स्तनपान – Breastfeeding Position, Importance, Tips, Information in Marathi
शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.
स्तनपान (Breastfeedingin Marathi) हा नवजात बालकाच्या पोषणाचा मूलाधार आहे . बाळाच्या पहिल्या ६ महिन्यापर्यंतही निव्वळ स्तनपान हा त्याचा अधिकार आहे . खालील लेखात स्तनपान, Breastfeeding Meaning, Breastfeeding Position, Breastfeeding Importance, Breastfeeding Tips, Breastfeeding Information in marathi इत्यादि स्तनपानाची सर्व माहिती मराठी भाषेमधे दिलेली आहे.
अनुक्रमणिका
बाळाचे पहिले स्तनपान Breastfeeding in Marathi
kangaroo Mother Care in Marathi, First Breastfeeding in Marathi –
बाळाचे पहिले स्तनपानजन्मानंतर लगेचच म्हणजे बाळाचा जन्म झाल्याबरोबर बाळाचे अंग कोरडे करून बाळाला कोणतेही कपडे न घालता, आईने आपल्या छातीशी धरून स्तनपान द्यावे. यालाच कांगारु मदर केअर ( कांगारु स्थिती ) असेही म्हणतात.
त्यानंतर त्याला उबदार कपड्यामध्ये ठेवावे. जन्मानंतर पहिल्याच प्रयत्नात बाळ स्तनपान करेल याची खात्री नसते. परंतु तसा वारंवार प्रयत्न केल्यानंतर बाळाचा स्तनपान करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल.
आई व बाळाचा पहिल्या तासातच येणारा शारीरिक संपर्क मनात बाळाविषयी प्रेम निर्माण करण्यास मदत करतो व त्यामुळे स्तनपानाची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होते.
जन्मानंतर तात्काळ स्तनपान केल्यास वार लवकर पडून बाळंतपणानंतर होणारा रक्तस्राव कमी होण्यास मदत होते.
बाळंतपणानंतर बाळाला आईच्याच बिछान्यात किंवा बिछान्याजवळ पाळण्यात ठेवावे. असे केल्याने आवश्यक तेव्हा आई बाळाकडे लक्ष देऊ शकते व गरजेप्रमाणे वारंवार स्तनपान देऊ शकते.
Breastfeeding Meaning in Marathi –
Breastfeedingला मराठी भाषेमधे स्तनपान असे म्हणतात.
बाळाला स्तनपान केव्हा व दिवसातून किती वेळा द्यावे ? Exclusive Breastfeeding in Marathi
याबाबत निश्चित असे काहीही नियम नाहीत. बाळाच्या मागणीनुसार बाळाला स्तनपान देणे हा सर्वात उत्तम व सोपा असा पर्याय आहे. प्रत्येक बाळाची गरज वेगळी असते व प्रत्येक बाळाची स्तनपानाची पद्धत वेगळ्या पद्धतीने विकसित होते.
बाळाला प्रत्येक २ ते ३ तासांनी स्तनपान द्यावे.
Exclusive Breastfeeding in Marathi:-
बाळाला पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढे फक्त स्तनपाण देणे याला निव्वळ स्तनपान किंवा Exclusive Breastfeeding असे म्हणतात
मागणीनुसार स्तनपान व त्यात उद्भवणाऱ्या अडचणी
काही बालके खूपच शांत असतात व भूक लागली तरी ती रडत नाहीत. अशा बालकामध्ये कुपोषण होण्याची शक्यता असते. अशा मातेने स्तनपानाचे वेळापत्रक आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तयार करून घ्यावे.
काही बालके गरजेपेक्षा जास्त वेळा स्तनपान करतात. अशा वेळी हे बाळ असे का करते ?
जास्त वेळ स्तनपान देणे मातेला हानीकारक आहे अशी एक चुकीची समजूत आढळून येते. जास्त वेळ स्तनपान केल्यास स्तनाग्राला भेगा पडतात अशीही एक चुकीची समजूत आहे.
