हत्तीपाय, हत्तीरोग कारणे, हत्तीरोग लक्षणे, हत्तीरोग प्रतिबंध, हत्तीरोग उपचार, Filariasis in Marathi,Hatti Rog Medicine, Hatti Pay, Lymphatic Filariasis in Marathi, Elephantiasis in Marathi, Marathi Doctor, www.marathidoctor.com
हत्तीरोग, हत्तीपाय लिम्फैटीरक फायलेरीयासिस (Lymphatic Filariasis in Marathi) यालाच हत्तीरोग या सामान्य नावाने ओळखले जाते. हा एक शरीर विदूप करणारा, शरीर अकार्यक्षम करणारा रोग असून. हत्तीरोग (Filariasis in Marathi) हा डासांच्या चाव्याव्दारे पसरतो.
खालील लेखात हत्तीरोग, हत्तीपाय आजार कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार संक्रमणाचा धोका कशाला असतो? हत्तीरोगाची लक्षणे काय आहेत? हे संक्रमण मी कसे टाळू शकतो? हत्तीरोगावर कोणते उपाय आहेत? Filariasis in Marathi, Hatti Pay, Hatti Rog Medicine इत्यादि हत्तीरोग, हत्तीपाय आजाराची सर्व माहिती दिलेली आहे.
अनुक्रमणिका
What Filariasis in Marathi? What is Filariasis Meaning in Marathi?
हा बूचेरेरीया बँक्रोफ्टी आणि ब्रूजीया मलायी नावाच्या परजीवी जंतूमुळे होणारा आणि डासामुळे प्रसारित होणारा रोग आहे . हया रोगाचा प्रसार क्युलेक्स जातीच्या डासदंशामुळे होतो.
हत्तीरोग ही जागतिक समस्या आहे. जगातील १२० कोटी लोकसंख्येचा भाग हत्तीरोगग्रस्त आहे. ८० देशातील ६० कोटी लोकांना या रोगाची लागण झालेली आहे.
भारतातील समस्या:-
हत्तीरोग ही भारतातील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण समस्या आहे. हा रोग देशभर पसरलेला आहे.
त्यातल्या त्यात जास्त प्रमाण असलेली राज्ये म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार झारखंड, आंध्र प्रदेश, ओरिसा, तामीळनाड, केरळ, गुजरात.
आजमितीस भारतात ५०० कोटी लोक हत्तीरोगग्रस्त प्रदेशात वास्तव्य करतात.
बूचेरेरिया बँक्रोफ्टी आणि ब्रुजीया मलायी. भारतात वूचेरेरिया बॅक्रोफ्टीमुळे होणारा हत्तीरोग प्राधान्याने आढळतो.
भारतातील हत्तीरोगाच्या एकूण प्रमाणात या हत्तीरोगाचा वाटा ९८ टक्के इतका आहे.
Information About Filariasis in Marathi, Filariasis in Marathi information, Lymphatic Filariasis Meaning in Marathi:-
रक्तात मायक्रोफायलेरिया असतात अशा व्यक्ती . एकदा हत्तीरोग पूर्ण विकसित झाला की नंतर मात्र त्या रुग्णाच्या रक्तामध्ये जंतू सापडणे कठीण असते .
Hatti Rog kasa hoto? Spread of Filariasis in Marathi:-
संसर्गक्षम सूक्ष्मअळया सोंडेमध्ये असलेला डास चावला की रोगाचा प्रसार होतो . दोन प्रकारच्या डासांमुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो
अ ) क्युलेक्स फटिगन्स – बॅक्रॉफ्टीयन हत्तीरोग
ब ) मान्सानॉइडीस – मलायन हत्तीरोग
५ ते १० महीने –
हत्तीपाय आजाराचे जंतूनी शरीरात प्रवेश केल्यानंंतर आजाराची लक्षणे निर्माण होण्यास ५ ते १० महिने लागतात.
Symptoms of Filariasis in Marathi, Hatti Rog Symptoms in Marathi:-
या रोगातील प्रमुख लक्षणे म्हणजे – वारंवार येणारा ताप आणि जननेंद्रिये, पाय, हात यावर बेढब व अवाजवी सूज येते. हा रोग प्राणघातक नसला तरीही त्याच्यामुळे व्यंग निर्माण होवून शारीरिक कार्यक्षमता कमी होते.
चार अवस्था:-
हत्तीरोगग्रस्त भागात राहत असूनही लोकांच्या रक्तात रोगजंतूच्या सूक्ष्मअळया किंवा लक्षणे दिसत नाहीत.
