श्वसनसंस्थेतील अवयव, रचना व त्यांच्या कार्य Respiratory system in Marathi
अनुक्रमणिका
श्वसन ( Respiration ) म्हणजे श्वास आत घेणे ( Inspiration ) आणि उच्छवास ( श्वास बाहेर सोडणे ) ( Expiration ) , वातावरणातून फुफ्फुसात हवा घेण्याच्या क्रियेला श्वास व फुफ्फुसातून कर्बवायू बाहेर सोडण्याच्या क्रियेला उच्छवास असे म्हणतात. मानवी शरीराच्या विविध प्रक्रिया योग्य स्थितीत सुरु ठेवण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते .
प्राणवायूच्या सहाय्याने शरीरातील ग्लुकोजचे ज्वलन होऊन शरीराला आवश्यक उर्जा प्राप्त होते . यासाठी आवश्यक प्राणवायु श्वसन संस्थेद्वारे आत घेतला जातो व तयार होणारा कर्बवायू , वाफ इ . वातावरणात सोडले जातात.
ग्लुकोज + पाचक रस उर्जा + पायरुविक आम्ल पायरुविक आम्ल + प्राणवायू = पाणी + कर्बवायू
नाक हे श्वसन संस्थेचे पहिले अवयव असून नाकाच्या समोरील भाग नाकपुडयांचा असतो . या दोन नाकपुडयांमुळे नाकाची पोकळी घशाच्या पोकळीला जोडलेली असते . नाकपुडयाच्या आत बहुस्तरीय आच्छादक पेशीजालाचे ( Stratified Epithelial Tissues ) सलग आच्छादन असते. त्यात तेल ग्रंथी व केस भरपूर असतात.
नाकाचे मूळ हाडाचे असून मधोमध वर टोकाचा भाग कूर्चेचा असतो. नाकाची पोकळी उजव्या व डाव्या भागात पडद्याद्वारे विभागली जाते . नाकाचा पडदा मध्य रेषेत नसून थोडा उजव्या बाजूस असतो . नाकपोकळीच्या समोरील भागात केसांचे जाळे असते.
नाकाच्या पोकळीच्या अंतस्त त्वचेत भरपूर रक्तवाहिन्या असतात व श्लेष्मा तयार करणा-या चषकपेशी ( Goblets Cells ) भरपूर असतात. त्यातील स्त्रावामुळे पृष्ठभाग नेहमी ओलसर व चिकट राहतो. श्वसन संस्थेतील इंद्रिये नाकाची आंतररचना नाकाची पोकळी तीन लहान पोकळयात शिंपल्यासारख्या हाडांनी विभागली असून कवटीतील वायुपोकळया नाकासोबत जोडलेल्या असतात. या पोकळयांना नाकाबाजूच्या वायूपोकळया ( Paramsal air sinses ) म्हणतात .
नाक व नाकाची पोकळी कार्य :-
कवटीतील वायूपोकळया :- कवटीतील झर्झरिका ( Ethmoid ) , वाघुळाकृती ( Spheroid ) , ललाटास्थी ( Frortal ) व गालाचे हाड ( Maxilla ) असलेल्या वायुपोकळया नाकासोबत जोडलेल्या असतात . कार्य : १. नाकातील हवेत ओलावा आणणे व हवा उबदार करणे . २. वायूपोकळया आवाजाचा प्रतिध्वनी होऊ देत नाही.
तोंडाच्या मागच्या भागाला घसा म्हणतात. घशाच्या वरील भागात पडजीभ असून नाकपोकळीचे मागचे छिद्र व पडजीभेपर्यंतच्या घशाच्या भागाला नाकघसा ( Nasopharynx ) असे म्हणतात . स्वरयंत्राकडील घसा ( Laryngopharynx ) म्हणजे नाक घशाच्या खालच्या भागापासून स्वर यंत्राच्या वरपर्यंतचा भाग होय .
श्वासनलिका ( Trachea in Marathi ) कार्य :-
१. गरम हवा थंड करणे व थंड हवेस उबदार करणे.
२. कोरडया हवेत ओलावा निर्माण करणे.
३. धूळ, धूर व जिवाणूंचा श्लेष्मात अटकाव करुन सिलियाद्वारे बाहेर टाकणे.
टिप : श्वसनसंस्थेत येणा-या अचानक अपघाती अडथळयामुळे किंवा काही अडकल्यामुळे श्वासनलिका कृत्रिम छिद्र करुन श्वसनक्रिया सुरु ठेवली जाते. अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेला ट्रॅकिओस्टॉमी असे म्हणतात. उदा : स्वरयंत्राचा कॅन्सर , घटसर्प , धनुर्वात किंवा श्वसनस्नायूंच्या पक्षघातासारख्या रोगात ट्रॅकिओस्टॉमी करणे आवश्यक असते .