प्रत्यक्षात चुकीच्या पद्धतीने ‘ स्तनपान केल्याने स्तनाग्राला भेगा पडण्याची शक्यता असते . ‘ चुकीची पद्धत म्हणजे स्तनपान करताना बाळाची स्थिती नीट नसणे , स्तन योग्य पद्धतीने बाळाच्या तोंडात न देणे इत्यादी. म्हणून बाळाला , त्याची इच्छा असेल तितक्या वेळा व तितका वेळ स्तनपान करू द्यावे.
पोट भरल्यानंतर बाळ आपोआप स्तन तोंडातून सोडून देते. सर्वसाधारणपणे एका वेळेला ५ ते १० मिनिटाचे स्तनपान पुरेसे होते. परंतु काही बाळांना २० ते ३० मिनीटे लागू शकतात. परंतु त्यात काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही.
मात्र २० ते ३० मिनीटे लागणाऱ्या बालकाचे स्तनपान मध्येच खंडित केल्यास त्या बाळाला स्तनातले मागील स्निग्ध पदार्थ जास्त असलेले दूध मिळणार नाही व बाळ कुपोषीत होण्याची शक्यता वाढते.
बाळाला किती वयापर्यंत स्तनपान द्यावे ?
१ ) पहिल्या सहा ते बारा महिण्यात बाळाला फक्त स्तनपान द्यावे.
२ ) सहा महिण्यानंतर फक्त स्तनपानाने बाळाची भूक भागत असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला पुरक आहार चालू करु शकता.
३ ) भारत सरकारच्या निर्देशानुसार बाळाला २ वर्षापर्यंत स्तनपान द्यावे.
४ ) मात्र १ वर्षानंतर स्तनपानाला पूरक आहाराची जोड द्यावी.
५ ) हळूहळू स्तनपान कमी करावे व सर्व आहार वाढवत न्यावा.
६ ) १ वर्षा पेक्षा मोठ्या बाळाला आपण खातो तो सर्व आहार देऊ शकता, मात्र कमी तिखट, कमी तेलकट.
स्तनपानाचे फायदे Importance of Breastfeeding in Marathi
स्तनपानाचे बाळास मिळणारे फायदे:-
Benefits of Breastfeeding to Baby in Marathi –
मातेचे दूध हे परिपूर्ण अन्न आहे.
मातेचे दूध पचनास सोपे असते.
मातेचे दूध आरोग्यवर्धक आणि निर्मळ, जंतूविरहित असते .
मातेचे दूध बाळाचे विविध आजारांपासून संरक्षण करते.
स्तनपानाचे मातेला मिळणारे फायदे:-
Benefits – Importance of Breastfeeding to Mother in Marathi –
स्तनपान केल्याने बाळंतपणानंतर रक्तस्राव कमी होतो.
स्तनपान केल्याने पाळणा लांबवण्यास मदत होते. बाळाच्या जन्मानंतर आईने त्यास सतत अंगावरचेच दूध पाजल्यास तिला पुढील संभाव्य गर्भारपणापासून 98 टक्के संरक्षण मिळते.
स्तनपान केल्याने मातेचा बांधा पूर्ववत होण्यात मदत होते.
स्तनपान केल्याने स्तनांच्या आणि बीजकोशांच्या कर्क रोगाचे प्रमाण कमी होते.
स्तनपान एकाच स्तनातून करावे किंवा दोन्ही स्तनातून ?
Breastfeeding Information in Marathi –
स्तनपान हे दोन्ही स्तनातून करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास स्तनपान न होणाऱ्या स्तनाला सूज (Mastitis in Marathi) येणे किंवा त्या स्तनातून दूध न येणे किंवा त्या स्तनातून दूध येणे कायमचे बंद होणे हे प्रकार होऊ शकतात.
परंतु दोन्ही स्तनातून स्तनपान देताना खालील बाबीकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे.
१ ) दोन्ही स्तनातून पुरेसे स्तनपान होणे आवश्यक आहे. असे न झाल्यास दोन्ही स्तनातील फक्त ‘ पुढील दूध बाळाच्या पोटात जाईल व बाळाचे कुपोषण होईल. ह्यासाठी पहिल्या स्तनाचे पुरेसे स्तनपान झाल्यानंतरच दुसऱ्या स्तनाचे स्तनपान चालू करावे.
