सुमन कार्यक्रम म्हणजेच सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम यालाच SUMAN ( SUMAN in Marathi ) असेही म्हणतात. खालील लेखात SUMAN म्हणजेच सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम ची सर्व माहिती दिलेली आहे.
अनुक्रमणिका
सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम प्रस्तावना SUMAN introduction in Marathi
माता आणि नवजात बालकांचे इष्टतम आरोग्य साध्य करण्यासाठी सुरक्षित गर्भधारणा आणि ताबडतोब प्रसुतीनंतरचा काळ हा महत्त्वाचा टप्पा आहे . माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच त्यामधील विविध राज्यांमधील असमानता दूर करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करणे गरजेचे आहेत .
यासाठी अखंडपणे सर्वसमावेशक , बहुविध आणि समन्वित रीतीने धोरणांचा अवलंब करणे तसेच त्यासाठी सतत सुरक्षित मातृत्व मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे . असे निदर्शनास येते की सुमारे ५२ % महिला प्रसुतीसाठी शासकीय रुग्णालयात जातात . मोफत , आदरणीय आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याची ही संधी आहे .
गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या जन्मादरम्यान संपूर्ण आणि सर्वसमावेशक काळजी घेण्याची हमी लाभार्थीना देता येऊ शकेल . म्हणूनच सुरक्षित गर्भधारणा , प्रसूती आणि तात्काळ प्रसूती पश्चात सेवांना सन्मानाने प्रोत्साहित करण्यासाठी एक योग्य धोरण तयार करणे महत्वाचे आहे . तसेच लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवेला हमीमध्ये परावर्तीत करणे लाभार्थी साठी अधिक अर्थपूर्ण आहे .
सुरक्षित मातृत्व आश्वासन ( SUMAN ) या कार्यक्रमामध्ये सर्व गरोदर माता, ६ महिन्यापर्यंतच्या स्तनदा माता तसेच सर्व आजारी बालके यांचा समावेश आहे .
माता व बालकांना ९ गुणात्मक सेवा उपलब्ध करुन देण्याची हमी या कार्यक्रमामध्ये देण्यात आलेली आहे . तसेच या कार्यक्रमांतर्गत दयावयाच्या सर्व सेवा देणे बंधनकारक असून त्या सर्व सेवा मोफत दयावयाच्या आहेत व गुंतागुंतीच्या व्यवस्थापनाची हमी द्यावयाची आहे . या सर्व बाबी करताना महिलेची स्वायत्तत्ता , प्रतिष्ठा , भावना , सेवेची निवड करण्याचा अधिकार तसेच लाभार्थीने निवडलेल्या सेवांना प्राधान्य दयावायाचे आहे .
सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम ध्येय SUMAN Goals in Marathi
सुमन कार्यक्रमांतर्गत दयावयाच्या सर्व सेवा या आश्वासित ( assured ) , प्रतिष्ठित ( Dignity ) , आदरयुक्त ( Respectful ) व दर्जेदार ( Quality ) तसेच मोफत मिळणे गरजेचे आहे .
अश्या आरोग्य सेवा माता व नवजात बालके यांना नाकारणे दखल पात्र आहे . तसेच टाळता येण्याजोग्या कारणांमुळे होणारे माता व नवजात बालमृत्यु व आजार हे संपुष्टात येतील व सकारात्मक प्रसूतीचा अनुभव प्राप्त होईल हे या कार्यक्रमाचे ध्येय आहे .
गरोदरपण , बाळंतपण व प्रसूतीपश्चात कालावधी हे जिवनाचे महत्वपुर्ण घटनांचे मैलाचे दगड आहेत . या दरम्यान आलेले अनुभव हे महिलेला , बाळांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रभावित करतात आणि त्याचे समाजावर महत्वाचे व दुरगामी परिणाम होतात .
जागतिक आरोग्य संघटनेद्वारे माता व नवजात बालकांसाठी व गुणवत्तापुर्ण सेवेच्या व्याख्येमध्ये , व्यक्ती व आजारी लोकसंख्येला योग्य प्रमाणात आरोग्य सेवा दिल्या गेल्या असतील तर आपेक्षित उद्दिष्ट साध्य होते . हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य सेवाही सुरक्षित , प्रभावी , वेळेवर , समान आणि लोकभिमुख तसेच कुशलतापूर्वक एकिकृत करणे गरजेचे आहे .
