एच. आय. व्ही. – एड्स कारणे, लक्षणे, प्रसार, प्रतिबंध HIV Symptoms in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

एच. आय. व्ही. – एड्स HIV AIDS म्हणजे “अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम” होय. एच.आय.व्ही. विषाणूच्या संसर्गामुळे होणारी ही एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. एड्‌स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. HIV Symptoms in Marathi

खालील लेखात एड्स ( AIDS ) रोगाचे स्वरुप, एच. आय. व्ही. – एड्स चा इतिहास, प्रसार कसा होतो?, एच आय व्ही – एड्स ची लक्षणे, HIV Symptoms in Marathi, निदान, प्रतिबंध, नियंत्रण, एचआयव्ही विंडो पिरीयड म्हणजे काय ?, एचआयव्ही बाधित व्यक्तिनी घ्यावयाची काळजी व एड्स नियंत्रण कार्यक्रम इत्यादि माहिती दिलेली आहे.

एच. आय. व्ही. (HIV) एड्स ( AIDS ) रोगाचे स्वरुप:-

विषाणू संसर्गामुळे रोगप्रतिकार शक्तीच्या कमतरतेमुळे बाधा झालेल्या रोगांचा समूह म्हणजे एड्स रोग होय. हा रोग प्राणघातक असून हयुमन इम्युनो डेफिशियन्सी ( HIV ) विषाणूमुळे होतो.

  • A for Acquired = ओढविलेला , मिळालेला
  • I for Immuno = रोगप्रतिकार शक्ती
  • D for Deficiency = कमतरता किंवा नष्ट होणे
  • S for Syndrome = लक्षणांचा समूह

एच. आय. व्ही. – एड्स चा इतिहास:-

HIV AIDS in Marathi, History of HIV in Marathi:-

इ.स. १९८१ मध्ये अमेरिकेत सर्वप्रथम एड्स हया रोगाची नोंद झाली असून आज हा रोग जगभर आढळतो.

भारतात एड्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद इ.स. १९८६ मध्ये तामिळनाडू राज्यात झाली होती.

एच. आय. व्ही. – एड्स चा प्रसार कसा होतो?

Transmission of HIV AIDS in Marathi:-

एच. आय. व्ही. एड्सचा प्रसार खालील मार्गाने होतो:-

अ ) लैंगिक सबंधाद्वारे:-

लैंगिक प्रसार ही एड्स प्रसाराची सर्वसामान्य पध्दत असून लैंगिक सबंधातून वीर्याद्वारे व योनीतील स्रावाद्वारे प्रसार होतो.

ब ) रक्तावाटे प्रसार:-

रक्तसंक्रमण, इंजेक्शसाठी वापरण्यात येणा-या सुया व पिचका-यांचा योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण न केल्यास, डॉक्टर व परिचारिकांच्या हातांना जखमा असतांना एच. आय. व्ही. बाधित रुग्णाच्या रक्ताशी संपर्क आल्यास, मादक पदार्थांचे इंजेक्शन एकाच दुषित सुईने घेतल्यास.

क ) प्रसूती कालावधीतील प्रसार:-

गरोदर माता एचआयव्ही बाधित मातेकडून गर्भास अथवा अर्भकास त्याचा संसर्ग होतो.

अधिशयन काळ:-

काही महिन्यांपासून सहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष हा एच. आय. व्ही. चा अधिशयन काळ आहे.

एच. आय. व्ही. – एड्स ची लक्षणे:-

Symptoms of HIV in Marathi, HIV Symptoms in Marathi, HIV Lakshan in Marathi:-

एच. आय. व्ही. एड्स लक्षणे, एच. आय. व्ही. लक्षणे, एड्स लक्षणे, HIV Symptoms in Marathi, HIV Lakshane Marathi

एच. आय. व्ही. – एड्स ची प्रमुख लक्षणे:-

१) एका महिन्यात शरीराच्या वजनाच्या १० टक्यापेक्षा जास्त वजन कमी होणे.

२) एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीची असलेली हगवण (जुलाब)

३) एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अधूनमधून अथवा सलग येणारा ताप

एच. आय. व्ही. – एड्स ची इतर लक्षणे:-

Symptoms of HIV AIDS in Marathi, HIV AIDS Symptoms in Marathi, HIV AIDS Lakshan in Marathi:-:-

  • एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा सतत खोकला .
  • तोंड व घशातील बुरशी रोग
  • संपूर्ण शरीरावर त्वचेची खाज
  • शरीरातील लसीका ग्रंथीवर सूज
  • श्वसनदाह व क्षयरोगासारखे इतर जिवाणू संसर्ग
  • वजन कमी होणे (६ महिन्यात १० किलोपेक्षा जास्त)
  • वारंवार तोंड येणे
  • वारंवार जुलाब
  • वारंवार आजारी पडणे
  • अंगावर लालसर डाग येणे

ही सर्व एच. आय. व्ही. लक्षणे साध्या रोगांत दिसून येतात त्यामुळे वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे संक्रमण निश्चित खात्री येत नाही.

एच. आय. व्ही. – एड्स चे निदान कसे केले जाते?

Diagnosis of HIV AIDS in Marathi, HIV AIDS Test in Marathi:-

रक्ततपासणी ( ELISA ) उपचार : विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. परंतु लक्षणानुसार उपचार देण्यात येतो. उदा . क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास क्षयरोगाचा उपचार दिला जातो.

संदर्भ सेवा : रुग्णात वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास संशयित एड्स रुग्ण समजून रक्ताची एच.आय.व्ही . तपासणीसाठी सामान्य रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाची रवानगी करावी.