२ ) एका वेळेला उजव्या स्तनातून पहिल्यांदा व नंतरच्या वेळेला डाव्या स्तनातून पहिल्यांदा दूध द्यावे. ह्यामुळे कोणतीही गुंतागुंत/त्रास होणार नाही.
स्तनपानाची योग्य पद्धत Breastfeeding Technique in Marathi
Breastfeeding Technique in Marathi –
बाळ मातेच्या स्तनाला योग्य पद्धतीने चिकटले आहे, याची खालील प्रमाणे खात्री करावी.
१ ) हनुवटी स्तनाला चिकटली आहे.
२ ) तोंड पूर्णपणे उघडले आहे.
३ ) खालील ओठ बाहेरच्या बाजूला आहेत.
४ ) स्तनाग्रा भोवतीचा भाग बाळाच्या तोंडाच्या खालच्या बाजूपेक्षा वरच्या बाजूला अधिक दृश्यमान राहील.
स्तनपानाची योग्य स्थिती Breastfeeding Position in Marathi
१ ) पाळणा पद्धत
२) फुटबॉल पद्धत
३ ) कुशीवर झोपून पाजणे
४ ) सुधारीत पाळणा पद्धत
५ ) सिझेरियन प्रसृति नंतर पाजण्याची पद्धत
६ ) जुळ्या बाळासाठी फुटबॉल पद्धत
जन्मानंतर स्तनपानाशिवाय इतर पदार्थ देण्याचे दुष्परिणाम
जन्मानंतर लगेच किंवा पहिल्या आठवड्यात ग्लुकोजचे पाणी , गाईचे दूध इत्यादि पदार्थ देऊ नयेत. अशा पदार्थाची सामान्यत: स्तनपान करणार्या बाळांना गरज नाही.
मात्र काही बाळांना स्तनपानाची समस्या निर्माण झाल्यास परस्थितीनुसार तुमचे डॉक्टर बाळाला साखरेचे पाणी पाजण्याचा सल्ला देऊ शकतात.
अशा पदार्थामुळे बाळ आजारी पडू शकते दूध व पाणी दिल्याने बाळाची भूक मरते व त्यामुळे बाळ स्तनपान घेत नाही. अशा बाळामध्ये अॅलर्जीचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते.
बाळाने स्तनपान न घेतल्यास दूध निर्माण होण्याच्या प्रक्रियेस उशीर होऊन , येणारे दूध कमी व अपुरे येऊ शकते.
स्तनातून भरपूर दूध आल्यास ते बाहेर न आल्यामुळे स्तनाला सूज , जंतुसंसर्ग ह्या गुंतागुंती होऊ शकतात.
माझ्या बाळाला माझे दूध पुरते का ?
माझ्या बाळाला माझे दूध पुरते का ? हा प्रत्येक मातेला पडणारा प्रश्न आहे.
जन्मानंतर पहिल्या १५ दिवसात बाळाला पुरेसे स्तनपान मिळाल्याच्या खुणा
१ ) पहिल्या आठवड्यात नैसर्गिकरित्या बाळाचे १०% वजन कमी होते.
२ ) पुरेसे स्तनपान मिळाल्यास ३ ते ५ दिवसानंतर बाळाचे लघविचे प्रमाण वाढणे.
३ ) पुरेसे स्तनपान मिळाल्यास १५ दिवसात बाळाचे वजन जन्मच्या वेळच्या वजनापेक्षा जास्त होते.
१५ दिवसानंतर पुरेसे स्तनपान मिळाल्याच्या खुणा:-
१ ) २४ तासात बाळ कमीत कमी ६ ते ८ वेळा लघवी करते.
२ ) पहिल्या महिन्यात ५०० ग्रॅम ( अर्धा किलो) पेक्षा जास्त वाढते.
३ ) दुसर्या व तिसर्या महिन्यात प्रत्येकी १ किलो बाळाचे वजन वाढते.