रक्ताच्या तपासणीत रोगजंतूच्या सूक्ष्म अळया दिसतात मात्र रोगाची कोणतीही लक्षणे व चिन्हे दिसत नाहीत.
या अवस्थेमध्ये ताप, लसीकाग्रंथीदाह, लसीकाग्रंथीस सूज, पुरुषामध्ये वृपणदाह इ. लक्षणे दिसून येतात.
हात, पायावर सूज
बाहय – जननेंद्रियांवर सूज, हायड्रोसील, काइल्युरिया ( Chyluria )
How to Prevent Filariasis in marathi?
खरे तर हत्तीरोगास मानव – निर्मित रोगच म्हणावयास हवे. या रोगाचा प्रसार अस्वच्छ वातावरण आणि सांडपाण्याची अयोग्य विल्हेवाट यांच्याशी तो, त्यामुळेच या नियंत्रणासाठी सर्वसामान्य आरोग्य शिक्षण फार महत्वपूर्ण ठरते.
आजकाल हत्तीरोग नियंत्रणासाठी प्राथमिक आरोग्य सेवेकडे साधन म्हणून पाहिले जाते.
Diagnosis of Lymphatic Filariasis in Marathi:-
हतीरोग जंतूच्या विशिष्ट सवयीमुळे हे जंतू मानवी रक्तात रात्री मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे रात्री ८.३० ते १२ दरम्यान रक्तनमूना घेऊन तपासणी केल्यानंतर हत्तीरोगाचे निदान करता येते.
Treatment of Lymphatic Filariasis in Marathi:-
केवळ हेटोंझान ( डायइथील कावामायझिन हेच औषध हत्तीरोग संसर्ग विरोधात परिणामकारक आहे . हे औषध शरीर वजनाच्या प्रत्येक किलोमागे ६ मि.ग्रॅ . एवढया प्रमाणात दररोज याप्रमाणे दोन आठवडयात बारा दिवस ( एकूण १२ मात्रा ) देतात.
हे औषध ज्याप्रमाणे दररोज ( आठवडयात सहा दिवस असे दोन आठवडे ) किंवा आठवडयातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असेही देता येते.
या औषधामुळे मायक्रोफायलेरिया तर मरतातच पण प्रौढ जंतू देखील बहुतेक मरतात .
डायईथील कार्बामायझिनयुक्त ( DEC ) मीठात प्रति किलो १ ते ४ ग्राम डि. इ.सी मिसळतात, या मीठाचे सेवन ६ ते ९ महिने करावे लागते.
हा एक स्वस्त व परिणामकारक उपाय आहे. लक्षव्दीप येथे डि.इ.सी. युक्त मीठाचा प्रयोग करण्यात आलेला असून याचे परिणाम खूप चांगले मिळाले. इतर ठिकाणी सुध्दा याचा प्रयोग करता येऊ शकतो.
हतीरोग होण्यासाठी अनेक महिने ते वर्षापर्यंत अनेकवेळा डास चावणे आवश्यक असते.
ज्या भागामधे या रोगाचे प्राबल्य आहे अशा ठिकाणी राहणा-या लोकांना संक्रमणाचा अधिक धोका असतो.
What are the Symptoms of Filariasis in Marathi?
How to Prevent Filariasis in marathi?
Treatment of Filariasis in marathi:-
ज्या लोकांना प्रौढ अळ्यांचा संसर्ग झाला आहे. त्यांनी रक्तात फिरणा-या सूक्ष्म जतूना मारण्यासाठी औषधाचा ( डीईसी ) एक वार्षिक डोस घ्यावा.
हा डोस प्रौढ अळ्यांना मारत नसला तरी त्यामुळे संसर्गग्रस्त लोकांकडून इतराना रोगाचा प्रसार होणे टाळले जाते.
प्रौढ अळ्या मेल्या तरीही लिम्फोडीमा होऊ शकतो. लिम्फोडीमा आणखी बळावू नये म्हणून अनेक मूलभूत तत्वे पाळता येतील, ती अशी सुजलेला भाग दररोज साबण आणि पाण्याने त्वचा धुवा, कोणत्याही जखमेवर विषाणू – विरोधी क्रीम लावा.
सुजलेला हात किंवा पाय उच धरा आणि त्याला व्यायाम गा म्हणजे द्राव हालता राहील आणि लसिकांचा प्रवाह सुधारेल.
आजकाल हत्तीरोग नियंत्रणासाठी सरकारी प्राथमिक आरोग्य सेवेकडे साधन म्हणून पाहिले जाते.
प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More
प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More
प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More
प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More
प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More
ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More