आजारांची माहिती

धनुर्वात कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार Dhanurvat, Tetanus Meaning in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

धनुर्वात हा क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी या जीवाणू मूळे होणारा तीव्र संक्रामक रोग आहे. ऐच्छिक स्नायूंना आकडी येऊन ते ताठरणे, शरीर धनुष्यबाणाप्रमाणे वाकडे होणे हे धनुर्वात (Tetanus Meaning in Marathi) या रोगाचे वैशिष्ट्य आहे.

कोणत्याही प्रकारच्या जखमेतून तसेच अगदी साध्या ओरखड्यातून धनुर्वाताचे हे जीवाणू शरीरात आत शिरतात. अ‍ॅक्सिजनविरहित वातावरण धनुर्वात या जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असल्याने जखमा व खोल भेगामध्ये हे जिवाणू सहज वाढतात.

विशेषत: मातीत व धुळीत हे जीवाणू मोठ्या संख्येने असतात. गायी, म्हशी, घोडे, कुत्रे इ. प्राण्यांच्या आतड्यांत व विष्ठेतही हे जीवाणू असतात. जखमेवर साचलेल्या मातीत धनुर्वाताचे जीवाणू असू शकतात. या रोगाचे संक्रामण रुग्णाच्या संपर्कातून किंवा हवेतून होत नाही.

धनुर्वात रोगाचे स्वरुप:-

Tetanus Meaning in Marathi, Tetanus in Marathi, Dhanurvat:-

 1. धनुर्वात हा क्लॉस्ट्रिडीयम टिटॅनी नावाच्या जिवाणूच्या बाहयविषामुळे होणारा रोग आहे.
 2. स्नायू – काठिण्य हे या रोगाचे प्रमुख लक्षण होय . हया रोगात गालाचे , पोटाचे आणि पाठीच्या मणक्याचे स्नायू सततच्या आंकुचनामुळे ताठरतात व कालांतराने हया स्नायूंना झटके यायला लागतात.
 3. धनुर्वातात मृत्यूदर बराच जास्त म्हणजे जवळजवळ ४० ते ८० टक्के असतो. हा रोग जगात सर्वत्र आढळतो .
 4. भारतातही हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. अधिकृत आकडेवारीनुसार १९९५ मध्ये धनुर्वाताचे एकूण ५६६८ रुग्ण आढळते.
 5. तसेच हयाच कालावधीत नवजात अर्भकातील धनुर्वाताचे एकूण १८९६ रुग्ण आढळले.

धनुर्वात संसर्गस्त्रोत:-

Tetanus Source in Marathi:-

हे जिवाणू वातावरणात इतस्ततः विखुरलेले आढळतात . उदा , माती , धुळ , घोडयाची लीद , शेण यात हे जंतू मोठया प्रमाणात असतात .

धनुर्वात साथरोगशास्त्रीय घटक:-

Tetanus Cause in Marathi

क्लॉस्ट्रिडीयम टिटॅनी नामक जिवाणू. हे जिवाणू मानवासह अनेक पृष्ठवंशीय प्राण्याच्या आतडयामध्ये आढळतात. हे जिवाणू प्राणवायुविरहित जागी अंकुरीत होऊन तीव्र बाहयविषाची निर्मिती करतात.

धनुर्वात प्रसार माध्यम:-

Tetanus Spread in Marathi:-

१) बहुतांश लोकांना धनुर्वाताची बाधा जखम झाल्यावर होते. धनुर्वात बीजाणूमुळे जखमा दूषित होऊन धनुर्वात होतो, अशा जखमा अनेकदा किरकोळ स्वरुपाच्या सुध्दा असतात.
२) लसीकरण अथवा इतर कारणासाठी इंजेक्शन दिल्यानंतर तसेच शस्त्रक्रियेनंतर क्वचित प्रसंगी धनुर्वात होऊ शकतो.
३) धनुर्वात बीजाणूचा शिरकाव शस्त्रक्रियेची उपकरणे, कॅटगट, मलमपट्टी करिता वापरलेले साहित्य आणि अनेक प्रकारच्या पावडर ( टाल्कम पावडर , सल्फोनामाइड पावडर ) या मार्फत होऊ शकतो. यास शस्त्रक्रियापश्चात् धनुर्वात म्हणतात.