कोणत्या परस्थितीत स्तनपान करु नये
Avoid Breastfeeding in Marathi –
१ ) माता एच आय व्ही संसर्गित असल्यास –
स्तनपान करणारी माता जर एच आय व्ही संसर्गित असेल तर स्तनपान टाळावे. परंतु माता एच आय व्ही चा योग्य उपचार घेत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने स्तनपान द्यावे किंवा नाहि हे ठरवावे. गरोदर असताना सर्व महिलांची एच. आय. व्ही. चाचणी केली जाते.
२ ) माता अँटीमेटाबोलीक / अँटीकॅन्सर / रेडिओअॅक्टीव्ह औषधे घेत असेल –
अशा परिस्थितीत उपचार चालू असेपर्यंत स्तनपान करू नये. दूध येणे सुरू रहावे म्हणून या काळात मातेने स्तनातून दूध काढून टाकणे सुरू ठेवावे. औषधपचार थांबविल्यानंतर काही काळाने स्तनपान सुरू करता येईल .
३ ) स्तनात गाठ किंवा पू होणे ( अॅबसेस ) –
दाटलेले स्तन , स्तनाग्रांना भेगा जाणे , दुग्धनलिका बंद होणे. हयावर वेळीच उपचार केले नाही तर स्तनात पू निर्माण होतो मातेला जास्त ताप व स्तनात वेदना होतात. डॉक्टरांंकडून त्वरीत योग्य उपचार घ्यावा. दरम्यान डॉक्टरांंच्या सल्ल्याने दुसऱ्या स्तनातून स्तनपान चालू ठेवावे.
योग्य स्तनपानाची लक्षणे
बाळ स्तनपान घेण्यासाठी योग्य स्थितीत आहे त्याची लक्षणे:-
बाळाचे पूर्ण शरीर आईकडे वळलेले असणे
बाळ आईच्या अगदी जवळ असणे
बाळ आनंदी दिसणे
स्तनपानाच्या दृष्टीने बाळाला चुकीच्या स्थितीत धरल्यास अशा समस्या उद्भवतात:-
स्तनाग्र दुखते व त्यास चिरा पडतात
पुरेसे दूध येत नाही
बाळ दूध पिण्यास नकार देते
बाळ नीटपणे दूध पीत असल्याची लक्षणे:-
बाळाचे तोंड व्यवस्थित उघडे असते
बाळाची हनुवटी आईच्या स्तनावर टेकलेली असते
स्तनाग्राभोवतीचा गडद रंगाचा भाग बाळाच्या तोंडाच्या वरील बाजूस, खालच्या बाजूपेक्षा, अधिक प्रमाणात दिसतो.
बाळ दीर्घ, सखोलपणे दूध ओढते.
आईचे स्तनाग्र दुखत नाही.
प्रत्येक मातेच्या शरीरात पुरेसे दूध निर्माण होऊ शकते जर:-
ती बाळाला फक्त स्तनपानच करवत असेल
बाळाला योग्य स्थितीत धरत असेल व स्तनाचा बराच भाग बाळाच्या तोंडामध्ये गेला असेल
बाळाच्या इच्छेनुसार दिवसा किंवा रात्रीदेखील त्याला हवे तितके दूध हव्या तितक्या वेळेपर्यत पाजत असेल
सारांश
स्तनपान अमृतपान
मातेने बाळाला रात्रीच्या वेळी जास्ती स्तनपान देण्याचा प्रयत्न करावा. रात्री स्तनपान केल्याने बाळास जास्त वेळ स्तनपान करण्याची संधी मिळते.
विशेषत: आई दिवसभर कामाला जात असेल तर दिवसाची कसर रात्री भरून निघून शकते व बाळाचे कुपोषण / आजारपण टळू शकते. तसेच स्तनपानामुळे पाळणा लांबविण्यासाठी मदत होते.
स्तनांची काळजी स्तनपान देणाऱ्या मातेने स्तन किंवा स्तनाग्रे साबणाने किंवा तत्सम पदार्थाने सारखी धुणे योग्य नाही. त्यामुळे स्तनाग्रांना चिरा पडण्याची शक्यता असते. प्रत्येक स्तनपानाच्या आधी स्तन किंवा स्तनाग्रे धुण्याची तर मुळीच आवश्यकता नाही.