आजारांची माहिती

कोरोना व्हायरस कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध CoronaVirus in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

खालील लेखात कोरोना व्हायरस Novel Corona virus 2019 कोरोना व्हायरस म्हणजे काय ?, कोरोना व्हायरस चा प्रसार कसा होतो?, कोरोना व्हायरस लक्षणे, कोरोना व्हायरस निदान/तपासणी, कोरोना व्हायरस उपचार, प्रतिबंध, लस इत्यादि सर्व माहिती मराठी भाषेमधे दिलेली आहे.

मास्क आणि सॅनिटायझर यांचा समावेश जीवनावश्यक गोष्टिमधे करण्यात आलेला आहे, याचा अर्थ मास्क आणि सॅनिटायझर यांचा अवैध साठा करता येणार नाही तसेच चढ्या किंमतीने विकता येणार नाही. या कायद्याचे उलंंघन केल्यास ७ वर्षाची शिक्षा होऊ शकते.

Coronavirus in pune, CoronaVirus in Maharashtra, CoronaVirus in Marathi

चीनमधील हुबेई प्रांतातील कहान व वुहान शहरात न्युमोनियाचे अनेक रुग्ण आढळले असून सदर न्युमानियाचे कारण नव्या प्रकारचा कोरोना व्हायरस ( Novel Corona virus 2019 – nCov ) असल्याचे सिध्द झाले आहे.

Coronavirus in india, Coronavirus in Maharashtra, Coronavirus in Solapur, Coronavirus in Marathi News, Coronavirus in Batami –

अनुक्रमणिका

कोरोना व्हायरस म्हणजे काय ? What is CoronaVirus in Marathi ?

साध्यासुध्या सर्दी खोकल्यापासून ते मर्स किंवा सार्स सारख्या गंभीर आजास कारणीभूत असणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या व्हायरस गटास कोरोना व्हायरस असे म्हणतात , सन २००३ साली आढळलेला ( SARS ) सार्स हा देखील एक प्रकारचा कोरोना व्हायरसच होता.

करोना व्हायरस, करोना व्हायरस लस, करोना व्हायरस प्रतिबंध, करोना व्हायरस उपचार, करोना व्हायरस निदानतपासणी, करोना व्हायरस लक्षणे, CoronaVirus in Marathi, coronavirus in pune, coronavirus in maharashtra, coronavirus marathi news, coronavirus in india

नॉव्हेल कोरोना व्हायरस काय आहे ? What is Novel CoronaVirus in Marathi ?

सध्या चीनमधील उद्रेकात आढळलेला विषाणू हा कोरोना विषाणूच आहे. तथापि त्याची जनुकीय रचना पुर्णपणे नवीन असल्याने त्यास नॉव्हेल कोरोना व्हायरस असे नाव देण्यात आले आहे.

कोरोना व्हायरस चा प्रसार कसा होतो?CoronaVirus Mode of Transmission in Marathi:-

या व्हायरसचा प्रसार

१ ) प्राण्याद्वारे माणसांना व

२ ) करोना विषाणूग्रस्थ एका व्यक्ती द्वारे दुस-या व्यक्तीला

या दोन प्रकारे होतो.

लक्षणांचे स्वरुप व विषाणू चा प्रकार पाहता शिंकणे, खोकणे, तोंंडातील व नाकांंतील स्राव यामुळे हवेमार्फत ( Droplet ) या विषाणूचा प्रसार होत आहे.

Coronavirus kasa pasarato? Coronavirus in india, Coronavirus in Maharashtra, Coronavirus Batami, Coronavirus Lakshane

कोरोना व्हायरसचा प्रसार कोणत्या प्राण्यांमार्फत होतो? CoronaVirus Animal Spread/Hosts in Marathi:-

कोरोना व्हायरस प्रसार नक्की कसा होतो याबद्दल नेमकी माहिती सध्या उपलब्ध नाही. मात्र खालील शक्यता शात्रज्ञा द्वारे व्यक्त होत आहे.

कोरोना व्हायरस हा प्राणीजन्य नवीन विषाणू मांजर,उंट, जंगली प्राणी, समुद्रातील प्राण्याच्या संपर्कापासून पसरतो.

परंतु सध्या पसरलेला चीन मधील करोना व्हायरस हा मांजर,उंट, साप व समुद्रातून मिळणारे खाद्य पदार्थातून पसरला असावा असा संशोधकांचा प्राथमिक अंदाज आहे.जसे मासे, खेकडे, झिंगे, कोळंंबी इ.