श्वासिका श्वासवाहिन्याच्या सर्वात लहान उपशाखा असून त्यांचे विभाजन होऊन श्वसनश्वासिका , वायुकोषनलिका , वायुथैली व शेवटी वायुकोषात रुपांतर होते . कार्य : हवा वायुकोषापर्यंत नेणे व कर्बवायु फुफ्फुसाकडून नाकपोकळीकडे आणणे .
मळकट पांढ-या रंगाची स्पंजासारखी शंकूच्या आकारांची फुफ्फुसे छातीपोकळीत हृदयाच्या दोन्ही बाजूस असतात.
उजव्या फुफ्फुसाचे वजन ६२५ ग्रॅम असून त्याचे वरचा, मध्य व खालचा असे तीन भाग असतात . याला डाव्या फुफ्फुसाप्रमाणे दृदयाकरिता पोकळ भाग नसतो तसेच जिभेसारखा भागदेखील नसतो. उजव्या फुफ्फुसाला दहा खंड किंवा छोटे उपभाग असतात.
डाव्या फुफ्फुसाचे वजन ५६५ ग्रॅम असून त्याचे वरचा व खालचा असे दोन भाग असतात. डाव्या फुफ्फुसाला दृदयाकरिता पोकळ भाग असून जिभेसारखा देखील भाग असतो . डाव्या फुफ्फुसाचे नऊ खंड किंवा छोटे उपभाग असतात.
फुफ्फुसाचे महत्वाचे भाग म्हणजे
१ ) फुफ्फुस मूळ
२ ) फुफ्फुसावरण
३ ) वायुकोष फुफ्फुसाचे मूळ ( Root of the Lung in Marathi ) :-
फुफ्फुसाच्या मुळाची रचना खालीलप्रमाणे असते .
१. फुफ्फुस धमनी :- शरीरातील अशुध्द रक्त शुध्द करण्यासाठी दृदयाकडून फुफ्फुसाकडे नेते .
२. फुफ्फुसनीला :- फुफ्फुसातील शुध्द रक्त दृदयाकडे घेऊन जातात .
३. श्वासवाहिनी :- फुफ्फुसामध्ये अनेक शाखा व उपशाखा तयार होऊन हवेचा प्रमुख मार्ग तयार होतो .
४. श्वसन धमनी :- छातीतून खाली जाणा-या महाधमनीची ही शाखा असून ती श्वसन धमनीः छातीतून खाली जाणा-या महाधमनीची ही शाखा असून ती फुफ्फुसातील पेशींना पोषण व प्राणवायू पुरविते .
५. श्वसननीला :- फुफ्फुसाच्या पेशीकडील काही अशुध्द रक्त घेऊन फुफ्फुसातून बाहेर पडते आणि उर्ध्व महाशिरेत सोडते .
६. लसवाहिन्यांची संख्या बरीच असून त्यापैकी काही फुफ्फुसात जातात व काही बाहेर येतात .
७. चेता :- व्हेगस व अनुकंपी चेता फुफ्फुसाच्या चेता पुरवठयासाठी आत जातात .
८. लसग्रंथी :- फुफ्फुसाच्या मुळाजवळ असंख्य लसग्रंथी असून फुफ्फुसामध्ये जाणा-या सर्व लस वाहिनीतील लस या ग्रंथीमध्ये गाळली जाते .
९. फुफ्फुसावरण :- प्रत्येक फुफ्फुसाच्या बाह्य पृष्ठभागावर पिशवीसारखे दुहेरी आवरणाला फुफ्फुसावरण ( Pleura ) असे म्हणतात . या दोन्ही आवरणांच्यामध्ये द्रव असतो . हयात हवा किंवा इतर पदार्थ नसतात . कार्य : फुफ्फुसाचे संरक्षण करणे व घर्षण टाळणे .
१०. वायूकोष ( Alveoli ) :- फुफ्फुसात असंख्य वायूकोष असून वायूकोषाच्या भिंती एक थरीय चपटया पेशीजालाच्या असतात . फुफ्फुस रोहिणीद्वारे आणलेला कर्बवायू वायूकोषात प्रवेश करतो , तर हवेतील प्राणवायू फुफ्फुस नीलाद्वारेदृदयाच्या डाव्या कर्णिकेत नेला जातो .
श्वसनगती :–
श्वसनाची स्वाभाविक गती वयोमानाप्रमाणे बदलत असते.