सुमन कार्यक्रमाचे लाभार्थी
- १. सर्व गरोदर महिला
- २. प्रसूती नंतर ६ महिन्यापर्यंतच्या स्तनदा माता
- ३. सर्व आजारी बालके
निष्काळजी पणाबद्दल शुन्य सहिष्णुता सुरू असलेले उपक्रमाचे एकत्रीकरण आंतर पाठपुरावा घेण्याची यंत्रणा 4GED सेवा हमी
सुमन कार्यक्रमाची उद्दिष्टे
- कार्यक्रमांतर्गत सर्व लाभार्थीना उच्च दर्जाच्या वैद्यकिय व अत्यावश्यक सेवा व संदर्भ सेवा देणे .
- लाभार्थीला या कार्यक्रमांतर्गत उपलब्ध सोयीसुविधा यांची नियमित माहिती देण्यासाठी तसेच लाभार्थच्या प्राप्त तक्रारींना त्वरीत प्रतिसाद देणारी प्रभावी आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करणे .
- सार्वजनिक आरोग्य संस्था तसेच विविधि सामाजिक संघटना जसे स्वयंसेवी संस्था , स्वयंसहाय्यता गट , लोकप्रतिनिधीयांचा १०० टक्के मातामृत्युच्यानोंदणीसाठी उपयोग व त्या मृत्युच्या अन्वेषणासाठी जनजागृती निर्माण करणे .
- आरोग्य सेवा पुरविणा – या सर्व कर्मचारी व अधिकारी याचे ज्ञान आणि कौशल्य बळकटीकरण करुन त्यांच्यामध्ये लाभार्थीच्या हक्काबाबत जागृती निर्माण करणे आणि त्यांना लाभार्थीना गुणात्मक सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रवृत्त करणे ,
- आंतरविभागीय समन्वय साधण्यासाठी कृती योजना तयार करणे ,
- सुमन कार्यक्रमाची परिणामकारकता वाढविण्यासाठी व योजनेची ध्येयधोरणे ठरविणे , पर्यवेक्षण करणे आणि कार्यक्रमाच्या नियमित आढाव्यासाठी सुकाणू समिती गठीत करणे.
सुमन कार्यक्रम सेवांच्या हमींची सनद
सुरक्षित मातृत्व आश्वासन –
सार्वजनिक आरोग्य संस्थांना भेट देणा-या सर्व गरोदर माता व नवजात बालके यांना खालील सेवा मोफत मिळण्याचा हक्क आहे . .
- सर्व गरोदर मातांच्या किमान चार प्रसूतीपुर्व सेवा ( ज्यामध्ये पहिली तपासणी पहिल्या तिमाहीमध्ये , दुसरी किमान एक तपासणी प्रधामंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत , लोहयुक्त गोळया , कॅल्शियम तसेच जंतनाशक गोळ्यांचा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुरवठा , सोनोग्राफी , इंजेक्शन टी.डी. आणि इतर प्रसूतीपुर्व सेवेतील सर्वसमावेशक सेवा ) आणि नवजात बालकासाठी किमान ६ घर भेटी
- वैद्यकिय गर्भपाताच्या , गर्भपात कायद्याप्रमाणे सर्वसमावेशक सेवा सेवांची हमी देणारी सुरक्षित मातृत्व पुस्तिका व माता बालक संरक्षक कार्ड यांचे वाटप गुंतागुंतीच्या नोंदी व व्यवस्थापनयावर मोफत उपचार कोणत्याही गंभीर रुग्णाला घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत एका तासात पोहोचण्यासाठी मोफत वाहतुक सेवा व आश्वासक संदर्भ सेवा उपलब्ध करुन देणे आणि संस्थेपासून घरापर्यंत डिसचार्ज मिळल्यावर मोफत ड्रॉपबॅक सेवा देणे
- नामनिर्देशित केलेल्या सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थामध्ये मोफत प्रसूतीची तसेच सिझेरियन शस्त्रक्रियेची व काही प्रकरणात गुंतागुंत झाल्यास संपुर्णपणे मोफत सेवा उपलब्ध करुन देणे मातेपासून बाळाला संक्रमण होणा – या एचआयव्ही , सीफ ीलीस , हिपॅटायटीस बी हया आजारांचा प्रतिबंध करण्याबाबतच्या सेवा
