आहे.

भारतामध्ये सध्या डेक्सामिथासोनची काय स्थिती आहे याची काय किंमत आहे?

डेक्सामिथासोन हे तोडांवाटे खाण्याची गोळी व इंजेक्शन स्वरुपात ही उपलब्ध आहे.

डेक्सामिथासोनची किंमत अतिशय कमी आहे. गोळ्यांची किंम्मत ६ ते ७ रुपये आहे. इंजेक्शन डेक्सामिथासोन च्या एका अम्पुल ची किंंम्मत फक्त १० ते ११ रुपये आहे.

भारतामध्ये डेक्सामिथासोन औषधाचा सर्वत्र उपयोग केला जातो

सरकारी रुग्णालयात डेक्सामिथासोन औषधांचा वापर होतो का?

सरकारी रुग्णालयात या औषधांचा वापर कमी/अधिक प्रमाणात केला जातो. मात्र विविध जिल्हा रुग्णांलयात स्टिरॉईड चा वापर डेक्सामिथासोन च्या स्वरुपात न करता मिथाईलप्रेडणीसोनाईड या स्वरूपात केला जातो.

याचे कारण विविध आजारात मिथाईलप्रेडणीसोनाईड हे डेक्सामिथासोन पेक्षा कितीतरी अधिक प्रभावी आणि अधिक परिणामकारक गुण दाखवणाऱ्या औषध आहे.

त्यामुळे मिथाईलप्रेडणीसोनाईड चे दिसलेले परिणाम हे रुग्णांमध्ये ताबडतोबीने दिसू लागतात आणि रुग्णांमध्ये सुधारणा ही झपाट्याने दिसू लागते.

अर्थात डेक्सामिथासोन च्या मुख्यतः किमतीचा विचार केला तर कदाचित अधिक मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यासाठी म्हणून भारतामध्ये डेक्सामिथासोन अधिक योग्य ठरू शकेल.

डेक्सामिथासोन च्या रूपाने आपल्याला एक पर्याय मिळालेला आहे कोरोना च्या विरोधात लढण्यासाठी पण जर कोरोनाचा समूळ उच्चाटन करायचे असेल तर किंवा कोरोनाला पूर्ण हद्दपार करायचे असेल तर याचा नक्कीच उपयोग होईल आणि मुख्य म्हणजे कोरोना वरील उपचाराच्या संपूर्ण संशोधनातील हा एक मैलाचा दगड म्हणता येईल.

कोरोना वर रामबाण उपाय म्हणून डेक्सामिथासोन कडे बघता येईल का?

रुग्णांच्या बाबतीत रोजच्या रोज उद्भवणारे वेगवेगळे प्रश्न आणि त्यांना तोंड देताना त्यासाठी आमलात येणाऱ्या वेगवेगळ्या उपचार पद्धती या सगळ्या संशोधनामध्ये आणि या सगळ्या अभ्यासामध्ये अत्यंत गरजेच्या आहेत आणि अत्यंत उपयोगी पडणार्या आहेत.

त्यादृष्टीने नुकताच प्रसिद्ध झालेला जो अभ्यास आहे डेक्सामिथासोन च्या बाबतीतला त्याचे मोल हे अशा गंभीर स्वरूपाच्या रुग्णांच्या उपचार पद्धती मधे मोलाचे आहे. मात्र डेक्सामिथाझोन हे करोना विषाणूंच्या संसर्गासाठीच रामबाण ईलाज म्हणून सापडलेल औषध आहे असा याचा अर्थ होत नाही.

या विषाणू तून उद्भवणारी गुंतागुंत ही शक्य तितकी टाळण्यासाठी आणि आपण ज्याला शरीरातील अंतर्गत व्यवस्था सुनियोजित ठेवणे किंवा सुव्यवस्थित राखणंं हे शरीराचा मिलिओ इंटिरियर कमाल आणि किमान मर्यादा यांच्यामध्ये राखणे यासाठी म्हणून अशा उपचार पद्धती उपयोगी पडू शकतात.

Disclaimer / डिस्क्लेमर / अस्वीकरण:-

डेक्सामिथासोन या नवीन औषधाचा शोध लागला असून ते करोनावर एक प्रभावी औषध आहे, अशा प्रकारच्या बातम्या अनेक वृत्तवाहिन्यांवर, वर्तमानपत्रात आणि सोशल मिडियामध्ये पसरत आहेत.

पण लक्षात घ्या डेक्सामिथासोन हे गेली पन्नास वर्षाहून वापरात असलेले प्रिस्क्रिप्शन औषध आहे . ते स्टीरॉइड्स या औषध प्रकारातले मध्यम काळात कार्य करणारे ( Intermediate Acting ) औषध आहे.

सर्वांना सूचना अशी की, कृपया कोरोनावरील औषध म्हणून कुणीही ते परस्पर वापरू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध वापरू नका. अ‍ॅसिडिटी वाढणे, जठराचा अल्सर होणे, हाडे ठिसूळ होणे, रक्तातील साखर वाढणे, मधुमेह होणे असे त्याचे काही गंभीर साईड इफेक्ट्स आहेत. डेक्सामिथासोन हे एक शस्त्र आहे, डॉक्टरांनाच ठरवू द्या ते कोणत्या रुग्णांमध्ये, केंव्हा आणि कोणत्या परिस्थितीत वापरायचे.

कोवीड १ ९ प्रतिबंधाचा किंवा चिकित्सेचा कोणताही दावा या ठिकाणी करण्यांत येत नाही .

Copyright Material Don't Copy © 2020