वयोगट | श्वसनाचा स्वाभाविक दर ( प्रति मिनिट ) |
०- २ महिने | ६० |
२ महिने ते १ वर्ष | ५० |
१ वर्ष ते ५ वर्ष | ४० |
५ वर्ष ते १४ वर्ष | २४ |
प्रौढ व्यक्ति | १५ ते २० |
प्राणवायू व कर्बवायू :- या वायुंची अदलाबदल करणे हे फुफ्फुसाचे कार्य आहे. श्वसनक्रियेत नाक व तोंडावाटे वातावरणातील प्राणवायूयुक्त हवा आत येते . श्वासनलिका आणि श्वासवाहिन्यांच्या शाखामार्फत ही हवा वायुकोषापर्यंत पोहचते . वायुकोषाभोवती असलेल्या फुफ्फुस धमनीच्या केशिकामधील अशुध्द रक्ताशी वायुकोषातील प्राणवायूयुक्त हवेचा निकटचा संबंध येतो . कारण वायु आणि रक्त यामध्ये एकेरी आच्छादक पेशीचे ( Epithelium ) कोष कोशिकाआवरण ( Alveolar capillary membrane ) असते. प्राणवायूचा दाब वायूकोषात जास्त असतो ( 100 mmHg ) तर अशुध्द रक्तात कमी असतो ( 40 mmHg ) आवरण ( Alveolar capillary membrane ) असते.
प्राणवायूचा दाब वायूकोषात जास्त असतो ( 100 mmHg ) तर अशुध्द रक्तात कमी असतो ( 40 mmHg ) म्हणून वायूवहन तत्वानुसार प्राणवायुचे वहन वायूकोषातून फुफ्फुस धमनीच्या केशिकामधील अशुध्द रक्ताकडे होते. तांबडया पेशीतील हिमोग्लोबीन प्राणवायुला शोषून घेते आणि हे प्राणवायूयुक्त रक्त ( शुध्द रक्त ) फुफ्फुसनीलांमधून दृदयाकडे व तेथून संपूर्ण शरीराकडे जाते . चयापचय क्रियेतून निर्माण झालेला कर्बवायू केशिकामधील रक्तातून कोषकेशिका आवरणामधून वायूकोषात येतो , कारण कर्बवायूचा दाब वायूकोषात 40 mmHg तर अशुध्द रक्तात 44 mmHg असते. त्यामुळे कर्बवायूचे वहन अशुध्द रक्ताकडून वायूकोषाकडे होते .
श्वसन क्षमता ( Vital Capacity in Marathi ) :- सर्वसाधारण श्वासानंतर अधिकाधिक हवा फुफ्फुसात घेवून सर्व साधारण उच्छवासनंतर जास्तीत जास्त हवा बाहेर सोडण्याच्या क्रियेत बाहेर पडणा – या हवेच्या आकारमानास श्वसनक्षमता ( Vital Capacity ) असे म्हणतात . श्वसन मार्गात अडथळे निर्माण करणारे जीर्ण / दीर्घकालीन रोग ( Chronic Obstructive Airway Diseases ) श्वसनसंस्थेत दीर्घकालीन रोगामुळे फुफ्फुसे संकुचित होतात व त्यामुळे फुफ्फुसांची श्वसन क्षमता कमी होते .
श्वसन नियंत्रण :- मेंदूलंब ( Medulla in Marathi ) व सेतू मेंदूत ( Pons ) असलेल्या श्वसन नियंत्रण केंद्राद्वारे श्वसन नियंत्रण केले जाते. कर्बवायूची रक्तातील पातळी श्वसन केंद्रावर नियंत्रण ठेवते . श्वसन नियंत्रण केंद्राचे तीन उद्देश आहेत शरीराची प्राणवायुची आवश्यकता पूर्ण करणे व कर्बवायु शरीराबाहेर काढणे . शरीर द्रव्यांच्या आम्ल व आम्लारी अवस्थेचे सन्तुलन नियंत्रित ठेवणे . श्वसनसंस्थेचे रक्षण करणे .
श्वसन संस्थेचे रक्षण :- विषारी वायू व घाण वास नाक व तोंड बंद केल्यामुळे श्वसनसंस्थेत प्रवेश करु शकत नाही . तसेच धूर , धूळ व कर्ब कण किंवा अन्न कणांचा श्वसन संस्थेत प्रवेश झाल्यास खोकला येणे , शिंका , ठसका याद्वारे ते बाहेर टाकले जातात.
प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More
प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More
प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More
प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More
प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More
ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More