Coronavirus in india, Coronavirus in Maharashtra, Coronavirus in Pune, Coronavirus in Marathi News, Coronavirus in Batami –

कोरोना व्हायरस आजाराची लक्षणे – Symptoms of CoronaVirus in Marathi :-

  • सर्दी , खोकला ( कॉमन कोल्ड ), घसा बसणे.
  • अचानक येणारा तीव्र ताप
  • गंभीर स्वरुपाची श्वसन संस्थेची लक्षणे. शरीरातील ऑक्सिजन चे प्रमान कमी होते.
  • श्वास घ्यायला त्रास होणे. श्वासास अडथळा- दम लागणे.
  • न्यूमोनिआ – ताप,सर्दि, खोकला, स्वासाची गती वाढणे.
  • पचनसंस्थेची लक्षणे – अतिसार
  • काही रुग्णांमध्ये – मूत्रपिंड निकामी होणे.
  • थकवा, अशक्तपणा, अंगदुखी
  • प्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये इतर असामान्य ( Typical ) लक्षणे आढळू शकतात .
  • काही रुग्णांमध्ये मृत्यू हि होऊ शकतो.
  • कोरोना व्हायरस आजारामूळे होणारे मृत्येचे प्रमाण फक्त २% आहे
  • coronavirus meaning in Marathi

स्वस्तात मास्क खरेदि करा:-

कोरोना व्हायरस निदान/तपासणी CoronaVirus Investigations in Marathi:-

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे या कोरोना आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.

कोरोना व्हायरस चे निदान करण्यासाठी व्हारल आयसोलेशन हि तपासणी करतात.

आढळलेल्या संशयित रुग्णाचा व त्यांच्या निकट सहवासितांचा पाठपुरावा व आवश्यक कार्यवाही एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांमार्फत ( आयडीएसपी ) करण्यात येतो.

कोरोना व्हायरस, कोरोना व्हायरस निदान तपासणी, CoronaVirus in Marathi, Investigations of CoronaVirus in Marathi, Marathi Doctor, Dr Vivekanand Ghodake, Coronavirus kasa pasarato? Coronavirus in india, Coronavirus in Maharashtra, Coronavirus Batami

कोरोना व्हायरस उपचार CoronaVirus Treatment in Marathi:-

कोरोना व्हायरस चा उपचार रुग्णाच्या लक्षणा नुसार करतात.

रुग्णाला साहयभूत ठरणारी निगा, काळजी ( Supportive Care ) अत्यंत प्रभावी ठरते.

कोरोना या व्हायरसकरीता कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही.

तापासाठी – पॅरासिटेमॉल,

सर्दिसाठी – अ‍ॅन्टिहिस्टॅमिनिक्स/ डिकन्जेस्टंट

खोकल्यासाठी – कफ सायरप

गरज पडल्यास ( सेंंकन्डरी इन्फेकशन झाल्यास ) – अ‍ॅन्टिबॉयोटिक्स वापरावीत.

योग्य आहार व पाणी द्यावे.

या विषाणूची लागण होण्यापासून प्रतिबंध करणे हेच सगळ्यात चांगले.

गंभीर अवस्थेत रुग्णांंला जीवन रक्षक प्रणालीवरही ( Ventilator ) ठेवण्याची गरज पडू शकते.

ह्या आजाराची घातकता फक्त १-३ टक्केच आहे, वेळीच योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो.

कोरोना व्हायरस प्रतिबंधाची खबरदारी CoronaVirus Preventive Measures in Marathi:-

सर्वसाधारणपणे कोरोना आजाराचे स्वरूप लक्षात घेता हा आजार होऊ नये यासाठी खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे घेणे आवश्यक आहे

  • श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तींशी निकट सहवास टाळणे.
  • हातांची नियमित स्वच्छता.
  • न शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले मांस खाऊ नये.
  • फळे , भाज्या न धुता खाऊ नये.
  • खोकताना, शिंकताना नाका – तोंडावर रुमाल / टिश्यू पेपरचा वापर करावा.
  • अशाप्रकारे वापरलेले टिश्यूपेपर ताबडतोब व्यवस्थित झाकण असलेल्या कचरा पेटीत टाकावेत.

स्वस्तात सॅनिटायझर खरेदि करा:-

खालील व्यक्तींनी विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यावा.

  • श्वसनास त्रास होणाऱ्या व्यक्ती.
  • हा त्रास कोणत्या आजारामुळे / विषाणूमुळे होत आहे हे स्पष्ट होत नसल्यास आणि रुग्णाने नुकताचा करोना प्रभावित क्षेत्रात प्रवास केला असल्यास.
  • प्रतिकार शक्ती कमी असलेल्या आजारी व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच नवीन करोना विषाणू बाधित देशात प्रवास केला आहे.
  • रुग्णास उपचार देणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सदर आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो, याकरीता रुग्णास उपचार करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी सुयोग्य संसर्गप्रतिबंध व नियंत्रण पध्दती वापरणे आवश्यक आहे. 