धनुर्वात रोग प्रतिकार क्षमता:-

धनुर्वात हया रोगापासून प्रतिकारशक्ती असली तरी रोग बरा होताच धनुर्वात प्रतिबंधक दिली गेली पाहीजे .

धनुर्वात अधिशयन काळ:-

Tetanus Incubation Period in Marathi:-

३ ते २१ दिवस.

अर्भकातील धनुर्वातः-

Tetanus Meaning in Marathi, Tetanus information in Marathi, Dhanurwat, Dhanurvat Lakshana, Dhanurvat karane, Dhanurvat las, Dhanurvat rog, Dhanurvat upchar, Dhanurvat upay, tetanus in Marathi, धनुर्वात लसीकरण, धनुर्वात कारणे, धनुर्वात लक्षणे, धनुर्वात प्रतिबंध, धनुर्वात उपचार

Neonatal Tetanus in Marathi:-

भारतात अर्भकांना धनुर्वात होण्याचे प्रमाण बरेच आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे योग्यरितीने निर्जंतुक न केलेल्या उपकरणांनी नाळ कापणे आणि नाळेची स्वच्छता न ठेवणे हे होय.
मातेला गरोदरपणातच धनुर्वात लस दिली गेली तर अर्भकाला होणारा धनुर्वात टाळता येतो.

धनुर्वात लक्षणे:-

Tetanus Symptoms in Marathi, Dhanurvat Lakshane:-

धनुर्वाताच्या जिवाणुच्या विषामुळे प्रामुख्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतो.

चिन्हे व लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:-

 • स्नायूच्या आकुंचन – प्रसरण प्रसंगी खूप वेदना होतात. विशेषतः जबडयाचे स्नायू आकुंचित झाल्याने रुग्ण तोंड उघडू शकत नाही.
 • लहान बाळास धनुर्वात झाल्यास तो अंगावर दूध पिऊ शकत नाही.
 • पाठ व छातीच्या स्नायूत झटके येतात.
 • झटके येते वेळेस रुग्णाची पाठ धनुष्याच्या आकारासारखी वाकते.
 • रुग्णास ताप येतो व घाम सुटतो.
Tetanus Meaning in Marathi, Tetanus information in marathi, Dhanurwat, Dhanurvat lakshane, Dhanurvat karane, Dhanurvat las, Dhanurvat rog, Dhanurvat upchar, Dhanurvat upay, tetanus in marathi, धनुर्वात लसीकरण, धनुर्वात कारणे, धनुर्वात लक्षणे, धनुर्वात प्रतिबंध, धनुर्वात उपचार,

धनुर्वात गुंतागुंतः-

Dhanurvat Guntagunt, Tetanus Complications in Marathi:-

 • श्वसनसंस्थेचा संसर्ग व अकार्यक्षमता.
 • स्नायू आकुंचनामुळे बरगडया, ईतर हाडे व मणक्यांचा अस्थिभंग होतो.

धनुर्वात उपचार:-

Dhanurvat Upay, Dhanurvat Upchar, Tetanus Treatment in Marathi:-

 • जखम असल्यास जखमेची स्वच्छता करावी. सर्व जखमाना पुरेसे स्वच्छ ठेवणे आवश्यक प्रतिजैविके द्यावीत.
 • झटक्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता स्नायू शिथिल करण्याचे अथवा गुंगीचे औषध देण्यात येते.
 • रुग्णाला कृत्रिम श्वसनाची आवश्यकता भासल्यास अतिदक्षता विभागात ठेवले जाते
 • रुग्णाला धनुर्वातापासून तात्पुरते संरक्षण मिळण्याकरिता धनुर्वात विरोधी मानवी प्रतिपिंडे / धनुर्वात विरोधी रक्तद्रव दिले जाते.
 • रुग्ण बरा झाल्यावर धनुर्वात विरोधी लस टोचून लसीकरण करावे.