- प्रशिक्षीत व्यक्ती किंवा स्कील्ड बर्थ अटेन्डन्ट मार्फत गुणवत्तापुर्ण सेवा , प्रतिष्ठा तसेच गोपनीयता राखून सन्माननीय सेवा ५ मिनिटापेक्षा जास्त वेळेनंतर किंवा वार पडल्यानंतर नाळ कापणे यापैकी एक पर्याय निवड करण्याची मुभा
- बाळ जन्मल्यानंतर बाळाला तात्काळ स्तनपान सुरु करण्यासाठी मार्गदर्शन व मदत करणे
- बाळाला जन्मतः करावयाचे लसीकरण आजारी नवजात बालकांना मोफत आरोग्य सेवा
- सार्वजनिक आरोग्य संस्थेमार्फत जन्म दाखला
- केंद्र व राज्य शासनाच्या विविधि योजनांचे आर्थिक लाभ लाभार्थीना अदा करणे प्रसूतीपश्चात कुटुंब नियोजन पध्दतीसाठीसमुपदेशन
- तक्रारींचे विहित कालमर्यादेत निराकरण करण्यासाठी कॉल सेंटर / हेल्पलाईन व वेबपोर्टल यांची उभारणी करणे
- सुरक्षित मातृत्वासाठी समुपदेशन आणि वर्तणुकीत बदलासाठी माहिती शिक्षण आणि संवाद.
सुमन कार्यक्रमासाठी महत्वाचे घटक
=> सेवेची हमी –
जननी सुरक्षा कार्यक्रम , जननी सुरक्षा योजना , प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान , लक्ष , ” मा ” दक्षता , नवजात बालकांसाठीचे विशेष काळजी कक्ष आणि गृहभेटीद्वारा नवजात बालकाची काळजी .
=> सामाजिक जाणीव जागृती –
स्वयासहाय्यता गट , आणि ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण समिती यांच्या संयुक्त प्रयत्नाने समाजाची कटिबध्दत आंतरविभागीय समन्वय . समाजातील विजेता सुरक्षित मातृत्व पुस्तिका व एमसीपी कार्ड यांचा वापर समाजिक स्तरावर जागृती करण्यासाठी वापर ,
=> आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण –
पायाभूत सुविधामध्ये
- लेबर डिलेव्हरी रिकव्हरी ,
- शल्यगृह ,
- ऑबस्टेट्रिक एचडीयु / आयसीयु ,
- नवजात शिशु काळजी कोपरा ,
- नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष ,
- नवजात शिशु विशेष काळजी कक्ष .
- मनुष्यबळ औषधे व प्रयोगशाळा चाचण्या .
- आश्वासीत संदर्भ सेवा .
- उत्कृष्ट आरोग्य संस्थांची निर्मीती .
=> संनियंत्रण व अहवाल सादरीकरण –
तक्रार निवारण आणि अहवालासाठी कॉल सेंटर , एमसीपी कार्ड आणि सुरक्षित मातृत्व बुकलेट , सेवांच्या हमीची सनद . मासिक अहवाल . एचएमआयएस चे विश्लेषण . राज्य व केंद्रस्तरावर मॉनिटरस् नेमणे .
=> प्रोत्साहन व पारितोषिके –
उत्कृष्ट काम करणार्यांना पारितोषिके आणि प्रोत्साहनात्मक भत्ता .
=> माहिती शिक्षण संवाद / वर्तणुकीत बदलासाठी संवाद –
टाळता येणा-या माता व नवजात बालकांचे मृत्यु यांचे प्रमाण शुन्य करण्यासाठी मोठया प्रमाणात सामाजिक बदलासाठी माहिती शिक्षण आणि संवाद.
=> सुमन कार्यक्रमांतर्गत विविधस्तरावर समितीची स्थापना
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तालुका वैद्यकिय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत सुचित केले आहे .