कोरोना व्हायरस साठी लस उपलब्ध आहे का? Vaccine for CoronaVirus in Marathi:-

कोरोना व्हायरस या विषाणूकरीता कोणतीही लस सध्या उपलब्ध नाही

पुण्यातील सिरम हि संस्था कोरोना व्हायरस विरुद्ध लस निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे, परंतु ही लस बाजारात येण्यास खुप दिवस लागू शकतात.

डॉक्टर व हॉस्पिटल यांंनी घ्यावयाची दक्षता CoronaVirus Directions for Doctors & Hospitals in Marathi:-

प्रत्येक जिल्हयाने / मनपाने आपल्या कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना या संदर्भातील आवश्यक माहिती द्यावी. जिल्हास्तरावर या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील

कोरोना व्हायरस प्रयोगशाळा निदानाची व्यवस्था – CoronaVirus Laboratory Investigation in Marathi

महाराष्ट्रात राष्ट्रीय विषणू विज्ञान संस्था पुणे येथे उपलब्ध असून निदानासाठी रुग्णांचे कोणते नमुने घ्यावेत व ते प्रयोगशाळेत कसे पाठवावेत याची माहिती एनआयव्ही पुणे यांच्या संकेतस्थळावर www.niv.co.in उपलब्ध आहे.

एनआयव्ही पुणे यांना रुग्ण निदानासाठी नमुने पाठवितांना ते जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत राज्य आय. डी. एस. पी. विभागाच्या अनुमतीने ( ssumaharashtra @ gmail . com ) पाठवावेत.

कोरोना व्हायरस संसर्ग-प्रतिबंधक खबरदारी – (Infection Prevention & control) :-

रुग्णालय स्तरावर संसर्ग प्रतिबंध यंत्रणा Universal Precaution धर्तीवर कार्यरत असणे आवश्यक आहे.

  • हात धुण्याची व्यवस्था
  • पी . पी . ई . ची पुरेशी उपलब्धता
  • जैव – वैद्यकीय कचऱ्याची सुयोग्य विल्हेवाट या बाबींकडे विशेष लक्ष देण्यात यावे,
  • या दृष्टीने रुग्णालयांची तयारी आणि विलगीकरण कक्ष सुसज्ज असणे आवश्यक आहे.
  • गंभीर रुग्णांसाठी व्हेंटीलेटर तसेच जीवनावश्यक प्रणाली सुविधा सक्षमपणे कार्यरत राहतील, याची ही दक्षता घेण्यात यावी.

कोरोना व्हायरस आरोग्य शिक्षण –

सध्या तरी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याची सुरवात आपल्या राज्यात झालेली दिसते तथापि, इन्फ्ल्यूएंझा सदृश्य आजाराच्या तसेच श्वसन संस्थेच्या आजाराच्या रुग्णांनी व नातेवाईकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनतेचे प्रबोधन करण्यात यावे.

स्वाईन फ्ल्यू संदर्भात उपलब्ध आरोग्य शिक्षण विषयक साहित्याचा वापर करावा . तरी उपरोक्त प्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक कार्यक्षम करुन नव्याने उद्भवलेल्या या दोन विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्था होण्याकरीता आपण सर्वांनी योग्य ते प्रयत्न करावेत, या आजारासंदर्भातील अधिक माहितीसाठी www.who.int या संकेतस्थळाचा उपयोग करावा.

भारत सरकार द्वारा घेण्यात येत असलेल्या खबरदारी Preventive Measures by Government of India :-

कोरोना व्हायरस या आजाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मुंबई , दिल्ली व कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरु केले आहे. दररोज अंंदाजे ९ हजार ते १० हजार प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जात आहे.

अशा प्रवाशांमधुन आढळलेल्या संशयित रुग्णाचा व त्यांच्या निकट सहवासितांचा पाठपुरावा व आवश्यक कार्यवाही एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांमार्फत ( आयडीएसपी ) करण्यात येईल.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे या आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. सध्या तरी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याची सुरवात आपल्या राज्यात झालेली दिसते तरी या अनुषंगाने आपण वरील बाबीं लक्षात घेवून काळजी घ्यावी.

सारांश:-

कोरोना व्हायरस आजारामूळे होणारे मृत्येचे प्रमाण फक्त २% आहे त्यामुळे घाबरून जाऊ नये. परंतु कोरोना व्हायरस आजारासारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांंकडून उपचार घ्या. Coronavirus in india, Coronavirus in Maharashtra, Coronavirus in Solapur, Coronavirus in Marathi News, Coronavirus in Batami Coronavirus in Marathi –

स्वस्तात कोरोना किट खरेदि करा:-

Copyright Material Don't Copy © 2020

View Comments

Share
Published by

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023