धनुर्वात प्रतिबंधनः-

Dhanurvat Pratibandh, Tetanus Prevention in Marathi:-

बालकांचे लसीकरण विगुणी लस ( डी.पी.टी ):-

Dhanurvat Lasikaran, Tetanus Vaccination in Marathi:-

१) विगुणी लस देऊन ( डी.पी.टी ) या रोगाचा प्रतिबंध करता येतो. वयाच्या सहाव्या आठवडयापासून सुरुवात करुन एक महिन्याच्या अंतराने या लसीच्या तीन ( ६ , १० व १४ आठवडे ) मात्रा देतात.

२) त्यानंतर वयाच्या दीड ते दोन वर्षात पहिला बुस्टर डोज व वयाच्या पाचव्या ते सहाव्या वर्षात दुसरा बुस्टर डोज देतात.

३) याशिवाय १० व्या व १६ व्या वर्षी धनुर्वात विरोधी लसीची मात्रा द्यावी.

गरोदर मातांंचे लसीकरण:-

Dhanurvat Garodarpanat Lasikaran, Pregnancy Tetanus Vaccination in Marathi:-

१) सर्व गरोदर मातांंना धनुर्वात विरोधी लसीच्या मात्रा देऊन धनुर्वात ह्या रोगास प्रतिबंध करावा.

२) त्यामुळे त्यांचे व त्यांच्या बाळाचे धनुर्वातापासुन संरक्षण होईल.

३) गरोदर मातांना ह्या लसीची चौथ्या व पाचव्या महिन्याला अशी प्रत्येकी एक मात्रा देतात.

४) त्यानंतर पुढील ५ वर्ष गर्भधारा झाल्यास फक्त एकच बुस्टर मात्रा देण्यात येते.

५) पहिल्या बाळंतपणानंतर पाच वर्षापक्षा जास्त कालावधी झाल्यास दोन मात्रा द्याव्यात.

स्वच्छता व निर्जंतुकिकरण:-

Tetanus Sterilization in Marathi:-

१) विशेषत: मातीत व धुळीत हे जीवाणू मोठ्या संख्येने असतात. गायी, म्हशी, घोडे, कुत्रे इ. प्राण्यांच्या आतड्यांत व विष्ठेतही हे जीवाणू असतात. जखम ह्या घटकांच्या संंपर्कात येऊ देऊ नये.

२) प्रसूतीच्या वेळी स्वच्छतेची काळजी घ्यावी. नेहमी निर्जंतुक केलेले साहित्य वापरावे.

३) प्रसूती करणा-या व्यक्तीचे हात, प्रसूतीची जागा, नाळ बांधण्याचा धागा, नाळ कापण्याकरिता वापरावयाचे ब्लेड स्वच्छ व निर्जतुक असावे.
४) तसेच बाळाच्या नाळेवर शेण, माती अथवा इतर पदार्थ लावू नये.

५) या व्यतिरिक्त अर्भकातील धनुर्वात टाळण्याकरिता प्रसूती शक्यतो दवाखान्यात करावी किंवा प्रशिक्षित व्यक्तीकडून करावी.

धनुर्वात प्रतिबंधन व आरोग्य शिक्षणः-

Health Education for Tetanus in Marathi:-

खालील मुद्यावर जनतेला आरोग्य शिक्षण द्यावे.
१. सर्व मुलांचे व गरोदर स्त्रियांचे लसीकरण केल्यास धनुर्वाताचे प्रतिबंधन करता येते.
२. जखमा झाल्यास योग्य ती काळजी घेऊन आवश्यकतेनुसार लसीकरण करावे.
३. जखमांवर अथवा अर्भकाच्या नाळेवर शेण, माती वा इतर पदार्थ नयेत.
४. प्रसूती प्रशिक्षित व्यक्तीकडून करावी.
५. प्रसूतीच्या वेळी डिस्पोजेबल डिलीवरी किटचा वापर करावा.
६. प्रसुती रुग्णालयातच करावी.

Copyright Material Don't Copy © 2020

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023