तोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तोंडाच्या कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.
अनुक्रमणिका
तोंडाचा कर्करोग म्हणजे भारताची सर्वात मोठी समस्या असून भारतातील मुख्य तीन प्रकारच्या कर्करोगामध्ये अग्रस्थानी आहे . १ लाख लोकसंख्येमागे २० असे तोंडाच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव आहे. भारतात होणाऱ्या एकत्रित कर्करोगाच्या प्रमाणात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण ३० टक्के आहे.
तोंडाच्या कर्करोगामध्ये खालील प्रकारचे कर्करोग मोडतात .
बहुतेक कर्करोग हे मुखाच्या आतील आवरणाला, दंतपक्तीच्या रेषेवर आणि जिभेवर असतात.
ओठाची बाहेरील किनार व त्वचा यामधील रेषेपासून तोडाची पोकळी सुरु होते . वरचा भाग कठिन टाळू ने बनला असतो . कठिन टाळू नंतर घश्याखालील भाग व त्यामधील जिभ आणि टॉन्सीलच्या मागील मृदु टाळू . गालाच्या आतिल भाग मुखपोकळीची बाजू तयार करतात , मुखाच्या पोकळीचा खालचा भाग तोंडाचा तळ तयार करतात. हा तळ भाग जिभेने आछादलेला असतो .
मुखपोकळी विशिष्ट भागात खालीलप्रमाणे विभागलेली आहे .
मुखातील आवरणावर प्रामुख्याने पांढरा थर ज्याचे इतर कोणत्याही आजारात वर्गीकरण करता येत नसेल त्याला ओरल ल्यूकोप्लाकिया म्हणतात. ( oral leukoplakia in Marathi ) सुरवातीच्या काळात वैद्यकीय तपासणी मध्ये पांढऱ्या थराचे वर्गीकरण होण्यापूर्वी त्याला तात्पुरत्या स्वरूपात ओरल ल्युकोप्लाकीया म्हणता येते .
अशा परिस्थितीत , योग्य निदान करण्याकरिता रासायनिक जखम ( Chemical Burn in Marathi ) घर्षणामुळे झालेली जखम ( व्रण ) ( Frictional keratosis ) ओठ किंवा गाल चावण्याची सवय , पॅपिलोमा ( Papilloma in Marathi ) , ल्युपस एरिथीमॅटोसस ( lupus erythematous in Marathi ) , व्हाईट स्पंज निवस ( White Sponge nevus , candidiasis and lichenplanus in Marathi ) किंवा त्यासारखे व्रण / जखम आवश्यक त्या कारणांची व जंतुसंसरर्गाची शहानिशा करून पांढऱ्या थराची बयोप्सी करण्यापूर्वी साधारणपणे २-४ आठवडयात थर कमी किंवा नाहीसा होणे अपेक्षित आहे .
पांढरा थर बहुधा लक्षण विरहीत असतो व नियमीत तपासणीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात येते . बाह्य स्वरूपावरून आणि इतर आजारांची शहानिशा करुन पांढऱ्या थराचे निदान करता येते .
प्रोलिफरेटीव वेरूकस ल्युकोप्लाकिया ( Proliferative verrucous leukoplakia in Marathi )
प्रेलिफरेटीब बेरुकस ल्युकोप्लाकीया हा मुखाच्या कर्करोगाच्या पूर्व लक्षणापैकी फार कमी आढळणारा प्रकार आहे . त्याला फ्लोरीड पॅपिलोमॅटोसिस ( Florid Paplilomatosis in Marathi ) म्हणतात . मल्टीपल स्क्वॉमस पॅपीलरी नोडयुल्स हे त्याचे चिन्ह आहे . मुखातील पांढऱ्या थरांचा हा घातक प्रकार असून जवळ जवळ सर्व प्रोलिफरेटीव्ह बेरसकस ल्युकोप्लाकियाचे पुढे अनेक ठिकाणी कर्करोगात रुपांतर होते.
एरिथ्रोप्लाकीया म्हणजे ज्याचे इतर कुठल्याही व्रणामध्ये रोगनिदान होऊ शकत नाही. साधारण श्लेषमल त्वचेच्या बाजुला लालभडक , मुलायम , बेल्वेटसारखा , कणीदार किंवा दाणेदार ज्याच्या कडा स्पष्ट असतात असा व्रण , मृदू टाळू , तोंडातील खालचा भाग , जीभेचा वरचा भाग , दाढेमागचा भाग इ . ठिकाणी हा आढळू शकतो . मध्यम ते वयस्क वयात विशेषतः पुरुषांमध्ये हा जास्त आढळतो.
विविध भागामध्ये याचे प्रमाण ०.०२ – ०.८३ % इतके आहे . तंबाखू सेवन व मद्यपान यामुळे एरिथ्रोप्लाकीयाची शक्यता अधिक बळावते . तोंडाच्या स्क्वॉमस सेल कार्सिनोमा ( Squamous cell carcinoma in Marathi ) प्रमाणेच याची कारणे आहेत.
ओरल सबम्युकास फायब्रोसिस म्हणजे तोंडाच्या कर्करोगाचा व्यवस्थित ओळखता येईल असा प्रकार आहे. दक्षिण आशियामध्ये हा अधिक आढळतो . उदा- यु.के. सिंगापूर , मलेशिया इत्यादी देशामध्ये. मुखातील श्लेषमल त्वचेवर एक विशिष्ट व्रण दिसतो. त्यामुळे तोंड पुर्णपणे उघडण्यास अडचण जाते . ओठांची ब जीभेची हालचाल नीट होत नाही. OSMF चे प्रमाण भारतात ०.२ – १.२ % आहे .
ओरल सबम्युकस फायब्रोसिस ( Oral Submucous Fibrosis in Marathi )
सर्व तंबाखू सेवन करणाऱ्यांनी दर महिन्याला तोंडाची तपासणी करावी . तोंडाची स्वतः तपासणी केल्याने तोंडातील जखमांचे लवकर निदान करता येते . हे कसे करावे –
जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More
bhagar-khatana-kay-kalaji-ghyavi-bhagar-vhishbadha-bhagar-acidity Read More
सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More
गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More
जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More
उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More