एच. आय. व्ही. – एड्स चे प्रतिबंधन व नियंत्रण कसे करावे?

Prevention of HIV AIDS in Marathi, HIV Marathi Madhe Mahiti:-

१) आरोग्य शिक्षण –

उपचार किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे . सर्वसामान्य जनतेला एड्सबाबत अद्ययावत माहिती देवून जनजागृती करता येते . रोगप्रसार टाळण्याकरिता अनैतिक लैंगिक सबंध टाळणे , निरोधचा वापर करणे इ.बाबत आरोग्य शिक्षण द्यावे .

२) रक्त किंवा रक्तघटक रुग्णाला देण्यापूर्वी रक्ताची एच.आय.व्ही.साठी तपासणी करावी .

३) एड्स संशयितांची प्रथम एलायझा तपासणी करावी .

४) एच.आय.व्ही . विषाणूची बाधा झालेल्या स्त्रीने गर्भधारणा टाळावी.

५) अनेक स्त्रियांशी / पुरुषांशी शरीर संबंध न ठेवता आपल्या पत्नीशी / पतिशी एकनिष्ठ असावे व समलिंगी शरीर सबंध ठेऊ नये.

६) रक्तदान, वीर्यदान, अवयवदान करण्यापूर्वी दात्यांची एलायझा तपासणी करावी.

७) निर्जंतुकीकरण केलेल्याच सुया व सिरिंजेस वापराव्या. एड्स आजाराकरिता हमखास असे औषध व प्रतिबंधनात्मक लस देखील उपलब्ध नाही.

एच.आय.व्ही. चा प्रसार खालील माध्यमातून होत नाही:-

HIV AIDS in Marathi, HIV Marathi Madhe Mahiti:-

१) हवा, पाणी, व अन्न सामाजिक संपर्कातून उदा. हस्तांदोलन, आलिंगन याद्वारे एच.आय.व्ही. चा प्रसार होत नाही.

२) कामकाजाच्या ठिकाणी इतर सहका-याच्या सोबत बसण्याने, त्यांनी वापरलेला टेलिफोन, टाईपरायटर, इतर वस्तू यांचा वापर केल्याने एच.आय.व्ही. चा प्रसार होत नाही.

३) एच.आय.व्ही. चे प्रमाण घाम, अश्रूमध्ये अत्यल्प असते. त्यामुळे एकत्र खेळल्याने, एकच संडास, मुतारी, स्नानगृह व पोहण्याचे तलाव अनेक व्यक्तींनी वापरल्याने, खोकल्यातून / शिंकण्यातून एच.आय.व्ही. चा प्रसार होत नाही.

एच. आय. व्ही. विंडो पिरीयड म्हणजे काय ?

Window Period of HIV in Marathi, HIV in Marathi:-

एचआयव्हीच्या चाचणीमध्ये एचआयव्हीचे विषाणू दिसत नाहीत तर शरीरात प्रवेश केलेल्या एचआयव्हीच्या विरुध्द शरीराच्या संरक्षणासाठी तयार झालेली प्रतिपिंडे दिसून येतात. त्यावरुन चाचणीचा निकाल निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह मानला जातो .

एचआयव्ही चाचणीकरता तीन वेगवेगळया प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात. जर एखाद्या व्यक्तिच्या रक्तांत प्रतिपिंडे आढळली नाहीत तर ती चाचणी नकारार्थी किंवा निगेटिव्ह धरली जाते. अशा व्यक्तिला तीन महिन्यांने परत चाचणीकरिता बोलावले जाते.

जर एखाद्या व्यक्तिच्या रक्तात पहिल्या चाचणीमध्ये प्रतिपिंडे आढळली तर आणखी दोन चाचण्याकरुन त्यामध्ये प्रतिपिंडे आढळली तरच चाचणीचा निष्कर्ष होकारार्थी मानला जातो.

एच. आय. व्ही. बाधित व्यक्तिनी घ्यावयाची काळजी:-

Advice for HIV Positive Patient:-

१) संतुलित आहार घ्यावा, आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, कडधान्ये व प्रथिनांचा जास्त समावेश असावा. योग्य आहारामुळे शरीराचे आजारांपासून संरक्षण होईल.

२) योग्य व्यायाम यामुळे ताण तणावापासून दूर रहाण्यांसम मदत होते. पुर्वीसारखे काम चालू ठेवणे जरुरीचे आहे.

३) जर काही आजार झाल्यास तज्ञ डॉक्टरांची मदत घ्या, डॉक्टर सांगतील त्या प्रमाणे नियमित औषधोपचार घ्यावेत.

४) शारिरीक संबंधाच्या वेळी निरोधचा वापर करणे.

५) दारु, सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर रहावे.

एड्स नियंत्रण कार्यक्रम:-

HIV AIDS Program in Marathi:-

एड्स रोगावर लस व प्रभावी औषधी नसल्याने रोग होऊ न देणे हाच रोगप्रसारास प्रभावी आळा घालण्याचा एकमेव मार्ग आहे. देशात झपाट्याने होणारा रोगाचा प्रसार व त्यास बळी पडलेल्या तरुण / तरुणीची संख्या लक्षात घेऊन भारताने इ.स. १९८५ साली एड्स समस्येवर एक अभ्यास गट नेमला.

ह्या गटाने सादर केलेल्या अहवालानुसार देशभरात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम १९८७ साली सुरु करण्यात आला. इ.स .१९९२ साली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था उभारली व त्यांच्याकडे एड्स नियंत्रण कार्यक्रमाची ( NACO ) जबाबदारी सोपवली.

लग्न आणि ब्लडग्रुप, Same Blood Group Marriage Problems in Marathi
Copyright Material Don't Copy © 2020